>टीप - सदर कथेचे copyright लेखकाकडे असुन कोणीही कथा कॉपी करू नये , तसे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो. काही सुचना असल्यास मेल करू शकता... . धन्यवाद
मेनका - भयकथा
*****
" हे बघा... तुम्ही स्वताला सावरायला हवं. आम्ही आमचे प्रयत्न करतोय... रिपोर्ट येतीलच इतक्यात.''
एका वातानुकूलित केबिन मध्ये बसलेले ते वयस्कर इसम 'ती'ला समजावत होते...
" डॉक्टर साहेब, काही करा , हवे तेवढे पैसे जाऊदेत पन माझ्या नव-याला बरं करा.." ती हात जोडून डॉक्टरांना विनंती करत होती..
" आम्ही आमचे प्रयत्न करतोय " डॉक्टरांच बोलण मधेच थांबल कारण मागे दरवाजावर कोणीतरी उभं राहून आत येण्याची परवानगी मागत होत. डॉक्टरांनी मानेनच खुणावल,
एक नर्स हातात बंद लिफापा घेऊन आत आली आणि डॉक्टरांच्या हातात तो लिफाफा दिला.. डॉक्टरांनी तो लिफाफा उघडला आणि भुवया आकसुन ते एक एक रिपोर्ट पहात होते , त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, काळजी होती... सगळे रिपोर्ट चाळुन ते समोरच्या टेबलावर ठेवत डोळ्यांवरचा चश्मा उजव्या हातात घेऊन डाव्या हाताच्या बोटांनी डोळ्यांच्या आतील कडा काही सेकंद तशाच धरल्या...
डॉक्टरांना असं चिंतीत पाहून तीच्या काळजाची धडधड वाढू लागली... पदर तोंडाला धरतच ती हुंदके देतच ती म्हणाली...
" काय झालं डॉक्टर... ते बरे होतील ना...?"
" हे बघा, तुम्ही असा धीर सोडू नका... आम्ही प्रयत्न करतोय... आणी तुम्ही कालपासून इथंच आहात, रात्रही बरीच झाली आहे.. आम्ही आहोत पेशंट जवळ... तुम्हाला विश्रांतीची गरज आहे... आपन उद्या बोलू.."
मेनका डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडली तसे डॉक्टर त्या नर्सला काहीतरी सांगताना तीनं काचेतून पाहील.....
ती तशीच व्हरांड्यातून चालत काही अंतरावर असलेल्या I.C.U. रूमजवळ आली... दरवाजावर लावलेल्या काचेतून तीनं आत पाहिलं तर तो अजून बेशुद्ध होता... त्याच्याकड पहात तीला त्याच ते रडणं, ओरडण, किंचाळण, वेदनांनी टाहो फोडण सारं काही नजरेवर येऊ लागलं... आता तो बेशुद्ध होता कारण डॉक्टरांनीच त्याला बेशुद्धीच औषध दिलं होतं... कारण शुद्धीवर येताच पुन्हा त्याचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू व्हायचा.. तीचा नवरा हाॅस्पिटलच्या बेडवर पडला होता आणि त्याला काय होतंय याच निदानही लागत नव्हतं... होय.. जरी डॉक्टर सांगत नसले तरी तीला ते समजत होत..
तीला आता अश्रू अनावर झाले, तोंडाला पदर लाऊनच ती हाॅस्पिटल मधून बाहेर पडली... आपल्या आलिशान मोटारीतून ती घरी येत होती... रात्रीचे साधारण अकरा, साडे अकरा झाले असतील.... शहराच्या दगदगीपासुन थोडं दुर असणा-या त्या आलिशान बंगल्याच्या गेटजवळ तीची मोटार येऊन थांबली.... तस मावशीनी घाईघाईतच गेट उघडल. पोर्चमधे काही आलिशान मोटारी दिमाखात उभ्या होत्या.. आपली मोटार पोर्चमधील एका मोोटारी मागे लावून चालत बंगल्याच्या आवारातील त्या गवतावर ठेवलेल्या खुर्चीत बसली... दोन दिवस हाॅस्पिटल मधे जीव थकुन गेलेला...
" मालकीण बाई.. आता कशी आहे साहेबांची तब्येत.."
मावशी काळजीनं विचारू लागली.
