✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ९ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
ते दृष्य जेव्हा प्रत्येकाने पाहिले आणि त्या सावलीचा चेहरा जेव्हा दिसला , तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला. . समोर होतं. . .
समोर वर्तुळातील विद्येत उभी होती "रेजिका". कस शक्य होतं ? सर्व कामगार आणि मेरी बुचकळ्यात पडले. रेजिका चा कही संबंध असेल ? नाही ती तशी नव्हती असं काहींचं मन सांगत होतं. जेन ने मात्र अचूक ओळखले होते.
जेन - त्या सैतानाने आपल्या रेजिका ला वश केलंय हे नक्की !
मेरी - पण तो असं का करेल ?
जेन - तेच तर कळत नाहीये ? त्यामुळे नेमके काय हवे आहे किंवा काय साध्य करायचे आहे, काय माहित ?
रेजिका अस्वस्थ दिसत होती , त्या सैतानाने तिला आपल्या वश मध्ये करून घेतली होती कारण त्याला आपल ध्येय साध्य करायचं होतं पण ह्यात कोणीच मदतीला नव्हतं . सर्वजण काय निभाव लावणार होते नाह माहित. ट्रंपेट चा आवाज वाढायला लागला. रेजिका विव्हळत होती. तिच्या आत्म्याला शांती लागू न देता त्याने तिला कैद केले होते. .
आता वातावरण पेटले होते. सैतान आणि माणूस ह्यांच्यातील इतक्या युगांपासून चालत आलेले हे युद्ध ,इथे ही पेटले होते. सत्याची परमेश्वराची बाजु आणि असत्य व्याप्त असलेली सैतानाची काळी बाजू. डावी उजवी बाजु पेलायला लागली.कोण श्रेष्ठ ? परमेश्वर की सैतान ? माणूस म्हणून जेवढं शक्य होत होतं तेवढं जेन-मेरी करीत होते. हरायच नाही असं दोघांनी ठाम केलं होत.त्या सौतानाशी सामना करायला ना त्यांच्याकडे काही देवाची वस्तू होती , ना येशूचा क्रॉस , ना काही दैवी शक्ती किंवा प्रभाव असलेली वस्तू होती . ती वस्तुस्थिती पाहता जेन सर्वांना म्हणाला . .
जेन - खऱ्या मनाने मनापासून तुम्ही परमेश्वराचा धावा केलात तर , जिथे असाल , जसे असाल त्या परिस्थितीत देव साथ द्यायला उभा राहतो.
सर्वांना ते मनापासून पटलं. जेन ने योजना आखली. सर्वांना त्याने त्या वर्तुळा भोवती रिंगण करायला सांगितले. प्रत्येकाचे हात एकमेकांच्या हातात देऊन रिंगण बंद केलं. आणि प्रत्येक जण प्रभू येशूचा धावा करू लागले. रिंगण धरलेली माणसे ना कोणी दैवी शक्ती असलेली होती ना कोणी देव, पण सामान्य माणसातील ताकद सुध्दा दैव बदलू शकते , त्याची प्रचिती येत होती.हळू हळू आवाज वाढवत सर्वांनी येशू ला प्रार्थना केली..आणि बघता बघता प्रभाव दिसू लागला. कुंडातील अग्नी विझल्या. धुराचे थैमान झाले. आणि दुसऱ्या सेकंदाला रेजिका मोकळी झाली आणि वर्तुळाच्या बाहेर पडली. सर्वजण पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर आले. . .
दैवाचे उपाय झाले म्हणून तो सैतान पिसाळला. एकेक दगड हलायला लागले. सर्वजण रेजिका कडे गेले तिला विचारपूस केली असता तिने सांगितले की , तिला ह्यातून बाहेर पडण्याचा उपाय माहिती असल्या कारणाने त्याने तिला वश करून बंधन घातलं. तेव्हा मात्र ती मोकळी होती तीने मदत म्हणून सांगितले की. . .
रेजिका - मेरी चा हात हातात घेऊन मी तिच्या आजी शी संपर्क करू शकते. नेमक काय गौडबंगाल आहे ते तेव्हाच कळेल.
सर्वजण बाजूला झाले. मेरी पुढे आली. तिने आपला हात रेजिका च्या हातात दिला. रेजिका ने डोळे मिटले आणि काय जाणवतंय ते पाहू लागली... तिने थोड्याच वेळात डोळे उघडले आणि "आपल्याला आजीला इथे बोलवावे लागेल असं म्हणाली". त्यासाठी मोठे चार दगड तिने आणायला सांगितले आणि तेच अग्निकुंड घेतल. त्यात अग्नी उत्पन्न करून त्याभोवती सर्वजण उभी राहिली. रेजिका ने आजीला बोलवायचं प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत त्या खोलगट भागात , मंदिरात , मुख्य दरवाजाच्या आत काहीच हालचाल नव्हती. चिडीचूप शांतता पसरली होती. एकदम निपचित शांतता. . .
