गणेशभक्त
(नवीन वाचकांच्यासाठी रिपोस्ट)
"अरे वेदांत आवर लवकर...किती पसारा केला आहेस...मी पूजा करेपर्यंत तुझं सगळं आवरून घे...शहाणा आहेस ना तू....पटकन आवर...चांगली आईवडिलांचं ऐकणारी मुले गणपती बाप्पाला आवडतात बरं"
प्रिया आपल्या 6 वर्ष्याच्या वेदांतला म्हणाली....वेदांत पटकन आवरू लागला....तशी प्रिया आपल्या पूजेत मग्न झाली....लहानपणापासून प्रिया गणपतीची भक्त होती...एकही दिवस असा नव्हता की तिने गणपतीचे दर्शन घेतले नसेल...शिकलेली असून सुद्धा "तूच माझी आई देवा तूच माझा बाप" ह्या निष्ठेने प्रत्येक काम गणपतीचे नाव घेऊनच सुरवात करायची...घरची पूजा झाल्याशिवाय तिचा पाऊल घराबाहेर पडायचा नाही...समोर गणपतीची सुंदर मूर्ती...तिच्यावर जास्वंदाचे फुल...आणि तिच्या तोंडून होणारी गणपतीची स्तुती आणि मधुर आवाजात म्हंटलेली मंत्रपुष्पांजली सोबत घंटेची किणकिण आणि अगरबत्तीचा मंद सुवास त्या घरात दरवळू लागला....आरती वैगेरे आटपून प्रियाने गणपतीला नैवेद्य दाखवला...आणि वेदांतला घेऊन ती घराबाहेर पडली....त्याला शाळेत सोडून ती ऑफिसला जाणार होती
महिन्यांपूर्वी ती ह्या घरात शिफ्ट झाली होती कारण तिच्या नवऱ्याची ह्या शहरात बदली झाली होती...त्या दोघांना आपल्या ऑफिसजवळ असणारं एखादं घर हवं होतं...जेणेकरून छोट्या वेदांत वर लक्ष देता येईल...पण औद्योगिक शहरात आणि त्या सिमेंटच्या जंगलात त्याची घरासाठी अखंड धडपड चालू होती....प्रियाचा नवरा प्रदीप आणि तिची खूप दमछाक झाली होती घर शोधता शोधता....शेवटी एक घर मिळालं....बऱ्याच दिवसापासून तिथे कोणी राहत नव्हते....प्रिया आणि प्रदीप ते घर पाहण्यासाठी गेले...मध्यवस्तीत असलेलं ते घर...त्याला अजून मालक कसा मिळाला नाही?? हा प्रश्न दोघांच्या मनात होता...पण त्या घराचा एजंट अंकुश हा प्रदीपचा चांगला जवळचा मित्र...प्रदीप आणि प्रियाला ते घर खूप आवडले होते...प्रशस्त आणि टापटीप घर ते पण इतक्या कमी किंमतीत मिळतंय ही डील प्रदीप साठी महत्वाची होती...चहाचा घोट घेता घेता अंकुश मोठया चिंतेत होता.....
"अरे अंकुश....काय झालं ??काही प्रॉब्लेम आहे का?? मघापासून गप्प गप्प आहेस...त्या घरासाठी अजून रक्कम हवी आहे का तुला?"
अंकुशने डोळ्यावरचा चष्मा उतरवला...चहाचा कप खाली ठेवून त्याने दीर्घ श्वास घेतला
"हे बघ प्रदीप...मी विषय जास्त फिरवत बसणार नाही आहे...पण हा विषय आधीच क्लियर करतो...तू ते घर घेऊ नको....wait wait माझं ऐकून घे मी काय सांगतो ते....ह्या पूर्वी त्या घरात तीन कुटुंबांनी रहायचा प्रयत्न केला पण...पण ते राहू शकले नाहीत....कारण वेगवेगळे आवाज ऐकू येणे...कसला तरी भास होणे असे प्रकार त्यांच्या बरोबर होत होते....हे घर ज्यांनी बांधलं ते वसंत पाटील यांच्या बायकोने त्या राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली...वसंतराव तिला सारखा त्रास द्यायचे...दोघांच्यात सारखे वाद होत होते....एकदिवस रागाच्या भरात त्यांच्या बायकोने त्या घरात पेटवून घेतले...ती गेली...पण वसंतरावांनी लगेच दुसरी बायको केली....त्यानंतर हा त्रास सुरू झाला...त्यांना ती दिसू लागली...कधी कधी वसंतरावांची दुसरी बायको विचित्र वागू लागली स्वतःला इजा करून घेऊ लागली...ह्या त्रासाला कंटाळून वसंतराव त्याच्या दुसऱ्या बायकोला आणि त्या पहिल्या बायकोच्या 4 वर्ष्याच्या मुलाला घेऊन इथून गावी निघून गेले...ते गेल्यावर इथे जे आले त्यांना सुद्धा काही विचित्र त्रास होऊ लागले म्हणून ते सुद्धा गेले....सो...मला वाटतंय की तू तुझ्या निर्णयावर विचार करावयास"
अंकुशचे हे कथन ऐकून प्रदीप जोरजोरात हसू लागला...हॉटेलमध्ये बसलेले लोक त्याच्याकडे बघत होते...शेवटी हसू आवरत तो अंकुशला म्हणाला
"अरे अंक्या...काय साल्या तू पण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवून लागलास काय??अरे मी नाही ठेवत असल्या गोष्टींवर विश्वास...मला ते घर आवडलंय...मी तेच घर घेणार बघू काय होतंय"
अंकुशने त्या घराची फाईल आपल्या बॅग मधून बाहेर काढली
"ठीक आहे जशी तुझी इच्छा....हे घे पेपर्स...ह्यावर साइन कर आणि उद्यापासून ते घर तुझं....बाकीची प्रोसिजर पूर्ण करून फायनल पेपर लवकरच तुला मी देईन"
"ठीक आहे जशी तुझी इच्छा....हे घे पेपर्स...ह्यावर साइन कर आणि उद्यापासून ते घर तुझं....बाकीची प्रोसिजर पूर्ण करून फायनल पेपर लवकरच तुला मी देईन"
