गुणाक्का ( पार्ट 2)
( ह्या आधीच्या पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
( ह्या आधीच्या पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
गुणाक्का खूप प्रेमळ . सुरकुत्या पडलेला चेहरा . पूर्ण अंगावर सुरकुत्याचे जाळे . डोळे जरा वेगळेच होते गुणाक्काचे . पण केस खूप लांब सडक आणि काळेभोर. ती खूप मोठा अंबाडा बांधे तिच्या केसांचा . गौरवर्ण. पण गुणाक्काच्या डोळ्यात सर्वान विषयी अपार प्रेम , काळजी दिसें . लोकांना अडी-अडचणीत मदत करणारी . आपली आजी जशी तिच्या नातंवडावर जीवापाड प्रेम करते ,तशीच प्रेम गुणाक्का पूर्ण गावावर करत असे. गाव पण गुणांक्का वर प्रेम करत असे. गावातील लोकांना तिची फार काळजी वाटत असे. तस पाहता तिचे खरे नाव गुणां होते पण ती पूर्ण गावाची मोठी बहीण झाली होती म्हणून सर्व जण तिला गुणांअक्का म्हणत. म्हणून ती गुणाक्का .
गुणाक्का गावात येण्या आधी गावातील एकुलती एक सुईण धर्माक्का ( कोणतीही डॉक्टरकिची पदवी नसलेली पण गावातील बाळंतपण करणारी अनुभवी डॉक्टर ) ही वारली होती . गावात दवाखाना न्हवता . गावातील सर्व बाळंतपण ही गावातील सुईणच करत असे. गावातील बाळंत बायकांचे बाळंतपण कसे करायचं याच गावाच्या पाटलाला आणि पूर्ण गावाला टेन्शन आलं होत . त्या साठीच त्या सकाळी गावातील मुख्य माणसे त्या झाडाच्या पारावर बसली होती . कारण बाळंतीनीला नदी ओलांडून त्या भयानक जंगलातुन माजगावाला नेणे शक्य न्हवते . आणि सांजगावा च्या शेजारच्या गावातील बायकांचे बाळंतपण पण धर्माक्का करत असे . म्हणजे त्या गावाची पण गैरसोय झाली होती . आणि शक्यतो मुलीचे पहिले बाळंतपण हे मुलीच्या माहेरिच करतात . त्या मुळे सगळे गाव चिंतेत होते . आणि सदा ला ती म्हातारी दिसली .आज अमावसेच्या मुहूर्तावर गावात पाऊल टाकत होती .एका हातात एक गाठोडे , डोक्यावर एक गाठोडे , एका हातात तोल सावरण्यासाठी काठी . आणि ती म्हातारी त्या पारा जवळ आली .
"पोरा वाईस पानी दे रे प्यायला लई तहान लागली बघ " म्हातारी म्हणाली . सदा ने शिरप्याला जवळच्या घरात पाठवलं , शिरपा पाणी घेऊन आला . म्हातारी ने पाणी पिले . ठीगळ लावलेल्या साडी ने तोंड पुसले . आणि पारावर बसली .
"म्हातारे गावात नवी दिसती , कुनच्या गावाची तू ? कुना कड आलिया ?"
व्हय रे नवीनच हाय मी , मी गुणा , मंबई वरून आलिया बघ . थोरले पोरग मंबई ला कामाला हाय मोठ्या कारखान्यात आणि धाकट पोरग बोंबलत हिंडतिया . मोठं पोरग नोकरीं साठी दुसरी कड जाणार व्हत मला भी घेऊन जाणार होत पण मीच नको बोलली . धाकट्या पोराला घर घ्यायला पैसे दिले त्या धाकट्या पोरानं ह्या गावात त्या नदी च्या पल्याड असलेले घर घेतलं बघ , आता तिकडच जाणार . नदी पलीकडच घर असं म्हंटल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली .
येडं हाय का तुझं पोरग अग म्हातारे नदीपलीकडची ती जागा लई वंगाळ हाय . आमी कोण भी तिकडे जात नाय . फकस्त गावातल् कोण मेल की नदीपल्याड जाऊन जाळतो ते भी नुसतं मड्या ला पेटवल की लगेच होडीत येऊन बसतो आणि गावात येतो .
"अरे पोरा माझ्या पोरानं मला काय न विचारता घर घेतलं बघ , माझं लहान पोरग माझं काय भी ऐकत नाय , स्वतःच्या मनाला वाटेल तस वागतय . कुठं बोंबलत जातंय काय करतंय मला काय भी सांगत नाय . घरी भी 4-4 दिवस येत नाय . लई समजावून सांगितलं पर ऐकत नाय आता मी भी नाद सोडला बघ . मोठं पोरग शान हाय , काम करत , पैसे कमवत , हे लहान पोरग वांड हाय . मी तर ह्या गावात नवीन मला काय माहित असणार र . पोरानं जिथं घर घेतल तिथं जाऊन राहणार . आणि तस भी अजून किती दिस राहिल माझं , पिकल पण कधी तर गळनार . "
"अग म्हातारे ती जागा वंगाळ हाय ग , कुणी बी राहत नाय तिकडं . ते घर त्या हडळ च हाय . ती कुठं असती , कशी दिसती कुणालाच माहित नाय . माणसं खाती ती हडळ . "
"हे बघ पोरा , मरण काय कुणाला भी चुकलं नाय , आणि बर वाईट होणार असेल तर कुठं भी होईल . मला कळतीय रे लेका तुझी काळजी पण माझं पोरग नाय शान , आणि डोक्यात राग धरल आन काय तर तिसरंच होईल बाबा . बर कधी कुणाला काय मदत लागली तर सांगा मला , मी सुईन हाय . आणि माझं पोरग दिसलं तर सान्गा त्याची म्हातारी घरी गेलीय . जेवण करून ठेवतीय .
म्हातारी सुईन आहे हे कळताच गावाची चिंता दूर झाली कारण आता दुसरी सुईण हूडकायाला नको . पण म्हातारी त्या नदीपलीकडच्या घरात राहणार हे ऐकून टेन्शन आलं .
"म्हातारे अगदी देवावाणी भेटलीस बघ , असं ही आमच्या गावची सुईण वारली हाय आणि पलीकडच्या गावात भी सुईणं नाय . तू सुईण हाईस म्हणजे आता काळजी नाय . पण म्हातारे त्या घरी जपून रहा . रातच्याला कुठं बाहेर जाऊ नकोस , त्या जंगलात तर अजिबात नको . वाटल्यास तू आणि तुझं पोरग गावात रावा . आमी सांगतो तुझ्या पोराला , तुझं पोरग आमचं ऐकलं . "
क्रमश ...
गुणांक्का (पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
No comments:
Post a Comment