काळरात्र
साधारणपणे 10 वर्षांपूरवुची गोष्ट असेल ही तेव्हा मी 9 वीला होतो घरात नवीन गाडी घेतल्याने खूप दिवसांपासून बाहेर फिरायला जायचं चालला होता तर सगळ्यांच्या संगमताने आम्ही रायगडला जायचा ठरवलं पावसाळ्याचे दिवस होते सकाळी आम्ही 5.30 वाजता निघालो चांदणी चौक पिरंगुट मुळशी ताम्हिणी आणि माणगाव करत आम्ही रायगडावर पोचलो काय ते सुंदर दृश्य सगळीकडे पाऊस आणि रोपेवे तर खाली तिकीट काढून आम्ही आमच्या फेरीची वाट बघू लागलो साधारण एक तासाने आमचा नंबर आला वर जाताना खाली सगळं धुकं काहीच दिसत नव्हता वरती शेजारी कोण उभं आहे हे पण कळत नव्हतं रायगड फिरून आम्ही परत खाली आलो तर एवढ्या लांब आलोय तर समुद्रकिनार्यवर जाऊन येऊ अस ठरलं तर आम्ही मुरुड करदेच्या किनाऱ्यावर जायचं ठरवलं दापोली करून आम्ही मुरड करदेवर पोचलो पण पावसामुळे समुद्राने आपला रौद्र अवतार धारण केलंत त्यामुळे पाण्यात उतरण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्यामुळे माशे खाण्याचा आमचा बेत पण राहिला 6 च्या दरम्यान आम्ही हर्णेवरून परत निघालो महाड मध्ये येता येता 9 वाजले होते महाड मध्ये जेवण केल्यावर हॉटेल मालकाला वरंधाचा मार्ग विचारला पण तो म्हणाला अजिबात त्या मार्गाने जाऊ नका रात्रीच्या 9 नंतर टिकडे काहीच नसता आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत तर आम्ही ताम्हिणी ने जायचं ठरवलं रात्रीचे 11 आम्हला माणगाव मध्ये वाजले थोडं फ्रेश होऊन आम्ही ताम्हिणीकडे निघालो ताम्हिणीच्या चढलाच धुकं सुरू झाला आणि पुढचं काहीच दिसत नव्हता आणि गाडी नवीन असल्याने त्यातले बरेचसे फुंकशन माहीत नव्हते हळू हळू करत आम्ही रायगड जिल्ह्याची बौन्द्री सोडून पुण्याच्या बौन्द्री मध्ये आलो आणि धुकं थोडा कमी झाला धुक्यामुळे ट्रक वाले सायडलाच थांबले होते तरी आम्ही हळू हळू प्रवास चालू ठेवला एक ठिकाणी पुण्याला जाणारा रस्ता असा सरळ होता आणि एक रोड गावात जात होता तर आमची गाडी 100 मीटर लांब असेल त्या वळणापासून आणि तिथे आम्हाला एक व्यक्ती दिसली ती गाडीला हात करत होती वडलांना वाटलं गाडी वगैरे बंद पडलिएका कोणाची म्हणून स्लो केली आणि असा वाटलं एक सेकंदात ती गाडीपाशी सरकत आली ती गाडीचा डाव्या बाजूला होती असा उंच धिप्पाड माणूस पूर्ण असा पंधरफिक्कत पडलेला चेहरा पांढर नेहरु सारख काही तरी घातला होता वडलांना कळलं नाही नेमका काई पण जेव्हा ते गाडीपाशी आला गाडीतल्या प्रत्येक जणांच्या अंगावर काटा आला एवढ्या पावसात दरदरून आम्हाला घाम फुटला वडलांनी गाडी जोरात पळवायला सुरवात केली दोन तीन ठिकाणी गाडी पण चांगलीच घासली खालून पण तरीही कशाचा विचार न करता गाडी पळवत होते ही कथा लिहतोय तरी माझा अंगावर काटा आला ते काई होता माहीत नाही पण घरी येईपर्यंतर कोणाचं कोणाशी काय बोलला नाही ही गोष्ट माझा आई ने माझा आजीला सांगितली तर आजीने त्याला खैस असा म्हणतात असा सांगितलं तेव्हापासून आम्ही रात्रीचा प्रवास टाळू लागलो
No comments:
Post a Comment