प्रदीपने पेपर्स साइन केले...लगेच ते त्या घरात शिफ्ट झाले...प्रियाने सगळं घर अगदी व्यवस्थित आवरलं होतं....काही दिवस मजेत गेले....दोघांचीही ऑफिसेस त्या घरापासून जवळच होती त्यामुळे दोघेही आनंदात होते...पण काही दिवसात अंकुश ने सांगितल्या प्रमाणे त्या घराने आपले रंग दाखवायला सुरवात केली....प्रदीप एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला होता...एके दिवशी तो खूप काळजीत होता...प्रियाने त्याचे कारण विचारले
"अग प्रिया...आमच्या कंपनीच्या कोरियामध्ये एक्स्पोर्ट होणाऱ्या मालात काहीतरी मोठा फॉल्ट सापडला आहे आणि विशेष म्हणजे त्याचं सुपरवाईझींग मी केलं होतं...साहेब म्हणतात मला कोरियाला जाऊन ती चूक सुधारली पाहिजे....नाहीतर कंपनीचे मोठे नुकसान होईल...आता त्या चुकीचा आळ माझ्यावर आला आहे मला तिथून परत यायला तीन महिने तरी लागतील गं"
प्रियाने प्रदीपला धीर दिला "तू बिनधास्त जा प्रदीप....मी आहे लक्ष देईन मी...गणपती बाप्पा सगळं नीट करेल"
प्रियाचा निरोप घेऊन प्रदीप त्वरित कोरियाला रवाना झाला....आता प्रिया आणि वेदांत दोघेचं राहू लागले....प्रिया छोट्या वेदांतकडे कामातून लक्ष देत होती...तिकडे प्रियाची सुद्धा तब्बेत बिघडू लागली....तिला सतत खोकल्याचा त्रास होऊ लागला....त्यामुळे तिचं घरात लक्ष जरा कमीच राहू लागलं....तिकडे वेदांत कडे तिला लक्ष देणे अवघड होऊन बसलं....तिचं डोकं नेहमी जडजड वाटायचं....किती डॉक्टर केले तरी काहीच फरक पडत नव्हता...ह्याचा परिणाम तिच्या कामावर होऊ लागला....तिचे ऑफिसचे काम पेंडिंग पडू लागले....सततच्या आजारपणाने आणि सततच्या सुट्ट्या यामुळे तिला तिच्या बॉस कडून नेहमी ऐकून घ्यावं लागतं होत....शांत स्वभावाची ती चिडचिड करू लागली.....ह्या सगळ्यात तिची "गणेश सेवा" मात्र विस्कळीत झाली.....प्रत्येक गोष्टीत गणपतीचे नाव घेणारी प्रिया आज गणपतीला विसरून गेली होती....त्या देव्हारातल्या गणपतीची पूजा आता बंद झाली होती....सुमधुर आवाजातील ती आरती आणि घंटेची किणकिण बंद होऊन प्रियाने छोट्या वेदांत वर काढलेला राग....आणि तिचा तो जीवघेणा खोकला याने त्या घराचे प्रसन्न वातावरण कमालीचे नकारात्मक बनले होते....बाल्कनीतली तुळस आता पाण्याअभावी वाळून गेले होती.....प्रिया आता प्रचंड मानसिक त्रासात होती....ऑफिसमध्ये केलेल्या कामात सुद्धा चुका होत होत्या....घरी आली की वेदांत सतत त्रास द्यायचा....कित्येक रात्री तिने जागून काढल्या कारण आपल्या आणि वेदांतच्या मध्ये कोणीतरी झोपलं आहे असा भास तिला नेहमी व्हायचा....देवाला तर ती पूर्णपणे विसरली होती...तिकडे प्रदीपचा काहीच पत्ता नव्हता...त्याचा फोन लागत नव्हता ना येत होता....ऑफिसमध्ये चौकशी केली तर नेहमी तीला उडवाउडवीची उत्तरे मिळायची....प्रदीप शिवाय ती एकटी पडली होती....सगळा दोष ती आपल्या नशिबाला देत होती....."मायबाप" गणपती आता तिला विलन वाटू लागला होता....एकेदिवस तीला अशक्त पणा वाटत होता...ती आज घरीच थांबली होती...आपल्या आराम खुर्चीत ती विचार करत झोके घेत हॉल मध्ये बसली होती समोर देव्हारा होता आणि त्या देव्हाऱ्यात अनेक दिवसांपासून धूळ खाऊन पडलेली आणि वाहिलेली फुले कोमेजून त्या मूर्ती वर चिटकलेली फुले...त्या मूर्तीकडे ती एकटक बघत विचार करत होती
"आपण याची आयुष्यभर सेवा केली आणि ह्याने आपल्याला काय दिले??नवरा बसला तिकडे कोरियात अडकून...त्याचा फोन सुद्धा लागत नाही...जिवंत आहे की तिकडेच मेला काय माहीत...मी इकडे आजारी...आणि हा सुखकर्ता म्हणे...काय सुखी आहे मी???....माझा सुद्धा जॉब जाईल असच चालू राहिले तर....मलाच कमवावे लागते बाहेर जाऊन...कोणी मला आणून देत नाही घरी...मी एकटी खंबीर आहे...खरंच काही उपयोग नाही याचा....मला नकोय कुणी बाप्पा...फिप्पा"
"आपण याची आयुष्यभर सेवा केली आणि ह्याने आपल्याला काय दिले??नवरा बसला तिकडे कोरियात अडकून...त्याचा फोन सुद्धा लागत नाही...जिवंत आहे की तिकडेच मेला काय माहीत...मी इकडे आजारी...आणि हा सुखकर्ता म्हणे...काय सुखी आहे मी???....माझा सुद्धा जॉब जाईल असच चालू राहिले तर....मलाच कमवावे लागते बाहेर जाऊन...कोणी मला आणून देत नाही घरी...मी एकटी खंबीर आहे...खरंच काही उपयोग नाही याचा....मला नकोय कुणी बाप्पा...फिप्पा"
