__सरपणीत आम्ही चार वर्ष होतो. चारही वर्षे आम्ही गानुवाडीतच राहिलो. गानुवाडीतल्या त्या झाडझाडोर्यात माझे दिवस मजेत चालले होते. फक्त त्या एका प्रसंगाचा अपवाद सोडला तर गानुवाडीतलं माझं वास्तव्य त्याआधी आणि त्यानंतरही अगदी आनंदात गेलं. सुनंदन माझा अगदी जीवलग मित्र बनत गेला. एकतर आम्ही एकाच वर्गात, रहायलाही अगदी समोरासमोर. आमच्या आवडी निवडीही बर्याच प्रमाणात सारख्याच. सुनंदनच्या अधिकच्या सान्निध्याने मला गानुंच्याही जास्त जवळ आणले. सुनंदनच्या आईला म्हणजेच गानु काकुंना माझ्याबद्दल ममत्व वाटायचेच;पण आता नानांनाही मी आवडू लागलो. आणि हे पाहून माझ्या बाबांना विशेष आनंद होऊ लागला. सरपणीतले गानु हे तालुकास्तरावरचे बडे प्रस्थ होते. बाबांच्या सरकारी कामांत बर्याचदा येणारे अडथळे नुसते गानुंचे नाव सांगितले की कमी होत. गानु आजोबा तर सुनंदन सोबत रोज संध्याकाळी माझाही अभ्यास घेत.
एवढं असलं तरी गानुवाड्यात जाताना, विशेषत: माजघरात मला नेहेमी बिचकायला होत असे. कारण माजघरातून बोळात जाणारी ती रिकामी चौकट कायम एखाद्या भुकेल्या अजगरागत आ वासून असायची. त्यातनं गानुंच ते देवघर ! तसं पाहता गानुंच्या त्या देवघराशी वा देवांशी माझं काही वैर नव्हतं.
पण त्या देवघरात साचून असणारा तो फिकट लालपिवळसर उजेड ! तो मला त्या खोलीतल्या उजेडाची आठवण करून द्यायचा. देवघर आणि त्या खोलीत एकच सामायीक भिंत होती. त्या सामायीक भिंतीचाच तर हा परिणाम नसेल ना ? कदाचीत त्या खोलीतल्या दुष्टाचा संसर्ग गानुंच्या देवघराला झाला असावा किंवा गानुंच्या देवघरातूनच काहीतरी झिरपत त्या खोलीत पोहोचत असावं. आणि...
मी त्यावर फार विचार करायचो नाही. माझं बालमन मला फार विचार करूही द्यायचं नाही.
साखरझोपेतल्या एखाद्या स्वप्नासारखे दिवस होते ते !
गोड, गुलाबी आणि फुलपाखरी पंखांसारखे.
पण शेवटी तो दिवस उजाडलाच.
चैत्र पौर्णिमेचा तो दिवस !
बरेच दिवस शांत पडून असणारा एखादा नाग फणा काढून अंगावर यावा तशी ती फुत्कारणारी संध्याकाळ आली,जी त्यानंतरच्या माझ्या उभ्या आयुष्यातल्या अनेक शांत, सुंदर संध्यासमयांची नासाडी करून गेली.
चैत्र पौर्णिमेची संध्याकाळ ! हनुमान जयंतीचा दिवस !!
सरपणीत हनुमान जयंती मोठ्या दिमाखात साजरी व्हायची. शेजारच्या डोंगरावर हनुमानाचे एक जागृत स्थान होते. तिथे छोटी जत्रा तर भरतच असे;पण सोबतीला हनुमानाची पालखीही निघायची. पालखीला अख्खा गाव लोटायचा. चैत्र पोर्णिमेच्या संध्याकाळी उभं सरपणी ओस पडायचं. गावात चिटपाखरूच काय ते. बाकी माणसांचा समुह सारा डोंगरावरील हनुमानाच्या पालखीला लोटलेला. पालखीला गानुंचा मान मोठा. नाना आणि गानु आजोबांनी खांदा लावल्याखेरीज पालखी निघतच नसे. पण यातही एक गोष्ट मला नेहेमीच कोड्यात टाकायची. मी तब्बल सहा सात वर्षे सरपणीत घालवली होती, सरपणीतल्या तेवढ्याच चैत्र पोर्णिमा मी पाहिल्या होत्या;पण एवढ्या दिवसांत मी कधीही गानुकाकुंना पालखीला गेल्याचं पाहिलं नव्हतं. सारा गाव ज्या पालखीला लोटायचा त्या पालखीला गानुकाकु मात्र कधीही जायच्या नाहीत. गावतल्या इतर सार्या बायका नटून थटून पालखीला ओवाळायला पुढे पुढे असत, अगदी गावात नवी असलेली माझी आईसुद्धा. पण गानुकाकुंना पालखीचं वावडंच होतं जणू.
