✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ७ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
चालत चालत जेन आणि मेरी एकमेकांना धरून एक ठिकाणी थांबले आणि दोघांनाही समोर अस चित्र दिसलं जे बघून दोघे एकमेकांकडे बघायला लागेल आणि काहीतरी स्मरू लागले. . . इतक्यात . . . .
जेन आणि मेरी ला जे दिसले ते पाहून दोघेही जागच्या जागी गारद झाले. खूप विषमता असलेल्या गोष्टी किंवा घटना अलगदपणे सहज आपल्या समोर घडतात तेव्हा जशी मनाची उचल डुचमळत जाते , तशी त्या दोघांची हालत झाली होती. त्यांनी पाहिलं त्या दरवाज्यावर , दगडी खांबावर , पायाखालच्या दगड गोट्यांवर एक प्रकारची नक्षी चिन्हे काढलेली होती. खूप भयानक नक्षी चिन्हे होती ती. दोघांनी दचकून जायचं कारण हे होत की, ती नक्षी चिन्हे तीच होती जी मेरीच्या आजीच्या डायरी मध्ये एका विशिष्ट पानावर रेखाटली होती. भयाण डोळे , विचित्र काळपट तोंड, रक्त पडत असलेले कापलेली जीभ , इतकं भयंकर चित्रं आणि ती कसलीशी चिन्हे होती. काय हा प्रकार ? हीच चिन्हे आजीचे डायरीत कशी ? काय असेल ह्या नक्षी चिन्हांचा अर्थ ?
जेन ला काहीतरी विचित्र आणि भयानक घडणार आहे की काय ,अशी चुनचुन लागली होती. का कोणास ठावूक पण तो थोडा बिथरला होता. भविष्य जाणत नव्हता पण सद्य परिस्थिती नक्कीच त्याला काहीतरी सांगत असावी. त्याने डोक्यातील सर्व प्रश्नांना एकजमाव करून शांत मनाने त्यावर चर्चा करून त्याने उपाय शोधला. त्याने एका कामगाराला वर पाठवायचे ठरवले. तस पाहता जेन कडे दुसरा मार्गही नव्हता आणि वेळ दवडण्यात अर्थ ही नव्हता कारण , पन्नास फूट खाली कुठल्याही प्रकारची सोय नाही. आवाजही बाहेर जाणार नाही, वरून काही मदत मागायची तरी कोणतेही उपाय नाहीत शिवाय जर त्यांच्याकडे वोकीटॉकी असते तर संपर्क करता आला असता किंवा कुठलीही मदत मागता आली असती.म्हणून शेवटी जेनला ते एकच सोयीस्कर वाटले. . . जर एक तरी कामगार वर गेला तर खूप सारे उपाय उपलब्ध होऊ शकतात. . . वर आणखीन पन्नास माणसे होती मदतीला. . . .. एका कामगाराला वर पाठवण्यात आले. . . त्याला वर जायला 1 तास लागला. तोपर्यंत खाली जे घडणार होते त्याला ते उरलेले कामगार मिळून तोंड देणार होते.
जेन,मेरी आणि ते उरलेले सात कामगार मिळून झुंज देणार होते. खाली एकंदरीत वातावरण पेटलेले होते. मुख्य दरवाजाच्या आतून तो विचित्र गंध आणि ट्रंपेट चा आवाज काही केल्या थांबत नव्हता , ती नक्षी चिन्हे दोघांच्याही डोळ्यांसमोर थयथयाट करु लागली. चरचर आवाज येऊ लागला. सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले. कुठून येतोय आवाज ? जेन ने टॉर्च वर मारली आणि एक सेकंद ही होतं नाही आणि काही कळायच्या आतच वरील दगडांचा घोळ खाली कोसळला. दोन चार दगड जेंन च्या अंगावर पडले. तसे फार मोठे नव्हते पण अंग खरचटून रक्त निघण्यासाठी पुरेसे होते. रक्ताची चिळकांडी चरचर कापत जमिनीवर उधळली गेली आणि त्या नक्षी चीन्हांवर पडली. बघता बघता आवाज वाढायला लागला. पडलेलं रक्त नक्षीवर चमकुन गेलं ,वारा सुसाट झाला, उधळून देऊ लागला सारा परिसर, डोळ्यात धुळाचे लोट जाऊ लागले, हसण्याचा आवाज यायला लागला, खांब हलायला लागले, वाऱ्याचे रूपांतर वावटळीत झाले , घोंगावत ते वादळ गरगर गरगर फिरू लागले, जेन मेरी आणि कामगार बाजूला व्हायला लागले. त्यातच दोन कामगार त्या वावटळीत सापडले आणि त्या घेऱ्यात गरगर फिरवून भिरकावले गेले आणि सरळ जाऊन त्या दगडावर आपटले. पुढच्या सेकंदाला तोंडातून रक्त बाहेर आले आणि जागीच ठार झाले. तेव्हा उरले जेन मेरी आणि पाच कामगार. . . . .
