कथेचे_नाव_अकल्पिता....एक शापित रहस्य....!!!- By दिपशेखर..
भाग_2
रात्री पाहिलेले स्वप्न तेजाच्या डोक्यात अजुनही घोळत होत. ती स्त्री कोण असावी? आपल्याच घरात अडगळीच्या खोलीत पडलेली ती पेटी त्या स्वप्नात का बरे दिसली असावी? तो त्यांचा संवाद आणि ते विव्हळणारे आवाज नेमके काय असावे हे सर्व? काल अडगळीच्या खोलीतली ती पेटी रात्री प्रकाशमान का झाली? आईने मला त्या पेटीपासून दुर रहायला का सांगितल? असे अनेक प्रश्न एकाच वेळी तेजाला पडले होते. त्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे तिला मिळत न्हवती त्यामूळे ती खुपच वैतागली होती. आजवर कधी ही न घडलेल्या गोष्टी ती अनुभवत होती. हे नक्कीच काहीतरी वेगळे असावे हे तिला सारख वाटत होते आणि तसा विचार ही ती करु लागली होती. त्या विचारात तिच मन जास्त घोळू लागल आणि त्याचा त्रासही तिला होऊ लागला म्हणून तिने सर्व काही विसरुन कविता लिहण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच कॉलेज मधून घरी परत येताना असणार्या बागेत आली. तिच डोक थोड शांत झाल. ती एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसली आणि तिने कविता लिहायची वही बैगमधून बाहेर काढली. ती विचार करु लागली आज काय लिहाव? प्रेम.. तो तर रोजचाच विषय आहे. ती अजुन विचार करु लागली... तोच वर्याची एक मोठी झुळुक आली आणि वहिची पाने फडफड करत पलटू लागली. तेजाचे केस ही त्या झुळकीने उडू लागले. कसे बेस केस सावरत ती केसाना पिन लावत होती तोच तिच लक्ष त्या पाने पलटलेल्या वहीकडे गेल आणि ती तिथेच स्तब्ध झाली.
'अरे... ही कोणती कविता आहे.? मी तर नाही लिहली.'
त्या पानावर असलेली ती कविता पाहून तेजा स्वताशीच बोलली. तिने केस सावरले आणि ती कविता वाचायला घेतली.... कवितेच शीर्षक ही विचित्र होत..
अनामिक ओढ...
(अरे बापरे.. कसले शीर्षक आहे हे.. तेजा मनातच बोलत होती.)
(अरे बापरे.. कसले शीर्षक आहे हे.. तेजा मनातच बोलत होती.)
स्वप्नात तू जे पाहिले
मनात त्याची ओढ तुला,
तुला जाणून घ्यायची
ही अनामिक ओढ मला...
मनात त्याची ओढ तुला,
तुला जाणून घ्यायची
ही अनामिक ओढ मला...
सत्य होते ते की स्वप्न
कोडे उलगडले नाही तुला,
नीट विचार करुन पहा
स्वप्नात पाहिले तू मला.....
कोडे उलगडले नाही तुला,
नीट विचार करुन पहा
स्वप्नात पाहिले तू मला.....
पाहिलेली तू ती पेटी
आठवत असेलच तुला,
एकवेळ येऊन भेट
मुक्तता मिळेल तेव्हा मला...
आठवत असेलच तुला,
एकवेळ येऊन भेट
मुक्तता मिळेल तेव्हा मला...
कोण असेन मी हा
प्रश्न आताही पडला तुला,
अनामिक अकल्पित सत्य मी
समजेल जेव्हा भेटशील मला....
प्रश्न आताही पडला तुला,
अनामिक अकल्पित सत्य मी
समजेल जेव्हा भेटशील मला....
****अकल्पिता******
ते शेवटच नाव वाचल आणि तेजाला खुप मोठा धक्का बसला. कारण हेच नाव काल तिने त्या पेटीवर वाचल होत आणि आज तेच नाव चक्क तिच्या वहीमधे होत. तिला हे ही माहित होत की ही कविता तिची नाहिये. ही कविता तिच्या कालच्या स्वप्नाची आहे आणि या कवितेतून तिला कोणीतर संदेश देत आहे. हे ही तिला जाणवू लागल होत. बापरे हा काय भयानक प्रकार आहे. तेजाला काही समजेना. तिने पटापट वही बैगमधे परत ठेवली आणि धावतच ती गाडीकडे आली. काहीही करुन आता तिला घरी पोहचायच होत. ती सैरभैर झाली होती आणि तिच डोक आता वेगळ्याच धुंदित होत. नेहमी पेक्षा आज तिच्या गाडीचा वेग जरा जास्तच होता. हे तिलाही जाणवत होत पण मनात असुनही ती गाडीचा वेग कमी करु शकत न्हवती. काहीतर होत आहे आपल्यासोबत हे कळत असुनही ती काहिच करु शकत न्हवती.