बंगल्याची देखभाल स्वच्छता, आणि इतर कामे करण्यासाठी बंगल्याच्या गेटजवळ एक छोटीशी खोली त्यांना रहायला दिली होती ..
" मालकीण बाई.... तुमचं कसलातरी पार्सल आलंय काल.. थांबा आणते.." एवढं बोलून मावशी आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागल्या ...
मोठा प्रशस्त बंगला होता.. कडेने साधारण चार फुट उंच असणा-या कंपाऊंडच्या भिंतीवर ठराविक अंतरावर मंद पांढरा प्रकाश देणा-या दिव्यांनी परिसर अगदी मनाला लुभावणारा भासत होता... बंगल्या समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालेल अस देखणं रुपड असणारा तो बंगला... अशा या आपल्या आलिशान बंगल्याच्या आवारातील लहानशा बागेतील हिरव्यागार गवतावर ठेवलेल्या पांढरट रंगाच्या आराम खुर्चीत ती डोळे मिटून बसली होती.. समोर टेबलवर एक दोन पुस्तक ठेवली होती... तीला पुस्तक वाचायला खूप आवडत... या एकांतात ही पुस्तकच तीचे सोबती होती...
"मालकीण बाई...?" मालु मावशी हातात कसलस पार्सल घेऊन आली होती. मेनका डोळे उघडून तीच्या कड पाहू लागली.
" बोला ना मावशी...??"
" हे पार्सल आलेलं. तुम्ही कालपासून हाॅस्पिटल मधे होता त्यामुळ द्यायच राहून गेलं.."
" मावशी आज थंडी खुप आहे हो.. जरा आग पेटवा ..." पुस्तक हातात घेत मेनका मावशीला म्हणाली आणि लगेच मावशी छोटी लाकड , काटक्या, एकत्र करू लागल्या... त्या पार्सलवर लावलेला कागद उघडू लागली.. चर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्र आवाज करत वर चिकटवलेला चिकट टेप काढला..
आत एक पुस्तक होतं... 'मेनका' एक रहस्य कथा...
पुस्तकावरच ते एका स्त्रीच हातांनी रेखाटलेल चित्र पहात ते पुस्तक समोरच्या टेबलावर ठेवत आपला मोबाईल त्या पुस्तकावर ठेवला आणि शुन्यात पहात तशीच विचार करत बसली.. आज तीच कशातच लक्ष लागत नव्हतं...
आपल्या पदराखाली झाकून ठेवलेल्या बंद मुठीत काहीतरी घट्ट आवळून धरलं होतं.. एका गर्भश्रीमंत घराण्यात वाढलेली ती मेनकेसारखीच देखणी होतीच, तर नावही मेनकाच होत.. तीच्या नितळ गो-या गालांसोबत लाडीक चाळा करणा-या लांब काळ्याभोर केसांच्या बटा पाहून कोणीही पुरुष अगदी सहज घायाळ होई... तीच्या निळसर डोळ्यात एक वेगळेच अदा होती... दोन वर्षांपूर्वी तीच लग्न झालं होतं.. आणि ज्याच्यासोबत घरच्यांनी लग्न लावून दिलं तो ही तसाच गर्भश्रिमंत... 'मनोज', तीचा नवरा... आई-वडिलांंचा ऐकुलता एक त्यामुळे फाारच बिघाडलेला.. सारी सुख अगदी पायाशी तीच्या लोळण घेत होती... पन पुरूषसत्ताक असलेल्या तीच्या सासरी ती एक सोन्यान मढवलेली बाहुली होती... हो बाहुलीच... नटवावे, सजवावे, आंजारावे, गोंजारावे, कुरवाळावे, मुरगळावे , कुस्करावे, चिरडावे. आणि हे करत असताना तीने मात्र कसलीच प्रतिक्रिया देऊ नये... जे होईल ते सहन करावं...
तीच्यातील सा-या संवेदना, आशा , आकांक्षा सारं काही मावळल होत, तीचे डोळे बंद होते पन ओघळणाऱ्या आसवांना त्या बंद पापण्यांची कवाडं बंध घालु शकत नव्हती. हाॅस्पिटलच्या बेडवर पडलेला तीचा पॅरलाईझ झालेला नवरा, जो उभा असताना पन कधी तीला सुख देऊ शकला नाही आणि आता तर धरणीला खिळल्यानंतर कुठलं सुख...
