A real horror marathi story
फ्लॅट भाग १६
तिथे कसलासा आवाज होऊन सोनेरी रंगात काहीतरी चमकल्याचा भास झाला आणि का माहिती नाही मला परत धडकी भरली…
मी घरी यायला निघाले तर बहाद्दूर माझी वाट बघत जिन्याकडे उभा होता... त्याला काहीतरी बोलायचं होतं...
"क्या हुवा बहाद्दूर?... इधर क्यूँ खडे हो?... कुछ काम है क्या?..."
"मेमशाब आपशे थोडा बात करनेका था मेमशाब..."
"हां बोलो ना... क्या हुवा?..."
"तन्मयबाबा के बारेमें..."
"आओ उपर चलके बात करते हें..."
बहाद्दूर घरी आला तर आई बाबा रुद्र हॉल मधेच बसले होते... रुद्र रडत होता... आधी त्याला शांत केला... पण रुद्र ने जे सांगितलं ते ऐकून मला सगळा प्रकार समजून आला... रुद्र म्हणाला...
"आई आज स्कूलच्या रिसेस मध्ये ना दादूच्या हातातून दुर्गा ताई ने दिलेला तो यल्लो धागा होता ना तो पडला होता... त्याला ही आज आम्ही बस मध्ये बसल्या वर समजलं मी सांगितल्यावर, पण तू ओरडशील म्हणून त्याने तुला सांगितलं नाही... आम्ही दुर्गा ताई आमच्या साठी कॅडबरी घेऊन येते ना तेंव्हा तिला गपचूप सांगणार होतो आणि तिच्या कडून परत धागा घेणार होतो..."
त्यांच्या त्या निरागस युक्ती वर काय बोलणार आणि रागावणार होते मी... बहाद्दूर आला होता काहीतरी सांगायला पण मला आधी दुर्गा ला फोने करायचा होता...
"हॅलो दुर्गा..."
" हां!... ताई बोल... काय झालं गं?... इतक्या रात्री फोन?... व्यवस्थित आहे ना सगळं?..."
"दुर्गा आपला तन्मय गं..." असं म्हणून मी फोन वरच रडायला लागले...
"ताई तू थांब... घरीच आहेस ना?... मी आले पाचच मिनिटात..."
"हो ये..."
दुर्गा येई पर्यंत मी कॉफि बनवली सगळ्यांसाठी... बहाद्दूर पण काहीतरी सांगायला थांबला होता पण मला ते सगळं दुर्गा ने ही ऐकावं असं वाटत होतं...
दुर्गा आली तसा रुद्र जाऊन तिला घट्ट बिलगला आणि खुप रडला...
"ताई दादू ने आणि मी मुद्दाम नाही गं केलं... तू जसं काही गोष्टी आम्हाला सिक्रेट सांगतेस तसंच दादूच्या हातातला धागा हरवल्याच मी आणि दादू तुला सांगणार होतो... सॉरी गं दुर्गा ताई पण प्लिज माझ्या दादू ला घरी आण ना गं..."
माझ्या मुलांमध्ये मी एकमेकांवर प्रेम करायचे केलेले संस्कार आज मला प्रत्यक्ष दिसत होते... दुर्गा कडे तन्मय बद्दल जे काही रुद्र बोलला त्याने त्या दु:खात ही मला माझ्या मुलांचा अभिमान वाटला... दुर्गाने ही माझ्या मुलांना तिच्या गोड स्वभावा मुळे लळा लावला होता... तिने माझ्या रुद्र ला खूप प्रेमाने शांत केलं, तिच्या त्या गोड आणि प्रेमळ समजावण्याने काय मोहिनी केली माहिती नाही पण चक्क रुद्र तिच्या कुशीत झोपला पण!... बहाद्दूर ला ताटकळत ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता... मी त्याला जे सांगायचंय ते बोलायला सांगितलं...
"मेमशाब!... आज रात को हम ड्युटी पे था... रातको १२.३० बजा होगा, तभी तन्मयबाबा हमको नीचे उतरके गेट की तरफ आते दिखा... गेट पे आया तो मेने उनको पूछा की किधरको जाता इतना रातको... पर मेमशाब वो मेरी तरफ देखा बी नई और शामने देखके मुझको बोला "पापा बाहर खडे हे, में उनको मिलने जा राहा हू"... पर मेमशाब मेने शाब को बाहेर जाते नहीं देखा था... तो मेने बाबा को अंदर लाने के लिये उनाका हाथ पकडा तो मेमशाब जेशे करंट लगा हो मुझे, मै पीछे धक्का लगके उड गया मेमशाब... और बाबाने मेरी तरफ देखा तो उनकी आंखे लाल थी और बाबा वहा से भाग गये... मेने शोचा की शहाब बाहर खडा होंगा तो मेने भी ज्यादा ध्यान नई दिया मेमशाब... फिर रात को जब में राउंड लगाने पीछे लॉन की तरफ गया ना मॅमशाब... तो रस्सी घिसनेका और कोई चीज उपर खिचनेकी आवाज आई... मैने आपकी बाल्कनी की तरफ देखा तो बाबा को कोई उप्पर खिच रहा था, आपके बाल्कनी में कोई औरत खडी थी और लॉन का मिट्टी सब तितर बितर हो गया था... तो में भाग के आया उपर आप सबको बताने..."
बहाद्दूर ने जे सांगितलं ते खरंच अंगावर काटा आणणार होतं... मी दुर्गा कडे बघितलं तर ती कुठल्याश्या विचारात होती...
"आप कितने सालों से यहां पे काम कर रहें है?..." दुर्गा ने बहाद्दूर ला विचारलं...
"जब शे ये बिल्डिंग का काम चालू हुवा हैं ना मेमशाब, तबशे..."
"तो यहां पे कभी तुम्हे कुछ अजिब लगा हें?... जिसने तुम्हे परेशान किया हो, या तंग किया हो..."
"अब क्या बोलूं मेमशाब... जो मैने गावायां ना मेमशाब वो मुझे हि पता हें..."
"क्यूँ क्या हुवा?..."
"मेमशाब में गांव शे मेरे परिवार के शाथ आया था... मेरी बीवी और मेरी दो बेटीया और एक बेटा... यहींपे मेरा छोटासा झोपडा था... कुछ दिनो बाद हमारे साथ अजिब अजिब होने लगा... यहां एक औरत और उसके बच्चे की आत्मा है मेमशाब... मेरा और मेरे परिवार का बोहोत बुरा हाल किया मेमशाब उशने... हम कहीं जा भी नहीं शकते थे यहां शे... रात को कहीं दुसरी जगह सोने गये तो भी खिंचके वापस लाती थी वो औरत... मेरी बडी बेटी को उसने अपने वष में किया था मेमशाब... बोहोत चिल्लाती थी बेचारी, पर ऊस डायान को जरा भी दया नहीं आई मेरी बेटी की... ले गई उसे अपने साथ... मेरी बेटी ने पांचवें माले से छलांग लगाई और मर गई... मैने भी तभी अपने परिवार को गांव में भेज दिया वापस... आज भी यहां रुके हें क्यूँकी ये साईट पे रेहेने का मलिक जादा पगार देता है, सबसे जादा... आदमी को मजबुरी में करना पडता हें न मेमशाब... क्या करें..."
बहाद्दूर ची राम कहाणी ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो... तन्मय ची काळजी घ्यायला सांगून बहाद्दूर निघून गेला... आपल्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते माझ्या तन्मय च्या बाबतीत होऊ नये म्हणून तो देवाला नक्की सांगेल असं तो म्हणाला... कधीही गरज पडली तर मला आवाज द्या मी येतो म्हणाला... आम्ही सगळे हॉल मधेच बसलेलो, रुद्र दुर्गा च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेला... वैभव चा फोने आला...
" हां वैभव बोल... कसा आहे आता तन्मय?... काय म्हणाले डॉक्टर?... मी आणि दुर्गा येतो आत्ता तिथे..."
"ऐक आधी मी काय म्हणतोय ते... तन्मय बरा आहे आता... डॉक्टरांनी त्याच्या सर्व जखमांना बँडेज केलंय... घाबरण्या सारखं काहीही नाहीये, खोल जखम वगैरे नाहीये काही... पण खूप दमलाय तो, त्या मुळे बेशुद्ध आहे म्हणालेत डॉक्टर... इंजेकशन दिलंय आत्ता त्यांनी आणि सकाळ पर्यंत जाग येईल म्हणाले तन्मय ला... मी आता आहे इथेच, तू आता काही येत बसू नकोस... त्या पेक्षा एक काम कर सकाळी बाबांना दुर्गा बरोबर इथे चहा आणि नाश्ता घेऊन पाठव... मं बाबा आणि दुर्गा इथे थांबतील आणि मी घरी येऊन तुला आणि आई ला घेऊन आपण परत हॉस्पिटल ला येऊ... काळजी करू नकोस, मी आहे तन्मय जवळ तू तिथे आई बाबा आणि रुद्र ची काळजी घे... आणि हो स्वतःची सुद्धा... ठेवतो मी फोने..."
"ठीक आहे... सांभाळून राहा आणि तुझ्या हातात धागा आहे ना दुर्गा ने दिलेला?"
"हो!... हो!... आहे... चल बाय..."
साडेपाच झालेच होते... दुर्गा ही आमच्या बरोबर थांबली... कोण होती हि पोर आमची?... कुठून आली आमच्या मदतीला?... आज आम्हाला फक्त तिचाच आधार होता... कित्ती लाघवी, कित्ती प्रेमळ... समोर बसलेल दोन मिनिटात तिच्या प्रेमातच पडावं... खूप चांगली होती बिचारी... आठ वाजता दुर्गा आवरून येण्यासाठी म्हणून घरी गेली, रुद्र आणि बाबाही तयार झाले... तन्मय आणि वैभव साठी नाश्ता दिला आणि रुद्र, बाबा आणि दुर्गा हॉस्पिटल ला गेले... वैभव येईल तर आवरून घ्यायचं म्हणून आई घाई करायला लागल्या... तरी मी त्यांना जबरदस्ती करून चहा आणि नाश्ता करायला लावला... आई त्यांचं आवरून तयार झाल्या आणि मी माझी अंघोळ वगैरे आवरा आवर करायला लागले... आंघोळी वरून आले तर आई कपडे वाळत घालत होत्या बाल्कनीत... वैभव हॉस्पिटल मधून येई पर्यंत भाजी निवडून ठेवावी म्हणून मी भाजी निवडायला घेतली... कपडे वाळत घालून आई ही माझ्या बरोबर भाजी निवडायला आल्या... माझी अर्धी भाजी निवडून झाली होती, आई ही निवडत होत्या... आमच्या गप्पा चालू होत्या आणि बोलता बोलता आईंचा आवाज एकदम घुमल्या सारखा आणि घोगरा झाल्याचा जाणवला... "आई काय होतंय?" असं म्हणत मी आईंच्या मनगटावर माझा हात ठेवला तेंव्हा आईनी पटकन माझंच मनगट धरलं... त्यांच्या त्या पकडण्यात एक वेगळाच जोर होता... प्रचंड वेदना होत होत्या त्यांच्या त्या पकडण्यामुळे...