घराच्या जवळ येताच गाडी गेटच्या थोडे मागेच थांबवुन तेजा खाली उतरली. तिने इकडे तिकडे पाहिले रस्त्याच्या दोन्ही बाजुला कोणीच न्हवते. आई झोपली असणार हे ही तिला माहित होत. ती हळुच पुढे झाली आणि आईच्या खोलीच्या खिडकीचा अंदाज घेत तिने गेट हलक्या हातानी उघडले. थोडाही आवाज झाला नाही पाहिजे याची पूर्ण काळजी तिने घेतली. ती हळुच आत आली आणि दरवाजा होता तसा बंद करुन ती झपझप अडगळीच्या खोलीकडे आली. खोलीला कुलुप लावलेल होत. ते पाहुन ती जरा नाराजच झाली पण तिला लगेच आठवल की खोलीची चावी तिथेच दरवाजा वरती ठेवलेली असते. तिने हात वरती केला आणि पाहू लागली. तिची उंची पुरत नसल्यामुळे नेमकी चावी कुठे आहे ते तिला समजेना. इकडून तिकडे हात फिरवत असताना अचानकच तिच्या हाताला ती चावी लागली आणि खाली पडली. चावी दिसताच एक वेगळीच चमक तिच्या नजरेत आली. तिने पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहिले आणि खोलीचा दरवाजा उघडला. आत जाताच तिने ती पेटी शोधली. पण पेटीच कुलुप पाहुन तिला पुन्हा राग आला. कारण ते एकदम विचित्र अस होत. त्याला चावी लावायला जागाच न्हवती. फक्त एकमेकात अडकलेले कप्पे होते जे हातानी सुटत न्हवते. ती खुप खटाटोप करु लागली पण काही केल्या ती पेटी उघडत न्हवती. काही वेळ तसाच गेला आणि ती एका जागी शांत बसली. मगापासून चाललेल्या खटाटोपात ती वैतागली होती म्हणून मागे असणार्या भिंतीला ती टेकली तोच एक आवाज झाला आणि समोरच्या भिंतीमधे एक कप्पा उघडला. जेव्हा ती मागे टेकली तेव्हा भिंतीत असणारी कळ दाबली गेली आणि तो समोरचा कप्पा उघडला. त्या कप्प्यात एक सुर्याच्या आकाराच गोल नाणे होते. ते हातात घेउन तेजा निरखून पाहू लागली. तोच तिची नजर त्या पेटीवर गेली आणि तिला आनंद झाला. त्या पेटीच्या वरच्या बाजूला सुर्याच्या आकाराची एक खाच होती. तिने ते नाणे त्या खाचेत बसवले तशी त्या पेटीला असणारे सर्व कप्पे एक एक करुन उघडू लागले. खट खट..खट.. असे आवाज होत होते आणि ती पेटी उघडत होती. शेवटी एक खट्ट.. आवाज झाला आणि तेजोमय असा प्रकाश त्या पेटीतून बाहेर पडला. तो प्रकाश इतका तीव्र होता की तेजाचे डोळे बंदच झाले. ती ते पाहूही शकत न्हवती. तिने दोन्ही डोळे हातानी गच्च दाबून घेतलेले. अचानक तिच्या कानात एक पुसट आवाज आला...
"तुझी नी माझी भेट घडावी... म्हणूनच मी आले... कोण मी.... अकल्पिता......."
तेजाने तो आवाज ऐकून डोळे उघडले तेव्हा तिने इकडे तिकडे पाहिले तर ती त्या बागेतच होती. तिला काही समजेना काय होत आहे. तिच डोक जड झाले होते. ती उठली आणि घराकडे आली.
धाड..... गेटचा दरवाजा जोरात वाजला. तशी तेजाच्या आईची झोपमोड झाली. आज परत ती खोडकर मुले गेटवर उड्या मारत असणार या विचारानेच आई उठली आणि खिडकीपाशी आली. ती काही बोलणार इतक्यात तिला दिसल की तेजाच आहे जी नुकतीच आत आली आहे. काही क्षण आई तिथेच थांबली आणि तेजाच निरीक्षण करु लागली. तेजाने आत येताच गाडी रोजच्या जागी न लावता वाटेतच आडवी लावली. गेटच दार तसच उघड होत. ते बंद न करता ती आत येऊ लागली. तशी आई वरुन ओरडली..