अस बोलून ती रागात उठली...तिने एक कापड घेतलं...सगळे देव गुंडाळले आणि माळ्यावर ठेऊन आली....देव्हारा रिकामा झाला....ती आता पूर्णपणे नास्तिक बनली होती...जॉबवर जात असताना बाजूच्या मंदिरातल्या घंटेचा आणि टाळ्यांचा आवाज तिच्या कानाला त्रास देत होता..घरात आल्यावर तर तिला खूप नकारात्मक विचार येत होते....ऑफिसमधल्या काही बायका प्रमाणे आपण सुद्धा दारू प्यावी आणि सगळं दुःख विसरावे असे विचार तिच्या मनात येऊ लागले.....घरात आता रोजच चिकन मटणाचा बेत होऊ लागला....छोटा वेदांत सुद्धा आवडीने बकऱ्याची हाडे फोडून खाऊ लागला....एक फळ खाऊन उपास करून गणपतीच्या नामस्मरणात लिन असलेली प्रिया आता संकष्टीला सुद्धा मटण खाऊ लागली....प्रदीपचा तर पत्ताच नव्हता....तिकडे प्रियाच्या मनात वाईट वाईट विचार येत होते....घरी जेवून बसली की कुणीतरी तिच्या कानात नेहमी फुसफूसायचं....घरात आल्यावर तिला एक अजबच फिलिंग यायचं जेवण करताना ती नेहमी मागे वळून बघायची...कोणी तरी आपल्या मागे उभं आहे असं तिला नेहमी वाटायचं....पण ह्याबद्दल तिने कुठे सुद्धा वाच्यता केली नाही किंवा तिला ती करू वाटली नाही...कुणासमोर घरातले प्रकार ती सांगू लागली की आपोआप तिला विसरायला होई....रात्री अपरात्री त्यांची चादर ओढली जाई.....कधी कधी वेदांत उठून बेड वर बसत असे आणि त्या समोरच्या भिंतीकडे बघत असे....प्रिया त्याला परत झोपवत असे...असे प्रकार रोजच घडू लागले....
एकेदिवशी वेदांतला शाळेत सुट्टी होती...प्रिया त्याला शेजारच्या काकूंच्या कडे सोडून गेली होती....प्रिया काम आटपून घरी आली काकूंनी सांगितलं की वेदांत घरीच आहे....प्रिया घरी आली तिने आज हाफ दे घेतला होता तिला आज खूपच अशक्तपणा वाटत होता...तिने घरात प्रवेश केला....तिला हसण्याखिदळण्याचा आवाज येत होता....कुठल्यातरी बाईचा विचित्र आवाज येत होता ती विचित्र आवाजात हसत होती....त्याच भयाण आवाजात कोवळ्या वेदांतचा हसण्याचा आवाज येत होता....प्रिया दबक्या पावलाने वेदांतच्या खोलीकडे जाऊ लागली..तिने हळूच दरवाजा उघडला...आणि दाराच्या फटीतून ती बघू लागली ...समोरचं दृश्य बघून ती खालीच बसली....वेदांत हवेत उडत होता आणि हवेतच गोल गोल फिरत होता...तो हसत होता...प्रियाच्या तोंडून किंचाळी बाहेर पडली
एकेदिवशी वेदांतला शाळेत सुट्टी होती...प्रिया त्याला शेजारच्या काकूंच्या कडे सोडून गेली होती....प्रिया काम आटपून घरी आली काकूंनी सांगितलं की वेदांत घरीच आहे....प्रिया घरी आली तिने आज हाफ दे घेतला होता तिला आज खूपच अशक्तपणा वाटत होता...तिने घरात प्रवेश केला....तिला हसण्याखिदळण्याचा आवाज येत होता....कुठल्यातरी बाईचा विचित्र आवाज येत होता ती विचित्र आवाजात हसत होती....त्याच भयाण आवाजात कोवळ्या वेदांतचा हसण्याचा आवाज येत होता....प्रिया दबक्या पावलाने वेदांतच्या खोलीकडे जाऊ लागली..तिने हळूच दरवाजा उघडला...आणि दाराच्या फटीतून ती बघू लागली ...समोरचं दृश्य बघून ती खालीच बसली....वेदांत हवेत उडत होता आणि हवेतच गोल गोल फिरत होता...तो हसत होता...प्रियाच्या तोंडून किंचाळी बाहेर पडली
"वेदांत ssssssss"
ह्या किंचाळीने वेदांत ने खाली बघितले आणि तो वरून खाली जोरात आला तो बेड वर कोसळला.....प्रिया धावत गेली आणि त्याला कवटाळून बसली....कसला तरी जोराचा धक्का मारून कुणीतरी दार आपटून बाहेर गेल्याचं तिला जाणवलं...ह्या प्रकारानंतर ती पूर्णतः हादरून गेली होती....कसला तरी विचार करत ती वेदांतला कवटाळून झोपी गेली....रात्र झाली अचानक गारठा जाणवू लागला....प्रियाला जाग आली वेदांत कुडकुडत होता...त्याचं अंग प्रचंड गरम झालं होतं...त्याला घाम फुटला होता...प्रियाला काळजी वाटू लागली....तिने रात्रभर वेदांतच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पण काहीच फरक पडला नाही.....सकाळ झाली पूर्ण रात्री तिने जागून काढली....वेदांत तापाने भाजत होता...प्रिया बाथरूम मध्ये जाऊन आवरू लागली....वेदांतला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं....आपलं आवरून झाल्यावर ती वेदांतच्या खोलीत आली....समोरचं दृश्य बघून ती शहारली...वेदांत उठून बसला होता...एकटक तो समोरच्या भिंतीकडे बघून हात करत होता...त्याचा बिछाना लाल झाला होता त्याने रक्ताची उलटी केली होती...