'काय आयुष्य देवाने वाढुन ठेवलय' या विचारानेच ती तासंतास एकांतात अश्रुंना वाट करून द्यायची... तीचा जीव अगदी त्रासून गेला होता... नितळ गो-या अंगावर ते ठिकठिकाणी दिसणारे काळसर चट्टे तीची सारी व्यथा सांगत होते.... ते काळे डाग जन्मजात नसले तरी शरिरावर उमटलेल्या त्या प्रत्येक डागाची एक कहाणी होती... कधी पाठीवर , कधी गळ्यावर तर कधी .......???
डोळे मिटून ती शांत बसली होती... तीला सारं काही आठवत होत....
मनोज, उंच ,देखणा शरिरानं अगदी मजबूत अगदी तीला शोभेल असा... पण लग्नानंतर काही दिवसांतच तीला त्याचा स्वभाव समजू लागला... कामाचं निमित्त सांगून रात्र रात्र बाहेर रहाणं मनोजसाठी नविन नव्हत... पन लहानसहान गोष्टींवरूनही तो तीच्यावर हात उचलू लागला होता.. पण लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला कहर झाला...
ती छान पिवळसर रंगाची साडी नेसलेली, त्यात शुभ्र मोग-याचा गजरा आपल्या काळ्याभोर केसांत घातलेला... मनोजची वाट पाहत बसली होती... तो आला... रात्रीचा एक वाजला असेल... इतका प्यायलेला की त्याला नीट उभही रहाता येत नव्हत.. काही न बोलता ती उठली आणि जेवणाच ताट लावत होती तोच पाण्याच्या ग्लासला धक्का लागला तस त्यातल थोडं पाणी मनोजच्या अंगावर उडाल... त्याला इतका संताप आला की कमरेचा पट्टा तुटला तरी तो आपल्या बायकोला मारत होता.. कसाई बकरी कापताना जशी ती मुकी जनावरं ओरडतात, किंचाळतात तशीच मेनका आरडत होती... 'मेनका' ची ही अवस्था तीची मोलकरीण, मालू रोज पहायची पन आपण नोकर माणसं. म्हणुन ती दुर्लक्ष करायची.. आपल्या छोट्या खोलीत अस्वस्थ पने तीच ओरडण ऐकत होती...यावेळी मात्र तीलाही रहावलं नाही...
मनोज झोपी गेला तशी मालु आपल्या मालकीनी साठी म्हणजे मेनका साठी जेवणाच ताट घेऊन आली...
" मालकीण बाई, मला ठाऊक आहे तुम्ही पन काही खाल्लेल नाही... वाईस खाऊन घ्या..."
भरल्या डोळ्यांनी समोर आलेल्या जेवणाच्या ताटाकडे पहात मेनका हुंदका देत म्हणाली...
'' मावशी. जेवण नसलं तरी चालेल, पण थोडं विष असेल तर खरच द्या.. निदान माझी सुटका होईल...''
"तु कीतीही प्रयत्न कर पन तु आत्महत्या करू शकणार नाहीस,
की नव-याला सोडूनही जाणार नाहीस. तुझी सुटका यातुन होणारच नाही.."
मावशीच हे उद्गार ऐकून ती सुन्नच झाली...
" असा का श्राप देताय मला..?"
"चला, सांगते.." एवढं बोलून मावशी तीला घेऊन बंगल्याच्या बाहेर आली..
तीला काहीच समजेनास झालेलं.. मनात विचारांच घोंघावणार वादळ घेऊन ती मावशीच्या मागे चालू लागली.. काही वेळातच त्या बंगल्याच्या तळघरात पोहोचल्या...मीट्ट काळोख असल्यान मावशीनं बाजुच्या भिंतीवरच वाईटच बटन दाबल... जुनं पुराण विखुरलेल साहीत्य पहात मेनका चालु लागली...
' समोर काही अंतरावरच एक जुनं लाकडी कपाट होतं... मावशीन आवाज न करता हळुवारपणे त्या कपाटाच दार उघडल.. आणी मेनका त्या कपाटात डोकावली... भुवया आकसुन ती सारं पहात होती पन तीला काही समजेना... तीनं आपल्या मोबाईलचा टाॅर्च सुरू केला आणि समोर धरला तशी तीची बोबडीच वळली... तीचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता...