आणि मग घंटा निनादली. झाली वेळ भरत आली. हळूहळू वारा गोळा व्हायला लागला.चुन चुन लागली. रेजिका आणि सर्वजण मेरिभोवती गोळा होते. हळूहळू त्या सर्वांच्या मध्ये एक आकृती निर्माण व्हायला लागली. ठळक ठळक होत जाऊन पूर्ण रुपात आली. ती होती मेरीची आजी. . . जशी मेरीची आजी स्पष्ट दिसायला लागली. मंदिरातील जुनाट होऊन खितपत पडलेली घंटा जोरजोरात वाजायला लागली, मंदिराचे खांब गदागदा हलायला लागले, संपूर्ण मंदिर भेदरून जाऊन गडगड आवाज करीत हलायला लागले, वारा सुसाट सुटला , इकडून तिकडे आपटून सार उध्वस्त करू लागला, इतकी प्रचंड ताकद होती त्या वाऱ्यामध्ये की सर्वजण उभे राहिलेले असताना, त्यातील दोन कामगार त्याचसोबत उडून दगडावर आपटले. जागीच ठार झाले, मुख्य दरवाजाचा दरवाजा खडखड करून आपटायला लागला. आतून ते दोन डोळे रखरखून बाहेर जळजळीत नजर फेकत होते. तीन इमारती पैकी दोनी इमारतींचे दरवाजा उघडले गेले. आतून सरसर करत वारा बाहेर आला, इतक्या वर्षांनी एखादा झोपलेला मदमस्त ज्वालामुखी उसळून बाहेर यावा आणि विध्वंस, उच्छाद मांडून पेटून उठावा तसा त्या सैतानाचा राग अनावर झाला होता. आजीला बघताच परसन इतका तुफान रागाने फणफणला का ? का त्याच्या रागाच्या शीरा इतक्या उंचावल्या की क्षणात सारा नाश करत चालला होता ?
प्रश्न तसेच ठेवत क्षणात रेजिका नाहीशी झाली .आता उरले होते जेन मेरी आणि तीन कामगार. त्यातले पुन्हा दोघांच्या अंगावर खांब कोसळला. तेही जागेवरच ठार झाले. उरले जेन, मेरी आणि एक कामगार व मेरीची आजी. आजीला बघून मेरीच्या डोळ्यात आसवे जमा झाली. इतक्या वर्षांनी पुन्हा आजी दिसल्यावर तीला अश्रू अनावर झाले. त्या अश्रूंना वाट मोकळी करून देऊन ती मूळ विषयाकडे येणार तोच तिची आजी आतल्या मुख्य दरवाज्याकडे बघत म्हणू लागली .
आजी - ( परसन कडे बघत ) हे बघ , आपले व्यवहार आपल्याशी होते , त्यात ह्यांना त्रास देण्याचा काहीही संबंध नव्हता. तुला मी हवीय , हे बघ मी आले पण त्यांना सोड.
मेरी - (काहीच कळत नव्हते ) आजी हे सगळं काय आहे , हा सैतान आम्हाला मारून टाकेल ? नेमक काय रहस्य आहे सांग ?
"आजी - मेरी , या घटनेची मुळ जोडली गेली ती 8 डिसेंबर 1976 साली. त्या साली देखील असाच भूकंप ह्याच जागी आला होता . सर्व उध्वस्त झालं होतं. तेव्हाही मोठे भगदाड पडले होते.आता हे जे मंदिर आहे ते त्या भूकंपात जमीनदोस्त झाल होतं. त्याच मंदिरात "परसन" ह्या सैतानाची मी पूजा करीत होते. आयुष्याला कंटाळून मी ज्या मार्गावर आली. ह्या मार्गाने लवकर यश मिळते असे वाटले होते पण, नाही पुढे मला तेच भारी पडले. जमीनदोस्त झाल्यावर मी शेवटची या मंदिरात त्याची पूजा करण्यासाठी आलेली होते , पण त्याने मला दिलेल्या यशाबद्दल किंमत मागितली. किंमत होती माझा आत्मा. त्याला मला मारायचे होते. मला फादर नी सांगितले होते त्याच्या पायाखालची माती जर आपण आपल्याकडे जप्त ठेवली तर तो काहीच करत नाही , पण जर का त्याला कळले की ती माती जवळपास आहे आणि त्याला मिळू शकते, तर तो पुन्हा आपलं अस्तित्व दाखवून ती माती मिळवायचा प्रयत्न करतो. he "Annexes" with all things."