"तेजा... अग काय करत आहेस. ते गेटच दार कोण बंद करणार? आणि ही गाडी अशी वाटेत का लावली आहेस.?"
तो आवाज ऐकताच तेजाने वरती आईकडे पाहिले. तिची नजर आईवर जाताच आई दचकली.. लालभडक डोळे.. चेहर्यावर एकप्रकारचा राग.. नजरेत एक वेगळीच भणक होती... तेजाने एक दिर्घश्वास घेतला आणि ती गेट कडे परत गेली. तिने गेटचे दार बंद केले आणि गाडीही नेहमीप्रमाणे लावली. तिने परत वरती आईकडे पाहिले. आईने कसबस चेहर्यावर हसू आणल तशी तेजा थोडी मवाळ झाली आणि आत आली.
"तेजा... अग काय करत आहेस. ते गेटच दार कोण बंद करणार? आणि ही गाडी अशी वाटेत का लावली आहेस.?"
तो आवाज ऐकताच तेजाने वरती आईकडे पाहिले. तिची नजर आईवर जाताच आई दचकली.. लालभडक डोळे.. चेहर्यावर एकप्रकारचा राग.. नजरेत एक वेगळीच भणक होती... तेजाने एक दिर्घश्वास घेतला आणि ती गेट कडे परत गेली. तिने गेटचे दार बंद केले आणि गाडीही नेहमीप्रमाणे लावली. तिने परत वरती आईकडे पाहिले. आईने कसबस चेहर्यावर हसू आणल तशी तेजा थोडी मवाळ झाली आणि आत आली.
** तेजा सोबत असे विचित्र प्रकार घडण्या अगोदर 15 दिवस......
******************************************
चंदननगर.... हिमालयाच्या दुरवर पसरलेल्या बर्फाळ रांगाच्या एका शेवटच्या टप्प्यात असलेल गाव.. गाव म्हणणे तसे चुकीचे.. हे नगर आजवर ओळखल गेल ते त्याच्या अनोख्या इतिहासासाठीच.. या नगरावर आजही तेथील ईतिहासाचा प्रभाव जास्त होता आणि आहे.. पुर्वी जसे राजे आपआपले राज्य पाहत तसेच काहिसे चित्र या नगराचे होते. आजही इथे नगराचा सर्व कारभार हा राजघराण्यात असणार्या वरसामार्फत चालवला जातो. हे नगर म्हणजे खर तर पृथ्वीवरिल स्वर्गच.. निसर्गाच्या अद्भूत कलाकारीने सजलेला एक अजब देखावा.. अगदी छोटस अस हे नगर हिमालयातील घनदाट पसरलेल्या जंगलात एका टेकडीवर वसलेल. त्यामूळे जगाशी काय तो संपर्क फार कमीच होता. थोडेफार लोक बाहेर पडले पण त्यानी परत नगरात येणच पसंद केल. चोहोबाजुला पसरलेल घनदाट जंगल.. लाल.. निळ्या.. पिवळ्या.. गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलानी या नगराच्या भोवताली सडाच टाकलेला जणु.. आणि तो ही कायमचाच.. नगराच्या अगदी मधोमध वाहणार निळाशार असा झरा... आणि त्या झर्याच्या दोन्ही बाजुला वसलेली छोटीछोटी घरे... टप्प्यावर टप्पे मांडत जावे तसे हे नगर खालपासून वरपर्यंत टेकडीवर वसलेल होत. टेकडीवर सर्वात वर एक खुप मोठा महाल होता.. जो तेथील राजाचा होता.. सध्या तिथे राज्य करत असलेल्या राजाच नाव अमन होत.. नावाप्रमाणे आपल्या या छोट्याश्या नगरामधे सर्वत्र अमन म्हणजेच शांती कायम ठेवण्यात हा राजा यशस्वी झाला होता.. इथली प्रजाही तितकीच सुखी आणि समृध्द होती.. एकुण पाहता राज्यपाट अतिशय सुरेख आणि सुरळित चालू होता.. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला जशी नजर ही लागतेच तशी या नगराला सुधा नजर लागलीच...