"आ आई!... दुखतंय!... सोडा ना माझा हात!... असं काय करताय तुम्ही?... दुखतंय मला..."
"क्वान आई?... म्या आई न्हाय तुजी... म्या चंदी..." असं म्हणत आईनी मान वर केली... चेहरा आईंचा असला तरी डोळे पांढरे झाले होते... डोळ्यात बुभुळ नव्हती... "हा!... हा!... हा!... म्या चंदी... हा!... हा!... हा!..."
माझा हात गळ्यातल्या रुद्राक्ष माळेकडे गेला... पण माळ नव्हती गळ्यात, आंघोळ करताना काढली गळ्यातून ती घालायला विसरले होते... माईंच्या हातात ही धागा दिसला नाही...
"सांगितलं व्हतं त्या दुर्गीन तुला... नग काढूस म्हनून... पन चंदी नं ठरिवलं मंजे ठरिवलं... ये आज्ज्या... म्या बोलले न्हाई का ही घावंल आपल्यास्नी..."
"च... च... चंदी?..."
"व्हय म्याच..."
असं म्हणत चांदीने माझा गळा धरला आणि मला जागेवरूनच सोफ्यावर फेकलं... आईंच्या अंगात चंदी घुसली होती, अमानवी शक्ती घुसून आईनं मध्ये प्रचंड शक्तीचा संचार झाला होता... आई उठल्या, माझ्या झिंज्या पकडल्या आणि मला समोरच्या भिंतीवर आदळलं... सोफ्यावर आपटले तेंव्हा इतकं लाही लागलं नाही पन आता भिंतीवर जाऊन आदळल्यामुळे माझ्या शरीराच्या उजव्या बाजूला मुका मार लागला...
"मला हिथून भाईर काडनार? न्हाई का तू?... आता तू हिथून हलून दाखिव मला फकस्त..."
असं म्हणत चंदी ने माझा पाय धरला आणि मला फरपटत मुलांच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली... माझ्या पायाला आणि हाताला धरून चंदी ने इतक्या जोरात मुलांच्या बेड वर आदळलं की बेड मोडलाच, पण माझी आता डावी बाजूही वाईट आपटली त्या मुळे... मी जोरजोरात ओरडत होते, मला ती दुखी सहन होत नव्हती, मी खूप रडले, चंदीच्या पाया पडले...
"चंदी मला खूप दुखतंय गं... का वगतीयेस गं तू आमच्याशी अशी?... आम्ही काय केलंय तुझं?... प्लिज सोड ना गं मला..."
तू काय केलंस?... माझ्या जागेत ह्रानार न्हाई का?... त्या दुर्गी च्या संगतीनं मला बांधतीस व्हय गं टवळे?... आनी तुला सोडू व्हय?... आज ती माई पण न्हाई येत तुला वाचवायला... चल दावते तुला..."
चंदी ने माझे केस धरले आणि ती मला तशीच फरपटत आमच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली... चंदी ने मला आज संपवायचं ठरवलं होतं... का माहिती नाही पण मला मात्र माझा अंत आलाय असंच वाटत होतं... माझ्या शरीराचा असा एकही भाग नव्हता जिथे चंदी ने मला दुखापत केली नव्हती... आणि आज माझ्या मदतीला कोणीच नव्हतं... मी आईं मध्ये शिरलेल्या चंदी च्या ताकदी समोर हतबल होते...
"आई तुम्ही तरी जाग्या व्हा हो... मला वाचावा हो या चंदी च्या तावडीतून... मी पाया पडते तुमच्या... चंदी पाय धरते गं तुझे मला खूप दुखतंय गं... मी नाही येणार तुझ्या वाटेला... मला आणि माझ्या कुटुंबाला सोड गं... मी हवंतर माझ्या मुलांची शप्पथ घेते, आम्ही निघून जाऊ इथून... आम्हला माफ कर..."
"काय फुका शपता घेते... कोन बी जित्तं ह्रात नसतंय या चंदीच्या तावडीतून... आज पातूर क्वनं बी नाय ह्रायल... अय माई... बघ तुझी पोर.. त्या दिस लय पुळका आला व्हता न्हाई का तुला... आज वाचिव हिला!..."
माई समोरच्या लॉन वर उभ्या होत्या... या सगळ्या गडबडीतही मला त्यांच्या चेहऱ्यावर फक्त काळजी दिसत होती... पण आज त्या फक्त शांत उभ्या होत्या... जसं काही त्यांना कोणीतरी बांधून ठेवलंय... माझ्या साठी त्या दिवशी धावून आलेल्या माई आज मात्र शांत उभं राहून बघत होत्या... मधेच त्यांचे हात डोळ्याकडे गेलेले मी बघितले...
"लय उड्या मारत व्हतीस ना तुज्या त्या माळेवर... आज का मं अशी लांबून बघतीयास?... आज न्हाई तुज्या समोर हिचा मुडदा बशीवला ना या घरात तर बघ..."
असं म्हनून आईंनी मला कमरेत धरून दोन हातानी अगदी डोक्याच्या वर उचलली... आता मात्र मी अशाच सोडली जिवंत राहण्याची... चंदी आता मला कोणत्याही क्षणी धोब्याने धुणं आपटावं तसं आपटणार होती आणि त्या वेळेलाही मी माझ्या स्वामींना आठवत होते... तेच होते आता मला या मृत्यूच्या दाढेतून सोडवणारे...
"आई!... काय करतीयेस हे?... सोड आधी प्रीती ला... काय चालवलंयस हे तू?..."
वैभव चा आवाज ऐकून मला काय आनंद झाला ते मी नाही सांगू शकत... जगण्याची शक्यताच सोडली होती मी, पण वैभव चा आवाज ऐकून मला आता थोडी आशा आहे असं वाटायला लागलं...
आईंनी मला तिथेच बाल्कनी च्या कोपऱ्यात टाकलं... आणि आता चांदीने मोर्चा वैभव कडे वळवला... वैभव ज्या तावात आईंना अडवायला आला होता त्याच तावात चंदीने त्याला शांत केला... वैभवला आईंच्या अंगात असलेल्या अमानवी शक्ती बद्द्दल माहिती नव्हतं अज्जीबात... तो जसा आईंच्या जवळ आला तसा आईंनी फक्त नजरेने बेडरूम मधली लाकडी खुर्ची फक्त नजरेने वैभव वर भिरकावली तसा वैभव त्या खुर्ची सकट बेडरूम च्या दाराशी जाऊन पडला... दाराची कडा वैभव च्या कपाळाला लागून तिथे खोक पडली आणि त्यातून रक्ताची धार लागली... परत आईंनी त्या खुर्ची कडे बघितलं तर ती इतकी जड खुर्ची जी साधी हलवायची म्हंटली तरी जीव निघायचा ती सहज उचलली गेली आणि वैभव च्या पाठीत जाऊन इतक्या जोरात आदळली कि त्या खुर्चीचे तुकडे झाले... झालेले आघात वैभवला काही सुधरूच देत नव्हते... वैभव आता काही येणार नाही हे लक्षात येताच चंदी परत माझ्याकडे वळली...
आईंनी मला तिथेच बाल्कनी च्या कोपऱ्यात टाकलं... आणि आता चांदीने मोर्चा वैभव कडे वळवला... वैभव ज्या तावात आईंना अडवायला आला होता त्याच तावात चंदीने त्याला शांत केला... वैभवला आईंच्या अंगात असलेल्या अमानवी शक्ती बद्द्दल माहिती नव्हतं अज्जीबात... तो जसा आईंच्या जवळ आला तसा आईंनी फक्त नजरेने बेडरूम मधली लाकडी खुर्ची फक्त नजरेने वैभव वर भिरकावली तसा वैभव त्या खुर्ची सकट बेडरूम च्या दाराशी जाऊन पडला... दाराची कडा वैभव च्या कपाळाला लागून तिथे खोक पडली आणि त्यातून रक्ताची धार लागली... परत आईंनी त्या खुर्ची कडे बघितलं तर ती इतकी जड खुर्ची जी साधी हलवायची म्हंटली तरी जीव निघायचा ती सहज उचलली गेली आणि वैभव च्या पाठीत जाऊन इतक्या जोरात आदळली कि त्या खुर्चीचे तुकडे झाले... झालेले आघात वैभवला काही सुधरूच देत नव्हते... वैभव आता काही येणार नाही हे लक्षात येताच चंदी परत माझ्याकडे वळली...
"वैभव मला वाचव वैभव... हि मला मारून टाकेल रे आता वैभव... प्लिज वैभव काहीतरी कर..."
"हां... येईल येईल तुला म्या मारली ना की तुजा नवराच येईल तुला उचलायला..."
चंदी ने माझा हात धरून पिरगळला... मी वेदनेने ओरडत होते पण मी जितकी जास्त ओरडत होते तितकी चंदी अजून हसायची आणि माझी वेदना वाढवायची... वैभव वर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यातुन वैभव सावरत उठत असलेला दिसला, म्हणून त्याला एवढाच आवाज देत होते...
"बाथरूम टॅप... बाथरूम टॅप... बाथरूम टॅप..."
पण वैभव झालेल्या दुखापती मुळे हेलकांडत बेडरूम च्या बाहेरच्या बाजूला पडलेला दिसला मला... आता तर उरले सुरले होप्स हि संपले माझे...
"गप गं!... काय बोंबलायली?... आता तर कोण नाय येत तुझ्या साठी बघ तर..."
असा म्हणून चंदी ने मला हात पिरगाळलेल्या अवस्थेतच परत उचललं आणि आता मला शेवटचंच आपटणार इतक्यात...
"प्रीती!..."
आवाज वैभव चा होता... मी आणि आईंमध्ये असलेल्या चांदीने चमकून मागे बघितला तर वैभव माझी रुद्राक्षाची माळे बरोबर, बेडरूम च्या दरवाजाचा आधार घेऊन उभा होता...