जेन - पण आमच्याकडे तर माती नाही मग, तो आमच्या मागे का ?
आजी - तुमच्या सर्वांच्या नाही , मेरीच्या मागे आहे .
आजीच्या या वाक्याने सर्वांना अवाक् केले. इतक्यात तो अक्राळविक्राळ "परसन" दरवाज्यातून बाहेर येऊ लागला. प्रचंड भयानक , अस्वलावर स्वार होऊन वाघाच्या तोंडाचा तो भयंकर सैतान पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. दगडांची शिळा गदगदून हलू लागली. दरवाजा मुळासकट मोडून पडला. मूर्तरूप सैतान समोर पाहून सर्वांची काळीजं धडधडायला लागली. परसन चा रोष तेव्हा जेन कडे होता. त्याला त्याच्या दिलेल्या यशाचे मोल हवे होते. त्याला आजीचा आत्मा हवा होता मग तो जेन कडे का जात होता. मेरीला काही कळेना , जेन कडे का चालला तो. इतक्यात आजी म्हणाली . .
आजी - जेन तुझ्याकडे मेरीच लॉकेट आहे ना. ते काढ बाहेर.
जेन ने काही ना बोलता ते बाहेर काढले. परसन पुढे पुढे सरकत होता. त्याला जेन ला गाठायचे होते.डोळ्यात आग , अंगात रग , चालीत शस्त्र असा तो भयंकर सैतान एकेक पाय टाकत पुढे पुढे येत होता. जेन ने लॉकेट बाहेर काढले. इतक्यात त्या सैतानाने आपल्या आत्मिक शक्तीने रेजिका आणि आजीला क्षणात बंधन घालून , त्या विद्येच्या मधोमध बांधून ठेवले. वर्तुळाच्या मध्यभागी दोघीही अटकेत पडल्या... काही बोलू शकत नव्हत्या नी हलू शकत नव्हत्या. तेव्हा मोठा पेचं हा पडला की आजीने लॉकेट तर काढायला सांगितले पण , त्याच करायचं काय ? जेन ला आठवले की त्या सैतानाला रक्त हवं असतं. त्याने एक टोकदार दगड उचलला आणि त्याच्या टोकाच्या भागणे करंगळी वरून एक धार सोडली. रक्ताची गरम धार टप टप गळत त्या विद्येवर सोडली पण काही उपयोग नाही झाला. इतक्यात मेरी म्हणाली. . .
मेरी - मला वाटतं जेन, माझ्या रक्ताची धार द्यावी लागणार, कारण ह्या सगळ्या प्रकाराला आजी कारणीभूत आहे तर, आजीच्या वंशातली म्हणून कदाचित त्याला माझ रक्त हवं असेल तर ?
जेन - पण त्याच्या पायाखालच्या मातीच काय ?
तोपर्यंत तो सैतान नजिक आला होता. त्याने मेरिवर निशाणा साधला. शक्तीने प्रहार केला इतक्यात जेन मध्ये आला. जेन ला मूर्च्छा आली, तो खाली कोसळला. ते उरलेले 3 कामगार मध्ये आले .त्या सैतानाने त्यांना सुध्दा यमसदनी धाडले. आता मेरी एकटीच . कशी लढणार ?
मेरी धावत गेली आणि जेन ला गदगदून हलवू लागली पण, जेन ला काही जाग आली नाही. शेवटी वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. तो सैतान पुढे येत होता. मेरी ने जेन च्या हातातील लॉकेट घेतले , उभे आडवे , वाकडे तिकडे करून पाहिले तर तिला सूक्ष्म आवाज ऐकू आला. तिने कानाजवळ नेऊन पुन्हा लॉकेट हलवले. पुन्हा तो बारीकसा आवाज आला. तिने पूर्ण लॉकेट उचकटायला सुरवात केली. तोपर्यंत त्या सैतानाने जेन ला उचलेल आणि विद्येच्या वर्तुळात मध्यभागी ठेवले . तो त्याला जाळणार होता. आता काही क्षण बाकी होते. मेरीला उशीर झाला तर जेन आयुष्यातून संपला असता. परिस्थीती बिकट झाली. . .
