फिरूनी, नवी जन्मेन मी... भाग 2
By sanjay kamble
*****
कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, शेवटी प्रेम असच असत ना. किती ती ओढ, भेटण्याची, आपल्या प्रेमाला पहाण्याची.. रात्र झाली तस आणखी एक कारण देत मी बाहेर पडलो...
गाडी उभी करून मी वर आमच्या नेहमाच्या ठिकाणी आलो. ती वाट पहात बसलेली... मला पाहून परत आपल्या ओढणी सोबत खेळ करू लागली.. आज थोडी रागातच होती... मी ओंजळ पुढ करत गजरा दाखवला तसा तो गजरा फेकुद देत म्हणाली....
" मला लग्न करायचे नाही... "
मी रागातच म्हणालो,
" सावकाराच्या मुलान घरात येऊन धमकी दिली ..?"
" तु कायपन समज..."
तसा मला राग आला आणि म्हणालो..
" तुला माझी शप्पथ... नाही सांगितलस तर माझ मेलेल तोंड पन तुला पाहायला भेटणार नाही..."
माझ बोलण ऐकताच गर्रर्रर्र कन मागे फिरली आणि माझ्या गालावर चपाट मारली...
"सत्य ऐकायला आणि ते सहण करायला, तस काळीज हाय तुझ्याजवळ......?"
ती काय बोलत होती काहीच समजत नव्हत. 'सुटल्या' म्हणून माझ्याकड पाहु लागली.. मी ही तीच्या गालांवर आलेली केसांची बट हळुवारपने तीच्या कानामागे सरकवत तीला जवळ ओढली आणी डोळ्यात पहात म्हणालो...
" तु आहेस माझ धाडस, माझी हिंम्मत, माझ सर्वस्व, तुच आहेस माझ सुंदर गोजिरवाण जग.. तुच आहेस ग गौरी..."
माझे शब्द ऐकताना तीच्या ओठांवर गोड हासु उमटल तशी तीच्या गालावरची खळी उमलुन आली... तीच्या कमरेवर हात ठेवत जवळ ओढताच माझ्या डोळ्यात पहात तीन लाजुन अलगद पापण्या मिटल्या... रात्रीचा मंद गार वारा सर्वांगाला झोंबत होता तरी एकमेकांचा वेगाने होणा-या उष्ण श्वासाचा स्पर्श चेह-यावर जाणवु लागला... चंद्राच्या शितल प्रकाशान चिंब भिजलेल्या तीच्या रुपाच चांदण चंद्रालाही लाजवत होत... वा-याच्या झोक्याबरोबर चेह-यावर पसरणारे तीचे काळेभोर केस बाजुला करत मी अलगद माझे थरथरणारे ओठ तीच्या ओटांवर ठेवले तसा तीच्या अंगावर सरसरून शहारा आला..तिनेही माझ्या गळ्याभोवती घातलेला आपल्या हातांचा विळखा घट्ट केला..
त्या मधुर स्पर्शाने दोघही रोमांचीत होत होतो.. पन तिच्या गालांवरून ओघळणा-या अश्रुंनी मी भानावर आलो...
" गौरी .... तुझ्या डोळ्यात पाणी.....?"
पण काहीच न बोलता ती माझ्या कुशीत शिरली.... मला घट्ट बिलगत होती...
"तुझ्यासोबतची ही रात आज संपु नये असच वाटतय...उद्याचा दिवस कधी उगवु नये..?"
बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता... नितळ चांदण्याची ती रात पुढे सरकत होती आणि गौरी तशीच माझ्या कुशीत आपले डोळे मिटून पडून राहीली... मी ही तीच्या मोकळ्या केसामधून हात फिरवत तीला छातीशी कवटाळत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो,
पन एक भयान सत्य आमचा पाठलाग करत होत...

सकाळी माझ्या मामेभावासोबत त्याच्या room मधे बोलत बसलो होतो ...
"सावकाराच्या मुलाची नाटक वाढलेत...त्याला एक डोस द्यायलाच पाहीजे.."
मी आरशात केस निट करत म्हणालो... तसा भाऊ बाजूला चार्जींगला लावलेला मोबाइल हातात घेत म्हणाला..
" त्या सावकाराला पाच पोरं हायती, तुला कनच्यान तरास दीला..?"