प्रिया धावत गेली आणि त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करू लागली....पण त्याची शुद्ध हरपली....प्रियाने त्याला उचलून कडेवर घेतलं....ती त्याला घेऊन शेजारच्या काकूंना हाका मारू लागली....वेदांतचे हे हाल बघून काकू शहारली....त्यांनी त्वरित हॉस्पिटल गाठलं....डॉक्टरांनी वेदांतचे चेकअप केले....तिकडे प्रियाची रडून हालत खराब होती....काकू तिला धीर देत होती...छोटा वेदांत अजून बेशुद्ध होता.....दिवस जात होते....प्रिया त्याच्याजवळ बसून होती....त्याला जाग यायची एखादी रक्ताची उलटी व्हायची...असं चालू होतं....प्रियाला प्रचंड मानसिक त्रास आला....गुबगुबीत असलेला वेदांत आता खूपच अशक्त बनला होता....डोळ्याभोवती आलेल्या काळ्या वर्तुळामुळे त्याचं ते बालपण हरवून गेलं होतं....आठवडा झाला तरी वेदांतची हालत सुधारत नव्हती...डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं....एखाद्या लहान मुलांची अशी हालत ते पहिल्यांदा बघत होते....चेकअप करताना त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता प्रियाला प्रचंड वेदना देत होती....चेकअप झाल्यावर त्यांनी प्रियाला आपल्या ऑफिस मध्ये बोलावलं
"हे बघा ताई....हा असा आजार मी पहिल्यांदा बघत आहे...तुमच्या मुलाच्या अंगात रक्ताची खूप कमतरता आहे...मी सगळ्या टेस्ट केल्या...टेस्ट नॉर्मल दाखवत आहेत पण त्याची बॉडी आमच्या औषधांना सपोर्ट करत नाहीय....ह्या बद्दल मी बेंगलोरच्या एका डॉक्टरांशी चर्चा केली...तुम्ही एक काम करा...तुम्ही तुमच्या मुलाला बेंगलोरला घेऊन जा....तिथे तुमच्या मुलाचा इलाज योग्य पद्धतीने होईल....मी आता याला डिस्चार्ज देतो आणि काही औषधं सुद्धा देतो....ज्यामुळे त्याला बरं वाटेल....4 दिवसांनी ते डॉक्टर येतील तेव्हा ते योग्य इलाज करतील....तुम्ही आजिबात घाबरू नका"
डॉक्टरचे हे वाक्य ऐकून प्रियाच्या मनात अनेक प्रश्न होते तिने ते बोलून दाखवले
"पण डॉक्टर तुम्ही त्याला इथे ठेऊन घ्या ना...4 दिवसांनी आम्ही त्याला तिकडे नेतो"
"पण डॉक्टर तुम्ही त्याला इथे ठेऊन घ्या ना...4 दिवसांनी आम्ही त्याला तिकडे नेतो"
त्यावर डॉक्टर तिला धीर देत म्हणाले
"हे बघा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल दाखवत आहेत...आणि इथल्या वातावरणापेक्षा तुमच्या घरच्या वातावरणात तो लवकर बरा होईल....बघितलं ना इंजेक्शन च्या सुईला किती घाबरतो तो"
"हे बघा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल दाखवत आहेत...आणि इथल्या वातावरणापेक्षा तुमच्या घरच्या वातावरणात तो लवकर बरा होईल....बघितलं ना इंजेक्शन च्या सुईला किती घाबरतो तो"
डॉक्टरांचे म्हणणे प्रियाला पटले....ती वेदांतला घेऊन घरी आली....त्याची हालत तिला वेदना देत होती...खेळकर वेदांत आता गप्प होता...काहीतरी विचित्र बडबडत होता....प्रियाने त्याला जेवण भरवलं आणि त्याला कवटाळून झोपी गेली.....रात्री झाली ....त्यांच्या अंगावरचं पांघरून आपोआप खाली गेलं....प्रियाला थंडी वाजत होती.....अचानक तिच्या कानावर आलेले तिचे केस मागे सरकले आणि तिच्या कानात कोणीतरी कुजबुजले
"शे...व....ट...... भेटून घे पोराला.....उद्यापासून त्यो माझा होणार आहे"
ह्या वाक्याने तिचे डोळे खाडकन उघडले....वेदांतच्या तोंडातून रक्त येत होतं....ती त्याला उठवायचा प्रयत्न करू लागली पण त्याची हालचाल होत नव्हती....तिच्या आर्त हाकांनी सगळं घर शहारले पण...तिने त्याला उचलून कडेवर घेतलं....आणि बाहेर आली....जवळपास रात्रीचे 3 वाजत होते....प्रियाने शेजारच्या काकूंचे दार ठोठावले पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता....शेवटी तिने खाली बघितले तर घराला कुलूप....ती आता रडू लागली...वेदांत आता थंड पडत होता....त्याला घेऊन ती हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागली रस्ता पूर्ण सामसूम होता...त्या रस्त्यावर ती चालत होती....कोणीतरी आपल्या मागे आहे असं तिला वाटायचं मागे बघितलं की कुणीच नसायचं....वेदांतची हालचाल होऊ लागली...तशी ती त्याच्या पाठीवर हात ठेवत प्रेमाने बोलली
"वेदांत.....बाळ....आलं हॉस्पिटल...काही होणार नाही तुला"
पण वेदांत तिच्या त्या आर्त हाकेला प्रतिसाद देत नव्हता....त्याला आणखी एक रक्ताची उलटी झाली....खांद्यावर डोकं ठेवून झोपलेल्या वेदांतचे रक्त प्रियाची पाठ लाल करत होत..............
