मॉल ( पार्ट 6) ( पहिल्या सर्व पार्ट च्या लिंक्स खालती दिल्या आहेत )
त्या 8 जणांनी उभे राहायचा प्रयत्न केला आणि तितक्यात खामकरानी माचीस पेटवली . क्षणात आगीचा भाडका उडाला . खिलारे कुटुंबीयांनी सूटण्याचा किंवा ओरडण्याचा काही प्रयत्न करू नये याची पुरेपूर काळजी घेतली होती . खामकरांच्या डोळ्या देखत उभ्या उभ्या खिलारे कुटुंबातील सर्व सदस्यांनी पेट घेतला होता . ती वेळ होती रात्रीची 2 . थोड्या वेळानी त्या खड्यात फक्त राख उरली होती . खड्डा परत आहे तसा बुजवाण्यात आला . खिलारे कुटुंबांना एका रात्रीत यमसदनी धाडण्यात आले .
खामकरांच्या माणसांनी अफ़वा उठवली की खिलारे फॅमिली ला त्यांच्या गावाकडे घर दिले आहे . आणि ते हे घर सोडून गेले आहे . आणि त्या जागीच आता तो S.K. मॉल उभा होता . पण आता त्या S.K. मॉल चे अस्तिव धोक्यात आले होते .
S.K. मॉल मधून खामकरांच्या घरी फोन गेला खामकर इथे मॉल मध्ये बेशुद्ध पडले आहेत . घरची सर्व आधीच मॉल प्रकरणा मुळे खुप टेन्शन मध्ये होते . खामकर घरी जास्त कुणाशी बोलत नसत त्या मूळे घरच्यांना पण वाटल की खामकर काही करणास्तव मॉल मध्ये गेले असतील आणि टेन्शन मुळे बेशुद्ध पडले असतील . घरचे सर्व खामकरांची बायको , मुलगा सून नातू तातडीने मॉल कडे रवाना झाले . खामकराचा फोन पण बंद लागत असल्याने त्यांना खात्री झाली की खामकर मॉल मधेच आहेत . इकडे खामकर स्वतःच्या ऑफिस केबिन मध्ये डोळे झाकून शांत पडले होते . त्यांनी स्वतःचा फोन बंद केला होता आणि स्टाफ ला सांगून ठेवले होते त्यांचा साठी कुणाचा फोन आला तर खामकर बाहेर गेले आहेत असा निरोप द्या . खामकर मॉल च्या प्रॉब्लेम साठी काही उपाय करता येईल का याचा विचार करत होते . इतक्यात माने घाबरत केबिन मध्ये आले , खामकर ओरडणार त्या आधीच माने नी घाबरत सांगितले सर मॉल मधून फोन आला होता तुमच्या घरचे सर्व जण तिथे अडकले आहेत खामकराना समजायचं बंद झाले . त्यांनी आधी त्यांच्या घरी फोन केला . नोकरानी सांगितले घरचे सर्व मॉल मध्ये गेलेत . आता मात्र खामकराना समजले सर्व म्हणजे नमित पण .....
काही पण करायचं पण आपल्या नमित ला काही होऊ द्यायचे नाही . आता त्यांच्या बायको साठी , सून मुलगा आणि त्यांच्या नातवा साठी त्यांना तिथे जाणे भाग होतेच . त्यांनी ड्राइवर ला गाडी तडक मॉल कडे नेण्यासाठी सांगितली . गाडी मॉल जवळ आली . खामकर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मॉल मध्ये गेले . आणि त्यांच्या बायकोला , मुलाला हाका मारू लागले . अचानक त्यांना हाक ऐकू आली . हाक 5 व्या मजल्या वरून येत होती . त्यांनी लिफ्ट चे बटण दाबले पण लिफ्ट चालू न्हवती . ते पायऱ्या चढू लागले . 1-1 मजला चढत ते शेवटी 5 व्या मजल्या वर आले आणि परत हाका मारू लागले . त्या समोरच्या मोठ्या हॉल मध्ये त्यांना त्यांची बायको, मुलगा सून आणि नमित दिसला . ते पळत तिकडे गेले . त्यांना खूप दम लागला होता . त्यांनी आधी नमित ला मिठी मारली . त्यांची बायको , मुलगा सून घाबरून उभे होते . खामकरानी मागे वळून पाहिले समोर खिलारे फॅमिली उभी होती . हात , पाय , बांधून घातलेली . तोंडत कापड कोंबलेल. त्यांना पाहून खामकरांचा तोल गेला ते खाली पडले . आता खिलारे कुटुंबीय खामकरान जवळ येऊ लागले . आपल्या नवऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार हे खामकरांच्या बायकोच्या लक्षात आले . ती पुढे आली रडत रडत स्वतःच्या नवर्याच्या आयुष्यासाठी भीक मागू लागली .
क्रमश ...
मॉल ( पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
मॉल ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
मॉल ( पार्ट 3)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
मॉल ( पार्ट 4)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html
मॉल ( पार्ट 5 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/5.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/5.html
No comments:
Post a Comment