"पकड..." एवढंच म्हणत वैभव ने माळ माझ्या दिशेने भिरकावली... हे सगळं इतक्या पटकन घडलं की चंदी ला ही कळलं नाही की वैभव ने काय केलं... वैभव ने टाकलेली माळ मी एक हात जो मोकळा होता त्याने कशीतरी धरली... माझ्या हातात माईंनी दिलेली माळ येताच आईंनी मला ४४० वोल्ट चा करंट बसावा तशी मला जमिनी वर टाकून लांब झाल्या... मात्र जमिनीवर पडताना चंदी ने माझा पिरगळलेला हात माझ्याच अंगा खाली आल्याने "कट" असा उजव्या हाताचं हाड मोडल्याचा आवाज आला आणि मी दुःखी सहन नं झाल्याने मी माझ्यात उरलेल्या सर्व शक्ती निशी ओरडले... माझ्या हातात रुद्राक्ष माळ आणि वैभव चा धागा तर होताच त्याच्या कडे... आईं मधली चंदी आता आम्हाला काहीच करू शकणार नव्हती... निदान हात तरी लावू शकणार नव्हती... वैभव धावतच माझ्या जवळ आला... त्याच्या आधाराने त्याने मला बसवलं...
"आज वाचलीस गं... पुन्हयांदा न्हाय वाचू देत मी तुम्हास्नी... आता एकजात तुमच्या सगल्याना संपिवते बघ म्या... येत्या आमवासेला तुमी समदे मरनार या चंदी च्या हातून... त्या दुर्गी ची फूस हाय व्हय तुमाला... पण माझ्या दिमतीला भी आज्जा आलाय... लाव म्हणावं आता तुजा जोर... दावं मला भी म्हनावं... ए आज्ज्या चल... तू भी लय लांबून आलायस... आजचा खेळ लय झाला... अमावशे पातूर जित्ती ह्राउ दे..."
चंदी ने जसं तिचा आज्जा धनाजी आल्याचं सांगितलं, तसं मला पुढे कायकाय वाढून ठेवलय आपल्या याचा एकंदरीत अंदाज आला... आता येणारी अमावस्या आमची शेवटची असणार हे जणू पक्काचं झालं डोक्यात... चंदी ने जसा तिच्या आज्ज्या ला आवाज दिला तसा आमच्या जवळपास काठी आपटल्याचा, तिच्या वाजणाऱ्या घुंगरांचा आणि पायातल्या त्या चपलांच्या करकर्ण्याचा आवाज यायला लागला... आईंच्या मधून चंदी जशी गेली तश्या आई बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या... पण त्या खाली पडायच्या आधी त्यांच्या मागे सोनेरी रंगात चमकल, ते तेच होतं जे मला काल रात्री त्या जांभळाच्या झाडा खालच्या धावजी पाटलांच्या छोट्या देवळा कडे चमकलेलं दिसलेलं... धनाजी च्या काठीचे घुंगरू...
आता मात्र जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता... हॉस्पिटल मध्ये थांबलेल्या दुर्गाला सगळं सांगायचं होतं... मला उभा करून मी वैभव ला बहाद्दूर ला बोलावून घ्यायला सांगितलं... मला आधार देऊन उभी करताना मला कपडे वाळत घालायच्या स्टॅन्ड ला अडकलेला आईंचा धागा दिसला... मला उभा केल्यावर मी आधी तो धागा परत आईंना बांधायला लावला... बहाद्दूर च्या मदतीने वैभव आईंना खाली गाडीत बसवून आला... वैभव आई ना बसवायला गेला तेव्हा मी लॉन कडे बघितला तर माई माझ्याच कडे बघत होत्या... त्यांना बघून मी हसले तर त्यांनी लांबूनच दोन्ही हात दाखवून मला बरी आहेस ना असं विचारलं... मी ही मानेनेच होकार दिला... वैभव ने आणि मी सगळ्यांचे एक एक कपडे बरोबर घेतले आणि मला आधार देत गाडीकडे आलो... आईंना घेऊन हॉस्पिटल ला पोहोचलो आणि आधी आईंना ऍडमिट केलं... दुर्गा हा सगळा प्रकार बघून डोकं धरून खालीच बसली... मी माझ्या बरोबर चंदी ने केलेली प्रत्येक गोष्ट सांगितली आणि तिने अमावास्येची दिलेली धमकीपण सांगितली...
"ताई मला आता लवकरच जायला हवं... आपल्याला आता याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवं... मी आत्ता निघते... मला जायला लागेल..."
सगळ्यांचा निरोप घेऊन आणि काळजी घ्यायला सांगून दुर्गा गेली... तन्मय मी आई वैभव सगळेच एका दिवसातल्या काही तासात हॉस्पिटल ला येऊन पोहोचलो होतो... आता दुर्गा आल्या शिवाय काही नाही... दुर्गा जाऊन एक अर्धा तसं झाला होता की मला दुर्गा च्या फोन वरून फोन आला...
"हां दुर्गा बोल गं!... आत्ताच प्लास्टर टाकलंय बघ..."
"मॅडम हा नंबर कोणाचा आहे? मी आकुर्डी पोलीस चौकी मधून हवालदार तावडे बोलतोय..."
"हा नंबर माझ्या बहिणीचा आहे... तुमच्याकडे कसा?..."
त्या पुढे हवालदाराने जे सांगीतलं त्याने मात्र मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं...
"मॅडम सनगार्डन सोसायटी जवळ तुमच्या बहिणीच्या गाडीला कोणीतरी उडवून गेलाय... त्यांना जबर मुकामार आहे... चौकीत आणून बसवलंय त्यांना... येऊन घेऊन जा प्लिज..."
क्रमशः.........
फ्लॅट भाग १७
"मॅडम सनगार्डन सोसायटी जवळ तुमच्या बहिणीच्या गाडीला कोणीतरी उडवून गेलाय. त्यांना जबर मुकामार आहे. चौकीत आणून बसवलंय त्यांना. येऊन घेऊन जा प्लिज."
फोन केलेल्या हवालदाराने असं सांगितल्यावर मला चक्कर आल्यासारखी झाली.
"काय झालं गं? प्रीती काही होतंय का? कोणाचा फोन होता? वैभव ला बोलावू का? काय गं?"
बाबांनी जाऊन वैभव ला बोलावून आणल. वैभव ला ही डोक्याला खोक पडल्याने टाके पडले होते पण दुर्गाचं ऐकलं आणि तो ही उडालाच. तश्याच अवस्थेतही वैभव दुर्गाला आणायला पोलीस चौकीला गेला. माझ्या तन्मय ला ही शुद्ध आली होती.
"आई!!!"
"कसं आहे माझं बाळ?" मला बघितल तसा तन्मय मला मिठी मारून खूप रडला.
"शांत हो पिल्लू, मी आलीये ना? आहे तुझ्या जवळ. रुद्र तर सकाळीच आलाय त्याच्या दादू ला बघायला. हो ना रुद्र?"
"दादू मला का नाही उठवलं काल रात्री? आपण दोघांनी मिळून तिला मारलं असत. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. मला पण उठव."
"तनू मला सांगशील काल रात्री काय काय झालं? तुला जितकं आठवतंय तेवढं सांग."
"मी रात्री झोपलो होतो ना तर मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. म्हणून मी जागा झालो, तर आई ते बाळ आपल्या बेडरूम च्या दाराशी होत. मी आज्जी आजोबांना उठवायला त्यांच्याकडे बघितल, पण बोलायला गेलो तर तोंडातून आवाजच बाहेर पडत नव्हता आणि ते बाळ माझ्याकडे बघून मला बोलवत होतं. मला कळत होत की मला तुम्हाला उठवायला पाहिजे पण मी ना तुम्हाला आवाज देऊ शकलो ना कोणाला उठवता आलं. मला नव्हतं जायच तरी त्या बाळाच्या मागे मागे घराच दार उघडून गेलो. मला आपल्या बहाद्दूर काकांनी पण अडवल, पण मी त्यांना काहीतरी बोललो आणि तिथून पळून गेलो. मी रस्त्यावर आलो आणि परत ते बाळ मला बोलवायला लागलं. मी परत त्याच्या मागे निघालो. आपल्या सोसायटी च्या मागच्या गेट ने परत आत आलो तर त्या तिथे ते छोटस मंदिर आहे ना तिथेच ती बाई आणि त्या बाळा बरोबर एक माणूस उभा होता. आई तो खूप भयानक होता, काळा कुट्ट, उंच, त्याच्या हातात एक काठी पण होती मोट्ठी. मी त्यांच्याकडे बघतच होतो की माझ्या उजव्या पायाला धरून कोणीतरी मला आम्ही खेळतो ना त्या गवतात खेचत ओढत न्हेलं. आणि मग खूप वेळ मला त्या मातीत कोणीतरी लोळवत होतं. ते तिघे तिथेच उभे होते. मी तुम्हाला सगळ्यांना खूप आवाज दिले, पण माझा आवाजच निघत नव्हता. मी खूप दमलो होतो. मला त्या बाई ने उचललं आणि जिन्याने आपल्या घरी आणलं आणि तुम्ही झोपले असताना तुमच्या समोरूनच मला आपल्या बाल्कनीत न्हेलं. मी तेव्हाही सुटायचा खूप प्रयत्न केला, पण मी फक्त विचार करू शकत होतो, हालचाल नाही. मला बाल्कनीत त्या बाई ने जमिनीवर जोरात आपटलं आणि म्हणाली. "माझ्या बद्दल ऐकायचं तुला? मं मला विचार कि तुझ्या आईला काय विचारतो? आज तुला लटकवतीये इथे पण लवकरच तुमच्या सगळ्यांना घेऊन जाणार मी" अस म्हणत आई तिने माझ्या दोन्ही गालांवर तिच्या नखांनी ओरबाडल. मी खूप ओरडलो, जमिनीवर आपटल्यामुळे मला खूप दुखतही होतं, तुला कित्ती आवाज दिले पण माझा आवाज निघतच नव्हता. मी हळूहळू वर वर जायला लागलो, खाली डोकं वर पाय आणि त्याच्या पुढच नाही आठवत मला." असं म्हणून माझा तन्मय माझ्या कुशीत शिरून खूप रडला.
