कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -4
कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग ४
हवालदार प्रमोद, इ. रवीना फोन करून सांगतो मुलीची ओळख पटली नाव गिरीजा वामन शिर्सेकर.
कोकणातली गाव (माडबन), वय वर्षे 22. महर्षी कॉलेजमध्ये शिकते आहे.
राहायला बदलापूर (ईस्ट).
.....
इ. रवी जरा वेळाने पोलीस चौकित येत डॉक्टर सुरेखास फोन लाउन सांगतात वॉर्ड नंबर १२, रूम नंबर २ ची ओळख पटली आहे. मी जरा वेळाने त्यांच्या कुटुंबाना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आहे. तुम्ही आता हॉस्पिटल मध्ये या.
....
रुपाली आणि बाबा ह्यांना हाँस्पिटलमध्ये घेऊन जातत. दोघे जण बघतात गिरीजा ऍडमिट असते.
...…
बाबा, शोभा ला फोन लाउन सगळे सांगून हॉस्पिटलमध्ये बोलवतात.
डॉक्टरना भेटून विचारतात आता कशी आहे.
......
डॉक्टर बोलतात मार मजबूत लागला आहे. कधी शुद्धीत येईल ते आता सांगता येऊ शकत नाही. हाताची नस तर चालु आहे पण हृदय बंद आहे. मला तुम्हाला सांगायला वाईट वाटते की ती कोमात गेली आहे बघुया २४ तास.
तुम्ही डॉक्टर सुरेखाना भेटा तेच हिला बघतात आहे.
.........
इथे पोलीस आईला आणि रुपलीला प्रश्न विचारत असतात.
रुपाली बोलते असे तिचे वैर कोणाशी नाही आहे. ती महर्षी कॉलेजमध्ये शिकते आहे. नंतर कॉलेज सुटल्यावर ती पार्ट टाइम जॉब करते. कॉफी इन या शॉपमध्ये ३ ते १० या वेळेत.
......
चल मुली मी जातो असे आजोबा बोलून निघून जात बोलतात आता तूच बघ तिला आणि ह्या मुलीला बोलून अदृश्य होतात
......
आता
चार दिवसा नंतर.
नमस्कार माझे नाव लेकेश राऊत. नाव जरा विचित्र आहे. माझे वय 23 मी महर्षी कॉलेजमध्ये शिकतो आहे. मु. पोस्ट (मीठगावाने).
.......
ही गोष्ट कालची मला तो दिवस आजून आठवतो आहे. तिचा कॉलेजचा पहिला दिवस.
मी आणि माझा ग्रुप कॉलेजच्या एन्ट्रीवरच्या स्टेरच्या पायऱ्यांवर बसलो होतो.
म्हणजे मी या ग्रुपमध्ये नवीनच जॉईन झालो आहे. काय, प्रेम, दिया, मयूर, आणि गिरीजाचे फक्त नाव ऐकले आजुन बघितले नाही आणि हे मला तिच्या बद्दल सांगत पण नाही, कळेल कधी तरी मला.
.........
समोरून ती आपले केस सांभाळत येत होती. पांढरा शुभ्र ड्रेस,त्याच्या वर पांढरी ओढनी, ओठावर लाल कलरची लिपस्टिक, डोळ्यात काजल, जश जशी ती पुढे येत होती तसे तिचे रूप समोर येत होते. डोळे हिरवे, ओठच्या खाली लहानसा तीळ आजूनच तीच्या रुपात तो उठून दिसत होता. मला एक समजत नव्हते, एवढी हवा पण नव्हती त्या दिवशी तरी तिचे केस कसे हलत होते.
ती माझ्या समोर येऊन मला विचारले की प्रिंसिपाल सरांनचे केबिन कुठे आहे. ती मला काय बोलते आहे त्यावर माझे लक्षच नव्हते.
मी तिच्या डोळ्यात एक टक बघतच राहिलो होतो माहिती नाही का. तिची डोळाची नजरच तीक्ष्ण होती की माझ्या डोळ्याच्या आरपार जात होती. असे वाटत होते की ती मला तिच्या नजरने आपल्याकडे खेचून घेत होती.
तिने मला परत विचारले सरांचे केबिन कुठे आहे, तुमचे नाव. बोलून तिने आपले डोळे बंद करून परत उघडले.