प्रिया हॉस्पिटलच्या दिशेने झपझप चालत होती...तिच्या डोळ्यात अश्रू होते तिचा लाडका वेदांत तिच्या हाकेला "ओ" देत नव्हता...तिची नजर रस्त्यावर होती....कुणी तरी मदत करावी आणि पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन वेदांत ला ऍडमिट करावं अशी आशा बाळगून तिची नजर मदतीच्या शोधात होती पण नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर आज चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते......प्रिया वेदांतच्या पाठीला कुरवाळत अश्रू गाळत रस्त्यावरून चालली होती....एक आवाज तिला कानी पडला
"माई......ए......माई
मला भूख लागली गं....कित्येक दिवस मी काही खाल्लं नाही गं माई"
मला भूख लागली गं....कित्येक दिवस मी काही खाल्लं नाही गं माई"
प्रियाची पाऊले अचानक थांबली..मदतीच्या शोधात असलेल्या प्रियाची नजर त्या आवाजाच्या दिशेने वळली......एक लहान मुलगा असेल 10 वर्षाचा.....काळाकुट्ट.....बहुतेक कित्येक दिवस त्याने अंघोळ केली नव्हती....अंगावर मळके कपडे शर्टाची बटन तुटलेली....पायात चप्पल नव्हतं.....आधीच संकटात प्रत्येक क्षण महत्वाचा असणाऱ्या प्रिया समोर हा मुलगा उभा राहिला....तशी प्रिया त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागली तसा तो मुलगा "माई.....माई" करत तिच्या पुढे आला
"माई....माई......असं का गं करतेस....बघ ना भूक लागली मला"
आपल्या पोराच्या जिवाच्या काळजीत असताना हा मुलगा मध्ये येतोय हे बघून प्रिया संतापली...तिने त्याला दूर ढकलले....तसा तो मुलगा बाजूला झाला...वेदांत अजून शांत निपचित तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन पडून होता....प्रियाने आपले डोळे पुसले....एरव्ही प्रत्येक गरिबाला मदत करणारी प्रिया आज त्या मुलाला फटकारत बोलली....प्रचंड नकारात्मकता तिच्या मनात भरली होती....
"ए....निघ इथून.....इथं माझा मुलगा आजारी आहे आणि तू का मध्ये मध्ये येत आहेस चल निघ"
तसा तो मुलगा परत धावत धावत तिच्यापुढे आला....त्याने आपल्या खिश्यातला एक कागद प्रियाच्या हातात खवला....
"ठीक आहे माई.....जातो मी....तो कागद एखादा उघडून बघ.....तो नक्कीच मदत करेल तुला"
असं बोलून तो मुलगा त्या भयाण अंधारात निघून गेला....प्रियाने त्या कागदाची घडी उघडली....तिचे डोळे अचानक मोठे झाले....तिचे डोके ठणकू लागले...त्या कागदावर गणपतीचे चित्र होते...त्या गणपतीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते...त्या फोटोकडे बघून प्रियाच्या डोक्यात परत तोच विचार आला "हा काय मदत करणार आपल्याला??देव नावाची गोष्टच या जगात नाही..माझी इतकी वर्षे फुकट गेली ह्याच्या भक्तीत"..तिच्या कानात परत तो आवाज घुमला
"फे...कु....न............दे....त्याला"
ह्या आवाजाने प्रियाने आपला हात वर केला आणि तो फोटो फेकून देऊ लागली....तितक्यात एक भलामोठा पावसाचा थेंब तिच्या डोळ्यावर पडला....तसा गचकन तिने डोळा मिटला....बघता बघता टपटप करत मोठमोठाले पावसाचे थेंब कोसळू लागले.....आधीच अंधार आणि त्यात हा पाऊस....झाडाच्या पानांची सळसळ वाढू लागली...आधीच आजारी असणारा वेदांत भिजू नये म्हणून प्रियाने आपला पदर त्याच्या डोक्यावर टाकला आणि तो फोटो त्याच्या डोक्यावर ठेऊन ती पावसापासून वाचण्यासाठी निवारा शोधू लागली....ती पावसात पूर्णपणे भिजली होती....तिला खूप थंडी वाजत होती....त्या मोठमोठ्या थेंबानी समोरचं काहीच दिसत नव्हतं....रस्त्यावर क्षणार्धात पाणी ओसंडून वाहू लागलं....समोरच्या अंधारात तिला एक प्रकाश दिसला.....त्या प्रकाशाच्या दिशेने ती जाऊ लागली.....मोठ्या पावसामुळे त्या भागातील वीज खंडित झाला होता....एक दिवा दिसत होत्या त्या दिशेने ती जाऊ लागली....तिथे गेल्यावर अचानक पाऊस ओसरू लागला....वाटेत येणारा तिचा खोकला कमी झाला होता....पाऊस कमी झाला तशी तिला वेदांतची काळजी होऊ लागली तिने त्याला कडेवरून खाली घेतले.....अचानक थंडगार झालेलं त्याचं अंग थोडं गरम जाणवू लागलं....त्याने आपले बारीक डोळे उघडून तिला बघितलं आणि प्रियाचा हात घट्ट पकडला....प्रियाला सुद्धा आता नॉर्मल वाटू लागलं होतं...पाऊस ओसरताच तिने वेदांतला परत उचलून कडेवर घेतलं...ती परत आपल्या हॉस्पिटलच्या वाटेला जाणार इतक्यात परत जोराचे वारे वाहू लागले परत पाऊस वाढला....प्रियाला काहीच सुचत नव्हतं....मागे कसला तरी आवाज झाला तशी ती मागे वळली....समोर बघितले तर तोच मळकट मुलगा तिथे उभा होता.....त्याने प्रियाकडे बघितलं....आणि समोरच्या दरवाज्याकडे इशारा केला आणि तो धावत धावत त्या दरवाज्याजवळ पोचला...त्याने दरवाजा उघडला आणि एकनजर प्रियाकडे बघून तो त्या खोलीत शिरला.....