ते वर्ष माझं सरपणीतलं शेवटचं वर्ष ठरलं.
आज एवढ्या वर्षांनंतर सर्व घटनाक्रम आठवला की वाटतं, ती एक संध्याकाळ केवढी मोठी उलथापालथ घडवून गेली.

आम्ही सरपणी सोडलं. गानुंचा तर जवळपास निर्वंशच झाला.
आठवतानाही छातीत कसं थंड हिव भरून येतं !
आठवतानाही छातीत कसं थंड हिव भरून येतं !
दुपारीच मला आईने सांगितलं की, मला पालखीला जाता येणार नाही कारण तालुक्याच्या गावाहून बाबांच्या ऑफीसमधनं एक माणूस येणार होता. त्याच्यासोबत बांबांच्या घरी असणार्या काही फायली पाठवायच्या होत्या. बाबा कामासाठी मुंबईला गेले होते. या मारुतीचं दर्शन घेतल्यास सौभाग्याचं मरण येतं अशी तेव्हा गावात समजूत होती, त्यामुळे झाडून सार्या बायापोरी पालखीला हजर असत. माझी आई देवभोळी त्यामुळे आईला आणि सोबत ताईलाही पालखीला जायचंच होतं. मी थोडासा रडवेला सूर लावला; पण बदल्यात आईने मला नवी गोष्टीची पुस्तकं विकत घेऊन देण्याची लालूच दाखवली आणि माझा रुसवा कुठल्या कुठे पळाला. पालखीला गेलं न गेल्यानं मला फार फरक पडणार नव्हताच कारण सुनंदनही कांजण्या आल्यानं अंथरुणाला खिळलेला. काल पासून तर त्याची अवस्था जरा जास्तच वाईट होती. त्याला तापही चढलेला. सुनंदनशिवाय कोणतीही मजा मला त्या काळात फिकीफिकी वाटत असे.
चार साडेचारच्या सुमारास आई आणि ताई वाडीतल्या इतर सर्वांसोबत डोंगरावरच्या हनुमानाच्या पालखीला निघून गेल्या. थोड्यावेळानं नाना गानु आणि गानु आजोबाही दोनचार गडीमाणसं सोबतीला घेऊन निघाले. आता गानुकाकु आणि भिवामामाचा अपवाद वगळता वाडीत कुणीही वडीलधारं असं उरलं नव्हतं. माझा आणि सुनंदनचा अपवाद वगळता वाडीत लहान मुलही कुणी उरलं नव्हतं. छोटा माधव होता; पण तो अगदीच छोटा होता. जेमतेम दीड वर्षांचा.
सगळे निघून गेल्यावर वाडी कशी अधिकच मोकळी ढाकळी वाटू लागली.वाडीतला झाडझाडोरा जरा जास्त मोकळेपणानं श्वास घेऊ लागला. मी क्षणभर वाड्यात डोकावून आलो. सुनंदनची तब्येत जास्तच बिघडली होती, त्यामुळे काकुही चिंताग्रस्त होत्या. त्यांनी मी का गेलो नाही म्हणून माझी जुजबी चौकशी केली;पण आज त्यांच्या विचारण्यात प्राण नव्हता. सुनंदनच्या आजारीपणाच्या काळजी व्यतीरीक्त अजून काहीतरी त्यांना संचित करत होतं, असं स्पष्ट दिसून येत होतं. त्या थोड्याथोड्या वेळानं परसात जाऊन सूर्य पश्चिमेकडे किती कललाय हे पाहून येत होत्या. मी बाहेर आलो आणि सभोवतालच्या त्या थंड काळोख्या हिरवाईत धुंद होऊन गेलो. आज माझ्यावर लक्ष ठेवणारं कुणीही नव्हतं. मी माचावर चढला,तिथून खाली ठेवलेल्या पेंढ्यांच्या गुंड्यावर उड्या मारल्या. नंतर हौदाजवळ जाऊन रहाटानं पाणी काढलं. गोठ्यातल्या गाईंच्या शेपट्या ओढल्या. त्या धुदावणार्या एकटेपणाचा मी मनोसक्त आनंद लुटत असतानाच भिवामामा आला,
‘‘ ताहींनी तुहास्नी बोहलहवलहय’’ असं त्याच्या ठाकरी भाषेत म्हणाला.
