🔸भाग सहाची लिंक 👇👇👇
🔸मनोरुग्ण - भाग सात🔸
"तुम्हाला सांगितल होत ना मी, जे काय पाहायचे किंवा बोलायचे असेल ते दुरुनच करा म्हणुन..मग दरवाज्याच्या एवढ्या जवळ कशाला गेले होते तुम्ही" आरती धापा टाकत बोलत होती.
अनंत काही न बोलता बाहेर रिसेप्शनला जावून टेबलसमोरील खुर्चीवर बसला..त्याच्यामागून आरतीपण आली, आणी तिने त्याला एक ग्लास पाणी प्यायला दिले.
"कसयं तुम्हांला माहितीये का सर, दूसरी कोणती पेशंट असती तर एवढा प्रॉब्लेम नव्हता पण ह्या रेश्माच्या रुममध्ये मी सुद्धा कधी एकटी जात नाही हो..ती कधी काय करेल ते आम्हांला पण सांगता येत नाही"
"कसयं तुम्हांला माहितीये का सर, दूसरी कोणती पेशंट असती तर एवढा प्रॉब्लेम नव्हता पण ह्या रेश्माच्या रुममध्ये मी सुद्धा कधी एकटी जात नाही हो..ती कधी काय करेल ते आम्हांला पण सांगता येत नाही"
"पण अचानक काय झाल होत पण नेमक तिला..काही सांगता येईल का तुम्हाला, आरती मँडम"
"मला जास्त काही माहिती नाही..पण सेंकड शिफ्टची अलका मँडम म्हणत असते तिला तिचा मेलेला नवरा समोर दिसतो म्हणुन ती अशी वेड्यासारखी करत असते.. मी आजवर अनेक पेशंट पाहिले सर, पण हिच्यासारखी कोणी नाही पाहिली..खूपच रिस्की आहे, हिच्या रुममध्ये तर एकही वस्तु ठेवायची सोय नाही.. स्वताच्याच अंगाला जखमा करून घेते, अनेकवेळा आत्महत्येचा पण प्रयत्न केलाय तिने..कधी एकदा हिला दूसरीकडे शिफ्ट करतील काय माहिती.. आमच्यातर डोक्यालाच ताप झालाय हिचा"😶
आरतीने तिला माहित असलेली माहिती एका दमात सांगितली.. सर्व ऐकून अनंत सुन्न झाला होता..त्याने त्याच्या डायरीमध्ये अनेक महत्वाचे पॉइंट लिहून घेतले होते.. थोड्यावेळाने तो आरतीला धन्यवाद करुन त्या इस्पितळातून बाहेर पडला..बाहेर आता अंधार पडायला लागला होता म्हणुन त्याने कराड शहरामध्येच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
दूसर्या दिवशी पुण्याला परत येत असताना अनंतने शंखेश्वराच्या डोंगरावर जाऊन महादेवाचे दर्शन घेतले, तिथल्या निर्जन परिसराचे आणी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले तसेच सातारा पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलीसांच्या फाईलमधील सागरच्या म्रुत्यूचे पण रेकॉर्ड पाहिले.
"मग साहेब, कुठवर आलाय सागरच्या अज्ञात मारेकर्यांचा तपास?" अनंतने हसून विचारलेल्या या प्रश्नावर तिथल्या पोलीस अधिकार्याकडे उत्तर नव्हते.
"मारेकर्यांचा तपास सुरू आहे, पण वकीलसाहेब, तुम्ही ज्या बस अपघाताच्या केसचा तपास करत आहात त्याचा सागरच्या हत्येशी काय संबंध आहे?"
अधिकार्याने अनंतला प्रतिप्रश्न केला..पण त्यावर अनंतने कोणतेही उत्तर दिले नाही..जरी त्याच्या समोर सर्व घटनाक्रम आणी परिस्थिती संतोषने सांगितलेल्या कहाणी प्रमाणे जुळणारे असले तरीही अजूनही त्याचे मन तो अपघात सागरच्या आत्म्याने घडवून आणला हे मान्य करायला तयार नव्हते..आणी जरी मान्य केले तरी हे सगळे कोर्टासमोर कसे पटवून द्यायचे हे पण त्याला समजत नव्हते.