मघाशी गायब झालेला मुलगा अचानक परत इथे कसा काय"??ही उत्सुकता प्रियाला लागली.....समोरच्या खोलीतुन एक मिनमिनता प्रकाश बाहेर येत होता बाहेर सुटलेल्या मोठया वादळात तो दिवा आपलं अस्तित्व टिकवून होता...प्रिया वेदांत ला घेऊन त्या खोलीत शिरली....पावसात भिजल्यामुळे तिच्या अंगातून पाणी ओघळत खाली सांडत होतं....ती त्या खोलीत शिरून त्या मुलाला शोधू लागली...तिची नजर आजूबाजूला गेली तो मुलगा कुठेच दिसेना...अचानक तिची नजर समोर गेली आणि ती मोठ्या आवाजात किंचाळली...काहीतरी अनपेक्षित तिने पाहिलं..तिच्या डोळ्यांची आग आग होऊ लागली...तिने वेदांतला खाली ठेवलं आणि डोळे घट्ट मिटून घेतले....तिच्या डोळ्यांना त्रास होत होता...ती डोळे चोळत एका कोपऱ्यात बसली...डोळे मिटल्यावर तिला गरगरल्या सारखं होऊ लागलं..डोळे मिटल्यावर त्या काळ्या अंधारात...तिला एक बाई त्यांच्या घरात फासावर लटकत आहे....त्यानंतर तिची काळी सावली पूर्ण घरभर फिरत आहे....अचानक प्रियाला त्या बाईच्या हातात वेदांतचा हात दिसला....तिथेच बाजूला एका खुर्चीला बांधून घातलेले प्रिया दिसली....प्रियाकडे बघून ती बाई म्हणाली
"माझ्या नवऱ्याने माझा लेकाला माझ्यापासून दूर केले...पण तुझा लेक मला आवडला आहे...मी त्याला घेऊन जाणार......घेऊन जाणार मी त्याला"
वेदांत तिच्याकडे हात करून रडत होता....मदतीसाठी "आई मला वाचवं.....आई मला वाचवं" अस ओरडत होता...ती बाई त्याला फरफटत घेऊन जात होती
"चल....चल.....घेऊन जाणार मी तुला" असा भयाण आवाज करत होती
वेदांत तिच्याकडे हात करून रडत होता....मदतीसाठी "आई मला वाचवं.....आई मला वाचवं" अस ओरडत होता...ती बाई त्याला फरफटत घेऊन जात होती
"चल....चल.....घेऊन जाणार मी तुला" असा भयाण आवाज करत होती
ह्या वाक्याने खाडकन प्रियाचे डोळे उघडले....वेदांत निपचित पडला होता....आधी गुटगुटीत असलेला वेदांत....आता आजारपणामुळे तो अशक्त झाला होता त्याची हाडे दिसू लागली होती...प्रियाने त्याच्या केसावरून हात फिरवला....तिने वर बघितलं....ती उभी राहिली.....त्या मंद दिव्यात सुद्धा तो भलामोठा दिसत होता....त्याला बघून प्रियाच्या डोळ्यांची जळजळ झाली होती त्याचीच मूर्ती तिला शीतलता देत होती....गणपतीच्या देवळात ती आली होती....आली होती नाही आणली होती....त्या घरातील काळ्या शक्ती तिच्यावर हावी होऊन प्रियाच्या डोक्यातून गणपती पूर्णपणे विसरवून टाकला होता....त्याच गणपतीच्या मंदिरात परत एकदा त्या मुलाने आणलं होतं....तो मुलगा आता कुठेच दिसत नव्हता....दिसत होती ती समोरची गणपतीची मूर्ती....त्या मुलाची भूक तिला लक्षात आली....तो "भक्तीचा" भुकेला होता....रोज पूजा अभिषेक करून सुद्धा त्या मंदिरातला गणपती आज मळकट वाटत होता.....कित्येक दिवसांनी प्रियाचे हात परत गणपती समोर जोडले गेले...."माफ कर देवा....तुझी सेवा करू शकले नाही...पण शेवटी तूच मार्ग दाखवलास....आता बघते ती कशी घेऊन जाते माझ्या वेदांतला"
साडीचा पदर कमरेला खवुन...तिने बाजूची कळशी घेतली आणि त्या कळशीतील पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अंघोळ घातली.....बाजूच्या तांब्यातील दूध गणपतीच्या मस्तकावर ओतलं....वेदांतच्या काळजीने तिच्या डोळ्यात अश्रू होते त्याच अश्रूपूर्ण डोळ्यांनी तिची पूजा चालू होती.....मूर्तीला अष्टगंध.....थोडी फुले आणि गणपतीच्या मस्तकावर प्रियाने दुर्वांची जुडी ठेवली....आरती कर्पूर पेटवून तिने गणपतीची आरती म्हणायला सुरवात केली....मधेच तीच लक्ष वेदांत कडे जायचं आरती म्हणत असताना मध्येच तिला हुंदके यायचे..आरती पत्रात तिचे अश्रू गळत होते..आरती झाल्यावर तिने त्या कुंडातील तीर्थ एका वाटीत घेतलं आणि वेदांतला पाजलं.....तिने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि डोळे मिटून अथर्वशीर्ष पठण चालू केले...आज तिच्या पूजेत भक्ती बरोबर वेदांतची काळजी सुद्धा होती.....अचानक वारे वाहू लागले....खिडक्यांची कवाडे एकामेकावर आपटू लागली....एक मोठा वाऱ्याचा झोत आला आणि गणपतीच्या डोक्यावरची दुर्वांची पेंड गडगडत येऊन वेदांतच्या मस्तकावर पडली....प्रियाचे डोळे बंद होते...तिचे नामस्मरण चालूच होते