तसा मी शुद्धीत आलो आणि बोललो माझे नाव लेकेश राऊत आणि सरांचे केबिन पहिल्या फ्लोअरवर राईटसाईडला आहे.
.........
तेवड्यात ती बोलली पण तुमचे नाव तर बोलून निघून जाते.
........
प्रेम बोलतो स्वप्नातून बाहेर ये रे बोक्या काय बघत होता तिच्याकडे जशी कधी मुलगी बघितली नाही. तशी कार ग, काया.
........
काया बोलते होरे काय तिच्या नजरेत टक लावून बघत होता रे.
.......
दिया बोलते काय रे तिला तू ओळखतो. तुझे नाव तर लेकेश राऊत आहे ना मग ती तुला अजू आहे असे का बोलून गेली.
.....
मयूर बोलतो काही नाही ग घरचे नाव असेल आणि कोणी तरी नात्याची असेल. आणि हा बोक्या कसा बघत होता. तिच्याकडे तिला खाऊ की गिळू या भुक्या नजरेने.
........
लेकेश बोलतो गप्प बसा काही पण बोलतात आहे.
......
तेवढ्यात ती येऊन लेकेशला बोलते thanks अजू राऊत. बायद वे माझे नाव सुरेखा.
......
प्रेम बोलतो माझे नाव.
.......
सुरेखा बोलते हो माहिती आहे मला तुमच्या सगळ्यांची नाव. मी तुमचा ग्रुप जॉईन करू का. तुमच्या ग्रुपला **प्रेमकागदीले** ने ओळखतात ना आणि मयुरला बोलते तुझ्या गर्लफ्रेंडच्या बर्थडेला तलाक दिला का गिफ्ट.
.......
काया बोलते हो चालेल ना रे लेकेश ऊर्फ अजू बोलून हसायला लागते.
.......
सुरेखा बोलते चला मी निघते उद्या भेटू चला सगळे बोलून निघून जात लेकेशकडे हसून जाते.
.......
प्रेम बोलतो काया ही तर नवीन ऍडमिशन आणि पहिल्यांदा आपल्याशी बोलली तर हिला तीन दिवसा अगोदर गिरीजा बोलून जे गेली होती. ती ही कशी बोलून गेली ग.
.....
काया बोलते तेच मी विचार करते आहे. हा तर नवीन आहे लेकेश.
.....
दिया लेकेशला बोलते जाणा तिला सोडायला समोरून एक मुलगी रिस्पॉन्स देते आहे तर जा ना माठ मेला बोलून त्याला ढकलत बोलते जा आणि सुरेखाला हाक मारते अग थांब तुला हा सोडेल त्याच्या बाईक वरून जा रे ठोंब्या.
.......
लेकेश दियाकडे रागात बघून तिला हो आलोच बोलून बाईककडे निघून, बाईक स्टार्ट करून तिच्याकडे घेऊन जाऊन बोलतो बस.
.....
सुरेखा पाठी बसून बोलते हो बसली. पण बाईक हळू चालव मी पहिल्यांदाच बसली आहे.
......
लेकेश बोलतो हो हळूच चालवतो आणि बाईक चालवत बोलतो, माझे नाव लेकेश आहे.
.....
सुरेखा बोलते हो का. आजून सवय गेली नाही आहे म्हंटले चालवताना बोलायची तुमची. समजेल हळू हळू.
.......
लेकेश बोलतो हो समजले पत्ता सांगा कुठे सोडायचे तुला नाही तर असेच फिरवत राहशील.
.....
हो माहिती आहे सांगते "आपटे वाडी बंगला चाकण" समजले का आणि माहिती आहे ना कुठे आहे तो.
....
लेकेश बोलतो हो माहिती आहे. गावाची हद्द संपते तिथे भूत बंगला. आजून कुठले घर भेटले नाही का तुला.
.........
सुरेखा बोलते घरात चल ना.
.......
लेकेश बोलतो नको जा तू.
......
सूरेखा हसत निघून घरात जाते.
.......
इथे पोलीस गिरीजाच्या कॉफी इन शॉपमध्ये इनकाँयरी येत शाँपच्या मालकास विचारपूस करून निघून जातात.
.......