भिवामामा गानुंचा जुना चाकर. त्याच्या आधी त्याचा बाप गानुंच्या चाकरीत होता.
मला थोडं नवल वाटलं. काकुंनी मला का बोलावलं असावं? मी लागलीच वाड्यात गेलो. तर काकु ओसरीवरच बसलेल्या. त्यांचा चेहरा अक्षरश: काळाठिक्कर पडलेला. काळजीनं, भीतीनं त्या रडवेल्या झालेल्या. ओसरीवरच्या गानु आजोबांच्या पलंगावरच सुनंदन झोपलेला. त्याचं शरीर;जेवढं उघडं होतं तेवढं सारं लालबुंद झालेल्या टचटचीत कांजीण्यांनी भरलेलं. लाळेचा एक ओघळ त्याच्या ओठांपासून पार मानेपर्यंत पसरला होता. त्याच्या तापलेल्या श्वासांच्या आवाजावरनंच त्याच्या बिकट अवस्थेची कल्पना येत होती.
माझं ते वय काळजी करण्याचं खासच नव्हतं. पण त्या दिवशीची सुनंदनची अवस्था पाहून मलाही भीती वाटली.
‘‘ नंदुची तब्येत खुपच बिघडलीये. घरात कुणीच नाहीये. सगळे पालखील गेल्येत. त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला हवं.’’ काकु थरथरत्या आवाजात मला म्हणाल्या. पण त्या हे मला का सांगताहेत हे मात्र माझ्या अजूनही ध्यानात येत नव्हतं. मी आपला शुंभासारखा मान हलवीत त्यांचं बोलणं एकत राहिलो.
‘‘ देवा ! नेमकी आजच ही वेळ यावी. पोर्णिमेला. तिही आजच्या.’’ काकु स्वत:शीच काहितरी बडबडत होत्या. मला त्यातलं बरचसं कळत नव्हतं.
‘‘ अवि. मी भिवाला घेऊन बैलगाडीनं दवाखान्यात जाते आहे. तू थोड्यावेळ माधवकडे लक्ष देशील? तिन्हीसांजेच्या आत परतेन मी.’’
गानुवाडी तशी सरपणीच्या एका टोकाला. सरपणीच्या वेशीवरच म्हणा ना. सरपणीत दवाखाना एकच,तोही सरकारी दवाखाना. गावाबाहेरच्या महामार्गावर. गानुवाडीपासून जवळपास सहा सात मैल लांब. आणि विरुद्ध टोकाला.
काकु अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. मला काय उत्तर द्यावं हे कळेचना. माधवला सांभाळणं काही अवघड काम नव्हतं,तसा तो माझ्यासोबत बर्याचदा तासंतास एकटा खेळत असे. मी निमुट मान डोलावली.
‘‘ गाडी लाव भिवा.’’ काकु भिवामामाला म्हणाल्या; पण भिवामामा तिथेच घुटमळला.

‘‘ काय झालं ?’’ भिवामामा काहीही न बोलता काकुंकडे पहातच राहिला.
‘‘ कळतंय मला भिवा;पण इलाज नाही. जायलाच हवं. शिवाय आपण परतुच की तिन्हीसांजेच्या आत. एवढी वर्षे गेली, आपण काळजी घेतलीच ना ? कुठे काय झालं? यंदाही नाही होणार. काढ तू गाडी लवकर.’’ भिवाकाका निघून गेल्यावरही काकु असंच काहीसं मला न कळणारं बडबडत राहिल्या. मी माजघरात डोकावून एक नजर छोट्या माधवकडे टाकली. तो झोपाळ्यात शांतपणे झोपला होता.