अधिकार्याने अनंतला प्रतिप्रश्न केला..पण त्यावर अनंतने कोणतेही उत्तर दिले नाही..जरी त्याच्या समोर सर्व घटनाक्रम आणी परिस्थिती संतोषने सांगितलेल्या कहाणी प्रमाणे जुळणारे असले तरीही अजूनही त्याचे मन तो अपघात सागरच्या आत्म्याने घडवून आणला हे मान्य करायला तयार नव्हते..आणी जरी मान्य केले तरी हे सगळे कोर्टासमोर कसे पटवून द्यायचे हे पण त्याला समजत नव्हते.
तो दिवस सातारा परिसरामध्ये घालवून अनंत रात्रीचा प्रवास करून पुण्यामध्ये परत आला. दूसर्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत झोप घेऊन दुपार नंतर त्याच्या ऑफीसमध्ये पोहोचला..केबिनमध्ये गेल्यानंतर मोनाली पण त्याच्या मागोमाग हातामध्ये एक फाईल घेऊन आली.🙎
"अनंतसर, तो बस अपघातातील आरोपी संतोषचा मेडिकल चेकअप रिपोर्ट आणी सायकोलॉजिकल रिपोर्ट आज सकाळीच हॉस्पीटलमध्ये जाउन कलेक्ट केला आहे मी"
"गुड, बघु बर जरा..काय म्हणतोय रिपोर्ट"
अनंत रिपोर्टची फाईल हातात घेऊन चाळू लागला.
अनंत रिपोर्टची फाईल हातात घेऊन चाळू लागला.
"इंटरेस्टिंग आहे सर..दोन्ही रिपोर्ट मध्ये तो एकदम नॉर्मल आणी फिट दिसून येत आहे..त्याचबरोबर त्याला कोणताही मानसिक आजार नाही असे पण मेन्शन केले आहे, याचा अर्थ सगळेजण म्हणतात तसा तो मनोरुग्ण बिलकुल नाहीये ,म्हणजेच ती बस अपघाताची घटना ही आरोपीने जाणीवपूर्वक घडवून आणलेली आहे..आता आपली केस ही एकदम क्लिअर झाली आहे असे मला वाटतेय" मोनालीने तिचे मत मांडले.
"नाही मोनाली, उलट केस आणखी कॉमप्लीकेटेड बनली आहे.. बर्याच वेळा समोर जे दिसत असते तेच पुर्णपणे बरोबर असलेच पाहिजे असे नसते"
मोनालीने आणलेला रिपोर्ट पाहून अनंत जास्तच विचारात पडला होता.. त्याच्यासमोर संतोषचा पुर्ण मेडीकल रिपोर्टही होता आणखी संतोषने सांगितलेल्या कहाणीचे सर्व संदर्भ पण त्याला गेल्या दोन तीन दिवसांमध्ये सापडलेले होते..पण हे सर्व कोर्टामध्ये सादर कसे करायचे हाच प्रश्न त्याच्यासमोर होता.
"ठिक आहे मोनाली, मी सांगतो त्याप्रमाणे संतोषची केसफाईल तयार करायला घे..सर्वात आधी...."🖊️📕
अनंतचे वाक्य पुर्ण होण्याच्या आतच टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल खणखणतो..आधीच त्रासलेला अनंत जरा रागातच फोन हातात घेतो, पण मोबाईल स्रीनवर किल्लेदार सरांचे नाव पाहुन कॉल रिसीव करून अदबीने रिप्लाय देतो.
"बोला सरजी..काय म्हणत आहात"
"अनंत, तुझ्याकडे माझे एक महत्वाचे काम आहे..हा एवढा आठवडा माझा मुक्काम पुण्यातच आहे तरी आज रात्री डिनरला माझ्या औंधच्या बंगल्यावर ये..तिथेच बोलतो तुझ्याशी"
पलीकडुन किल्लेदार सर बोलतात.
"अनंत, तुझ्याकडे माझे एक महत्वाचे काम आहे..हा एवढा आठवडा माझा मुक्काम पुण्यातच आहे तरी आज रात्री डिनरला माझ्या औंधच्या बंगल्यावर ये..तिथेच बोलतो तुझ्याशी"
पलीकडुन किल्लेदार सर बोलतात.
"ओके सर..नक्की भेटू आपण रात्री"
"आता किल्लेदार सरांनी काय काम काढले माझ्याकडे" फोन कट केल्यानंतर अनंत म्हणाला.