" हे कसं शक्य आहे...???" मावशीन कपाटाचा दरवाजा बंद केला आणि दोघी तीथुन बाहेर पडल्या...
ती बेडवर पडली होती पन डोक्यात विचारांच काहूर माजलेल.. एक भयान वास्तव तीच्या समोर आले वासुन उभं होतं... पन मावशीनं तीला उपायही सांगितलेला आणि त्यासाठी मेनकाही तयार झाली...
असेच काही दिवस लोटले.. मनोज दिवसेंदिवस अधीकच क्रुर वागु लागला. रात्र रात्र बाहेर असायचा... रेडलाईट एरीयात जाणं त्याच्यासाठी नेहमीच होत. पैसे फेकून एखादी call girl हाॅटेलवर न्यायची आणि तीच्या सोबत हवं ते करायच.. . एकदा एका call girl च्या पाठीवर पेटत्या सिगारेट चे चटके दिले आणी तीच्या दलालांनी याला धु धु धूतीलं...
हे मेनका ला समजलं तसा तीला आपल्या नव-याचा तिटकारा वाटू लागला..
त्या घटनेनंतर काही दिवसांनी ती घरी आपलं नेहमीचं काम करत होती तोच हाॅस्पिटल मधून फोन आला... नव-याच्या काळजीपोटी ती हाॅस्पिटल मधे पोहोचली... एक एक रूम पहात होती.. मनात असंख्य विचार येत होते...
पुन्हा कोणाशी मारामारी केली...?
दारूच्या नशेत कुणाशी भांडण झालं...?
काय झालं असेल....?
रूम शोधत होती तोच एका रूममध्ये तीला आपला नवरा दिसला... बेशुद्ध...
डॉक्टर तपासून जात होते तोच मेनका तोंडाला पदर धरतच म्हणाली...
" काय झालं डॉक्टर साहेब... पुन्हा भांडण केल का यांनी..?"
मागे त्याच्याकड पहात डॉक्टर म्हणाले
" भांडण नाही पन लाॅजवर एका call girl सोबत होता... दारू आणि लैंगिक औषधांचा ओव्हर डोस झालाय त्यामुळ अर्ध शरीर पॅरलाईझ झालय..."
डॉक्टराचे हे शब्द ऐकून ती जवळजवळ कोसळलीच... एक अंधारलेल भविष्य तीला समोर दिसत होत... काही दिवसांनी त्याला हाॅस्पिटल मधून घरी आणल. पन नेहमी बाहेर फिरण्याची सवय असल्यान त्याचा जीव आपल्या खोलीत गुद्मरू लागला...
आणी सगळा राग , चिडचिड संताप त्यान आपल्या बायकोवर काढायला सुरुवात केली... मागच्या सहा महिन्यांपासून ती आपल्या या पॅरलाईझ झालेल्या नव-याची साथ देत होती, त्याचा प्रत्येक शब्द पाळत होती...
