पाऊस
सरीवर सरी बरसत होत्या. बस स्टाॅपच्या बाजुला असलेल्या झाडाच्या आडोश्याला ऊभ राहुन मी पानांनवर पडत असलेल्या पाऊसाच्या थेंबाना एकटक पाहत होतो. पाऊसासोबत येणारी हवेची गार झुळूक मनातल्या झोक्याच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर शांतपणी झुलत होती. आभाळात होत असलेला विजेचा गडगडाट अंगावर अनपेक्षितपणे शहारे आणत होता.
पाऊस आणि मी तसे सहजीवन सोबती. लहान होतो तेव्हा घरासमोर पाऊसाच्या पाण्याची नदी व्हायची. कागदी बोट पाण्यावर जशी तरंगते ना अलगद, न भिजता , न बुडता तेव्हा ऊंच ऊंच पण घरातच उड्या मारायचो, अर्थात प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आभाळात गडगडणार्या वीजेचा मोठा आवाज होण्याआधिच आई कुशीत घ्यायची, मोठा झालो नी ती कुश तर गेलीच आणि आई सुद्धा.....
पाऊस म्हणजे पहिल प्रेम, पाऊस म्हणजे चिंबचिंब भिजण, पाऊस म्हणजे आठवणींची साठवण, पाऊस म्हणजे ती, तीच्या गालावरची हसरी खळी, तीच्यासोबत पाऊसात भिजत खाल्लेला गरम गरम मका....पाऊस म्हणजे टपरीवरचे मित्र व चाय आणि सोबतीला कांदाभजी....
पण .....
हाच पाऊस जेव्हा जिवावर बेततो ना तेव्हा मात्र कहर करतो. जेव्हा पानांनवरच्या पाण्याच्या थेंबाच जमिनीवर पडुन जसे शिंतोडे उडुन त्याच अस्तित्व संपत ना अगदी तसच आठवणींच्या हिंदोळ्यावर वार्यासोबत झोक्यावर झुलणारे मन हेलकावे खात राहत....ते कायमचंच...
दरवर्षी येणारा पाऊस हा आनंदच घेऊन येईल अस नाही ना? पाऊसामुळे बस स्टाॅपवर छत्री न आणल्यामुळे होणारी गर्दी, रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे बस ला यायला होणारा उशीर, यामुळे मिळेल त्या जागेवर काहीजण उभे राहातात. काहीजण उशीर होईल म्हणून चालतच भिजु नये म्हणुन झाडाचा आडोसा घेत घेत घर गाठतात.
"जस मला गाठायच होत अगदी तसं".
निरागस पहिल्या प्रेमाचा पाऊस हा आचानक जीव घेना बनतो तेव्हा तो पहाटे पडलेल्या वाईट स्वप्नापेक्षा ही भितीदायक असतो. गडगडत कोसळणारा पाऊस , घाईघाईत विसरलेली छत्री, उशीरा येणारी बस, न थांबणारी रिक्षा किंवा खिशाला न परवडणारी रिक्षा या सगळ्यांनमध्ये तो शर्टाच्या खिशातला वाजणारा फोन, घरी वाट पाहणारे वडील, बायको पोरं..... या सगळ्या विचारांमुळे पाय शेवटी झपाझप झाडाखालुन घराच्या दिशेने जात होते.
आयुष्यातील काही प्रसंग हे निशब्द करून जातात....निरागस, प्रेमळ, स्वप्न दाखवणारा हा पाऊस मात्र माझ्यासाठी स्वप्नहीन ठरला . स्टेशनवरून फास्ट रेल्वे मोठ्याने आवाज करत जशी पटरीवरुन कोणालाही व्यव्सथीत न दिसता निघून जाते आणि दिसेनासी होते तेव्हा मागे उरते ती फक्त धुळ ..... बरोबर ना!!!!! तसच काहीस मी झाडाजवळ पोहोचलो असता अतिशय वेगाने येणारी व कोणालाही न दिसणारी आणि प्रचंड मोठ्या आवाजाची ती वीज माझ्या अंगावर पडली आणि मागे राहीली ती फक्त नाशवंत देहाची राख.....
ं
या झाडाखाली लोक उतारे टाकायला येतात कारण झाडाखाली येणारा प्रत्येक माणूस आता झपाटला जातो. घाबरला जातो. डोळ्यांची फक्त खोबणी आणि पांढराफटक चेहरा असलेला मी त्यांच्या मागेमागे कधी चालत तर कधी धावत तर कधी ओरडत जातो, पण त्यांना झाडाखाली थांबु देत नाही.
ं
या झाडाखाली लोक उतारे टाकायला येतात कारण झाडाखाली येणारा प्रत्येक माणूस आता झपाटला जातो. घाबरला जातो. डोळ्यांची फक्त खोबणी आणि पांढराफटक चेहरा असलेला मी त्यांच्या मागेमागे कधी चालत तर कधी धावत तर कधी ओरडत जातो, पण त्यांना झाडाखाली थांबु देत नाही.
कारण.....
माझ्यासाठी शेवटचा ठरलेला तो पाऊस, त्यांच्यासाठी त्यांचा आजचा हा पाऊस शेवटचा व्हायला नको .....बरोबर ना!!!!
समाप्त
ऋचा हाडवळे
ठाणे.
ठाणे.
No comments:
Post a Comment