तस त्याच्याकडे न पहाता मी म्हणालो,
" ज्यासोबत आधी माझी कचकच झालेली..."
भावाने भुवया ऊंचवत माझ्याकडे पाहील, आणि म्हणाला...
" तु तयार हो... थोड बाहेर जायच आहे ..."
फ्रेश होऊन दोघेही बाहेर पडलो, गाडीवरून पाच मिनीटात सावकाराच्या दारात आलो...
मी म्हणालो...
"अरे... आता लोचा नको...तुझ लग्न ठरलय.. नंतर बघू...."
मला काही उत्तर न देता तो आत गेला...सोबत मी ही गेलो...
सावकाराचा मोठा मुलगा दारात बांधलेल्या गुरांसाठी आणलेली वैरण टाकतच भावाला म्हणाला..
" काय र भिकाजी .... सकाळ सकाळ....!"
" काय न्हाय.... आबाची तब्बेत कशी आहे विचाराव म्हटल...."
" बर... आत हायती आबा.."
आम्ही दोघे आत सोफ्यावर येऊन बसलो
तसा भावाने मला खुनावत समोरच्या भिंतीवरचा फोटो दाखवला... तो हार घातलेला फोटो सावकाराच्या त्याच मुलाचा होता, मी दचकुन उभा राहीलो आणि वेगात तीथुन बाहेर आलो...पाठोपाठ भाऊही आला...
मी आश्चर्यान भावाला म्हणालो..
" कसा आणि कधी मेला हा...?"
तसा भाऊ म्हणाला.."
दोन वरीस झालीत.. accident झालेला. याच्याच शेतातली उसाने भरलीली ट्राली पायावरून गेली..पायाचा चेंदामेंदा झाला... दोन्ही पाय गेलत... वरीसभर जीत्ता होता... रांगतच घरभर फिरायचा. जोरजोरात कण्हायचा, आरडायचा चार पाच वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला पन वाचला.. मग एकदा शेतातल किटनाशक प्यायला. लय तळमळत, हात बोट घासत हुता.. दोगजन दोस्त मोटरसाइकिल वरन दवाखान्यात न्हेत व्हती... पन गावाबाहेरच्या नाल्यावर त्याला झटका आला तशी तिघबी खाली पडलीत... सावकाराच पोरग तीतच आरडून आरडून मेल..."
भावाच बोलन ऐकुन धक्काच बसला...सर्रर्र्रर्र कन अंगावर काटा आला... झटकन लक्षात आल म्हणजे त्या रात्रि मला दिसला तो सावकाराच्या मुलाचा आत्मा होता. मी भावाला म्हणालो ,
" मग ती मला खोट का बोलली..."
भाऊ गाडी चालवत विचारु लागला..
"कोन ती..."
"ती कोण म्हणजे ...? गौरी.... हा सावकाराचा मुलगा मला त्रास करतो म्हणाली..."
पन भावाला माझा खुप राग येतोय अस वाटत होत..
तो वैतागुन म्हणाला...
"अर..डोक बीक हाय ना जागेवर..."
त्यान गाडी सरळ गावात आणली ती गौरीच्या दारात...
मी त्याला म्हणालो
"अरे आता तुझ डोक ठिकाणावर आहे का...इथ कशाला आणलस...."
माझ्याकडे पहातच त्यान हाक दीली...
" मावशी....ये मावशी...."
तशी गौरीची आई बाहेर येतच आपले दोन्हा हात आमच्या समोर जोडत केविलवाण्या नजरेने बोलू लागली...
" या की र लेकरानु ... "
ती आम्हाला आत घेऊन गेली... गंज चढलेल्या जुन्या ट्रंगवर ठेवलेल लोकरीच घोंगडं जमिनीवर अंथरून म्हणाल्या...
"बसा लेकरानु..... 'चहा' ठेवते तुमास्नी..."
गौरीच घर खूपच छोट होत. एक छोटीशी पाल्याची झोपडी आणी आतुन पांढ-या मातीन सारवलेल्या भिंती.. लहान असताना यायचो या घरात... पण आता ते घरही खुप उदास वाटत होत.... डाव्या कोप-यात देवाची गाणी म्हणायचे साहीत्य चौंडक, टफ, तुणतूणा. लाकडाने विणलेल्या दुरडीत भंडारा लावलेली देवीची मुर्ती...
" बोला की र लेकरानू..काय काम हूत..."
