योगी महाराज सांगत असलेली सर्व कथा ऐकताना तेजा थोडीशी घाबरलीच होती. कारण अशा भयानक गोष्टीचा तिला आजवर कधीच अनुभव आला न्हवता आणि अशी कोणतीही गोष्ट तिने आजवर ऐकलीहि न्हवती. तिने न राहवून मधेच एक गोष्ट योगी महाराजांना विचारली.. कि आपणास हे सर्व कसे माहित. यावर योगी महाराजांनी घडलेली सर्व घटना ऐकशील तेव्हा त्यातच तुला समजेल हे आणि योगी महाराज पुढे आपली कथा सांगू लागले.
"राणीसाहेब आपल्या खाजगीच्या महालात चिंतेत बसलेल्या होत्या. त्याचवेळी योगी महाराज राजवाड्यावर दाखल झाले. वाटेत असतानाच त्यांना घडलेली घटना सांगण्यात आली होती. ते येताच तडक राणीसाहेबांच्या खाजगीच्या दालनाकडे रावण झाले. वीरसेनला त्यांच्या दालनात अराम करण्यास सोडले होते.
योगी महाराज : प्रणाम राणीसाहेब..
राणीसाहबे : योगी महाराज आपण आलात. या आम्ही आपलीच वाट पाहत होतो. झालेला वृतान्त तुमच्या कानावर पडला असेलच.
योगी महाराज : हो राणीसाहेब. सर्व घटना मला समजली. राजकुमार वीरसेन कसे आहेत आता?
राणीसाहेब : ते ठीकच आहेत. एकूण सर्व पाहता त्यांच्या मनावर याचा खप मोठा आघात झाला आहे असे वाटत आहे पण जस कि तुम्हाला माहिती आहेच कि त्यांचे हेतू धोकादायक होते आणि अजूनही ते असतीलच यात शंका नाही.
योगी महाराज : आपण बरोबर बोललात राणीसाहेब. कालच माझ्या एका शिष्याने वीरसेन याना कोण्या अनोळख्या व्यक्तींसोबत पाहिले होते. पण असेल कोणीतरी म्हणून त्याने दुर्लक्ष केले होते. तरीही त्याने ती गोष्ट माझ्या कानावर घातली आणि आज हा प्रकार घडला हि.
राणीसाहेब : म्हणजे आपणास काय सूचित करायचे आहे योगी महाराज.
योगी महाराज : राणीसाहेब... आपण खूप मोठ्या संकंटात सापडलो आहोत हे आपण लक्षात घ्यावे. बंदिस्त असणाऱ्या काळ्या शक्ती आता मुक्त संचार करीत आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा पकड मिळवणे खूपच कठीण आहे. आता काय होणार आहे हे दैव जाणे.
राणीसाहेब : योगी महाराज आपण जाणते आहेत. वडिलांच्या काळातही आपण नेहमी त्यांना राज्यावरील आलेल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी अनेक मार्ग सुचवले आहेत. यावेळीही आपली गरज आम्हास आहे. काय करावे आम्हाला काहीच सुचत नाहीये. अदृश्य रूपातील या काळ्या शक्तींना तोंड देण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे की नाही हाच सवाल आम्हाला सतावतो आहे.
योगी महाराज : राणीसाहेब... आपण विसरत आहे कदाचित, पण मला मात्र सर्व ज्ञात आहे. मुळात चंदननगर राज्यात आपला जन्म झाला मुली तो याच कारणासाठी.. या काळ्या शक्तीचा नायनाट करण्यासाठीच तर आपला जन्म झाला आहे. आपली कुंडली मी पहिली आहे. त्यानुसार त्या काळ्या शक्तींना फक्त आपणच संपवू शकता हे आपण लक्षात घ्यावे.
राणीसाहेब : हे मी खूपवेळा तुमच्या कडून ऐकले आहे महाराज. पण मला असा कोणताही बदल अथवा अपार शक्तीची जाणीव आजवर झाली नाही.
योगी महाराज : राणीसाहेब वेळ आणि काळ हे परमेश्वराने निश्चित केलेले गणित आहे. कदाचित हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमचे सामर्थ्य पानास लावायचे आहे आणि हाच तो काळ आहे जिथे आपल्यातील दैवी शक्तींना मार्ग मिळणार आहे.

