मंतरलेली_रात्र
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेतो. परंतू आजही अशा काही गूढ गोष्टी आहेत ज्यांचा गुंता विज्ञानालाही सोडवता आला नाही. आजच्या विज्ञानासमोर त्यांचे गुढ कायम आहे...
मी माझ्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. विज्ञान ही गोष्ट मानत नाही हेही मला मान्य आहे परंतू मी जो अनुभव घेतला तो माझ्या बरोबरच्या आठ लोकांनी घेतलाय त्यामुळे तो खोटा असण्याचा प्रश्नच नाही...
माझे नाव नितीन. माझे वडील झेडपीच्या सरकारी दवाखान्यात कंपांडर म्हणून कामास होते. सरकारी नोकरी म्हटलं की चार ते पाच वर्षानी बदली ही आलीच. आज इथे तर उद्या तिथे. अशीच माझ्या वडिलांची बदली ही मायणी,ता.खटाव, जि.सातारा येथे झाली. एक दोन वर्षात आजूबाजूच्या ओळखी झाल्या, मित्रमंडळीही जमली. मी त्यावेळेस चौदा वर्षांचा असेन.मी आठवीत होतो. माझा मधला व थोरला भाऊ असे मिळून आम्ही तिघे जण होतो. माझ्या मधल्या व मोठ्या भावात दोन-दोन वर्षांचे अंतर त्यामुळे मोठ्या भावांचे मित्र ते माझे मित्र व माझे मित्र ते भावांचे मित्र होते. असा सर्वांचा मित्र समूह एकच होता..
एके दिवशी थोरल्या भावाच्या मित्राच्या आतेभावास अपघात झाल्याचे कळले.. ते मायणीपासून चितळी रस्त्यावर सुर्याचीवाडी येथे रहायला होते. आम्ही सर्वांनी त्याला भेटायला जायचे ठरलले. संध्याकाळ झाली होती. सात सायकल आणि आम्ही नऊ जण असे निघालो. सोबत दोन ब्याटर्याही घेतल्या. पहिल्या सायकलवर मी छोटा म्हणून मागे डबलशीट बसलो होतो. ब्याटरी माझ्या हातात होती. शेवटच्या सायकलवर एकजण डबलशीट बसला होता आणि त्याकडे एक ब्याटरी होती. रात्र होत आली होती. आम्ही रमत-गमत मस्त गप्पा मारत निघालो.. आता खुप अंधार पडला होता. आम्ही मित्राच्या आतेभावाच्या घरी पोहोचलो...
एवढ्या रात्रीचं आम्हाला पाहून आतेभावाच्या घरच्यांना काय करु आणि काय नको असं झाले. ते काळजीत पडले होते आणि त्याला कारणही तसेच होते. एक तर सगळे अठरा ते वीस वयोगटातले होते आणि मी त्या सर्वात लहान. आणि सायकलवरुन एवढ्या रात्री नऊ ते दहा कि.मी. आलो होतो.
त्याच्या वडिलांनी आम्हा सर्वांना आत बसण्यास सांगितले. तोवर आम्ही तोंड हातपाय धुतले. शेंगा गूळ खाऊन थंड रांजणातील पाणी पिले. मित्राच्या आतेभावाची गाठभेठ झाली. आमची निघायची घाई चालू होती हे पाहून त्याच्या वडिलांनी फर्मावले,'जेवल्याशिवाय कुणीही जायचे नाही'. हि आपली ग्रामीण संस्कृती, प्रेमळ हक्क हे त्यावेळी कळलं.
आमच्यासाठी अंड्याचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी असं मस्त जेवण बनवलं होतं. प्रवासामुळे आणि गप्पागोष्टींमुळे सर्वच खुप थकले होते. सडकून भुक लागली होती. सर्वानी जेवणावर यथेच्छ ताव मारला. सर्वांनी पोटभर जेवण केलं. सर्व आटोपून आम्ही निघायची तयारी करु लागलो. तसे त्याच्या वडीलांनी मुक्कामी थांबून सकाळी लवकर जाण्यास सांगितले. पण आम्ही नाही सांगून नीट जातो असं सांगितले .
सर्वांचा निरोप घेतला आणि आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. तोपर्यंत रात्र चांगलीच भरुन आलेली होती. गप्पा मारत आम्ही निघालो होतो. आम्ही गाव मागे सोडलं होतं. सायकलवरून दीड-दोन कि.मी. पुढे आलो होतो. रात्र अंधारलेली होती. बाजूने दुतर्फा घनदाट झाडी होती.
सगळीकडे कुट्ट काळोख दिसत होता. सू"" सू"" करत सुसाट्याने वाहणारी थंडगार बोचरी हवा, रातकिड्यांची किर्र-किर्र्,कुत्र्यांचे ते भुंकणे आणि रडणे ऐकून वातावरण आणखीनच भीतीदायक वाटायला लागलं होतं.