पन दोन दिवसांपूर्वी जे झालं त्यान तीचा संयमच सुटला.... दोन दिवसांपूर्वीचा ती घटना... सकाळ झालेली... अंगात थोडी कणकण असल्यानं तीला उठायला थोडा उशीर झाला... अंग फारच ठणकत होतं. त्यात रात्री अपरात्री पॅरलाईझ झालेल्या नव-याच्या हाकेला वरचेवर जागं व्हावं लागायच, कदाचित त्यामुळच सकाळी तीला जाग आली नाही... नवरा मात्र बाजुच्या आरामखुर्चीत बसुन दारूचा एक एक घोट रिचवत बेडवर शांत झोपलेल्या आपल्या बायकोला पहात होता. एक दोन वेळा त्यान तीला हाक देखील मारली पन तापान तीच अंग मोडून आलेल. खिडकीतून बाहेर पहात त्यान तोंडातली सिगारेट पेटवली आणि एक एक झुरका घेऊ लागला... एक हात निकामी असल्यानं हातातील सिगारेट टेबलवर ठेवलेल्या गोल ट्रे मधे ठेवली आणी हळूहळू उभ रहात बेडवर तीच्या जवळ येऊन बसला.. टेबलवरची ती सिगारेट तोंडात घेवून एक लांब झुरका ओढला आणि हवेत सोडला... दारूची धुंदी आता डोळ्यात उतरत होती...तीच देखणं रुप पहात त्याचा हात तीच्या देहावरून फिरू लागला. तीच अंग तापानं भाजत होत, याक्षणी तीला कसलीच संवेदना जाणवत नव्हती... नाईट गाऊनच्या नाड्या सोडतच त्याचा हात तिच्या मानेवरून फिरत खाली सरकु लागला पन तीला अजुनही जाग आली नव्हती.. त्यान ती तोंडात घेतलेली सिगारेट बाहेर काढत सिगारेटच्या टोकावर जमलेली राख तीच्या तोंडावर टाकली... पुन्हा ती सिगारेट तोंडात घेऊन एक झुरका घेतला आणी झटकन ती पेटती सिगारेट तीच्या छातीवरच्या अंतर्वस्त्रावर ठेवून तीथेच कुस्करली तसा सिगारेट वरचा तो लाल निखारा टेरिकाॅटच कापड जाळत खाली तीच्या नाजूक त्वचेपर्यंत पोहोचला. त्वचा जळू लागली तशी शरिरात उठलेल्या वेदनांनी ती जोरात किंचाळली.. पन ती सिगारेट तिथंच ठेवून त्यान तीच तोंड दाबून धरल...
बेडवर पडुनच असह्य वेदनांनी ती हुंदके देत रडत होती. तीच तोंड दाबूनच तो तीच्या जवळ जात कानात पुटपुटला...
"शुsss....आज खुपचं रोमॅंटिक मुड झालाय."
तीच्या डोळ्यातुन ओघळणार पाणी तीच्या केसांमध्ये विरून जाऊ लागलं. शरिरात उठणा-या वेदना तिच्या डोळ्यांत कुणीही सहज पाहू शकल असतं पन त्यासाठी हवं असणारं संवेदनशील काळीज तीच्या नव-याकडे नव्हत.
स्वताची लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी त्याला गोळ्या औषधं खाण्याची सवय झाली होती... तीच्या होकाराचा अथवा नकाराचा प्रश्नच नव्हता. त्याला हवं होतं . बस्स.... आर्ध्या निर्जीव शरिराच ओझ पेलत तो तिच्यावर आरूढ झाला आपली कामवासना शमविण्यासाठी...
त्याची कामवासना शमली तसं आपलं आर्ध निर्जिव शरिर घेऊन तीच्या अंगावरून बाजूला झाला... आणी तसाच पडून राहिला... कपडे सावरत ती उठली... अंगातल्या तापामुळ तीला थंडी वाजून आलेली.. एरवी थंड पाण्यात हात घालायला न धजवणारी बाथरूममध्ये शाॅवरखाली उभी थंड पाणी अंगावर घेत होती... .. सिगारेटचा चटका बसलेल्या जागी आता लालसर फोड आलेला... शाॅवरमधल थंड पाणी त्या फोडाची धगधग थोडी कमी करत होत...
त्याच दिवशी रात्री...
आपल्या बागेतील त्या आराम खुर्चीत ती डोळे बंद करून बसली होती... रोज क्षणभर का होईना ती बाहेर त्या खुर्चीवर बसायची... सकाळी सिगारेट न जळालेल्या जागी आता दाह होत होता, पन सहण करण्यापलिकड ती काही करू शकत नव्हती...पन तीन काहीतरी आपल्या पदराखाली बंद मुठीत गच्च आवळून धरलं होतं... तापानं भाजणा-या अंगातून अक्षरशा वाफा निघत होत्या.. तीन औषध घेतले नव्हतं आणि घ्यायचही नव्हत... तीचा नवरा मात्र बेडरूम मधल्या पैस अशा बेडवर पडुनच बाजूच्या खिडकीतून बाहेर तीला बसलेल पहात होता.. सकाळ पासून मनोजच डोकं ठणकत होतं. डोक्यावरची गोळी तोंडात घेतली आणि पाणी पिण्यासाठी शेजारी ठेवलेला ग्लास उचलत होता की तो ग्लाास जमिनीवर पडला आणी काचा पांढ-या शुभ्र फर्शीवर तुकड्यांमध्ये विखुरल्या... एव्हाना ती गोळी तोंडात विरघळून संपूर्ण तोंड कडू झालं.. आपल्या बायकोला झोडपण्यासाठी इतकं कारण पुरेसं होतं त्याच्यासाठी... तीला असं शांत बसलेल त्याच्यान पहावेल कसं...? कसाबसा तो बेडवरून उठला आणी कपाट उघडलं. आत गुंडाळी करून ठेवलेला तो काळा चामड्याचा बेल्ट हातात घेऊन आपल्या बेडरूममधून बाहेर पडला... जस रक्त डोळ्यात उतरल होतं... तीनं किंचित डोळे उघडून त्याला आपल्या दिशेने येताना त्ययाला पहाात होती..