वैभव आणि दुर्गा आले, दुर्गाची अवस्था खूप वाईट होती. गाडी स्किट झाल्याने तिची डावी बाजू अख्खी खरचटली होती आणि शरीराला मुकामार होता. वैभवच्या आधाराने लंगडतच बिचारी चालत होती. तिची हि अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय अवस्था झाली होती बिचारीची? कोण कुठले आम्ही, पण आमच्या साठी ती इतकं सहन करत होती. हे सर्व चंदी मुळेच झालं यात मला शंका नव्हती. माझ्या डोळ्यात आलेलं पाणी बघून तिने मला डोळ्यानेच खुणावलं की काही नाही झालय शांत रहा. आई अजून शुद्धीत यायच्या होत्या, मी मुलां जवळ सासऱ्यांना थांबवलं आणि मी, वैभव आणि दुर्गा आम्ही हॉस्पिटल च्या कॅन्टीन ला गेलो.
"दुर्गा! काय झालं ग हे? मला सांग सगळं सविस्तर, चंदीच आहे ना गं या सगळ्या मागे?"
"सांगते! सांगते! थांब जरा! जीजू... आपल्या तिघांनाही... कॉफी सांगा ना प्लिज... आणि माझी वाली... स्ट्रॉंग... तुम्ही या... मग बोलू."
तिला हे सगळं बोलताना सुद्धा कित्ती दम लागत होता. नक्की आता पुढे काय ऐकायला मिळणार आणि पुढचा दुर्गाचा प्लॅन काय असेल हे ऐकायला जणू माझे कान आतुर झाले होते. वैभव कॉफी घेऊन आला आणि आमचं बोलणं सुरु झालं.
"मी इथून निघाले, सन गार्डन सोसायटी जवळ पोहोचलेच असेन एवढ्यात माझ्या जवळून एक ट्रक वेगात पास झाला. ट्रक च्या मागे बसलेल्या एका लाल पागोटं घातलेल्या म्हाताऱ्याने एक जोरदार शिवी हासडली म्हणून त्या जाणाऱ्या ट्रक च्या मागे माझं लक्ष गेलं आणि तेवढ्यात आपल्या सोसायटी च्या समोर रस्त्याच्या बरोब्बर मध्ये एक बाळ खेळत बसलेलं दिसलं. बाळाला वाचवण्यासाठी मी गाडीचा स्पीड कमी करायला गेले तर गाडी कंट्रोल नाही झाली आणि स्किट झाली, मी रस्त्याच्या कडेला फरपटत फेकले गेले. मागून येणाऱ्या भरदावं ट्रक ने माझी रस्त्याच्या मधोमध पडलेली गाडी धडकेने उडवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ट्रक च्या मागे ही तोच लाल पागोटं घातलेला म्हातारा, त्या रस्त्यावर खेळताना बघितलेल्या बाळाला घेऊन बसला होता. तो धनाजी आणि ते चंदी च बाळच होत यात मला तरी शंका नाही. त्या पुढे मला चक्कर आल्या सारखं झालं. शुद्धीत आले तर आजूबाजूला लोक आणि पोलीस होते, पण कोणीच लागोपाठ गेलेल्या ना त्या दोन ट्रक ना बघितल ना त्या बाळाला रस्त्याच्या मध्ये खेळताना बघितलं..."
"पण तुला इतकी हानी पोहोचवायचं कारण काय त्यांना? आम्हाला त्रास देतायत ते काही कमी आहे का?"
"अगं! माझ्या येण्याने त्यांना तुमच्यावर डायरेक्ट वार नाही करता येत आहे. त्या मुळे मी त्यांच्या रस्त्यातील काटा आहे आणि मला घाबरवायचा हा दुसरा प्रयत्न केलाय त्यांनी. कारण दुसऱ्या ट्रक मधून धनाजी बाळा बरोबर गेला तेंव्हा त्याने काही परत शिवी नाही घातली मला तर... त्याने... जाऊ दे तू नको जास्त विचार करू."
" नाही सांग! काय बोलला ते?"
"तो म्हणाला. आज वाचलीस परत नाही वाचणार, निघून जा"
"काय? असं म्हणाला?"
"म्हणूनच म्हणते ना की ही त्याने मला दिलेली दुसरी वोरनिंग होती म्हणून."
"मं आता काय करायच दुर्गा आपण? मला खूप भीती वाटतीये. तुला त्यांनी काही केलं तर?"
"मी बोलले ना तुला ताई, माझे स्वामी आजोबा आहेत माझ्या बरोबर. ते लवकरच दाखवतील मार्ग यातुन बाहेर पडण्याचा. जीजू माझ्या बरोबर घरी चला ना जरा तुमच्या, माझं काम आहे."
"नको दुर्गा! आपण सगळे आत्ताच एका दिव्व्यातून वाचून बाहेर पडलोय, आता तुम्ही दोघे नका जाउ कुठे"
"ताई! काहीही होणार नाही, मला काही गोष्टी बघायच्यात. जीजू मला फक्त तुमच्या फ्लॅट वर सोडा, मग तुम्ही परत आलात तरी चालेल. मी बघते पुढे काय ते."
"ठीक ए! चल! पण मी ही येणार तुझ्या बरोबर, म काय होईल ते होईल. तसं चालणार असेल तरच जाऊ नाहीतर तुझ्या घरी सोडतो तुला, तू ही आराम कर घरी जाऊन."
"ठीक ए बाबा! चला तुम्ही ही!"
"आणि मी काय करायचा ते ही सांगून जा"
"तू? चल सांगते!"
असं म्हणत आम्ही परत तन्मय आणि सासू बाईंना एकाच रूम मध्ये ठेवलं होत तिथे आलो.
"अगं मला सांगणार होतीस ना काय करायच ते?"
"हो! हो! सांगते धीर धर जरा, ते बघ काय ए समोर"
सगळ्या गडबडीत माझं लक्ष त्या भिंतीवरच्या स्वामींच्या तसबिरीकडे गेलंच नव्हतं. स्वामी वटवृक्षाच्या झाडाखाली चौथऱ्यावर पाय खाली सोडून बसलेत. हात गुढघ्या वरून खाली सोडलेले, नजरेत जरब पण भक्तासाठी प्रेम, अशी आजानुबाहू तसबीर होती ती. स्वामींकडे बघून वाटत होत ते मला सांगतायत मी आहे ना मं का भितेस, मीच आहे तो; जो अशक्य ही शक्य करून दाखवू शकतो, मी या आधी ही होतो; आता ही आहे आणि पुढे ही मीच असेन, तू फक्त मला मनापासून आवाज दे आणि बघ मी काय करू शकतो ते.
"ताई! कसला विचार करतीयेस? की बोलायला लागलीस लगेच स्वामी आजोबांशी?"
"नाही गं! तू काही तरी सांगत होतीस ते सांग."
"मी आणि जीजू जाऊन येई पर्यंत तुला एक मंत्र सांगणार आहे मी. स्वामी आजोबांसमोर बसून तुला तो म्हणत राहायचाय आणि फक्त आम्ही येई पर्यंत म्हणायचा असं नाही. नंतर हि जेव्हां जेव्हां तुला भीती वाटेल, एकटं वाटेल तेव्हा म्हण चालेल. पण आत्ता मात्र नक्की म्हणणार आहेस तू. समजलं?"
"हो गं बाई समजलं. या पटकन जाऊन, मी वाट बघतीये."
"हो आलोच."
दुर्गा आणि वैभव आमच्या घरी गेले. मी स्वामीं समोर बसून दुर्गाने सांगितलेल्या मंत्राचा जाप करायला घेतला. आईंना ही शुद्ध आली होती, पण दुर्गा ने सांगितलं तसं मी माझा जप करण नव्हतं बंद केलं. तासा दीडतासात वैभव आला, पण तो कसल्याशा काळजीत होता हे त्याच्या चेहऱ्यावरून समजत होतं. मी ही स्वामींना नमस्कार करून उठले. मी आणि वैभव मुद्दामच कॅन्टीन ला आलो. आई, बाबा आणि मुलं या सगळ्या प्रकाराला इतके धास्तावले होते कि त्यांच्या समोर काही बोलायची आम्हा दोघांची ही इच्छा नव्हती.
"वैभव काय झालं घरी गेलात तर? काय बोलली दुर्गा? काय बघायचं होतं तिला घरी जाऊन? ती ठीक तर आहे ना?" मी इतकं बोलले तरी वैभव त्याच्याच तंदरीत होता...
"वैभव!" मी वैभव ला जोरात हलवून भानावर आणलं.
"अं! काययय?"
"अरे वैभव! काय झालं घरी गेलात तर? काय बोलली दुर्गा? काय बघायचं होतं तिला घरी जाऊन? ती ठीक तर आहे ना? मी काय बोलतीये इतकावेळ झाले? कुठे लक्ष आहे अरे तुझं? कसल्या विचारात हरवलायस आल्या पासून? सगळं ठीक आहें? काही प्रॉब्लेम नाहीये ना? सांग मला आधी?"
"मला सांग! ती चांदी जेंव्हा आईच्या अंगात आली होती तेंव्हा तिने जाताना आपल्याला धमकी दिली ना?"
"हो! ती म्हणाली की येणाऱ्या अमावास्ये पर्यंत ती आपल्या सगळ्यांना तिच्या बरोबर घेऊन जाणार. काय झालं वैभव? आल्या पासून तू तुझ्याच विचारात आहेस? म्हणजे नक्कीच असं काहीतरी झालंय ज्याचं तुला इतकं टेन्शन आलंय! सांग मला सविस्तर, माझी शप्पथ ए तुला, काहीही न लपवता सांग."
"मी आणि दुर्गा आपल्या सोसाटीत पोहोचलो मगाशी तेंव्हा, पहिलेतर आपला बहाद्दूर धावत आला आमच्या गाडीच्या मागे. त्याला आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं महत्वाचं. पण त्याने जे सांगितलं प्रीती ते ऐकून मी निम्मा तिथेच गार झालो."
"म्हणजे? असं काय सांगितलं त्याने?"
"काल आपल्या तनू ला आम्ही सगळे जेंव्हा हॉस्पिटल ला घेऊन आलो आणि सोसायटी मधले सगळे जसे आपापल्या घरी गेले, सगळं शांत झालं परत. बहाद्दूर त्याच्या केबिन मध्ये बसला होता, रात्रपाळीचा दुसरा वोचमन राउंड ला गेला होता. साधारण ०३.३०/०४.०० वाजले असतील म्हणाला. त्याला डुलकी लागली होती आणि अचानक त्याचे कोणीतरी हात पाय घट्ट पकडून ठेवलेत, ज्या जागेवर तो बसला होता त्या जागेवरून हलता पण नव्हतं येत असं झालं म्हणाला. त्याच्या छातीवर कोणीतरी बसलंय असं वाटलं त्याला आणि त्याच्या कानात जाड्या भरड्या आवाजात बोलत होतं "ये भादुर, तेरी बेटी को लेके गये तरी अक्कल नई आई क्या रे तेरेकू? लय खुजली है न तेरेकू वो लोगो को बचानेकी? लांब रेहेनेका, हमारे बीच मे आया ना? तो आनेवाले अमावस्या को तुझे भे ले जाके रखता हे फिर तेरी बेटी के पास, संभालकें ऱ्हय." असं म्हणून एकदम एखाद्या बंधनातून सुटावं तसं सुटलो म्हणाला मी."
