काल रात्री अचानक माझा श्वास घुसमटल्याने मला जाग आली.त्याचवेळी नाकात वळवळ झाली आणि एकापाठोपाठ सपासप सात-आठ शिंका आल्या... मी पुर्ण जागा झालो. बेडमध्ये गुडूप अंधार होता. मी बाजूचा कानोसा घेतला. बायको आणि मुलगा गाढ झोपेत होते. माझ्या शिंकांचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. त्यांनाही याची सवय झाली होती. तसं पाहायला गेलं तर मला धुळीची एलर्जी होती पण हवेत जरा जरी बदल झाला नि गारठा वाढला तरी मला शिंकांचा त्रास सुरू व्हायचा!
किती वाजले असावेत?
एक प्रश्न माझ्या मनात उमटला.
मी उशाला असलेला मोबाईल हाताने चाचपला. त्याची स्क्रीन ऑन केली. अचानक झालेल्या उजेडाने माझे डोळे एकदम दिपले .त्या अंधारात तो प्रकाश खूप तीव्र वाटत होता. किलकिल्या डोळ्यांनी वेळ पाहिली... दोन वाजून चौतीस मिनिटे झालेले होते .उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी जरा जास्त जाणवत होती. बेडरूमही थंडगार पडली होती . कुठून तरी थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. कदाचित खिडकी उघडी राहिली असेल .
मी उठलो...
खिडकी जवळ आलो... खिडकीचे पडदे बाजूला केले .खिडकीचा मधला काचेचा भाग फिक्स होता. त्याच्या बाजूचे दोन काचेची तावदाने बाहेर उघडता यायची. डाव्या बाजुचा भाग उघडा होता.
मी उठलो...
खिडकी जवळ आलो... खिडकीचे पडदे बाजूला केले .खिडकीचा मधला काचेचा भाग फिक्स होता. त्याच्या बाजूचे दोन काचेची तावदाने बाहेर उघडता यायची. डाव्या बाजुचा भाग उघडा होता.
रात्रीची ती वेळ...
मिच्च गढूळ काळोख ...
ती नीरव शांतता...
मिच्च गढूळ काळोख ...
ती नीरव शांतता...
एक अभद्र जाणीव मनाला शिवू लागली. हळूच हवेची एक झुळूक स्पर्शून गेली.
आल्हाददायक वाटण्याऐवजी त्यातला अनैसर्गिकपणा मला जाणवला ...
आल्हाददायक वाटण्याऐवजी त्यातला अनैसर्गिकपणा मला जाणवला ...
सर्रकन काटाच आला माझ्या अंगावर!
क्षणभर तसाच उभा राहिलो.
मला खिडकीतून तो रस्ता दिसत होता.
मी तिकडे केवळ पाहत होतो ...
माझे लक्ष नव्हते. हे पाहणे फक्त भौतिक पातळीवर होते.
माझे लक्ष नव्हते. हे पाहणे फक्त भौतिक पातळीवर होते.
आमच्या या इमारतीच्या कंपाऊंडच्या पलीकडे एक मोकळी जागा होती. त्या जागे पलीकडे चिंचेची भरपूर झाडे होती. त्या मोकळ्या जागेत प्लॉटिंग केलेले होते.बरोबर मध्ये वीस फुटी काँक्रीटचा रस्ता आणि दोन्ही बाजूला चौरसाकृती प्लॉटस् अशी रचना असावी. त्या कॉंक्रिटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कधी काळी लावलेले स्ट्रीट लाईट होते. त्यापैकी आता फक्त त्या कोपऱ्यातील एकाचा दिवा तेवढा चालू होता. बाकीचे केंव्हाच धाराशयी पडले होते.
त्या काळोख्या पार्श्वभूमीवरील त्या एकाचा मिणमिणता भकास उजेड मनात अजूनच औदासिन्य निर्माण करत होता.उदासीनतेने माझे मन व्यापून गेले.
ज्याप्रमाणे स्थिर पाण्यात छोटासा खडा टाकल्यावर त्यावर तरंग निर्माण होतात आणि ते चहुबाजूंनी पसरत जातात ... मानवी मनाचेही अगदी तसेच असते... मनाच्या पातळीवर विशिष्ट विचारांच्या लहरी उमटायला सुरुवात झाली की त्यांना कशाचेही बंधन उरत नाही...
स्थळ,काळ,वेळ,विषय,मिती...
कशाचेही...!
ते केवळ पसरत जातात ...