आपलं अर्ध निर्जीव शरीर खेचत तो चालत होता. एक हात मनगटातुन मुडापलेला, किंचित डाव्या बाजूला सरकलेला तोंडाचा जबडा आणी अर्धवट उघडा डोळा तिच्या वरच रोखला होता... बागेतील गवतावरून आपला डावा पाय खेचत तो काही अंतरावरच होता तसं त्याला पहात आपल्या हाताच्या बंद मुठीकड पाहिलं... तस भयंकर संतापान त्यान हातातला चमड्याचा बेल्ट तिच्यावर उगारला आणि तो पाहुन ती मंद हसली...
'' सारं काही संपलय आता... आज मी शेवट केला... तुझ्या नरकयातनेतुन आज मी मुक्त झाले..."
" मुक्त.... त्यासाठी तुला जीव द्यावा लागेल,..?"
बोलतच तो समोर उभा राहिला...
" हो... मला माहित आहे..? " एवढं बोलून ती पुन्हा मंद हसली...
तो प्रश्नार्थी नजरेने तीच्याकड पहातच होता की पदराखालून तीन आपला हात बाहेर काढला... त्यानं थोडं निरखून पाहिल आणि पुरता हादरून गेला.. हातातील बेल्ट कधी जमिनीवर पडला हे त्याच त्यालादेखील समजल नाही... धडधडत्या काळजान तसाच तो मागे सरकला... आपलं शरीर ओढतच तो आपल्या बेडरूममध्ये येत दरवाजा आतून नीट बंद करून घेतला... आतापर्यंत त्याच सर्वांग घामानं भीजल होतं. डोकं अधिकच ठणकायला लागल. त्यानं समोरच्या त्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं .... ती अगदी निश्चिंत होती बागेत त्या आराम खुर्चीत बसून ती जणू मनात म्हणत होती...
'आता कोणाचा छळ करणार..?
आता कोणाला सिगारेट चे चटके देणारं...?
कोणासोबत आपली वासना शमवणार....?'
तीची भेदक नजर त्याल सहन होईनाशी झाली... पन आता काय करायचं..? हा प्रश्र्न त्याला भेडसावत होता... डोकं अधिकच ठणकत होतं .. तोच तोंडातली कडवटपणामुळ त्याला उचमळुन आलं, उलट्या करतच तो बाथरूम मध्ये गेला आणी........
रात्रभर तो आपल्या बंद खोलीत ओरडत किंचाळत होता.... . दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला हाॅस्पिटल मधे अॅडमिट केलं... डॉक्टर उपचार करत होते पन काही फरक पडत नव्हता... शरिर पोखराव तशा वेदना होत होत्या. त्या वेदनांनी तो जोरजोरात ओरडायचा, किंचाळायचा. हातात खुपसलेली व्हेनप्लो, उपसुन टाकुन आपलं शरीर ओढतच बाहेर जायचा प्रयत्न करायचा... त्यामुळ डॉक्टरांनी त्याला बेशुद्धावस्थेतच ठेवलं होतं...
कालपासून नवरा हाॅस्पिटल मधे होता ...
मुळ तीला थोडं शांत वाटत होत. हसणं विसरलेल्या तीच्या चेहऱ्यावर आज एक मंद हास्य उमटलं होत, त्यात एक समाधान झळकत होत... सुटकेच.....
एव्हाना समोर काही लाकडं पेटवून मावशीनं छान आग पेटवली होती... त्यामुळ अंगाला झोंबणारा गारवा काहीसा कमी झालेला... लग्नानंतर कितीतरी दिवसांनी आज एक असा दिवस उजाडला होता की तीच्या शरिरावर चमड्याच्या पट्ट्याचा व्रण उमटला नव्हता..