भाऊ बोलू लागला..
" मावशी काल लग्नाची पत्रिका दीली ना... देवीला नमस्कार करायला आलोय..."
म्हणत त्यान देवीच्या मुर्तिपुढ डोक टेकवल.. गौरीच्या आईने तीथलाच थोडा भंडारा आम्हा दोघाच्या कपाळाला लावला.
मागे भिताडाला तक्या देत भाऊ म्हणाला,
" मावशी ..... गौरीचा काही फोन, वगैरे येतो का..."
आमच्या हाती को-या चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या
"न्हाय र लेका......तीन चार वरीस झाली, कायबी सुगावा न्हाय तीचा..कुठ हाय..कशी हाय..कायबी ठाव न्हाय..."
गौरीच्या आईन आपल्या देवीला हात जोडले आणि म्हणाल्या
"जीत बी हाय तीथ माज्या लेकीला सुखी ठेव ग आई.."
बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आल... त्यांच बोलन मला काहीच समजत नव्हत...आम्ही दोघे त्या माऊलीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...

गाडीची किक मारत भाऊ म्हणाला,
"पाच वर्षापुर्वी तुझ आणि गौरीच लफड हाय अस सावकाराच्या पोरान गावभर केल. गौरी पळून जाऊन लगीन करल, गावची आन तीच्या घरची परंपरा मोडल म्हणून गावसभा घ्यायला लावली...बिचारी गौरी, प्रत्येकासमोर हात जोडत होती र... 'मला हे न्हाय करायच' अस रडून रडून सांगत व्हती, पन कुनीबी ऐकल न्हाय...आठ दिसानी गावाच्या देवळात देवासोबत तीच लगिन लावल... आणि तीच्या आईप्रमाण तीलाही 'देवदासी' बनवण्यात आल... नाईलाजान ती दारोदारी जाऊन जोगवा मागायची, देवळात देवाची गाणी म्हणायची... जेव्हा आपल्या घरी जोगवा मागायला आली की मला आठवणीन इचारायची की.....
" संजु कसा हाय र, कदी मला इचारतो का त्यो.."
मी होय म्हणालो की ती फुलासारखी उमलायची, आणि निघून जायची.. गावची मुल तीला घाणघाण बोलायचीत...एकदा ती जोगवा मागुन घरी चाललेली, सावकाराचा मुलगा आणि त्याच्या दोस्तानी गाडी तीच्या आडवी लावली आणि म्हणाला...
"' तु कीतीबी नाटक कर..तुला म्याच कुस्करणार "
त्यावर ती इतकी चिडली की त्या सावकाराच्या पोराच्या शर्टचा कॉलर पकडून मरत होती... तीथल्याच काही लोकांनी त्याला सोडवल पन आख्ख्या गावात त्याची लायकी गेली.... त्या नंतर काही दिवसानी ती यायची बंद झाली...
गावात चर्चा सुरू झाली की ती कुणाबरोबर तरी पळुन गेली...."
भावाच बोलन ऐकून डोक्यात लाल मुंग्यांच वारूळ उठल... लक्षात आल की त्यामुळेच ती गावक-यांच्या त्रासाला कंटाळुन जंगलात रहात असावी... मनाशी निश्चय केला काही झालं तरी तीला या नरकातून बाहेर कढून आपल्या सोबत घेऊन जायच...
शांतपने भावाला म्हणालो..
" गौरी इथच आहे, या जंगलात रहाते. लोक त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही...आज तु सोबत चल... आणि हो... मी लग्न करणार आहे तीच्या सोबत....वाट्टेल ते झाल तरी..." अस म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली... माझ बोलन ऐकुन तो मात्र अस्वस्थ झाल्यासारखा वाटला...

रात्र झाली तस आम्ही दोघेही त्याच्या गाडीवरून बाहेर पडलो..
मी खुपच उतावळा होतो...मागे बसुन माझ बडबडन भाऊ मात्र शांत बसुन ऐकत होता....
आम्ही नेहमीच्या ठीकाणी आलो तस भावाला गाडी लावायला सांगुन मी धावतच वर गेलो... गाडी लाऊन तो ही माझ्या मागे आला...
गौरी अजुन आली नव्हती. त्या दगडाला तक्या देत मी भावाला सांगु लागलो..