मी एक प्रोफेसर आहे.नुकतीच बदली होऊन येथे शिफ्ट झालो होतो.या भागात तसा नवीनच होतो. दोन दिवसांपूर्वी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता.
जरा आडबाजूला होता...
पण पहिल्या मजल्यावर होता, डिपॉझिट नाही शिवाय भाडेही इतरांपेक्षा कमी, जवळपास निम्मेच आणि मुख्य म्हणजे कॉलेजला येण्याजाण्याच्या दृष्टीने सोयीचा होता.
मग मी जास्त विचार केला नाही...
हा अडचण एकच होती...
तीन मजल्यांच्या या इमारती मध्ये राहायला फक्त आम्हीच होतो .बाकी सर्व मजले नि फ्लॅट बंद होते .
का?
माहीत नाही !
आणि माहीत करून घेण्याच्या फंदातही मी पडलो नाही.
एवढी एक 'किरकोळ' बाब सोडली तर माझ्या बजेट मध्ये फ्लॅट मिळाल्यामुळे मी खुश होतो.हळूहळू रुळत होतो.
खाडकन माझी तंद्री भंग पावली...
काय दिसले होते मला?
कसली हालचाल झाली ?
माझी विचार साखळी तुटली...
समोरच्या त्या रस्त्यावर हालचाल जाणवू लागली...
एक काळसर आकृती सरपटत होती.
मी निरखून पाहू लागलो. साधारण कुत्र्या एवढा तिचा आकार होता. आधी मला तो कुत्राच वाटला होता. पण...पण...कुत्रा सतत आकार थोडाच बदलतो...?
मी निरखून पाहू लागलो. साधारण कुत्र्या एवढा तिचा आकार होता. आधी मला तो कुत्राच वाटला होता. पण...पण...कुत्रा सतत आकार थोडाच बदलतो...?
माझ्यापासून साधारण शंभर फुटांवर तो लिबलिबीत आकार(हीन) वळवळत होता.
सजीव की निर्जीव?
मानवी की अमानवी?
प्रश्नचिन्ह?????
नेमका काय प्रकार होता तो?
भयाची एक लहर माझ्या शरीरात उसळताना मला जाणवली...
क्षणात मी भानावर आलो...
प्रथमच मला असुरक्षिततेची जाणीव झाली ...
प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी त्याप्रमाणे खिडकी लावण्यासाठी मी उजवा हात बाहेर काढला. नजर मात्र त्या आकृतीकडे होती . ज्या क्षणाला मी हात बाहेर काढला,अगदी त्याच क्षणाला ती आकृती गचकन ब्रेक लागावा तशी थांबली. माझ्या हृदयाचा ठोका चुकला.
खिडकी लावण्यासाठी बाहेर काढलेला उजवा हात तसाच बाहेर होता...
आता मला तो आत घेता येईना...
कदाचित...कदाचित...
कोणीतरी बाहेरून त्याला जखडून ठेवले होते का?
कोणी?...
आणि
का?
आणि
का?
हे विचारच मला घाम फोडायला पुरेसे होते...
मी जागच्या जागी फ्रिज झालो होतो...
इच्छा असूनही माझे स्नायू माझ्या ताब्यात नव्हते जणू कोणीतरी त्यांना अंकित केले होते...
नजर मात्र एकटक त्याच्याकडे खिळली होती...
त्याला माझे अस्थित्व जाणवले होते ?
एक एक क्षण वातावरणातील ताण वाढवत होता...
एक ...दोन...तीन...
धडाड...
बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्याने झेप घेतली...
थेट माझ्या दिशेने...
ते खिडकीवर येऊन आदळले...
सर्व इमारत थरथरली...
आवाज झाला नाही पण माझ्या हाताला धक्का मात्र बसला...
सर्व इमारत थरथरली...
आवाज झाला नाही पण माझ्या हाताला धक्का मात्र बसला...
संपूर्ण खिडकी त्याने व्यापली. माझा हात आता त्याच्यात होता.
ओलसर...किळसवाणा...नकोसा वाटणारा स्पर्श...
खल्लास…..!
अलार्मच्या आवाजाने मी जागा झालो...
अंधार...
काय भयानक स्वप्न होतं ते!
अंधार...
काय भयानक स्वप्न होतं ते!
मी बेडवर होतो...
सहा वाजले ? इतक्या लवकर...
मी वेळ पाहिली...
सहा वाजले ? इतक्या लवकर...
मी वेळ पाहिली...
दोन वाजून चौतीस मिनिटे...
मी दचकलोच...
काहीतरी चुकत आहे...अलार्म तर सहाचा लावला होता...