पुस्तकाच उघडलेल ते कागदी चिकटटेप तीनं समोर पेटवलेल्या त्या छोट्या आगीत टाकले... टीपाॅयवर ठेवलेल्या त्या पुस्तकावर नजर गेली... 'मेनका'. शिर्षक तीचच नाव होतं.. हात पुढे करून ती पुस्तकं उचलणार तोच त्या पुस्तकावरच ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली... फोन डाॅक्टर साहेबांचा होता...
" हा बोला डाॅक्टर साहेब..."
" मेनका मॅडम, एक वाईट बातमी आहे...?"
तीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला... डॉक्टर बोलत होते आणि ती मात्र हादरून गेली होती... डॉक्टरांनी फोन ठेवला आणि मेनका अस्वस्थ झाली..
"मावशी...?" तीने आपल्या मोलकरणीला हाक दिली...
" काय झालं मालकिन बाई..?" ती धावतच आपल्या खोलीतून बाहेर आली...
" मावशी......?" तीचं अंग शहारून आलं होतं...
" झालं काय ते तरी सांगा..?"
" मनोज...? मनोज...?"
" काय झालं साहेबांना...?"
" मनोज... हास्पिटल मधुन पळून गेलाय... तो माझा जीव घेणार आता...?"
" आता दया करू नका... नाहीतर स्वताचा घात करुन घ्याल.. माहीत आहे ना... कपाटात तुमच्या सारखी दिसणारी ती काळ्या धाग्यांनी जखडून ठेवलेली ती बाहुली.. मग जस सांगितलय तसं करा.."
मालुच बोलणं ऐकताच तीन आपल्या पदराखाली झाकून ठेवलेली ती काळी बाहुली बाहेर कढत समोर धरली... ती बाहुली अगदी तीच्या नव-यासारखी म्हणजे मनोज सारखीच दिसत होती, मनोज चा रूमाल तीला गुंडाळला होता, त्या बाहुलीच्या डाव्या बाजूला कितीतरी चमकदार टाचण्या खुपसल्या होत्या. आणी तशाच डोक्यातही खुपसलेल्या...
मालुने मानेनं खुणावताच मेनका न त्या बाहुलीच मुंडक मुरगाळत ताकतीनीशी धडावेगळे केल...तसं कोणीतरी जोरजोरात किंचाळत असल्याचा आवाजान दोघीही हादरल्या... जिवाच्या आकांताने कोणी तरी ओरडत होतं.. तो आवाज अगदी जवळून येत होता... पुढच्या क्षणी तीन हातातली ती विद्रुप बाहुली समोरच्या त्या पेटत्या आगीत फेकली तशी चर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्र आवाज करत ती बाहुली पेटू लागली.. पन एका भयाण आवाजान दोघीही सुन्न झाल्या.....
कारण मागे काही पावलांवर उभी तीच्या आलिशान गाडीन अचानक धडधड करत पेट घेतला. आणी आत लपुन बसलेला मनोज जिवाच्या आकांताने ओरडत जळुन राख झाला...
त्या मोटारीकड पहात मालु म्हणाली.
" आजही त्याच्यावर दया केली असतीस तर आज तु त्याच्या जागी असतीस.."
" होय... पन मावशी.. तळघरातील कपाटातील ती माझ्यावर केलेली बाहुली... तीच काय करायचं...?'' मेनका थोडी काळजीनं विचारू लागली..
" तुला जखडून ठेवणारा संपलाय... आता काही फरक पडत नाही...''' मावशी पुटपुटली तसे बंगल्याच्या आवारातील गाडीतून उठणारे आगीचे, धुराचे लोट पाहुन काही वेळातच रस्त्यावरून जाणारे लोक जमले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करु लागले... ती मात्र धगधगत्या आग्नित राख झालेल मनोजच शरिर पहात होती.. एक पिशाच्च ज्या आगीत जाळून राख होत होतं तीच आग तीच्या कोमेजलेल्या आयुष्यात नवा प्रकाश देणारी होती, एक सुंदर सकाळ तीची वाट पाहत होती...
समाप्त.....
मेनका - भयकथा- Menaka Marathi horror story -bhaykatha

No comments:
Post a Comment