******************************************
चंदननगर.... हिमालयाच्या दुरवर पसरलेल्या बर्फाळ रांगाच्या एका शेवटच्या टप्प्यात असलेल गाव.. गाव म्हणणे तसे चुकीचे.. हे नगर आजवर ओळखल गेल ते त्याच्या अनोख्या इतिहासासाठीच.. या नगरावर आजही तेथील ईतिहासाचा प्रभाव जास्त होता आणि आहे.. पुर्वी जसे राजे आपआपले राज्य पाहत तसेच काहिसे चित्र या नगराचे होते. आजही इथे नगराचा सर्व कारभार हा राजघराण्यात असणार्या वरसामार्फत चालवला जातो. हे नगर म्हणजे खर तर पृथ्वीवरिल स्वर्गच.. निसर्गाच्या अद्भूत कलाकारीने सजलेला एक अजब देखावा.. अगदी छोटस अस हे नगर हिमालयातील घनदाट पसरलेल्या जंगलात एका टेकडीवर वसलेल. त्यामूळे जगाशी काय तो संपर्क फार कमीच होता. थोडेफार लोक बाहेर पडले पण त्यानी परत नगरात येणच पसंद केल. चोहोबाजुला पसरलेल घनदाट जंगल.. लाल.. निळ्या.. पिवळ्या.. गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलानी या नगराच्या भोवताली सडाच टाकलेला जणु.. आणि तो ही कायमचाच.. नगराच्या अगदी मधोमध वाहणार निळाशार असा झरा... आणि त्या झर्याच्या दोन्ही बाजुला वसलेली छोटीछोटी घरे... टप्प्यावर टप्पे मांडत जावे तसे हे नगर खालपासून वरपर्यंत टेकडीवर वसलेल होत. टेकडीवर सर्वात वर एक खुप मोठा महाल होता.. जो तेथील राजाचा होता.. सध्या तिथे राज्य करत असलेल्या राजाच नाव अमन होत.. नावाप्रमाणे आपल्या या छोट्याश्या नगरामधे सर्वत्र अमन म्हणजेच शांती कायम ठेवण्यात हा राजा यशस्वी झाला होता.. इथली प्रजाही तितकीच सुखी आणि समृध्द होती.. एकुण पाहता राज्यपाट अतिशय सुरेख आणि सुरळित चालू होता.. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला जशी नजर ही लागतेच तशी या नगराला सुधा नजर लागलीच...
गेल्या काही दिवसापासून नगरामधे भितीग्रस्त वातवरण तयार झाले होते आणि त्याचे कारणही तसेच होते. नगराच्या मागच्या बाजुला असणार्या घनदाट अरण्यात गेल्या काही दिवसा पासुन खुपच चित्र विचित्र आवाज येत होते. या आवाजाचे कारण शोधण्यासाठी नगरातुन राजाच्या आदेश वरुन काही लोक बाहेर पडले. एकुण सहा लोक बाहेर गेले होते त्यापैकी एकच व्यक्ती सुखरुप परत आली होती. पण ती व्यक्ती अर्धमेल्या अवस्थेत होती आणि नेमके काय घडले ते सांगू शकली न्हवती. तो व्यक्ती पुर्ण शुध्दीवर येण्याची वाट पाहणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राजाकडे न्हवता. त्यामूळे जो तो वाट पाहण्यात गुंग होता. राज महालामधे आसणारे वैद्य ती व्यक्ती शुध्दीवर यावी यासाठी आटोकाट प्रयत्न करित होते. पण म्हणावे तसे यश प्राप्त होत न्हवते. सर्व काही आता त्या परमेश्वराच्या हातात होते. अहोरात्र पुजा आरत्या.. होम.. चालू होते.
आज सकाळीच नगरामधे एक योगी महाराज आल्याची बातमी राजाला कळाली. राजाला हे थोड नवलच वाटल आणि म्हणून त्यानी राजगुरुशी यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आणि ते तडक राजगुरुच्या निवास कक्षाकडे निघाले. राजा तिथे पोहचताच द्वारपालने तशी माहिती राजगुरुना कळवली.
राजा : राजगुरु क्षमा असावी. तुम्हास अचानक असा त्रास देत आहोत.
राजगुरु : राजे.. आपले स्वागत आहे. यावे..
राजगुरु : राजे.. आपले स्वागत आहे. यावे..
राजा आतमधे तर आले. पण काय बोलावे आणि कशी सुरवात करावी हेच त्याना समजत न्हवते. त्यांचा तो पेच राजगुरुनी ओळखला.
राजगुरु: राजे.. जे काही आपल्या मनात आहे ते बिनदिक्कत बोलावे. असे संकोचून जाऊ नका.
राजा: राजगुरु आपल्या राज्यात आज सकाळीच एका योगी महाराजांचे आगमन झाले आहे असे आम्हास कळले आहे. राहून राहून आम्हास असे वाटत आहे की हे योगी महाराज आपल्याला सध्या ज्या प्रसंगाला आपण तोंड देत आहोत यावर काहीतरी मार्ग नक्कीच सुचवतील. आपले याबाबत काय म्हणणे आहे?