"अरे देवा! आता रे? आपण झालो, मग दुर्गा झाली आणि आता हा बहाद्दूर सुद्धा? वैभव तू हे सगळं संगितल्यावर माझ्या मनात एक शंका आली बोलू का रे?"
"बोल ना! काय झालं?"
"वैभव! दुर्गा आपल्यासाठी खूप करतीये रे, पण मला असं वाटतंय की ती कुठेतरी कमी पडतीये का? मला तिच्या सात्विक शक्तीवर अविश्वास नाही, पण तिची शक्ती कमी पडतीये का रे? तिची खूप काळजी लागून राहिली ए. आपल्यासाठी बिचारी एवढं करतीये पण याची शिक्षा तिला नाही ना भोगावी लागणार? एक म्हणता बेक होऊन बसलं ना, तर आपण काय तोंड दाखवणार कोणाला?"
"इथेच आपण चुकतो प्रीती. अध्यात्म हा विषय वरवर जरी खूप सोप्पा आणि साधा वाटला तरी तो तितकाच अवघड, गहन आणि खूप खोल आहे. जितकं त्याला समजायला जावं तितका तो आणखीन गुंतागुंतीचा होत जातो हे मला आज दुर्गा कडे बघू समजलं. दुर्गा दाखवते तेवढी ती सोप्पी नाहीये प्रीती, कदाचित आपल्या सामान्य माणसाला समजावी म्हणून ती तेवढी जमिनीवर आहे. तुला तर माहितीये की मी देवाला नाकारलं नसलं तरी त्याच्या भरवश्यावर कधीच नव्हतो, माझा देवभोळा स्वभाव नव्हता. पण गेल्या काही दिवसात हे सगळं पटलं की जशी देव ही एक शक्ती आहे तशीच दानव, भूत, पिशाच्च, आत्मा ह्या ही शक्ती आहेत. भले निगेटिव्ह असतील, पण आहेत. आमच्या IT च्या भाषेत बोलायचं झालं तर जो पर्यंत व्हायरस येत नाही तो पर्यंत अँटिव्हायरसच महत्व कळत नाही तसच देवाचं ए, संकटं येत नाहीत तो पर्यंत त्याचं महत्व कळत नाही. रूप कोणतंही असो पण तो आहे आणि ते साधना की काय म्हणतात ना ती आपल्या दुर्गाची तर इतकी ए ना की काय सांगू तुला. मी तर आत्ता प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलोय."
"अरे पण काय झालं ते तरी सांग?"
"बहाद्दूर ची रामकहाणी ऐकून आम्ही वर आपल्या घरी गेलो. दुर्गा आणि मी आपल्या हॉल मधेच होतो. दुर्गा म्हणाली ""जीजू मला थोडावेळ इथे बसावं लागेल. तुम्ही माझ्या बरोबर थांबलात तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला खाली थांबायचं असेल तरी मी एकटी मॅनेज करेन इथे... पण जर तुम्ही माझ्या बरोबर थांबणार असाल तर तुम्हाला मी सांगेन ते ऐकावं लागेल, मंजूर ए?" मी थांबणार आहे असं म्हंटल्यावर तिने पुढच्या अटी सांगितल्या. "मी थोडावेळ इथे ध्यान लावणार आहे, मला जाणून घ्यायचेत काही गोष्टी. तुम्ही माझ्या बाजूलाच बसा. तुमच्या हातात मी दिलेला धागा आहेच, त्या मुळे कोणीही तुम्हाला हात लावणार नाही, काळजी नका करू. काहीही झालं तरी जागा सोडायची नाही, मग काय वाट्टेल ते झालं तरी. तुम्ही जागा सोडावी म्हणून ते तुम्हाला काहीही लालूच दाखवतील. मं ते काहीही असेल, चांगलं ही किंवा वाईट ही, पण तुम्ही काहीही झालं तरी हलणार नाही जागचे. जर तुम्ही जागा सोडलीत तर माझ्यासाठी खूपच अवघड जाईल जीजू. तुम्हाला पुढे करून ते मला शह देतील आणि तेंव्हा मला कदाचित नाही सावरता येणार सगळं. तेंव्हा प्लिज हे जमणार असेल तरच थांबा इथे, नाहीतर अजूनही जाऊ शकता तुम्ही बाहेर." मी तरी सुद्धा थांबायची हिम्मत आणि तयारी दाखवली. "ठीक ए! काळजी नका करू मी सांगितलं तेवढं करा, मी बघते बाकीचं आणि हो! जो पर्यंत मी माझं काम संपवत नाही तो पर्यंत '॥ श्री स्वामी समर्थ ॥' हा जप सतत म्हणत रहायचा आणि तो ही अगदी मना पासून. "चिंता नका करू, चिंतन करा" असं माझे गुरु नेहमी सांगतात." मला बरोबर घेऊन दुर्गा आपल्या हॉल मधेच बसली. दुर्गा ने डोळे मिटले आणि ध्यानाला बसतो त्या मुद्रेत दुर्गा ने ध्यान लावलं. तोंडाने काहीतरी पुटपुटत होती ती, थोडाच वेळ गेला असेल की आपल्या हॉल मधलं वातावरण गरम व्हायला लागलं. असं वाटत होतं की दुर्गा जे पुटपुटत होती ते शब्द हॉल मध्ये घुमतायत. माझा स्वामींच्या नामाचा जप तर चालूच होता. अजून काही वेळ गेला असेल की मला तन्मय चा आवाज आला. "बाबा ही बघा मला परत उलट लटकवतिये, मला वाचावा" मी नाही लक्ष दिलं, तेवढ्यात स्वयंपाकघरातून आई आली आणि म्हणाली "अरे वैभव! बाबा बघ कसे करतायत, उठ लवकर." मी आई कडे बघितलं तर तिच्या हातात तुझे केस धरलेले, म्हणजे तुला तिने स्वयंपाकघरातून फरपटत बाहेर आणलेलं. मी स्वामींचा जप करत परत दुर्लक्ष केलं, तर तिने तुझा गळा पकडून तुला हवेत उचललं, तू हात पाय झाडत होतीस, मला सोडवण्या साठी आवाज देत होतीस आणि आई म्हणत होती. "उठ वैभव, नाहीतर मी तुझ्या बायकोला आणि माझ्या सुनेला असच लटकवून मारून टाकेन, उठ बाळा लवकर." एक क्षण सगळं खर वाटलं पण मी माझ्या डोक्यातून विचार झटकून टाकला आणि परत स्वामींचं नाव घेतच राहिलो. आता इतकावेळ जे दिसत होतं ते एकदम नाहीस झालं आणि हॉल, किचन आणि आपल्या दोन्ही बेडरूम मधल्या बऱ्याचशा वस्तू आमच्यावर कोणीतरी फेकत होतं, वस्तू आमच्या वर फेकल्या जात होत्या पण पोचत नव्हत्या. जणू काही दुर्गा जे म्हणत होती त्याने आमच्या भोवती एक कवच निर्माण झालं होतं जे आम्हाला वाचवत होतं. एकदम दुर्गा च्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, असं वाटत होतं की ती खूप चिडली आहे आणि काहीतरी विचारात आहे. मधेच डोक्यावर आठ्या आणि मधेच चेहऱ्यावर राग असं काहीस वागणं होतं तिचं. अचानक झटका लागावा तशी ती तिच्या ध्यानातून जागी झाली आणि मला म्हणाली, "जीजू, लवकरात लवकर मला इथून घेऊन चला घरा बाहेर." मी तिला तसच उठवलं आणि घरा बाहेर आणलं. तिला बाहेर आणताना तिच्या शरीरातून जणू ज्वाळा बाहेर पडत होत्या इतकं तीच अंग गरम होतं, प्रचंड थकवा आला होता तिला, जणू शरीरातली ताकद कोणीतरी काढून घेतली असावी. आम्ही घरातून बाहेर पडलो तर मागे दार कोणीतरी जोरात आपटावं तसं आपटून बंद झालं. मी तसच तिला खाली आणलं आणि बहाद्दूर कडून एक एनर्जी ड्रिंक मागवून आधी तिला प्यायला दिलं. थोडी ताजी तवानी झाल्यावर तिने मला घडलेला सर्व प्रकार सांगितला. धनाजी आणि चंदी बरोबर दुर्गाचा संवाद झाला, खूप भांडले म्हणाले दोघे. दुर्गाला नमवण्याचा एकही प्रयत्न धनाजीने सोडला नाही आणि चंदी मला भुलवत होती. पण दुर्गाने जे आमच्या भोवती जे कवच निर्माण केलं होतं त्याने आम्ही वाचलो. त्यात मला आणि हॉस्पिटल मध्ये तुला जो मंत्राचा जप सांगितला तो उपयोगाला पडला म्हणाली. फक्त धनाजी इतकी शक्ती कुठून घेऊन आला ते तिला कळलं नाही म्हणाली आणि तेच शोधायला ती गेलीये आता."
"म्हणजे? कुठे गेली? आपल्याला सोडून? अशी कशी गेली ती? आणि तू कशी काय जाऊ दिलंस तिला वैभव? इथे काय चालू आहे नीं तू."
"अगं थांब! ऐक ना जरा! आपल्या सगळ्यांना अमावास्येला धोका आहे हे तिला ही कन्फर्म झालंय आणि तिला कोणतीही रिस्क नको ए. तिचं एक चुकीचं पाऊल आणि आपल्या सगळ्यांचंच बरं वाईट. म्हणून ती पुढच्या तयारीसाठी गेलीये कारण अमावास्येला फक्त ४ दिवस राहिलेत. तिने आपल्याला ही सांभाळून राहायला सांगितलंय, जमलं तर त्या घरी जाणं टाळायचंय पण तसं होणार नाही. चंदी आणि धनाजी पूर्ण प्रयत्न करणार की आपण अमस्येच्या आधी सगळे त्या घरात परत गेलेलो असू."