साडीचा पदर कमरेला खवुन...तिने बाजूची कळशी घेतली आणि त्या कळशीतील पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अंघोळ घातली.....बाजूच्या तांब्यातील दूध गणपतीच्या मस्तकावर ओतलं....वेदांतच्या काळजीने तिच्या डोळ्यात अश्रू होते त्याच अश्रूपूर्ण डोळ्यांनी तिची पूजा चालू होती.....मूर्तीला अष्टगंध.....थोडी फुले आणि गणपतीच्या मस्तकावर प्रियाने दुर्वांची जुडी ठेवली....आरती कर्पूर पेटवून तिने गणपतीची आरती म्हणायला सुरवात केली....मधेच तीच लक्ष वेदांत कडे जायचं आरती म्हणत असताना मध्येच तिला हुंदके यायचे..आरती पत्रात तिचे अश्रू गळत होते..आरती झाल्यावर तिने त्या कुंडातील तीर्थ एका वाटीत घेतलं आणि वेदांतला पाजलं.....तिने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि डोळे मिटून अथर्वशीर्ष पठण चालू केले...आज तिच्या पूजेत भक्ती बरोबर वेदांतची काळजी सुद्धा होती.....अचानक वारे वाहू लागले....खिडक्यांची कवाडे एकामेकावर आपटू लागली....एक मोठा वाऱ्याचा झोत आला आणि गणपतीच्या डोक्यावरची दुर्वांची पेंड गडगडत येऊन वेदांतच्या मस्तकावर पडली....प्रियाचे डोळे बंद होते...तिचे नामस्मरण चालूच होते
"आई sssssss"
असा एक मोठा आवाज त्या खोलीत घुमला...प्रियाचे डोळे उघडले...वेदांत पोट पकडून उठून बसला होता....प्रियाने त्याला सावरलं....एक मोठी किंचाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि त्याला उलटी झाली....प्रियाने त्याला पकडलं....उलटी करून तो आईच्या कुशीत शिरला....प्रियाने त्याला कवटाळले...तिने खाली बघितले की वेदांतच्या तोंडून काळी घट्ट उलटी बाहेर पडली होती त्यात एक मोठा केसांचा पुंजका होता....वेदांत शांत झाला......प्रियाने गणपती समोर हात जोडले आणि बाजूचा अष्टगंध वेदांतला लावला.....ती काळरात्र संपली
होती. काळे ढग जाऊन स्वच्छ कोवळी सूर्यकिरणे पडली...गणपतीच्या कृपेने परत एकदा नवी सकाळ प्रियाच्या आयुष्यात आली
असा एक मोठा आवाज त्या खोलीत घुमला...प्रियाचे डोळे उघडले...वेदांत पोट पकडून उठून बसला होता....प्रियाने त्याला सावरलं....एक मोठी किंचाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि त्याला उलटी झाली....प्रियाने त्याला पकडलं....उलटी करून तो आईच्या कुशीत शिरला....प्रियाने त्याला कवटाळले...तिने खाली बघितले की वेदांतच्या तोंडून काळी घट्ट उलटी बाहेर पडली होती त्यात एक मोठा केसांचा पुंजका होता....वेदांत शांत झाला......प्रियाने गणपती समोर हात जोडले आणि बाजूचा अष्टगंध वेदांतला लावला.....ती काळरात्र संपली
होती. काळे ढग जाऊन स्वच्छ कोवळी सूर्यकिरणे पडली...गणपतीच्या कृपेने परत एकदा नवी सकाळ प्रियाच्या आयुष्यात आली
वेदांतला घेऊन ती परत त्या घरात आली...आता तिला कशाची भीती नव्हती...माळ्यावर टाकलेले देव तिने परत काढले आणि विधिवत त्यांची पूजा केली....वेदांत परत खेळू बागडू लागला होता...त्याचा आनंद अजून जास्तच वाढला होता कारण गणेशउत्सव दोनच दिवसांवर आला होता....नवीन घरातील पहिला गणपती....वेदांत खूपच आनंदात होता...प्रिया आणि वेदांत दोघांनी मिळून सजावट केली....मागे जे काही घडलं ते सगळं विसरून ते गणपतीच्या आगमनाची वाट बघत होते....घरात गणपती आले....वेदांत नेहमी गणपतीच्या आसपास राहू लागला तिकडे प्रियाची नैवेद्याची तयारी चालू होती
"वेदांत ए वेदांत आता शांत बस बरं...आता आपण आरती करायची आहे"
प्रिया हातात मोदकाचे ताट घेऊन येत होती...अचानक त्या घरात तोच मधुर आवाज घुमला
"माई.......ए.....माई......आलोय गं मी"
ह्या आवाजाने प्रिया जागेवरच थांबली तिने ते मोदकाचे ताट तिथेच टेबलावर ठेवले आणि धावत दाराजवळ पोचली....आवाज तर कालच्या त्या मळकट अशक्त मुलाचा होता पण आज समोर एक गुटगुटीत गोंडस मुलगा उभा होता....त्याने शुभ्र पांढरा सदरा घातला होता...हातातला भला मोठा कंठा आणि पायातील वाळा...त्याचं रूप अजून खुलवत होते....प्रिया त्याच्याकडे एकटक वरून खाली बघत होती
"असं का बघतेस...माई.....अग मीच आहे.....काल भेटलेला.....आज तुला भेटावसं वाटलं....म्हणून मी परत आलो बघ"
अस बोलून त्याने आपलं पाऊल घराच्या पहिल्या पायरीवर ठेवलं....त्याच बरोबर खनsssss असा त्याच्या पायातील वाळ्याचा आवाज आला....एखादी जोराची घंटा वाजवी तसा हा आवाज पूर्ण घरभर पसरला.....एक कमालीचं चैतन्य त्या घरात संचारले....तो मुलगा घरात आला.....तशी त्याची नजर समोर ठेवलेल्या मोदकाच्या ताटाकडे गेली
"मोदक sssssss"
तो धावत धावत त्या ताटाजवळ गेला....त्याने एकनजर प्रियाकडे बघितलं आणि भराभर मोदक खाऊ लागला...प्रियाच्या तोंडून एकही शब्द बाहेर निघत नव्हता....कोण आहे हा मुलगा??कुठून आलाय?? हे विचारायची सुद्धा तिला गरज वाटली नाही ती सर्व समजून चुकली होती....तो बेभानपणे मोदक खात होता....त्याचे गाल फुगले होते....वेदांत त्याच्याकडे नुसता बघत होता....बघता बघता 10....15......20 आक्ख ताट रिकामं झालं.....त्याने शेवटचा मोदक उचलला....त्या मोदकाकडे बघत त्याने त्याच्याकडे एकटक बघणाऱ्या वेदांतच्या तोंडात तो एकविसावा मोदक कोंबला.....प्रियाच्या हातातल्या तांब्यातल पाणी पिऊन त्याने तिच्या साडीच्या पदराला तोंड पुसलं....