दोघांचे संभाषण सुरु असतानाच अचानक राजवाड्यात आरडाओरडा सुरु झाला. भयानक अशा आर्त किंकाळ्या कानावर पडू लागल्या. योगी महाराज आणि राणीसाहेब दालनातून धावतच बाहेर आले. जिकडे तिकडे सर्वजण सैरावैरा धावत होते. काय चालले आहे काहीच समजण्यास मार्ग न्हवता. सैरावैरा पाळणाऱ्यातील एका दासीला थांबवून राणीसाहेबानी विचारपूस केली असता वीरसेन यांच्या दालनाकडे काहीतरी भयानक घटना घडत आहेत अशी माहिती त्यांना मिळाली राणीसाहेब आणि योगी महाराज पुढे झाले. समोरचे दृश्य पाहून त्या दोघांनाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही.
वीरसेन दालनात अराम करत असतानाच मुक्त संचार करणाऱ्या काळ्या शक्तीने राजवाड्यात प्रवेश केला. तिला आपले सावज माहित होतेच. कारण त्यानेच तर तिला मुक्त केले होते. ती त्याच्या शोधातच तिथवर आली होती. जोवर ती त्या शरीरात प्रवेश करणार न्हवती तोवर तिचा प्रभाव कोणालाच जाणवणार न्हवता. राजवाड्यातील एक एक दालन पाहत ती काळी शक्ती अखेरीस वीरसेनच्या दालनापाशी आली. त्या दालनात प्रवेश करताच तिला तिचे सावज समोरच दिसले. क्षणाचाही विलंब न लावता ती काली शक्ती वीरसेनच्या शरीरात समाविष्ट झाली. झोपेत असणाऱ्या वीरसनेला काही समजायच्या आतच त्या काळ्या शक्तीने त्याच्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आणि सुरु झाला एक महाभयंकर खेळ. वीरसेनने अचानक अक्राळ विक्राळ असे रूप धारण केले आणि दालनातून बाहेर पडला. त्याचा तो अवतार खूपच स्तिमित करणारा होता. मानवी रूप सोडून तो एका अमानवी रूपात परिवर्तित झाला होता आणि समोर येईल त्याला मारून त्याच्या नरडीचा घोट घेत होता. रक्तासाठी आसुसलेल्या रानटी कोल्हयांसारखा तो समोर दिसेल त्याच्यावर तुटून पडत होता. त्याचा तो अवतार पाहूनच जो तो सैरावैरा धावू लागला. वाट मिळेल तिकडे पळू लागला. एव्हाना त्याने कितीतरी सेवक आणि सैनिकांना यमसदनी धाडले होते.
त्याचा तोच अवतार आता योगी महाराज आणि राणीसाहेबांच्या समोर आला होता. राणीसाहेबाना पाहताच तो आणखीन क्रूर झाला आणि हल्ला करण्यास पुढे सरसावला. तोच योगी महाराजांनी इशारा केला आणि राणीसाहेबाना घेऊन राजवाड्यातील मोकळ्या पटांगणात पलायन केले. त्यांच्या पाठोपाठ तो सैतानहि आलाच होता. राणीसाहेबाना वाचवण्यासाठी अनेक सैनिक आता पटांगणात दाखल झाले होते. त्या सैतानावर त्यांनी प्रतिहल्ला करण्यास सुरवात केली. तसे त्याने अजून महाकाय असे रूप धारण केले आणि क्षणात तो अनेक सैनिकांना मारू लागला. त्याच्या पुढे सर्व सैनिकांचे बळ अपुरे पडत होते पण जो तो आवेगाने आणि आवेशाने लढत होता. हे सर्व पाहणाऱ्या राणीसाहेबाना आता मात्र त्या सैतानाचा राग येऊ लागला. आजवर अनेक युद्ध जिंकलेली अकल्पिता या सैतानपुढे हार मानूच शकत नाही याची जाणीव राणीसाहेबाना झाली आणि आपले राज्य वाचवण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. त्या सैतानाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला यात त्या दूर फरफटत गेल्या. "तू माझं काहीच बिघडू शकत नाहीस अकल्पिता" असं बोलत तो सैतान पुन्हा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी इकडे योगी महाराजांनी परमेश्वराचे ध्यान