वैभव ने जे सांगितलं त्याने काय करावं ते सुचत नव्हतं. दुर्गाने घरी जाऊन फक्त बॅग घेतली आणि बाहेर पडताना आईला सांगत होती तेंव्हा ऐकलं म्हणे त्याने, की कोणा काकांकडे चाललीये. दोन दिवसात परत येईन, मोबाइलला रेंज नसेल कदाचित काळजी नको करुस. आम्हाला सगळ्यांना 2 बेड ची एक रूम मिळाली होती. आई आणि तन्मयला अजून एक दिवस तरी ठेवणार होते हॉस्पिटलला. आम्ही सगळे त्या एकाच खोलीत एकजेस्ट झालो. इथे आम्हाला कसलीच भीती नव्हती अजून तरी. रात्री झोपेतून मला वैभव ने जागं करून उठवलं. घामाने थपथपला होता तो, चेहरा पंधरा पडला होता.
"काय झालं रे?"
"ते बाथरुम मध्ये, काचेवर."
"काय बाथरूम मध्ये?."
"चल जरा तिकडे."
आम्ही दोघं बाथरूम मध्ये गेलो तर बेसिन च्या वरच्या आरशावर रक्ताने लिहिलं होतं.
"नाही वाचणार? फक्त चार दिवस राहिलेत!!!"
वेलिंग नाडकर्णी...
फ्लॅट भाग १८...
"नाही वाचणार?... फक्त चार दिवस राहिलेत !!!..."
हे काय बघतं होते मी?... मला वाटलं आम्ही घरी नाही, इथे हॉस्पिटल ला आहोत, तर आम्हाला इथे त्रास नाही होणार... पण समोर बेसिन वरच्या काचेवर लिहिलेला मेसेज बघितला आणि मनात धडकी भरली... त्यात दुर्गा ही इथे नाही, झोपायच्या आधी फोन केलेला तर नॉट रिचेबल सांगितला... दुर्गा २४ तास बरोबर जरी नसली तरी जवळपास होती, फोन केला तर वेळेला हजार असायची... आता कुठे शोधणार होते मी दुर्गा ला?... कशी मिळणार होती मला दुर्गा ची मदत?... आरशावर जो काही संदेश आम्हला चंदी ने दिला होता... तो देताना आजू बाजूला सर्व रक्त पडलेलं आणि आमच्या बाथरूम मधून आम्हाला दिलेल्या हॉस्पिटल रूम च्या बाहेर पर्यंत रक्त सांडलं होतं... याचा अर्थ हे इथे जे लिहिलं होतं ते कोणीतरी येऊन लिहिलं होतं?...
"वैभव काय बघितलंस तू नक्की?... तू उठल्या पासून मला उठवे पर्यंत सगळं सांग मला..."
"मला रात्री वॉशरूम ला लागली म्हणून उठलो... वॉशरूम ला जाऊन हात धुवायला बेसिन कडे गेलो तो पर्यंत डोळ्यावरची झोप ही उडाली होती, आणि समोर लक्ष गेलं तर हे लिहिलं होतं काचेवर... तसाच बाहेर आलो आणि तुला उठवलं..."
मी आणि वैभव दोघंही त्या पडलेल्या रक्ताच्या थेंबांचा मग काढत आमचं रूम च्या बाहेर आलो... ते रक्ताचे ठसे पायऱ्यांवरून खालच्या कॉरिडॉर कडे गेले होते... आम्ही तसेच काली आलो तर ते ठसे केजुअल्टी समोर एका स्ट्रेचर वर कोणाला तरी झोपवलं होतं त्याच्या स्ट्रेचर कडे येऊन थांबले... त्याच्या हातातूनही रक्त जमिनी वर पडत होतं... केजुअल्टी मध्ये रात्रपाळीचा नर्स झोपल्या होत्या आम्ही तिथल्याच एकीला उठवलं...
"मावशी!... ओ मावशी!... ओ ताई!... उठा ना!..." मी आवाज दिला तश्या सगळ्याच खडबडून जाग्या झाल्या, त्या सगळ्यांना वाटलं असावं कि मेन डॉक्टर आले म्हणून...
"बोला ना मॅडम!... काही हवाय का?..."
"नाही तसं काही नाही... मला फक्त विचारायचं होतं की हे स्ट्रेचरवर कोणाला झोपवलंय?... त्यांच्या हातातून सगळं रक्त पडतंय तिथे जमिनीवर म्हणून विचारला..." मी षक्य तेवढा माझ्या चेहर्या वरची भीती लपवायचा प्रयत्न करत म्हणाले...
"अहो कमला बाई!... कधीचं सांगितलं तुम्हाला पोलीस पंचनाम्याला येत नाहीत तो पर्यंत ही बॉडी शवागारात ठेवायला सांगा म्हणून... त्याचं काय ना मॅडम आत्ता रात्री इथे ऍक्सिडेंट झाला जवळच, ह्या माणसाला कोणीतरी इथे घेऊन आलं... पण हॉस्पिटल ला पोहोचे पर्यंत हा बिचारा मेलेला होता, डॉक्टरांनी चेक केलं, पण ऍक्सिडेंट केस आहे तर पोलीस येऊन पुढची कार्यवाही करतील... पण आमच्या मावशींच्या नाही राहील लक्षात म्हणून हां... घेतो आम्ही साफ करून... तुम्ही काही बोलू नकात कोणाला... आमची नोकरी जायची..."
"बोलू नकात?... तुम्हाला तुमच्या नोकरीची काळजी आहे?... आणि आमच्या जीवावर बेतणार होता त्याचं काय?... तुमच्या डॉक्टर ना बोलवा आधी... कसा मृत घोषित केलं मला बघायचाच ए..." रात्री वैभव ने उठवल्या पासून जे जे काही बघितलं त्या मुळे चंदी चा सगळा राग त्या बिचाऱ्या नर्स वर निघत होता... माझा चढलेला पारा लक्षात घेता त्या सगळ्यां मधली एक म्हातारी नर्स पुढे आली...
"ताई काय झाल सांगा ना आम्हाला... ह्या सगळ्यांच्या हलगर्जी पणासाठी मी माफी मागते तुमची... पण आम्हाला सांगा तरी की काय झालं नक्की?..."
"अहो मावशी!... तुमच्या डॉक्टरांनी ज्याला मेलेला म्हटलंय ना तो जिवंत ए..."
"मॅडम तुम्ही मगाशी ओरडलात, आमची चूक होती मान्य ए... त्या मुळे तुमचा राग राग होतोय हे ही मान्य, पण तुम्ही त्याला मेला नाहीये म्हणताय ते अशक्य ए... डॉक्टरां बरोबर मी ही होते चेकिंग ला..."
"आहो मावशी!... मी का बोलेन खोटं?... चला माझ्या बरोबर दाखवते..."
मी, वैभव आणि त्या मावशी आम्ही सगळे आमच्या वॉर्ड कडे जायला निघालो... मी मावशींना सगळे रस्त्यातले रक्ताचे डाग दाखवत होते... ते बघून मावशी ना पण वेगळं वाटत होतं... मावशींना घेऊन आमच्या रूम मध्ये आणलं आणि बाथरूम मध्ये न्हेलं, पण ते रक्ताचे ठसे फक्त बेसिन खाली येऊन संपले पण आरशावर काहीच लिहिलेलं नव्हतं... मी आणि वैभव एक मेकांकडे बघत होतो... पण मावशींना एवढाच लक्षात आलं की त्या स्ट्रेचर पासून रक्ताचे ठसे आमच्या रूम पर्यंत आले होते... मावशी पण आता चक्रावल्या... आम्हाला दोघांना घेऊन सिक्युरिटी रूम मध्ये गेल्या... हॉस्पिटल प्रशस्त असल्याने सिकत्व वगैरे सुविधा होती... रक्ताचे ठसे रूम पर्यन्त जन ही मावशींसाठी चिंतेची बाब होती आणि फक्त मावशींसाठीच नाही तर हॉस्पिटलच्या इभ्रतीचा प्रश्न होता... मावशींना CCTV रूम मध्ये आलेलं बघून तो सिक्युरिटी गार्ड पण चक्रावला... मावशी हॉस्पिटल मध्ये फक्त वयानेच म्हाताऱ्या नव्हत्या तर स्टाफ मध्ये ही जुन्या दिसत होत्या... CCTV रूम मध्ये गेल्यावर मावशींनी रात्री १२.०० नंतरचे सगळे फुटेज दाखवायला सांगितले... आम्हाला एक एक मिनिटांचं विडिओ दाखवत होता सिक्युरिटी... मावशी ऍडव्हान्स पण तेवढ्याच होत्या कारण तेवढ्यात...
"पळव ना माकडा... आता इथे काय ३ तास घालवतो का आमचे?...:"
म्हणजे त्यांना या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल माहिती ही दिसत होती... विडिओ मध्ये साधारण रात्री ११.३० ला ऍम्ब्युलन्स मधून बॉडी आणली केजुअल्टी मध्ये हे दिसत होतं... ११.३५ ला डॉक्टर येऊन चेक करून गेले, साधारण ०१.००/०१.१५ ला सगळ्या नर्स झोपल्या, आणि ०१.३५ ला स्ट्रेचर वर हालचाल दिसली... स्ट्रेचर वरचा मृत घोषित केलेला तो माणूस उठून बसला... ऍक्सिडेंट झालेल्या मोडक्या शरीरानेच तो अडखळत चालायला लागला... तो त्याच अवस्थेत हॉस्पिटल चे जिने चढून पहिल्या मजल्यावर आला... हे सगळं आम्ही त्या त्या ठिकाणच्या कॅमेऱ्यात बघत होतो... ती बॉडी आमच्या मजल्यावर बरोब्बर आमच्या रूम मध्ये शिरली... एक १० मिनिटं गेले असतील आणि परत बाहेर आला आणि जसा आला तसाच परत जाऊन त्या स्ट्रेचर वर झोपला...
"बघितलात मावशी!... तो जिवंत होता..."
"हो मॅडम ते मला ही समजलं आत्ता हा विडिओ बघून... तुम्ही या माझ्या बरोबर..." आम्ही परत केजुअल्टी मध्ये आलो...
"कमला ते स्ट्रेचर आणि बॉडी कुठे?..."
"ती पोचवली ना मी त्या कोल्ड स्टोरेज ला..."
मावशींनी तिथूनच रात्र पाळीच्या डॉक्टर ला बोलावून घेतलं आणि त्या माणसाला परत एकदा चेक करायला सांगितलं...
"तुम्ही बसा तुमच्या रूम मध्ये... मी येते रिपोर्ट घेऊन... व्हा तुम्ही पुढे... मी आलेच..."