अचानक वरून शिडी लावली गेली . वर गेलेल्या कामगाराने वरून संपर्क करण्यासाठी वॉकीटॉकी आणि शिडी सोडली होती वर संपूर्ण संघ तयारीत ठेवला होता. एकंदरीत काय झाले आहे ते संपूर्ण टीम ला ज्ञात झाले होते.अचानक वादळाने आपला रोख वर वळवला. पन्नास फुटाच अंतर त्या वादळाने अवघ्या दोन मिनिटात पार पाडले. वर जाऊन त्या वादळाने जे उध्वस्त केले त्याला नेम नाही. एकही तंबू त्याने शिल्लक ठेवला नाही , भांडी कुंडी , बांबू गाड्या कुठल्या कुठे उडवले गेले. मोठमोठ्या मशीन सुध्दा त्या वादळा समोर हतबल होत्या. अख्खाच्या अख्खा संघ त्या तळावरून हकालपट्टी केल्यासारखा शांत, निपचित पडला होता. होता एकच फरक सर्व उध्वस्त झाले तरी जेन आणि मेरी यांचा तंबू जागीच उभा होता आतली एकही वस्तू हलली नव्हती... तो सारा प्रकार जेन आणि मेरीच्या कानावर पडला. दोघेही एकमेकांशी चर्चा करू लागली. . .
जेन आणि मेरीला प्रश्न पडले होते की , "एक हा दिवस जेव्हा वादळ सगळं उध्वस्त करत पण , आपला तंबू नाही आणि एक तो दिवस जेव्हा कोणाचे तंबू नाही पण आपला तंबू सलग दोन तीन वेळा उध्वस्त झाला होता !"काय असेल या मागच कारण ? तेव्हा जेन च्या डोक्यात प्रश्न पडला , ते वादळ नसून त्या काळ्या शक्ती ला काहीतरी साध्य किंवा काहीतरी हवे आहे म्हणून ती हे सगळे प्रकार करत आहे. मग ते आपल्या तंबूलाच सुरक्षित ठेवले म्हणजे आपल्याकडून काहीतरी हवे असेल तर ? तेव्हा मेरीला अचानक जाणवले तिने जे गळ्यात लॉकेट घातले होते ते येशु जवळ ठेवताच तो फोटो खूप वेळा पडून फुटला होता , आग लागली होती , तंबू विस्कटला होता. कदाचित त्या लॉकेट चा काही संबंध असेल तर ? जेन ने ताबडतोब कामगारांना ऑर्डर देऊन ते लॉकेट मागवले. कामगारांनी देखील त्वरित ते आणले आणि एका कामगाराने ते शिडी उतरून जेन च्या हातात फेकले. . . .
आश्चर्य म्हणजे जसे ते लॉकेट जेन च्या हातात पडले , दोन मिनिटात ते वादळ पुन्हा वरून खाली आले. तेव्हा जेन ला पुर्णतः खात्री झाली की लॉकेट च्याच मागे ती शक्ती आहे. सर्वजण घामाघूम झाले. लॉकेट तर त्यांच्या हाताला लागले होते पण पुढे करायचे काय. कुठलीही रूपरेषा नव्हती , आयोजन नव्हतं. असत तरी मानवाचं कुठे काय चालतंय अघोरी शक्तिंपुढे. तरी लढायच असतं असे जेन चे विचार होते. मेरीने लॉकेट घट्ट हातात धरले होते ,वादळ घोंगावत घोंगावत मेरी भोवती घेरा धरू लागल. तेवढ्यात तीन ही इमारतींचे दरवाजे खाडकन् उघडले आणि हा हा म्हणता वादळाने घेर कमी केला आणि निमिषात , अगदी पापणी लवायचा सेकंदात ते वादळ मंदिराच्या मधल्या दरवाजातून आत गेले. मुख्य दरवाजा सोडून बाकी दोन्ही दरवाजे बंद झाले. तेव्हा उरला होता मुख्य दरवाजा जो सताड उघडा झाला होता. अंधार काळोखाचे मुखवटे धारण करून त्या सर्वांवर आपली अघोरी काळी नजर रोखून होताच. सर्वजण एका ठिकाणी येऊन एकमेकांना धरून दबा धरून बसले...पण जेन बरोबर सर्वांच्याच मनातील एक गैरसमज दूर झाला होता की , काळी शक्ती मेरीच्या लॉकेट च्या मागे होती. जर तशी असती तर लॉकेट हातात आल्यावर काहीतरी अघटीत घटना घडली असती. . . .सर्वांनी एक मंद उसासा सोडला आणि काही क्षण शांततेत गेले. .
पण नंतर , जे घडू नये असे वाटत होते तिच घटना घडली, अचानक. . . . .
भाग - ९ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar
No comments:
Post a Comment