काकुनं घाईघाईने आवरलं. तोवर भिवामामाने बैलगाडी बांधली होती. मागे छान मऊसूत बिछाना अंथरला होता. मला एरवी भिवामामासोबत बैलगाडीतनं रपेट मारायला फार आवडे. सुनंदन सोबत मी अनेकदा त्या गाडीतून फिरलो होतो. पण आजची गोष्ट वेगळी होती. भिवाकाकाने हलक्या हातांनी सुनंदनला उचललं,खांद्यावर टाकलं आणि बैलगाडीत नेऊन ठेवलं. ‘‘ अवि, बाळा आत ये जरा.’’ माजघरातून काकुंची हाक ऐकू आली. मी आत गेलो. माजघरातल्या मोठ्या बाकड्यावर काकु बसल्या होत्या. त्यांनी खुणेनंच मला त्यांच्या शेजारी बसायला सांगितलं. मी काही न कळता बसलो. त्यानंतर बराच वेळ त्या काहीही न बोलता गप्पच होत्या. थोड्यावेळाने अचानक त्यांनी भिवामामाला हाक मारली,
‘‘ भिवा ..’’
भिवामामा माजघराच्या आत न येता दारातूनच डोकावला.
‘‘ नैवेद्य लाव.’’
भिवामामा नुसती मान डोलावत निघून गेला.
भिवामामा गेला आणि काकु माझ्याकडे वळल्या. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं;पण ते कसं सांगावं हेच जणू त्यांना कळत नव्हतं.
‘‘ अवि.’’ एकदाचा त्यांच्या तोंडून शब्द फुटला.
मी ऐकू लागलो.
‘‘ मी गेल्या पावली परतणार आहे, काळजीचं काही कारण नाही. माधव झोपलाय, तो अगदीच लहान आहे म्हणून मी त्याला माझ्या सोबत नेत नाही. त्यातनं कांजीण्या हा संसर्गाचा आजार. त्याला नंदुच्या जास्त जवळ नेलं तर कदाचीत त्यालाही कांजीण्या येतील. म्हणूनच खरंतर मी त्याला इथे ठेवून जाते आहे. तू हुशार मुलगा आहेस, हो ना?’’

मी किंचीत लाजत मान डोलावली. तेवढ्यात भिवामामा आला. त्यानं एका मोठ्या ताटात काहीतरी आणलं होतं. काहीतरी मातकट रंगाचं.
ते ताट काकुंच्या हातात देऊन तो पुन्हा बाहेर पडला. काकुंनी ते ताट हातातच धरून ठेवलं. मला आता ते ताट स्पष्ट दिसत होतं. त्या चक्क कालवलेली चिखलमाती होती. मी काकुंकडे पाहिलं, तर त्या माझ्याकडेच पाहात होत्या. मला निरखून अगदी जोखून पाहात होत्या. माझं लक्ष त्यांच्याकडे जाताच त्यांनी एक सुस्कारा सोडला.
‘‘ तुला कळतय ना अवि, माझं जाणं किती गरजेचं आहे ते. नंदुची तब्येत अचानक बिघडली आहे. मला जायलाच हवं, हो ना? ’’ काकु जणू स्वत:चीच समजूत घालत होत्या.
‘‘ तू इथेच थांब. माधवकडे लक्ष ठेव. मी येईनच तासा दीडतासात.’’ काकू पुन्हा एकदा बोलायच्या थांबल्या. त्यांना खरंतर वेगळंच काहीतरी बोलायचं होतं;पण त्या भलतंच काहीतरी बोलत होत्या. त्यातनं माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे कमी त्या ताटात कालवलेल्या चिखलमातीकडेच जास्त जात होतं.
‘‘ काही वाट्टेल ते झालं तरी बोळाकडे फिरकू नकोस.’’ काकु रोखल्या नजरेनं शांतपणे म्हणाल्या आणि माझ्या काळजाला असंख्य इंगळ्या एका क्षणी डसल्या.
बोळ.
अंधार.
ती खोली.
तो उजेड.
आणि ती...

क्रमशः
Part 5
https://marathighoststories.blogspot.com/2019/08/marathi-thriller-story-from-andharwari_6.html

No comments:
Post a Comment