आम्ही आमच्या रूम मध्ये आलो तर आई बाबा पण आता उठले होतेच... आम्हाला इतक्या रात्री जग बघून त्यांना ही काळजी वाटण साहजिक होता आणि जे घडलं ते त्यांच्या पासून लपवणं शक्य ही नव्हतं... कशीतरी हिम्मत करून वैभव ने त्यांना सगळं सांगितलं... आई तर रडायलाच लागल्या... इतक्यात मगाचच्या मावशी परत आल्या आमच्या रूम मध्ये...
"काय म्हणाले डॉक्टर?... तो माणूस..."
"मॅडम तो माणूस मारून आता ४ तास झालेत... डॉक्टरांनी सांगितलं तेव्हाच तो मेला होता... पण मला तुमच्याशी बोलायचंय तुमच्याशी..."
"काय झालं?... डॉक्टरांचं काहीतरी चुकत असेल ओ मावशी... पण तुम्ही बोला आधी..."
"मॅडम मला या नोकरीत ४५ वर्ष झाली आता... ही डोक्यावरची पांढरी झाली ती इथंच... ह्याच क्षेत्रात... तो माणूस मारून ४ तास उलटून गेले ते ही अगदी खरं ए... कारण डॉक्टर साहेबांबरोबर मीच होते त्या वेळी... पण मगाशी जे आपण केमेऱ्यात बघितलं तसं काही खूप वर्षांनी बघायला मिळालं... ते जे बघितलं आपण ते साधं नव्हतं... माझ्या या नोकरीत, हॉस्पिटल मध्ये असे खूप अनुभव ऐकले ही आणि घेतले ही... ती हॉस्पिटल पण तशीच होती म्हणायला, पण हे हॉस्पिटल बांधल्या पासून आज हा आलेला पहिलाच अनुभव माझ्या बाबतीत... आमचे डॉक्टर साहेब देव माणूस... कधी कोणाला फसवलं नाही... कधी कोणाची हाय, तळ तळ नाही लागली... त्या मुळे जरी ह्या हॉस्पिटल ला १० वर्ष झाली असली तरी असं पहिल्यांदाच घडलंय..."
"पण मं आज का घडलं असेल?..." सगळं ठाऊक असून मी उगीच येडगाव हुन पेडगाव ला जायचा प्रयत्न केला...
"तेच विचारतीये मॅडम... इथे काहीतरी झालं एवढं नक्की... तो माणूस आला खरं तुमच्या या रूम मध्ये, पण परत बाहेरही आला... मं तुम्हाला कळण्याच आणि तुम्ही शोधत येण्याच तसं काहीच कारण नाही... आणि जरी तुम्हाला कळलं तरी तुम्ही मला जे आणून दाखवलंत त्या पेक्षा जास्त काहीतरी नक्की होतं... जे मला दिसलं नाही किंवा तुम्ही दाखवलं नाही... पण आपण जे काही त्या कॅमेऱ्यात बघितलं ते वाटत तेवढा सोप्पं नव्हतं... माझं ऐकाल तर तुम्हाला दुसरा उपाय करण आवश्यक आहे... पर्वा तुमच्या मुलाला ज्या अवस्थेत इथे आणलं, काल तुम्ही तुमचा नवरा आणि सासू ज्या अवस्थेत इथे आलात, झालंच तर ती मुलगी होती तुमच्या बरोबर ती ही कुठेतरी धडपडली आणि काही वेळा पूर्वी जे झालं ते... माझं ऐकाल तर तुम्ही बाहेरची मदत घ्यावी... तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतीये ते?..."
"मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते... उद्या इथून जाऊ तेंव्हा बघतो आम्ही काय ते... पण तो माणूस आणलं तेंव्हा नक्की मेलेला ना?..."
"मी संगितलना मॅडम तुम्हाला... मी तिथेच होते... तरी उद्या डॉक्टर आल्यावर मी त्यांच्या कानावर घालणार आहे हे सगळं... त्यांना ही कळालं पाहिजे की काय झालं ते... सकाळी येतील डॉक्टर तेंव्हा बोलावते तुम्हाला... आता थोडावेळ आराम करा तुम्हीही..."
त्या मावशी गेल्या आणि जीव भांड्यात पडला आमचा... कारण आरशावर काय लिहिलं होतं हे सांगायला त्यांना सगळंच पहिल्या पासून सांगावं लागणार होतं, ते टळलं... आता आजचा दिवस धरून आमच्याकडे ४ दिवस होते अमावस्या यायला... आज डॉक्टर डिस्चार्ज देणार हे नक्की होतं, पण जर आम्ही घरी गेलो असतो तर परत चंदी आणि धनाजी आ वासून आमची वाटच बघत होते... आणि दुर्गा येई पर्यंत कुठेही जायची माझी तरी इच्छा नव्हती... पण काय म्हणतात तसं आपण एखाद्याला मनापासून आवाज द्यावा आणि त्या माणसाला कळावं तसं दुर्गा चा फोन वैभवच्या फोन वर आला... त्या वेळी माझाच नाही तर आम्हा सगळ्यांचेच चेहरे काय आनंदाने खुलले ते काय सांगू...
"हॅलो जीजू... काय करताय... इथे टेकडीवर आलेले चालायला तेंव्हा रंगे मिळाली मी फोन लावला... कसे आहेत तुम्ही सगळे?... तन्मय, काकू, काका आणि रुद्र काय म्हणतायत?... महत्वाचा आपल्या मॅडम कुठे आहेत... आठवण आहे का माझी तिला..."
"आम्ही सगळे ठीक आहोत... हॉस्पिटल मध्येच आहोत... तू कशी आहेस?... हे घे बोल प्रीती शी..."
"काय ताई कशी आहेस?... आणि जीजू तुम्ही ठीक आहात असं का म्हणाले?... तुम्ही आहात ना सगळे व्यवस्थित?..."
दुर्गाचा कानावर पडलेला आवाज आणि ती करत असलेली चौकशी याने मला रडू अनावर झालं... दोन दिवस ही झाले नव्हते खरंतर दुर्गा ला जाऊन, पण खूप वर्षांनी आवाज ऐकला असं वाटत होतं मला... मला रडल्यामुळे बोलताच आलं नाही तिच्याशी,,, मी फोने परत वैभव कडे दिला...
"हां दुर्गा बोल गं..."
"जीजू काय झालं ताई ला?... मला सांगा?... परत काही झालंय का तिकडे?... तुम्ही हॉस्पिटल मधेच आहात ना?..."
"हो!... हो!... आम्ही हॉस्पिटल मधेच आहोत..."
वैभव ने दुर्गा ला ती गेल्या पासून आत्ता पर्यंत जे जे काही म्हणून घडल ते सगळं सांगितलं... त्यावर मी उद्या निघतीये नका काळजी करुत, आल्यावर डिटेल सांगेन इतकं बोलली दुर्गा आणि कॉल कट झाला... आम्ही थोडावेळ तिथेच विश्रांती घेतली... ८ वाजता मावशी सगळी रूम साफ करायला आल्या... आम्ही सगळ्यांनी खाली कॅन्टीन मध्ये जाऊन नाष्टा केला... साधारण १० वाजता डॉक्टर आले... मावशी आम्हाला बोलवायला आल्या... मी आणि वैभव मावशीनं बरोबर डॉक्टरां कडे गेलो...
"या बसा बसा मि. वैभव काय म्हणतायत आमचे सगळे पेशंट?..."
"ठीक आहेत आता डॉक्टर.. थोडा तन्मय ला अशक्त पणा जाणवतोय आणि आई ला ही बसवतात मला..."
"नो नो मि. वैभव... ते सगळे आता ओक आहेत... आणि थोडा अशक्त पणा जाणवणारच... आता घरी गेल्यावर त्यांना पौष्टिक आहार द्यावा लागेल मात्र... त्यांनाच नाही तुम्हा सगळ्यांनाच... तुम्ही एक आठवड्या भरात टाके काढायला या पण वहिनींचं प्लास्टर काढायला मात्र एक महिना लागेल... मला वाटत आज डिस्चार्ज करायला हरकत नाही सगळ्यांना... काय मावशी?..."
"डॉक्टर मी काय म्हणते, आज एक दिवस आपण राहू देऊ त्यांना इथे... कसा ए ना की घरातले सगळेच काही ना काही कारणाने आजारी आहेत, दोन लहान पोरं आहेत बरोबर... त्यांची पण अडचण होईल ना... घरातली करती स्त्री नसेल, अशी आजारी असेल तर कुटुंबाची अबाळ तर होणारच ना... आजच्या दिवस राहू दे डॉक्टर यांना..."
"मावशी पण..."
"डॉक्टर साहेब... मी रिक्वेस्ट करते तुम्हाला... त्यांना अडचण नसेल तर थांबुड्या आज..."
"ठीक आहे... तुम्ही म्हणाल तसं... पण मला नंतर सांगा बारा का कधीतरी की तुम्ही यांना एका दिवस करता का थांबवलंत ते... का मि. वैभव... चालेल ना उद्या संध्याकाळी डिस्चार्ज?..."
"हो!... हो!... चालेल ना!... मावशी तर आमच्या मनातलं बोलल्या... आणि मला अजून एक बोलायचं होतं... कालचा विडिओ बघितला का तुम्ही?... काय होतं ते?..."
"सी मि. वैभव... मेडिकल मध्ये अशे मिरॅकल होत असतात... ज्यांना मेडिकली आम्ही डेड सांगतो ते कधीतरी जिवंत होतात नंतर... काही वेळेला कायमचे तर काही वेळेला थोड्या वेळा साठी..."
"ते सगळं ठीक आहे ओ... पण आता तरी मेलाय का तो?..."
"त्याच्या त्याच सगळ्या टेस्ट करायला आणि कन्सल्ट साठी मि माझ्या डॉक्टर मित्राला सांगितलंय व्हिजिट करायला... तो आला आणि टेस्ट झाल्या की मि बोलावें तुम्हाला तेव्हाच डिटेल सांगतो सगळं... चालेल?..."
"हो!... चालेल!... येतो आम्ही..."
आम्ही डॉक्टर केबिन मधून बाहेर आलो... मावशी ही होत्या... त्यांचे कसे आभार मानायचे आम्हाला कळत नव्हतं... आज जर आम्ही त्या घरात गेलो तर परत यायची सोया नव्हती... मावशींनी देवा सारखा वाचवला आम्हाला...
"मावशी थँक्यू... आज तुम्ही काय केलत आमच्यासाठी त्याचे कसे आभार मानू तुमचे?..."