"मोनाली, गेले दोन तीन दिवसांच्या प्रवास आणी दगदगीमुळे मला थकवा जाणवत आहे.. आणी आज रात्री किल्लेदार सरांनी डिनरसाठी त्यांच्या घरी बोलावले आहे..माझे तर डोके जाम दुखायला लागलेय.. मी आता घरी जाऊन थोडावेळ आराम करतो..संतोषची केसफाईल आपण उद्या बनवू..तु बाकीचे काम बघ आणी साडेपाच वाजता ऑफीस बंद करून निघून जा"
मोनालीने मान डोलावली आणी अनंत चेअरवरून उठून केबिनच्या बाहेर पडला.
मोनालीने मान डोलावली आणी अनंत चेअरवरून उठून केबिनच्या बाहेर पडला.
रात्री नऊच्या आसपास अनंत औंध भागातील एका उच्चभ्रू वस्तीमधील किल्लेदार सरांच्या बंगल्यावर पोहोचला.🏙️
गेटवरच्या वॉचमेनला नाव सांगून एन्ट्री करून बंगल्याबाहेरच्या गार्डनमधून आत जाताच किल्लेदारांनी त्याचे स्वागत केले.. थोडावेळ गप्पा मारल्या नंतर दोघांनी डायनिंग हॉलमध्ये जावून आधी महागडे ड्रिंक्स घेऊन नंतर स्वादिष्ट डिनर उरकले.🍷
आणी त्यानंतर प्रशस्त हवेशीर गँलरीमध्ये ठेवलेल्या आरामखुर्चीवर जाउन बसले. किल्लेदारने पाकिटातुन दोन सिगारेट काढून एक अनंतला ऑफर केली.. किल्लेदार सर आज आपल्यासोबत एवढे आपुलकीने का वागत आहेत हे अनंतला समजत नव्हते.
गेटवरच्या वॉचमेनला नाव सांगून एन्ट्री करून बंगल्याबाहेरच्या गार्डनमधून आत जाताच किल्लेदारांनी त्याचे स्वागत केले.. थोडावेळ गप्पा मारल्या नंतर दोघांनी डायनिंग हॉलमध्ये जावून आधी महागडे ड्रिंक्स घेऊन नंतर स्वादिष्ट डिनर उरकले.🍷
आणी त्यानंतर प्रशस्त हवेशीर गँलरीमध्ये ठेवलेल्या आरामखुर्चीवर जाउन बसले. किल्लेदारने पाकिटातुन दोन सिगारेट काढून एक अनंतला ऑफर केली.. किल्लेदार सर आज आपल्यासोबत एवढे आपुलकीने का वागत आहेत हे अनंतला समजत नव्हते.
"कस आहे अनंत, तुला मी आज एक कानमंत्र देतो..तुला जर तुझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल ना तर तुझ्या वरिष्ठ अधिकार्यांची मर्जी कधीही मोडू नकोस.. एकेकाळी मी पण एक सामान्य वकील होतो रे.. तुझ्यासारखा तरुण असताना नेहमी सत्याच्या मार्गानेच चालणार असा निश्चय पण केला होता..पण सत्याच्या मार्गावर चालताना मला फक्त अपयश आणी ठोकराच खायला मिळाल्या नंतर मी ठरवले आधी स्वताचा आणी वरिष्ठांचा फायदा कशामध्ये आहे ते बघायचे आणी मग जमल तरच सत्याची बाजू घ्यायची..त्यानंतर मी प्रगती करायला सुरूवात केली आणी आज तु पाहतो आहेसच"
किल्लेदार सिगारेटचा धूर सोडत बोलत होते.
किल्लेदार सिगारेटचा धूर सोडत बोलत होते.
"बरोबर आहे, पण तुम्ही कशा संदर्भात बोलताय ते मला व्यवस्थित समजले नाही सर" अनंत गोंधळात पडला होता.
"स्वारगेट चौक बस अपघातातील एकमेव गुन्हेगार असणारा संतोष xx हा एक मनोरूग्ण सायको आहे अशी केसफाईल कोर्टामध्ये दाखल कर " किल्लेदारने शांतपणे सांगितले.🚬
"पण सर, मी त्याचा मेडीकल रिपोर्ट चेक केला आहे त्याप्रमाणे तो नॉर्मल आहे..त्याचबरोबर गेली गेली तीन चार दिवस मी या केससंदर्भात जो काही तपास केला आहे तो पण धक्कादायक.."