एक तास झाला दोन तास झाले परंतू अजून मुख्य मार्ग सापडत नव्हता. आता आम्ही काळजीत पडलो होतो. सगळेजण घाबरले होते. काहीतरी चुकीचं घडतय हे सर्वांना कळून चुकलं होतं.
ती अमावस्येची रात्र होती. त्यात आम्ही उशीरा निघालेले होतो आणि भरीस वशाटही खाल्लेलं होतं. सर्वांनी जोरात सायकल मारायचं ठरवलं. समोर जाणारी वाटच दिसेनाशी झाली होती. आम्ही जोरात सायकल चालवत होतो. पण फिरुन फिरुन तिथेच त्याच जागी येत होतो. "ते" जे काही होतं ते आम्हाला पुन्हा त्याच जागी आणत होतं. तिथं विहीर होती. शेजारी पिंपळाची आणि वडाची मोठ्ठीच्या मोठ्ठी झाडं होती. वार्याने त्या वडाच्या मोठ्या पारंब्या खुप भीतीदायक वाटत होत्या. वडावरच्या घुबडाच्या कर्कश आणि भेसूर घुत्काराने सर्वांच्या अंगावर सरारुन काटा उभा राहिला होता. विहीरीपाशी काळे मांजर आमच्याकडे त्याच्या भयानक नजरेने पाहत होते. आम्ही एकटे नव्हतो. "कोणीतरी" होतं जे आमच्या मागे होतं. "त्याची " जाणीवही होत होती. कानामागून एखादी थंड हवेची लहर स्पर्श करुन जात होती , तिथे आवाज ऐकू येत होते. जसं कुणीतरी बोलत होतं, "त्याकडे" बोलावत होतं,आणि एखादं लहान बाळ रडत होतं , "आलास...आलास" असा आवाज येत होता.. आणी आम्ही त्यात फसत जात होतो. पुढे जाऊन सगळ शांत मग पुन्हा तेच सुरु आणखीन जोराने. पुन्हा त्याच विहीरीपाशी आलो होतो..की आणून सोडलं जातं होतं ? झाडापाशी टाकलेले उतारे दिसत होते. बांगड्या, पिना टोचून उतारलेल्या कणकेच्या बाहुल्या , लिंबू , मटनाचे उतारे,चिलीम-बिड्या-दारु हे सर्व काही पद्धतशीर मांडलेलं दिसत होतं.
आम्ही फसलो होतो. मृत्यूच्या जबड्यात खेचले जात होतो. या चक्रव्यूहातून बाहेर यायचा कोणताच मार्ग सापडत नव्हता...
३.३० ते ४ तास फिरुनही पुन्हा त्याच जागी येत होतो. सर्वजण खुप घाबरले होते. कुणी मागे रहायचे नाही, सर्व सोबत चलायचे, आणि मागेही पहायचं नाही असं ठरवलं. मनात देवाचा धावा चालू होता पण रात्र "मंतरलेली" होती. आम्ही "त्याकडे" खेचत चाललो होतो. काळोख्या रात्रीच्या त्या निरव शांततेने आणि सू"" सू"" वाहणार्या थंड बोचर्या हवेने भीतीने सर्वांच्या अंगावर शहारे आले होते. कुत्र्यांचे रडणे आणि भुंकनेही आता मोठ्याने चालू झाले होते. भीतीने सर्वांना दरदरून घाम फुटला होता. बुद्धी कुंठित झालेली होती. काय करु आणि काय नको हेच समजेनासे झाले होते. कडाड्कन् वीज कोसळली. ढग गडगडू लागले होते. वारा आणखी जोराने वाहू लागला होता आणि पाहता पाहता मुसळधार पाऊस पडू लागला. आमची या वादळातून सुटका होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नव्हती...
होता होता पहाटेचे ४ वाजत आले होते. मुख्य मार्ग काही केल्या सापडत नव्हता. गोल - गोल फिरवून तिथंच आणून फेकलो जात होतो. यातून सुटकेचा कोणताच मार्ग सापडत नव्हता. "सापडला"... शेवटी रस्ता सापडला. आम्ही जो रस्ता शोधत होतो तो फक्त दहा पावलांच्या अंतरावर होता. "त्याची" वेळ संपली होती ..आम्ही घरी आलो होतो.
सर्वांना कुठे चुकलो त्याची जाणीव झाली होती..
ती अमावास्येची रात्र होती. त्यात आम्ही वशाट खाल्लेले होते. ३.३० ते ४.०० तास आम्ही रस्ता शोधत होतो परंतू तो फक्त दहा पावलांवर असूनही दिसत नव्हता, सापडत नव्हता. "ते" जे कुणी असतं ते त्याच्या जागेत फसवून आणून आपला घात करत असतं. यालाच आपल्या ग्रामीण भाषेत "चकवा" म्हणतात...!

समाप्त ...!
लेखक-
No comments:
Post a Comment