शिघ्रपतनवर उपाय start stop start
सौजन्य : विक्की डोनर
पहिला आठवडा – हस्तमैथुन करायला लागायचं पण वीर्यपतन होऊ द्यायचं नाही. वीर्यपतन व्हायची वेळ आली की इतर कोणते तरी (अध्यात्मिक?) विचार करून लिंगाचा ताठरपणा घालवून द्यायचा. परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करायचं व परत हीच क्रिया करायची. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन करून किंवा संभोग करून वीर्यपतन करायचं नाही. या टप्प्यात हळूहळू पुरुषाने त्याच्या वीर्यपतनावरचं नियंत्रण सुटण्याचा बिंदू ओळखायला लागायचं. कोणत्या क्षणानंतर आपला संयम सुटणार हे त्याने व्यवस्थित ओळखायला शिकावं.
दुसरा आठवडा – जोडीदाराने शीघ्रपतन होणाऱ्या व्यक्तीला हस्तमैथुन करण्यास सहाय्य करावं. जसा वीर्य पतनाचा क्षण जवळ तसा पुरुषाने जोडीदाराला थांबवावं. थोडा अवधी जाऊ द्यावा आणि लिंग शिथिल झालं की परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करावं व परत हीच प्रक्रिया करावी. असं दररोज तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.
तिसरा आठवडा – पुरुषाने पाठीवर झोपायचं. लैंगिक उत्तेजना येऊन लिंग उत्तेजित झालं की जोडीदाराने आपल्या योनीचा स्पर्श लिंगाला करावा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर त्या क्षणी तिथेच विराम घ्यावा. हळूहळू लिंगाचा योनी प्रवेश करवून या स्थितीत काही वेळ जावू द्यावा. लिंग शिथिल होऊ द्यावे आणि परत लिंग उत्तेजित करून योनी प्रवेशी स्थितीत यावे पण नंतर कुठलीही हालचाल करू नये. हीच स्थिती १० ते १५ मिनिटे कायम ठेवावी. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करावं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.
चौथा आठवडा – वरील टप्प्यात एक बदल करायचा. आता लिंगाला योनीप्रवेशी स्थितीत काही मिनिटं तरी राहण्याची सवय झालेली असते. या टप्प्यात स्त्री जोडीदाराने लिंगाचा योनीप्रवेश झाल्यानंतर हळूहळू खाली वर अशी हालचाल करायची. वीर्यपतन होतंय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी पुरुष जोडीदाराने ही हालचाल थांबवावी. वीर्य पतनाची भावना गेल्यानंतर परत हालचाल पूर्ववत करावी. असं १० मिनिटे दररोज पुढचा एक आठवडा करायचं. या टप्प्यात पुरुषाचा संभोग कालावधी वाढलेला दिसतो.
पाचवा आठवडा – स्त्रीने पाठीवर झोपायचं. पुरुषाने उत्तेजित लिंगाचा योनी प्रवेश करावा. जर वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर अल्प विराम घ्यावा आणि वीर्यपतनाची भावना गेल्यानंतर परत लिंग आत घालण्याचा प्रयत्न करावा. लिंग योनीत असताना हळूहळू हालचाल करावी. वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर परत थोडा वेळ थांबावे. वीर्यपतनाची इच्छा गेल्यानंतर परत ‘स्ट्रोक’ सुरु करायचे.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
१. सबुरी हवी. घाई घाईत पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करू नका.
२. काही वेळा एक टप्पा पार करताना अपयश येतं. याचा अर्थ पूर्वीच्या टप्प्यात अजून सुधारणा हवी. इथं दिलेला ‘एक आठवडा’ असा प्रत्येक टप्प्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो.
३. संभोगाचा कालावधी वाढला की काही महिने/वर्षानंतर काही जणांचं परत लवकर वीर्यपतन सुरु होतं. अशा वेळी परत वरील टप्प्यांचा वापर करून संभोगाचा कालावधी वाढवायचा प्रयत्न करावा.
इतर काही पद्धती
१. डबल निरोधचा वापर – निरोध वापरून संवेदनशीलता कमी होते म्हणून काहीजण डबल निरोध वापरून संभोगाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करून बघतात.
२.ऍनेस्थेटीक जेली – काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी ऍनेस्थेटीक जेली लिंगाला लावून लिंग काही अंशी बधिर करून संभोग करतात. या रसायनामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो. पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते व संभोगातून कमी सुख मिळतं. अशा प्रकारचं रसायन निरोधाच्या वंगणात वापरून संभोगाचा कालावधी वाढवणारे निरोध बनवले जातात. या ‘एक्स्ट्रा टाईम’ निरोधाच्या वंगणात अशा तर्हेचं ऍनेस्थेटीक रसायन मिसळलेलं असतं.
समाप्त
No comments:
Post a Comment