पुन्हा पुन्हा पाहिले...वेळ तीच होती...
मी दचकलोच...
काहीतरी चुकत आहे...अलार्म तर सहाचा लावला होता...
पुन्हा पुन्हा पाहिले...वेळ तीच होती...
दोन चौतीस...!
हे काय आहे ओलसर...
माझ्या खालील गादी अशी चिकट का वाटतेय...आणि तो तीव्र वास...हा ओलसरपणा...शी!
माझ्या खालील गादी अशी चिकट का वाटतेय...आणि तो तीव्र वास...हा ओलसरपणा...शी!
कोणीतरी माझ्याभोवती वळवळत असल्याची जाणीव मला झाली.
मी बाजूला पाहिले तर बेड रिकामा...कोणीच नाही...सविता नि सुजल गेले कुठं?
मी उठायचं प्रयत्न केला पण व्यर्थ...
छे...!
कसल्यातरी चिकट पदार्थाने मी बेडला चिकटून बसलो होतो.
त्या वासाने माझे डोके भणभणायला सुरुवात झाली होती.
मी उठायचं प्रयत्न केला पण व्यर्थ...
छे...!
कसल्यातरी चिकट पदार्थाने मी बेडला चिकटून बसलो होतो.
त्या वासाने माझे डोके भणभणायला सुरुवात झाली होती.
हळूहळू तो चिकट पदार्थ माझ्या शरीरावर पसरतोय याची जाणीव मला झाली. तोंडात शिरला तो...मी असहाय होतो.ओरडण्यासाठी तोंड उघडले पण आवाजा ऐवजी आतून चिकट पदार्थच बाहेर आला.हळूहळू मला गुदमरल्यासारखे होऊ लागले...
नाकात शिरला की काय...?
माझा श्वास अडकला...
मला ओरडायचेय...खूप ओरडायचेय...
तितक्यात एक काळी आकृती माझ्यावर झुकली...
पाठोपाठ आवाज ऐकू आला...
"अहो...! अहो...!
असे काय करताय...उठा उठा...!"
असे काय करताय...उठा उठा...!"
एखाद्या नदीचा बांध फुटल्याचे मला दिसले...पाण्याचा लोंढा माझ्यावर आला...
त्याचक्षणी मी बंधनातून मोकळा झालो नि खोलवर मोकळा श्वास घेतला ...
डोळे उघडले...
खोलीत स्वच्छ प्रकाश पडला होता ...
बायको घाबरून माझ्याकडे पाहत होती...
आणि मी जोरजोरात श्वास घेत होतो...
त्याने माझी छाती धपापत होती...
बायको घाबरून माझ्याकडे पाहत होती...
आणि मी जोरजोरात श्वास घेत होतो...
त्याने माझी छाती धपापत होती...
स्वप्न...!
पुन्हा...एकदा...
मी घाबरून घड्याळाकडे पाहिले घड्याळात वेळ होती ...
दोन चौतीस...
मला वेड लागणे बाकी होते...
उर्वरित रात्र मी जागून काढली...
नंतर विशेष काही घडले नाही.
नंतर विशेष काही घडले नाही.
***
सकाळी कॉलेजला निघालो तेव्हा जागरणाने जरासं डोकं दुखत होतं.
रात्रीचे स्वप्न होते याची खात्री झाल्याने आपण उगाच घाबरलो असे वाटू लागले.
रात्रीचे स्वप्न होते याची खात्री झाल्याने आपण उगाच घाबरलो असे वाटू लागले.
कॉलेजात आत्ता पोहचलो.एफ वाय च्या वर्गात लेक्चर आहे. वर्गात जाताच काल तयार केलेल्या नोट्स काढल्या.
धीरगंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली...
"आजचा टॉपिक आहे."
मी नोट्सवर नजर टाकली...
'अमिबा'
मी जरा सटपटलोच.रात्रीचा वळवळणारा 'तो' मला आठवला.
शरीर एकदम गरम होऊ लागले.कपाळावर घर्मबिंदू जमा होऊ लागले.
रुमाल काढण्यासाठी मी खिशात हात घातला.
खिशात काहीतरी आहे...
ओलसर...किळसवाणे...चिकट...
हा धक्का पचवणे मला अवघड आहे...
छातीत जोराची कळ निघाली नि मी धाडकन जमिनीवर कोसळलो...!
छातीत जोराची कळ निघाली नि मी धाडकन जमिनीवर कोसळलो...!
समाप्त.
(काल्पनिक कथा)
श्री.आनंद निकम
पुणे 24
पुणे 24
No comments:
Post a Comment