"हे बघ आम्ही इथच भेटतो पन इथ एक भयानक अनुभव पन आला, एक भयानक आकृति दिसलेली रे.. पन आता तु घाबरू नको, तुझ्या सोबत मी आहे ना...."
आणि मी त्याला माझ्या जवळचा धारधार चाकू दाखवत म्हणालो.....
"हा बघ चाकु... त्या घटने नंतर या जंगलात तर हत्यार पाहीजे अस वाटल..."
वेड्यासारखा मी एकटाच बडबडत होतो भाऊ मात्र माझ बोलन ऐकत शांत उभा होता...
कदाचित आज पौर्णिमा असेल... चंद्र आज भरात आला होता...रात्र पुढे सरकत होती पन अजुन गौरी आली नव्हती. मला खुप अस्वस्थ वाटत होत.. खुप वेळ वाट पाहिली पन तीचा पत्तच नव्हता तेव्हा भाऊ म्हणाला, "चल.....निघुया आता....कदाचित आज ती येणार नाही...."
त्याच बोलन मधेच थांबवत हसुन त्याच्याकडे पहात मी म्हणालो...
"तीचा जीव आहे माझ्यावर, ती बघ मागे......गौरी उभी आहे..."
भावाचा हात दबत मी गौरी जवळ जातच तीला म्हणालो...
" काय madam... किती हा उशीर... कोणाला वेळेची कदर नाही म्हणून आपला देश मागे आहे ..."
गौरी तशीच शांत उभी होती...तीच्याकडे पहात मी पुन्हा बोलू लागलो..
" आपण लग्न करणार आहोत.. भावाला सांगितलय... तुला कोणाला घाबरायची गरज नाही...कोण काही म्हणाल तर मी तीथच उसाच्या पेरा सारख कंडक करतो त्याच.."
मी भावाकडे पाहिल तर त्याच्या चेह-याचा रंग उडाला होता... तो पुढ येत म्हणाला
" स....संजु...कोणाशी बोलतोयस..... काय झालय तुला..."
त्याच्या आवाजात थोडी भिती जाणवत होती.
" कोणाशी काय, गौरी सोबत बोलतोय..."
समोर शांतपणे उभ्या गौरीकडे हात करत मी म्हणालो... तसा भाऊ माझ्या जवळ येऊन म्हणाला...
"संजु .. तुला भास होतोय, ती इथ नाही आणि कधी येणारही नाही...."
मला मात्र हसु फुटल.. हसतच मी म्हणालो....
" ये गौरी, ह्याला बघ चश्मा लागलाय...तु दिसत नाहीस याला.."
अस म्हणत मी तीचा हात आपल्या हाती घेतला तस काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं ... सर्वांग शहारल...
तीचा हात माझ्या हातात येत नव्हता. ती जवळ होती पन तीला स्पर्श करता येत नव्हता.. तीला स्पर्श करताना माझा हात हवेतच फिरत होता...
"ग.................ग...... गौरी............."
माझे शब्दही आता थरथरत होते...
तसा भाऊ माझ्यावर रागावत जोरात ओरडला.....
"मेली तुझी गौरी...हालहाल करून ठार मारल तीला त्यानी..."
भावाचे शब्द कानावर पडताच अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला, कोणीतरी गरम गरम वितळलेल शिस कानात ओताव अस वाटल... शरीरातून प्राण निघून गेल्या सारखा मी खालीच बसलो... समोर ऊभ्या गौरी कडे पहाताच माझे डोळे भरून आले, तसे माझ्याकडे पहात तीचेही डोळे पाणावले,
भाऊ आपल डोक दोन्हा हातानी पकडून खाली बसला आणि ढसाढसा रडत मला सांगु लागला...
" तुझ्यावर खुप जिव होता तीचा... पन ती देवदासीची मुलगी म्हणून बाबाना तुमच लग्न होऊ द्यायच नव्हत.".......
हूंदका आवरत भाऊ पुन्हा बोलु लागला..
" तीची दाहवीतूनच शाळा बंद करून गावच्या प्रथेनुसार तीलाही लोकानी जबरदस्ती देवदासी बनवल..खुप रडली..ओरडली... उपाशी राहीली... पन शेवटी नाईलाजान घरोघरी जोगवा मागु लागली.सावकाराच पोरग येता जाता तीची छेड काढायच...'हीला मीच कुस्करणार ' अस चारचौघात ओरडायचा, ती या रोजच्या त्रासाला वैतागली होती. एक दीवस तीन चारचौघातच त्याच्या मुस्काटात हाणली. आणि पुन्हानादाला लागु नको म्हणून दम भरला..."