चालू केले आणि आराधना सुरु केली. काहीही करून राणीसाहेबाना त्यांच्याकडे असणारी दैवी शक्तीची जाणीव होणे गरजेचे होते. योगी महाराज डोळे बंद करून आराधनेत लिन झाले. इकडे सैतान पुन्हा हल्ला करण्यास सरसावला पण राणीसाहेबानी यावेळी त्याला चकवा दिला. तसा तो आणखीनच संतापला आणि रागाने तिथे असणाऱ्या वस्तूंची तोडफोड करू लागला. यातच स्वतःला त्याच्यापासून वाचवत पाळणाऱ्या राणीसाहेबाना एक जोरदार झटका बसला आणि त्या समोर असणाऱ्या महादेवाच्या पिंडीजवळ फेकल्या गेल्या. त्या पिंडीतून अचानक एक ऊर्जा निर्माण झाली आणि तिने राणीसाहेबांच्या शरीरात प्रवेश केला. अचानक राणीसाहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली. तेजाने त्यांचा चेहरा उजळून गेला होता. ते तेज सामान्य डोळयांनी पाहणे खूपच कठीण असे होते. त्यांच्या अंगात एकाकि खूप बळ जमा झाल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी आता त्या सैतानावर प्रतिहल्ला करण्यास सुरवात केली. एकामागोमाग एक असे अनेक हल्ले त्यांनी त्या सैतानावर करण्यास सुरवात केली. बघता बघता त्या सैतानाची ताकद राणीसाहेबांच्या पुढे कमकुवत वाटू लागली. अखेरीस राणीसाहेबानी आपली तलवार त्या सैतानाच्या छातीत आरपार केली. त्याचवेळी त्या काळ्या शक्तीने वीरसेनचे शरीर सोडले. वीरसेन पूर्ववत झाला. तो शुद्धीवर देखील आला. पण त्याचवेळी त्या काळ्या शक्तीने राणीसाहेबावर हल्ला केला. यामध्ये राणीसाहेबाना मोठा मार लागला आणि त्या क्षीण झाल्या.
त्याचवेळी त्या काळ्या शक्तीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण सावध असणाऱ्या राणीसाहेबानी वेळीच तिला आपल्या हातातील साखळदंडाने जखडले. तिचा नायनाट करण्यास त्या सामोऱ्या गेल्या तोच वीरसेनने पाठीमागून राणीसाहेबांवर तलवारीने वार केला. तशा त्या खाली कोसळल्या. त्याची पकड सैल होत असतानाच योगी महाराज आराधनेतून बाहेर पडले. समोर घडलेला अनर्थ पाहूनच त्यांनी आराधना थांबवली. वीरसेन पुढे सरसावला तोच राणीसाहेबानी आपल्या तलवारीने त्याचे मुंडके उडवले. योगी महाराजांनी त्या काळ्या शक्तीला पुन्हा जखडले आणि तिथेच पटांगणात असणाऱ्या त्या पिंडीखाली कायमचे बंदिस्त केले. सर्व काही ठीक आहे असे वाटत असतानाच वीरसेनची आत्मा तिथे प्रकट झाली. "तुला वाटत असेल कि तू जिंकलीस.. पण तस नाहीये.. मी पुन्हा येईल... माझी अपुरी इच्छा पूर्ण करण्यास... अकल्पिता.." असे म्हणून ती आत्मा तिथून अदृश्य झाली. तिथेच मरणावस्थेत असणाऱ्या अकल्पिताने म्हणजे राणीसाहेबानी योगी महाराजांकडे पाहिले आणि बोलू लागल्या " योगी महाराज.... ती काळी शक्ती जरी कैद झाली असली तरी तिला जागृत करणारा अजून जिवंत आहे आणि तो त्याचा प्रतिशोध घेण्यास पुन्हा येईल हे सत्य आहे. तो जेव्हा कधी परत येईल तेव्हा मी पुन्हा जन्म घेईनच. पण माझा शोध पुन्हा घेता यावा यासाठी आपणास मात्र अमर राहावं लागेल. मला मिळालेल्या दैवी ऊर्जेतील उरलेला हा एक अंश आज मी तुम्हास देत आहे. तो नेहमीच तुमच्यासोबत राहील. जोवर या काळ्या शक्तीचा आणि वीरसेनचा पूर्ण नायनाट होत नाही तोवर तुम्ही अमर आहात." इतकेच बोलून राणीसाहेब मरण पावल्या....
क्रमशः
No comments:
Post a Comment