"फरगेट इट.., तो मेडीकल रिपोर्ट इंटर्नल आहे अजून पब्लिक मध्ये आणी मिडीयामध्ये गेलेला नाहीये.. तो पुर्ण रिपोर्ट तुला चेंज करुन मिळेल त्याची फिकीर तु करू नकोस"
"पण सर, आपल्याला माहित आहे कि तो मनोरुग्ण नाहीये, त्याच्या क्रुत्यामागे इतर काही कारणे आहेत तर मग आपण चूकीची केसफाईल का बनवायची?" अनंतने विचारले.
"तेच तर सांगतोय मी तुला..या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे..घटना घडल्यानंतर लगेच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे सांगितलेले आहे..त्यामुळे आता या प्रकरणी दुसरी कोणती नवीनच माहिती समोर येणे सरकारला परवडणारे नाही..कारण दूसरीकडे विरोधी पक्ष या प्रकरणाचे भांडवल बनवण्यासाठी सज्ज आहेत.. येत्या काही महिन्यामध्ये इलेक्शन्स पण डोक्यावर आहेत, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री साहेब विरोधकांना कोणताही मुद्दा देऊ इच्छित नाहीत, त्यामुळे त्यांची ऑर्डर आहे की सध्यातरी कोणताही अधिक तपास न करता आरोपीला मनोरूग्ण दाखवून थेट जेलमध्ये टाकावे.. जेणेकरून मिडीयाचा आणी पब्लिकचा फोकस या प्रकरणावरून दूर जाईल..आणी विरोधकांनाही या प्रकरणाचा फायदा उचलता येणार नाही. आधीच सरकारसमोर अनेक मोठे प्रश्न पडलेले आहेत..ही घटना घडली तेव्हाच मला मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितले होते की या प्रकरणामध्ये एखादा नवखा आणी मर्जीतील वकील दे म्हणुन त्यामुळेच तर अनेक नामवंत वकील असतानाही ही केस मी तुझ्याकडे सोपवली होती"
किल्लेदारांनी लांबलचक स्पष्टीकरण दिले.✋
किल्लेदारांनी लांबलचक स्पष्टीकरण दिले.✋
"पण प्रकरणाची पुर्ण माहिती नसताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अशी चुकीची माहिती का दिली होती"
"आता मी मुख्यमंत्र्यांना क्रॉस क्वेशन विचारू का? तुला नसली तरी मला आपल्या भविष्याची चिंता आहे बाबा, सर्व मिडीयामध्ये तशा बातम्या आलेल्या होत्या त्यावरून त्यांनी गेस केले असेल. पण ते काहीही असो..तु फक्त मी सांगतो तसे कर..भविष्यात टप्याटप्याने तुझी प्रगती कशी करायची ते मी बघतो." 🚬
किल्लेदारने संपत आलेली सिगारेट अँशट्रे मध्ये चिरडली.
किल्लेदारने संपत आलेली सिगारेट अँशट्रे मध्ये चिरडली.
"पण अशाप्रकारे रिपोर्ट वगैरे चेंज करून पुर्ण केसफाईल बदलणे म्हणजे समाजाची दिशाभूल करण्यासारखे वाटत आहे" अनंत नाराजीच्या स्वरात म्हणाला.
"अरे आपल्या समाजाची स्मरणशक्ती खूप कमी असते, एकामागोमाग एक नवनवीन प्रकरणे घडत जातात आणी लोक जूने प्रकरणे विसरत जातात..अजून थोड्या दिवसांनीच बघ हे प्रकरण, आरोपी आणी कोर्टाचा निकाल सर्व काही लोक आपोआपच विसरून जातील.. "
"सॉरी सर ,स्पष्टच सांगायचे म्हणले तर मला हे पटत नाहीये.. पॉलिटिकल दबावाखाली आपण आपला निर्णय बदलणे हे मला योग्य नाही वाटणार..सोळा माणसे मेली आहेत या दूर्घटनेमध्ये, वीसेक जखमी आहेत..या गंभीर प्रकरणाचे संपूर्ण सत्य हे समाजासमोर आणणे हे मी माझे कर्तव्य समजतो..बाकी यावर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, पण मी माझ्या मतावर ठाम आहे"
अनंतने न अडखळता वरील उत्तर दिल्याने किल्लेदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. 🙄
अनंतने न अडखळता वरील उत्तर दिल्याने किल्लेदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. 🙄
#क्रमश..
No comments:
Post a Comment