शांतपने चालत गौरी माझ्या जवळ बसली... आणी डोळ्यातील अश्रु पुसत भाऊ माझ्याकडे पहात पुन्हा बोलु लागला...
" चारचौघात गौरीन केलेल्या या अपमानान सावकाराच पोरग जबर चिडल होत. पावसाळ्याच दिवस होते ते...अशीच एक दिवस शेजारच्या गावातुन ती देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करुन घरी निघालेली.. वाटेत सावकाराच पोरग आणि त्याचे दोस्त तीची वाटच बघत बसलेले...तीला बघताच तीच तोंड दाबून जबरदस्तीन पळवून नेल... वर डोंगरत त्याच्या शेतात बांधलेल्या पाल्याच्या छप्परात नेऊन सगळ्यांनी तीच्यावर बलात्कार केला..."

भावाचा एक एक शब्द माझ काळीच चिरत होता.. दगडाला डोक टेकुन मी ऐकू लागलो, डोळ्यातुन एकसारख पाणी वहात होत...तीला ही गहीवरून आल होत. माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून गौरी शांतपने ऐकत तशीच रडत होती..पुन्हा भाऊ बोलु लागला..
" त्या नराधमाच एवढ्यावर समाधान झालं नाही, तीला त्याच ठिकानी बांधून ठेऊन ते परतले आणि ज्यांच्या समोर तीन सावकाराच्या पोराचा अपमान केला त्या आपल्या मित्रांना पन तीच्यावर बलात्कार करायला सांगितल..."

भावाच बोलण ऐकुन कंठ दाटून यायचा...... "तुझ्या गौरीला जीवंत रहाण्यापुरत खायला द्यायचे रे आणि पुन्हा आपली वासना शमवाचे...कुणालाच तीच्या कोवळ्या मनाशी तीच्या भावनाशी काही घेणदेण नव्हत...ती त्यांच्यापैकी कुणाचीच बहिण, मुलगी नव्हती.. त्यांच्या मते गावातल्या कुत्र्या मांजरालाही तीच्या शरीराचे लचके तोडायचा अधिकार होता... कारण ती 'देवदासी' होती..."
भावाचा एक एक शब्द माझ काळीज फाडत होता...मोठ्यान ओरडाव, रडाव वाटत होत पन आवंढा गिळून पुन्हा ऐकू लागलो...तसाच हूँदका आवरत भाऊ बोलु लागला...
"गौरी गावातून गायब होऊन आठवडा झाला असेल... ती शहरातील एका मुलाबरोबर पळुन गेली अशी अफवा त्याच नराधमानी उठवली.. मला संशय आला तसा एक दिवस त्यांचा पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जागेवर आधीच तीघे चौघे होते. ... ते तीथून जायची वाट पाहत एका झाडामागे लपुन बसलो. सर्वजण तिथुन परत गेले तसा मी त्या झोपडीत गेलो..आणि समोर द्रुष्य बघुन काळजाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यासारख वाटल रे......"
म्हणत त्याला हूंदका आवरण कठिन झाल होत...तो ढसाढसा रडु लागला... माझी ही तीच अवस्था झालेली...स्वताला सावरत भाऊ बोलु लागला..
" एखाद्या उमलचलेल्या फुलासारखी तुझी गौरी निश्तेज, निपचीप पडली होती, पार सुकून गेलेली.. अंगावर कपडे पन नावापुरतेच... तोंडातून किंचीतसा आवाज यायचा... आई......आई........पाणी .......... .....पाणी........ माझी चाहूल लागली तसे हळू हळू डोळे उघडून पाहू लागली... मला बघीतल तस आपल उघड शरीर झाकायचा केवीलवाणा प्रयत्न करु लागली... पन तीला साधा हात ही वर उचलता येत नव्हते... इतक्या यातना सहन करून आता तीच्या डोळ्यातील पाणीही आटल होत...तीच्यापाशी जात बाजुला पडलेल्या कापडाच्या चिंध्यानी तीच थोड शरीर झाकू लागलो... तशी मला म्हणाली,
"संजु कसा आहे रे..."