घंटा निणादली. मेरी धावत धावत ते लॉकेट उचकटत होती.तोपर्यंत त्या वर्तुळा भोवती परसन ने अग्नी उत्पन्न केला आणि ती धगधगती आग तो जेन कडे घेऊन जाऊ लागला. अगदी हातभार अंतरावर अग्नी होता. मेरी जिवाच्या आकांताने धावत होती , धावता धावता लॉकेट उघडल गेलं आणि त्या दोघांच्या फोटोच्या आत होती त्या त्या सैतानाचा पायाखालची माती. सैतानाने अग्नी अगदी बोटाच्या अंतरावर आणला आणि स्पर्श करणार इतक्यात मेरीने ती लॉकेट मधील काळी माती त्याच्या अंगावर फेकली. अंगावर माती पडल्याने परसन बाजूला उडाला. त्याला हवं ते मिळालं नव्हतं ,त्याला रक्त हवं होत. मेरीने बाजूचा दगड उचलला आणि आपल्या हातावर फिरवून रक्ताची धार त्या वर्तुळात सोडली. परसन व्हीव्हळत शांत झाला पण त्याच्या हातातली अग्नी बाजूच्या दुसऱ्या अग्निवर पडला आणि आगीच मोठा भडका उडाला. मोठा धमाका झाला तसा जेन शुद्धीवर आला आणि अगदी चपळाईने तो वर्तुळाच्या बाहेर आला. थोडक्यात बचावला. तो बाहेर पडताच आगीने लोट उठवून लावला...
तीनही दरवाजे जळू लागले. आणि सर्व खांब कोसळून पुन्हा ते मंदिर जमीनदोस्त झाल. "परसन" च पर्व संपल होतं.. . .
जेन आणि मेरी दोघेही शिडी ने वर आले. . . . . .
तीनही दरवाजे जळू लागले. आणि सर्व खांब कोसळून पुन्हा ते मंदिर जमीनदोस्त झाल. "परसन" च पर्व संपल होतं.. . .
जेन आणि मेरी दोघेही शिडी ने वर आले. . . . . .
वेलकौम चे उत्खनन झाले होते , साध्य झाले होते 50 फूट खोल काय होते ते. होते वर्षांपूर्वी दफन झालेले सैतानाचे एक मंदिर . जेन आणि मेरीने उत्खनन केले होते आजीच्या शापित प्रारब्धाचे . परसन सारख्या सैतानाने विचित्र इच्छित आणि परमेश्वर पाठीशी आणि अस्तित्वीक असल्याचे समक्ष उदाहरण. काळी रात्र काही क्षणांची असते , पुन्हा दिव्य रवितेजांनी पवित्र करणारी सुंदर, देखणी, उमदी सकाळ होतेच. . .
धैर्य , वीरता , समंजसपणा , सावधानगी , तत्परपणा आणि योग्य नियोजन आणि शांत मनाने घेतलेले निर्णय ,ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांनी आज विजय मिळवला होता. महाभयंकर सैतानाला सुध्दा काही उतरत्या बाजु असतात पण, त्या जाणून त्यावर उपाय केले की परमेश्वर सुध्दा पाठीशी उभा राहतो.
"आजीच वाक्य जेन ला आठवल " he Annexes with all things". पण तो कितीही annexes म्हणजे ताब्यात किंवा सामील करू पाहत असला तरीही परमेश्वरा पेक्षा मोठा नसतो.. . . ."
झाल वादळ शांत झालं. . .
दोघेही वर पोहोचले
दहा दिशांनी नुसते कौतुक आणि कौतुक . . !!
पण , मेरी आणि जेन स्वीकारत होते ते कौतुकाचे शब्द आपल्या डोळ्यातील पाण्याने. . . . .
दोघेही वर पोहोचले
दहा दिशांनी नुसते कौतुक आणि कौतुक . . !!
पण , मेरी आणि जेन स्वीकारत होते ते कौतुकाचे शब्द आपल्या डोळ्यातील पाण्याने. . . . .
पुन्हा एकदा "परमेश्वर" जिंकला होता ,
पुन्हा एकदा "माणूस" विजयी झाला होता . . .
सैतान हरला होता , अपयशी ठरला होता. . . . .!!
वेलकौम चे नाट्य संपले होते. सांगता झाली होती. . . !!
पुन्हा एकदा "माणूस" विजयी झाला होता . . .
सैतान हरला होता , अपयशी ठरला होता. . . . .!!
वेलकौम चे नाट्य संपले होते. सांगता झाली होती. . . !!
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
लेखक :-
ही कथा तर संपली , कशी वाटली नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांनी आणि प्रतिसादाने उत्साह भरीस येतो.त्याबद्दल धन्यवाद 🙏
आज अष्टमी , आई भवानी तुमच्या सर्व संकटाचे , पापांचे , विघ्नांचे होमात क्षालन करो आणि आपल्याला आनंदी, सुखी आयुष्य देवो ही प्रार्थना. त्याचबरोबर दोन दिवसांनी येणाऱ्या दसरा दिनाच्या माझ्या सर्व वाचकांना आणि "मराठी भुताखेतांच्या गोष्टी" या ग्रुप ला हार्दिक हार्दिक शुभेछा 🙏🙏🙏🙏🙏
भेटू पुन्हा लवकरच . . . . . . .😊
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar
No comments:
Post a Comment