"चल माई येतो मी.....अजून बरंच फिरायचं आहे मला....आणि हो ती बाई गेलीय घरातून....आता हे घर तुझंच आहे....."
प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..त्याच्याकडे बघत ती म्हणाली "परत भेट कधी???"
"माई मी इथेच असतो गं.....तू मनापासून बोलवं...मी कुठल्यानं कुठल्या रुपात मदत करतोच....चला मी निघतो..."
अस बोलून त्याने प्रियाचा निरोप घेतला ....प्रिया हात जोडून उभी होती....ढोल ताश्यांचा गजर होत होता....एका मोठया गणपतीची मिरवणूक येत होती...त्या गणपतीकडे त्याने बघितलं आणि वळून प्रियाकडे बघितलं....प्रियाकडे बघत त्याने एक स्मितहास्य केलं आणि आपलं एक बोट उंचावून त्या भल्यामोठ्या मूर्तीकडे केलं.....त्याचा दुसरा हात त्याने आपल्या छातीवर ठेवला जणू "मनापासून गणपतीवर विश्वास ठेव" अस तो तिला सांगत होता...अचानक गुलाल उडाला त्या गुलालात तो दिसेनासा झाला...प्रियाला काहीच सुचत नव्हतं...ती त्या गणपतीला नमस्कार करून आत आली....वेदांत पाठमोरा हात जोडून त्याच्या घरातल्या गणपती समोर बसला होता...प्रिया त्याच्या जवळ गेली...तिला धक्काच बसला....हा काय चमत्कार......गेली आठ दिवस रक्ताच्या उलट्या करून अशक्त झालेला वेदांत....अचानक टवटवीत आणि पूर्वीसारखा गुटगुटीत झाला होता....प्रियाने त्याला कवटाळले आणि रडू लागली...आपले अश्रू आवरत तिने वेदांत सोबत आरतीला म्हणण्यास प्रारंभ केला....कित्येक दिवसांनी त्या घरात प्रसन्न वातावरण होतं... आरती झाल्यावर वेदांत लगेच न सांगता गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागला....प्रिया आज एकावर एक चमत्काराला सामोरी जात होती...तिचे हात सारखे गणपती पुढे जोडले जात होते........अजून एक चिंता तिच्या मनात होती पण हसऱ्या वेदांत कडे बघत ती सगळं दुःख पचवत होती......
"सुखकर्ता दुखहर्ता"
लता मंगेशकर यांनी गायलेल्या आरतीचा आवाज येऊ लागला...प्रिया उठून आपल्या फोन जवळ गेली....रिंग होणारा फोन तिने हातात धरला....स्क्रीनवरील नाव बघून तिचा हात थरथरू लागला......."प्रदीप"
तिने फोन उचलला आणि थरथरत्या हाताने कानाला लावला तिच्या डोळ्यात अश्रू आले कित्येक दिवसांनी त्याचा फोन आला होता...कापर्या आवाजाने तिने.....हॅलो म्हंटलं
लता मंगेशकर यांनी गायलेल्या आरतीचा आवाज येऊ लागला...प्रिया उठून आपल्या फोन जवळ गेली....रिंग होणारा फोन तिने हातात धरला....स्क्रीनवरील नाव बघून तिचा हात थरथरू लागला......."प्रदीप"
तिने फोन उचलला आणि थरथरत्या हाताने कानाला लावला तिच्या डोळ्यात अश्रू आले कित्येक दिवसांनी त्याचा फोन आला होता...कापर्या आवाजाने तिने.....हॅलो म्हंटलं
हॅलो.....हॅलो.......प्रिया
माफ कर गं....खूप दिवसांनी फोन केला....खूप मोठ्या समस्येत अडकलो होतो गं....ह्या कोरियन लोकांनी कंपनी फ्रॉड मध्ये मला दोषी ठरवलं होतं....त्यांनी मला जेल मध्ये सुद्धा टाकलं...हे लोक इतके निर्दयी आहेत की त्यांनी मला एक फोन सुद्धा करू दिला नाही...पण अचानक काल त्यांनी मला सोडलं....आता ते माझी माफी मागत आहेत कारण त्यांच्या नजरचुकीने हा फ्रॉड झाला होता....त्यांनी मला नुकसानभरपाई सुद्धा दिलीय....मी निघतोय इथून लवकरच परत येईन....हॅलो....वेदांत कसा आहे??....मला खूप आठवण येतेय ग त्याची.......हॅलो.....प्रिया....ऐकतेस ना.....हॅलो
माफ कर गं....खूप दिवसांनी फोन केला....खूप मोठ्या समस्येत अडकलो होतो गं....ह्या कोरियन लोकांनी कंपनी फ्रॉड मध्ये मला दोषी ठरवलं होतं....त्यांनी मला जेल मध्ये सुद्धा टाकलं...हे लोक इतके निर्दयी आहेत की त्यांनी मला एक फोन सुद्धा करू दिला नाही...पण अचानक काल त्यांनी मला सोडलं....आता ते माझी माफी मागत आहेत कारण त्यांच्या नजरचुकीने हा फ्रॉड झाला होता....त्यांनी मला नुकसानभरपाई सुद्धा दिलीय....मी निघतोय इथून लवकरच परत येईन....हॅलो....वेदांत कसा आहे??....मला खूप आठवण येतेय ग त्याची.......हॅलो.....प्रिया....ऐकतेस ना.....हॅलो
हे ऐकून प्रियाच्या हातातून मोबाईल खाली पडला...ती डोळे पुसत धावत धावत गणपती जवळ गेली....त्या सुखकर्त्या समोर तिने आपले डोके टेकवले.......................(समाप्त)
-- शशांक_सुर्वे
Wow yar nice
ReplyDelete