भावाचे शब्द ऐकताच माझ्या काळजाचा बांध फुटल... ढसढसा रडत मी अश्रुना वाट करून दिली...आपले डोळे पुसत भाऊ सांगु लागला... "मी तीला सोडवणार तोच ते सर्व परत आले... मला ठार मारायची धमकी देत म्हणाले की 'गप गुमान चालाय लागायच हीतन....तुला पन एक बहीन आहे...' हात्यार दाखवून मला तीथून धमकी देऊन घालवल रे.. पुन्हा माझ तिथ जायच धाडस नाही झाल...तुला फोन करून सांगावस वाटल पन काय सांगु, आण कस सांगु... पन मला माहिती आहे एवढ करून त्यांनी गौरीला जीवंत ठेवली नसणार...."
बोलत भाऊ माझ्या जवळ आला
"चल घरी जाऊया."
मी तसाच सुन्न मनाने बसुन होतो..
" निघ तु.... मी नंतर येईन.."
पाणावलेले डोळे पुसत मी त्याला परतायला सांगितल... तो माघारी नीघु लागला तस माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून मघापासुन फक्त ऐकणारी गौरी जड आवाजात शांतपणे म्हणाली...
" आठवडाभर माझ्या शरीराच लचक तोडत व्हती, त्यांच्यात एक शेरातला पोरगा बी व्हता त्यान तर माझ लचक तोडायला पैस दिल व्हत... तुझा भाऊ तिथवर पोहोचला तसे ते घाबरले...त्या राती म्या डोळ मिटीन पडुन
आत कण्हत पडलेली.. घसा कोरडा पडलेला थोड पाणी प्यावस वाटल पन जागच हालता येईना की बोलता येईना , पन ते परत आले प्रत्येकान पुन्हा स्वताच्या शरीराची भुक भागवली आणी............ हळु हळू ते माझ्या भवती वाळलेली लाकड रचत आसल्याच जाणीवल... लाकडाचा खच पडला व्हता, मी पुर्ण झाकुन गेले... जिते पणीच ते माझी चिता रचत व्हते.... कुणीतरी गाडीतल पेट्रोल त्या लाकडांवर शिंपडल आणी आग लावली तसा आगीचा भडका उडाला. चर्रर्रर्रर चर्रर्रर्रर करत माझ्या अंगावरची लाकड पेटत व्हती.. .....पर म्या मनापासुन देवाकड एक प्रार्थना केली 'देवा तुज लय उपकार झालत, आज तुला माजी दया आली र...आज तु ह्या नरकातून मला सोडवस पन देवा संजु ला भेटल्याबिगार मला मुक्ति देऊ नग र .'.. आगीच चटक अंगाला बसत व्हत पर जोरात आरडायची पन ताकत माज्यात नव्हती र... कण्हत कण्हतच मी त्या आगीत होरपळुन राख झाले... .त्यांनी मला जीवंतच जाळली आन परतून गावात गेले.. पर जे मरण त्यानी मला दिलं त्यापरास कितीतरी भायन मरणान मी त्यास्नी मारल....."
गौरीच शब्द ऐकले तसे तीला आपल्या मीठीत घेतल, एका देवदासी ची काही राक्षसानी जीवंत होळी केली होती... अश्रु पुसत मी खिशातला चाकू काढून गळ्यावर ठेवला आणि खस्स्स्स्स कन ओढणार तोच गौरी अगदी शांतपणे माझ्या डोळ्यात पहात म्हणाली ...
"तुला ठार मारुन आपल करायच असत तर दोन वेळा त्या पिशाच्चा च्या तावडीतन वाचीवल नसत. मरायला हिम्मत लागत न्हाय, दु:ख पाठीवर टाकुन जगायला हिम्मत लागतीया... तु किडा मुंगीसारख मेलल मला आवडायच न्हाय... एक गौरी मेली म्हणून जग थांबल न्हाय. या देसात आज कितीतरी गौरी देवदाशी बनुन रोज मरत्यात आन मरण भोगत जगत्यात... तुला भेटयलाच जीव तळमळत व्हता... पन आता म्या मुक्त झाले रे.... "
तीच्या बोलण्याने मी स्तब्ध होऊन तीला छातीशी कवटाळले पन...... तीच शरीर हवेसारख तरल झालं होत... ती माझ्या पासुन दूर जात होती... दटलेल्या कंठातुन गौरी म्हाणुन तीला साद घालू लागलो तशी माझ्याकडे पहात म्हणाली...