राजगुरु : योगी महाराज. राजे हा तर योगायोगच म्हणावा लागेल. आपले म्हणणे अगदीच योग्य आहे. आपण तुर्त त्यांची भेट घ्यावी. कदाचित हा मार्गही असू शकतो या संकटावर. मीही आपल्या सोबत येतो. चला.
राजा आणि राजगुरु दोघेही क्षणाचाही विलंब न करता योगी महाराजांच्या भेटीसाठी बाहेर पडले. जेव्हा ते दोघे तिथे पोहचले तेव्हा योगी महाराज भगवान शंकराची पुजा करण्यात व्यस्त होते. राजा आणि राजगुरुही त्या पुजत इतर लोकासोबत सहभागी झाले. योगी महाराज पुजेमधे पुर्ण तल्लीन होते. राजा योगी महाराजांचे निरिक्षण करु लागला. भगवे वस्त्र धारण केलेले त्यानी. पांढरी शुभ्र दाढी जी खुपच लांब होती आणि केस ही तसेच पांढरे शुभ्र.. केस एकत्र बांधलेले होते. सडपातळ बांधा पण आवाज करारी होता. चेहर्यावर असणारे तेज उजळून दिसत होते. हातात आणि गळ्यात रूद्राक्ष माळा होत्या. सर्व अंगाला भस्म लावलेले होते. राजा ते रुप पाहण्यात दंग असतानाच एक आवाज झाला आणि राजा भानावर आला..
योगी: तुम्ही दोघे याल याची मला पुर्व कल्पना होतीच. राजे अमन आणि राजगुरु सच्चिदानंद.. आपण दोघे येथे आलात मला खुप आनंद झाला. परिस्थिती ओळखून तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. यावरूनच समजते की तुम्हाला भेडसावणारे संकट किती मोठे असेल याची कल्पना तुम्हास आहे. आणि त्याच संकटावर कशी मात होईल हे सांगण्यास मी येथे आलो आहे. मी तुमचीच वाट पाहत होतो.
योगी महाराजांच्या या बोलण्याने राजा आणि राजगुरु दोघेही चक्रावले. पण समोर जे अनभिज्ञ संकट आहे त्यावर मात कशी होईल याचा मार्ग कळणार आहे म्हटल्यावर ते दोघेही सुखावले. योगी महाराज पुढे बोलू लागले.
योगी : राजा या नगराचा एका ईतिहास आहे. तोच आज पुन्हा नव्याने जीवंत होत आहे. हजारो वर्षापुर्वी आलेले ते अस्मानी संकट आज पुन्हा जागृत होत आहे. वेळ खुप कमी आहे तुर्तास आपल्याकडे. त्यामुळे लवकरात लवकर तिचे आगमन होणे गरजेचे आहे.
राजा: अस्मानी संकट..? इतिहास.. आणि कोणाचे आगमन योगी महाराज... आपण काय बोलत आहात आम्हाला काही समजले नाही.
योगी : राजा हजारो वर्षापूर्वी जेव्हा त्या सैतानाचा जन्म झाला होता तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी एका स्त्रीने या नगरामधे जन्म घेतला होता. त्या सैतानाचा नायनाट करता करता त्या स्त्रीचाही त्यात मृत्यु झाला. पण त्यावेळी ती त्या सैतानाला पुर्णपणे नष्ट करु शकली नाही. त्यामूळे भविष्यात पुन्हा जर हा सैतान जागृत झालाच तर ती परत यावी म्हणून तिने स्वतःला एका पेटीत बंद करुन घेतले. आता वेळ आली आहे ती त्या स्त्रीला शोधायची. ती पेटी स्वता आपल्या वारसाला निवडेल.
राजा: योगी महाराज.. आपण ज्या स्त्री बद्दल बोलत आहात त्या कोण? त्यांचे नाव काय? आणि आता त्या कोठे भेटतील.
योगी : चंदननगरची तेजस्विनी....महाराणी... अकल्पिता... त्यानी पुन्हा जन्म घेतलाच आहे... आजपासुन 15 दिवसानी येणार्या पौर्णिमेला त्या जागृत होतील. त्याना येथवर आणण्याचे कार्य पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. राजा तुम्ही फक्त मी काही गोष्टी सांगत आहे त्याची तयारी करावी.
राजा: जशी आपली इच्छा योगी महाराज
नंतर योगी महाराजांनी राजाला आणि राजगुरुना योग्य त्या सुचना केल्या आणि ते बाहेर पडले.. अकल्पिताच्या शोधात......
क्रमशः
No comments:
Post a Comment