रात्रीचे ९.०० वाजले असतील सुरेखा
आसन गावी आपली गाडी घेऊन स्मशानभूमीचा फेरफटका लाऊन निघून जात परत रात्री १२.३० ला परत स्मशानभूमीत येत तिथे असलेल्या गुरखास बोलते मला जरा पाणी देतात का .
.....
तो गुरखा बोलतो हो याना आत बोलून आपल्या खोलीत जातो.
......
तशी सुरेखा त्याच्या पाठी येत घराचा दरवाजा बंद करत बोलते. पाठ मोरी बोलते ओळखले का रे रघु मला.
.......
रघु मॅम काय करतात आहेत तुम्ही दरवाजा का बंद केला आणि कोण आहेत तुम्ही मी नाही ओळखले तुम्हाला.
.......
अरे रघु असा काय करतोस अरे मी गिरीजा बोलून पाठी वळते.
.......
रघु ते रूप बघून पाण्याचा ग्लास खाली पडत तसा तो पण खाली पडत बोलतो तू मेलीस आ आ आहेस हे कसे शक्य आहे. ती कोण आहे.
......
ते तुला काय करायचे आहे बोलत गिरीजा जश जशी पुढे जाते.
.....
तस तसा रघु सरकत पाठी जातो.
......
गिरीजा बोलते अरे किती पाठी सरकत जाणार तू. शेवटी तुला आज मरायचे आहे.
.....
रघु बोलतो मला माफ कर मला त्यांनी जरा पैसे दिल्या मुळे मी मदत केली. मला कसे शोधून काढलेस तू. मी तर कोणालाच माझा ठाव ठिकाण नाही सांगितला.
......
गिरीजा बोलते जाऊदे ते. बोलून आपला हात हवेत वर करते तसा रघु हवेत तरंगत आपली मान हाताने पकडत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो. तशी गिरीजा त्याला भिंती वर फेकते.
तसा रघु भिंतीवर आढळून खाली पडत आपले डोके पकडतो.
गिरीजा बोलते मी पण तेच बोलत होती ना सोडा मला, पण कोणी ऐकले का नाही ना. मग मी पण का ऐकू, तू पण असेच माझी मान पकडून भिंतीवर आपटलेसना.
असे बोलून त्याच्या शरीरात प्रवेश करून जोर जोरात भिंतीवर डोके आपटतत बसते. जीत पर्यंत रघूचा जीव जात नाही तिथं पर्यंत.
जरा वेळाने गिरीजा त्याच्यात शरीरातून बाहेर येत सुरेखाच्या शरीरात प्रवेश करते, तशी सुरेखा बोलते. अरे ह्या मुलीने पुर्ण चेंदा केला मेंदूचा बोलुन बाहेर येत आपल्या गाडीत बसुन निघुन जाते.
......
पुढे गेल्यावर एका शांत ठिकाणी गाडी थांबवत बोलते गिरीजा बाहेर ये अगोदर.
......
सुरेखाला एक झटका लागल्या सारखे होत गिरीजा बाहेर येते.
......
सूरेखा, गिरीजला बोलते हे असे कोण मारते का. तू त्याला पोलिसांनच्या ताब्यात पण दिले असते ना.
.......
गिरीजा बोलते हो दिले असते काय फायदा झाला असता. तीन वर्षानी बाहेर आला असता म्हणून त्याला संपवले.
एक प्रश्न विचारू का तुला हा इथे आहे हे तुला कसे समजले.
.......
सूरेखा बोलते मला खूप विद्या येतात. त्यातली एक विद्या मी वापरली.
......
गिरीजा बोलते कुठली ग.
.....
सुरेखा बोलते ही बिराटी विद्या होती.
कुठे कोणती वस्तू ,बाहुली,तोडगा ,ओलांडा पूरला असेल तर ह्याने शोध घेतला जातो.भूत प्रेत तांत्रिक क्रियांचा शोध घेतला जातो. हे सगळे मी माझ्या बाबान कडून शिकले आहे. समजले की बाऊनसर गेले. चल आता निघुया बस तिथेच आता. माझे अंग दुखाते आहे.
......
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गिरीजला चेक करत बाबांना बोलतात. मिरँकल बाबा ही जरा जरा रीस्पॉंड्स देते आहे बघा हा मॉनिटर मेंदू जरा वर्क करतो आहे.
क्रमश.
No comments:
Post a Comment