"या जन्मात नाही रे, पन पुढाचा जन्म तुझ्यासाठीच घेईन. फक्त तुझ्यासाठी..."
तीने आपले दोन्ही हात पसरले, मी जमीनीवर गुडघे टेकुन भरल्या डोळ्यानी हात जोडून पाहु लागलो..
तिची पांढरट आकृति आकाशात विरून गेली, आणी तीच्यासोबत पाहीलेली स्वप्नही . काळीज फाटत होत तीच्या विरहाने, तीच्या जाण्याने.. पन तीचा आत्मा रोज हे सहन करत माझ्या वाटेकडे डोळे लाऊन असायचा... आज तीची प्रतीक्षा संपली आणी मुक्त झाली, मी मात्र त्या रात्री भरलेल्या अंत:करणाने घरी परतलो..

******
आज मी माझ्या शहरातल्या घरी निघालोय... येताना कोणाच्या नाही पन गौरीच्या आईच्या पायावर डोक टेकवल... तसे त्यांचे डोळे पाणावले... आपले दोन्हा हात माझ्यासमोर जोडत त्या म्हणाल्या..
" लेकरा... तु माज्या गौरीचा लहानपनापासुनचा जीवलग मैतर हाईस... ती कुणाबरोबर पळून शेरात गेली अस गावातली माणस म्हंत्यात... तुलाबी ठाव हाय माजी पोर आस न्हाय करनार पर तरीबी माजी गौरी कधी शेरात भेटली तर म्या तुझ्यावर रागवली न्हाय म्हणून सांग र... आईच काळीज हाय, तुजी आटवन काढून डोळ भरून येत्याती म्हणाव.."
गौरीच्या आईने कंबरेला खोवलेली एक चुरघळलेली दहा रूपयांची नोट माझ्या हाती दीली आणि म्हणाल्या...
" हे पैस माझ्या लेकीला दे... आन .. काळजी घे म्हणाव स्वताची .."
बोलताना त्यांच्या डोळ्यातुन आसवे ओघळू लागली..
" ठाव हाय लेकरा मला. माझी लेक परत या गावात पाऊल न्हाय ठेवायची, तीला लय तरास दीला या गावान. पर काय करू...माझ्या मनातन तीचा हासरा चेहरा जाईत न्हाय , तीच हासण, बोलन, रागावन, तसच नजरवर येतय र.....'"
यापुढ त्यांच्यासमोर थांबण्याची हिंम्मत होईना
त्या माऊलीच बोलण ऐकुन गहीवरुन आल... खळ्ळकन डोळ्यात पाणी आल.. एक वेळ वाटल की त्यांच्या गळ्यात पडून खुप रडाव. मन मोकळ कराव..
पन आवंढा गिळत खाली पहातच मान डोलावली आणि S.T. मधे चढलो.. त्या कच्च्या रस्त्यावरून धुळ उडवत एस.टी. धावत होती.... बाजुच्या खडखडणा-या खिडकीतुन त्या दुर टेकडीवरील त्या उंच झाडाखालील दगडावर माझी नजर गेली... माझी गौरी..... जेव्हा मी शहरात जायला निघायचो तेव्हा तिथेच उभी मला पहायची... जाताना हात उंचावुन मुक्यापनेच 'काळजी घे' म्हणुन खुणवायची...आणी क्षणभर वाटल ती माझ्या जवळ आहे, अजुनही .... आणी कुणीतरी एस.टी. मधे लावलेल एक सुरेख गाण ऐकु येऊ लागल...

'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
आशा, उद्याच्या, डोळ्यांत माझ्या,
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या , मनीचे , गूज घ्या जाणूनी .
या वाहणार्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी...

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी...'
'गौरी'.... जीन मला प्रेमाचा खरा अर्थ शिकवला , ती गेली पन माझ्या आयुष्याली तीची पोकळी कायम राहील.. तीचा आत्मा मुक्त झाला असला तरी गौरीसारख्या हजारों मुली 'देवदासी' प्रथेच्या बळी ठरत आहेत...
आज आयुष्याला एक नवी दिशा मिळाली..... गौरीच्या आठवणी मनात साठवुन आता पुढच्या प्रवासाला निघालोय...

समाप्त..
No comments:
Post a Comment