"साहेब सांगा मॅडम ना... मॅडम मी नाही ओ काही केला... पण तुम्ही सगळे ज्या अवस्थेत तुमच्या घरातून आलात सगळे ते बघता इथून परत त्याच घरात पाठवणं मला नाही बाई योग्य वाटत..."
"ते तर आहेच..."
"फक्त एकाच दिवस मी वाढवू शकले मात्र... डॉक्टर साहेब नवीन हाय गावात आले तेव्हा पासून मी त्यांच्या बरोबर काम करतीये... त्यांनी माझ्या शब्दाला मन दिला हा त्यांचा मोठेपणा... आज मी रात्री ड्युटी ला येणार आहे तेव्हा जेवण घेऊन येईन... आज बाहेरचा नका खाउ काही..."
"आहो पण..."
"पण बीण काही नाही... मी आणतीये जेवण..."
मावशी घरी गेल्या त्यांच्या आणि आम्ही आमच्या रूम वर आलो... रुद्र काल पासून हॉस्पिटल मध्येच होता म्हणून चिडचिड करत होता... वैभव त्याला घेऊन बाहेर गेला... मी बाहेरच्या स्टेशनरी मधून एक पात्याचा कॅट घेऊन आले... तन्मय ला पत्ते खेळायला आवडतात मं आम्ही थोडावेळ पत्ते खेळले... दुपारची जेवण झाली आणि रात्रीच्या जागरणाने आम्ही सगळ्यांनी थोडी विश्रांती घेतली... संध्याकाळी डॉक्टरांनी बोलावलंय असं निरोप घेऊन एक नर्स आली... मी आणि वैभव डॉक्टरांकडे गेलो...
"या!... मि. वैभव... वाहिनी बसा... मी सकाळी म्हणालो तसं बाहेरच्या डॉक्टरांची एक टीम आज येऊन गेली... कारण तसं आमच्या हॉस्पिटल मध्ये ही असं पहिल्यांदाच घडतंय..."
"पण मं कारण काय समजलं त्या मागचं?..."
"सांगतो!... काल हॉस्पिटल मध्ये आलेला तो माणूस जेव्हां आणला तेव्हां मेलेला होता... पण असं मिरॅकल होऊ शकत की जे हार्ट बंद पडलंय ते काही कारणाने चालू झालं असेल... सो त्यात वेगळं असं काही नाही, आणि आता तो माणूस दुसऱ्यांदा जिवंत होऊन मेलेला आहे हे सिद्ध झालंय... आणि तो जे जिन्याने वर आला त्या बद्दल एवढंच म्हणेन, की जर कधी काळी तो या हॉस्पिटल मध्ये येऊन गेला असेल तुमच्या रूम मध्ये ही, मं कारण काहीही असेल... तर तो जेव्हा परत जिवंत होऊन उठला तेंव्हा त्याच्या ऍक्सीडेन्ट नंतर ज्या काही मेमरी राहिल्या असतील त्यात ही पण एक मेमरी असेल आणि म्हणूनच तो आला वर... तुम्ही चला माझ्या बरोबर आणि आपण खात्री करून घेऊ..."
"इट्स ओक डॉक्टर... खात्री काय करायची त्यात?... तुम्ही दोन दोन वेळा चेक केलाय आता तर मेलाच असेल ना तो..."
"नो!... नो!... असं कसं?... तुम्हाला वॉर्डबॉय घेऊन जाईल पुढे मी आलोच १ मिनिटात..."
आम्ही नको नको म्हणत असताना डॉक्टरांनी बाहेर केजुअल्टी ला फोन लावला आणि आमच्या बरोबर वॉर्डबॉय ला पाठवायला सांगितलं... डॉक्टर स्वतः येणार तर आम्हाला आत जाणं भाग होत... आम्ही डॉक्टरांच्या केबिन बाहेर आलो... तर एक वॉर्डबॉय आला आणि म्हणाला "चला"... आणि तो पुढे चालायला ही लागला... मी आणि वैभव त्याच्या मागे मागे गेलो... हॉस्पिटल ची ती कोल्डरूम मागच्या बाजूला होती आणि तिथे जाण्यासाठी जो मधला पॅसेज होता तो एकदम शांत, गडबड नाही गोंधळ नाही, कोणाची वर्दळ नाही... तो पॅसेज चालू झाला तसा मी वैभव चा हात घट्ट धरला... आम्ही त्या कोल्ड रूम पर्यंत पोहोचलो... वॉर्डबॉय आता त्या कॉडरूम च दार उघडणार इतक्यात वैभव म्हणाला...
"दाद थांबा जरा... डॉक्टर येऊ देत मग जाऊ आपण आत..."
"क्वनला हवाय डाक्टर हिथं... तुमा द्वघास्नी म्याच लय झालो..."
असं म्हणत तो वॉर्डबॉय मागे वळला आणि त्याने वैभव चा गळाच धरला... वैभव ला समोरच्या भिंतीवर आपटून तसाच गळ्याला धरून वर उचलला... वैभव भिंतीला घासून हळू हळू वर जात होता... बघता बघता फूटभर वर उचललं त्याने वैभवला आणि ते ही गळ्याला धरून... वैभवच्या फक्त गळ्या भोवती पकडलं असल्याने वैभव पाय झटकायला लागला, त्याचा चेहरा लाल पडला, श्वास गुदमरायला लागला... माझ्या तोंडून एक भयानक किंकाळी बाहेर पडली...
"दादा सोडा हो माझ्या नवऱ्याला... मी पाय पडते तुमच्या... त्यांना नका त्रास देउ..."
"तरास?... म्या तर अमावाश्येची तयारी करतुया... जितका जास्त जीव आत्ता निघलं तेवढा लवकर मरेल न्हवं का ह्यो..."
असं म्हणत धनाजी ने माझ्याकडे बघितलं तेव्हां त्यातला सैतान मला दिसला... मी काही सैतान बघितला नाही, पण असलाच तर तो ह्या पेक्षा क्रूर निर्दयी आणि भयानक दिसूच शकत नाही... माझी तर भीतीने गाळण उडाली... मी "वाचावा ओ कोणीतरी" असं कितीतरी वेळ आवाज दिला... पण काही उपायोगं नाही... आता मलाच काहीतरी करणं भाग होतं... आणि मला माईंनी दिलेल्या रुद्राक्ष माळेची आठवण झाली... मी माझ्या गळ्यातली ती माळ काढली आणि हातात गुंडाळली... धनाजी ने वैभवला धरलं होतं, जसा वैभव तडफडायचा तसा हो कर्कश्य आणि विचकट हसायचा... मी धावत जाऊन धनाजी ने वैभव ला धरलेल्या हाताला धरलं... माझ्या हाताचा स्पर्श जसा झाला तसा धनाजीने वैभव ला जागेवर सोडल... आणि एवढ्यात...
"मि. वैभव... मि. वैभव..." असं आवाज देत डॉक्टर आणि वॉर्डबॉय तिथे आले... मी ज्या प्रकारे कर्कश्य किंचाळले होते ती हाक ऐकून दोघे धावत आले होते...
"सरांना आणि मॅडम ना त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा आधी..."
त्या वॉर्डबॉय ने आणि मी आधार देत वैभव ला रूम मध्ये आणलं... झाल्या प्रकाराने वैभव ची हालत खराब होती... आम्ही सगळेच टेन्शन मध्ये आलो परत... थोडेसे रिलॅक्स झालो की चंदी आणि धनाजी ऍक्टिव्ह होत होते... रात्री त्या सकाळच्या मावशी डबा घेऊन आल्या... झाला प्रकार मात्र मी त्यांना सांगितला... त्या ही काळजीत वाटल्या... आम्हाला आग्रह करून, जबरदस्ती जेवायला वाढून त्या मावशी निघाल्या... डबे इथेच असूदेत म्हणाल्या आणि जायला लागल्या... मी त्यांना दारा पर्यंत सोडायला गेले...
"थँक्यू मावशी... तुम्ही खूप करताय आमच्यासाठी..."
"नाही गं त्यात काय एवढा..."
मी परत आता वळणार इतक्यात... "बाळ प्रीती!..." अशी हाक आली मागून... तीच हाक जश्या माई मारायच्या... मावशी जिना उतरल्या होत्या आणि वळून उभ्या होत्या...
"काळजी करू नकोस हां बाळा... होईल सगळं व्यवस्थित... अमावस्या जवळ आली ना... आता त्या दोघांचीही ताकद खूप वाढलीये... त्यात त्या धनाजीची तर खूपच... म्हणूनच हातात धागा असून त्याने वैभव ला धरलं... पण तू स्वामींवर विश्वास ठेव... त्याचे पापाचे घडे भरले की ते त्यांचं विश्वरूप नक्की दाखवणार... काळजी घे... जप सगळ्यांना... रुद्राक्ष माळ तुला काहीच होऊ देणार नाही... तिला तुझ्यापासून लांब करू नकोस आता फक्त... येते मी सगळे खाली वाट बघत असतील..."
एवढं बोलून मावशी गेल्या... वैभव पण आतून आवाज देत होता... त्याला सध्या माझी जास्त गरज होती... आम्ही झोपायची तयारी केली... तन्मय आणि रुद्र जवळ मी झोपणार होते आणि आई बाबांच्या मध्ये वैभव... झोपायला जाणारच होतो की त्या मावशी परत आल्या...
"जेवलात का सगळे व्यवस्थित?... तिखट नव्हता ना स्वयंपाक?..."
"मावशी असं काय करताय... तुम्हीच येऊन आम्हाला वाढून गेलात की थोड्या वेळ पूर्वी... मं असं का विचारताय?..."
"मी वाढून गेले?... नाही ओ मॅडम... मी त्या दुसऱ्या नर्स ला सांगितलेलं डब्याची पिशवी वर द्यायला... हां! ही काय इथेच तर आहे कोपऱ्यात... ही मी घेऊन जाते... आहो मॅडम!... ड्युटी वर आले आणि डॉक्टर साहेबांचा रात्रीचा राउंड असतो मं मला तिथेच जावं लागलं, नाहीतर मीच येणार होते डबा घेऊन... चला मी जाते... तुम्ही करा आराम... काय वाटलंच तर सांगा मला... मी आहे खालीच..."
असं म्हणून मावशी गेल्या आणि मी वैभव कडे बघतच राहिले...
जर ह्या मावशींनी आम्हाला वाढलं नाही तर त्या मगाशी येऊन आम्हाला आग्रहाने वाढून गेल्या त्या कोण होत्या???
वेलिंग नाडकर्णी...
No comments:
Post a Comment