घर नंबर १३- New latest Marathi horror Story |
घर नंबर १३- New latest Marathi horror Story
+++++++++++++
(भयकथा)निशा सोनटक्के लिखित.
+++++++++++++++++++++++
आमचे असे घर नव्हतेच...आंम्ही भाड्याचे घरात रहात होतो.
अचानक घरमालकांची मुलगी इथेच रहायला येणार असे घरमालकांनीच सांगितले...त्यामुळे दुसरे घर बघायला लागलो.
एक महिन्यात घर मिळणे अवघड होते.
आणि
एक घर बघायला गेलो....जवळच अथांग सागर पसरलेला...
मागे पुढे अंगण....नारळीपोफळी नी सज्ज असलेले घर
मला आवडले.
पण
त्या घराचा नंबर तेरा होता.ते दक्षिणेकडे तोंड करून होते.
घराला लागूनच पिंपळवृक्ष होता.आणि त्याच्या फांद्या
घरावर पसरलेल्या होत्या.विशेष असे की...समुद्र जवळच
त्यामुळे स्मशान पण जवळच...आणि प्रेते घरासमोरूंनच
स्शानानात जाण्याचा रस्ता होता....माझ्या काळजात चर्र
झाले.मी अहोकडे पाहिले....ते व मुले खूप खूष होते.मी
काय बोलणार????
कारण
मला माहिती आहे....अंधश्रध्दा म्हणून मलाच सगळे
हसणार...मी गप्प बसले.
आंम्ही लगेचच रहायला आलो.
घरात मस्त वारा खेळायचा...अगदी छान वाटायचे...हे तर
जाम खूष होते.मी मात्र तेरा नंबर,,,पिंपळ,,, दक्षिणेकडे
दरवाजा,,,यातच अडकले होते....घरासमोरून प्रेत जाताना
काळजात धस्स व्हायचे...खरंतर सगळ्यांनाच कधीतरी
इथून जायचे आहे....तरीही हो तरीही....मी साशंक होते.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पावसाळ्याचे दिवस आले....काळे घन दाटून आले....
सौदामिनी चा खेळ...ढगांचा गडगडाट....तुफान वारा...
मी दारे बंद केली....तर कोणीतरी दारावर थाप मारते आहे
असा आवाज येत होता.घरात मी एकटीच...खरं तर अहो आॅफीस मधून आले नव्हते....मुले क्लासला गेली होती...
तेच आले असतील म्हणून दार ऊघडणार इतक्यात आतल्या
खोलीतून एक माणूस माझ्याकडे बघत बघत त्या बंद
दरवाजातून बाहेर गेला...जाताना एवढेच बोलला
"""दारावर तीन थापा मारल्याशिवाय दार ऊघडू नको""""
मी जाम घाबरले....कोण हा माणूस???आत काय करत
होता???बंद दरवाज्यातून बाहेर कसा गेला???
मी धावत जाऊन दार ऊघडले.समोरच समुद्राच्या लाटा
ऊसळल्या होत्या..त्या लाटांवरून असंख्य माणसे धावत
येत होती....मला हाका मारत होती..
आणि
मगाचा तो माणूस पिंपळाच्या बुंध्यात चालत गेला...तिथेच
नाहीसा झाला.
आता समुद्राच्या फक्त लाटा दिसत होत्या....
मी कुणालाही काही बोलले नाही.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आता मला घरात,,,बाजारात,,,,कुठेही गेले तरी माणसेच
माणसे दिसतात...पण काही अधांतरी चालत असतात....
आता मी जाणते....हे अधांतरी चालणारे...मृत आहेत तर
जमीनीवर चालणारे जिवंत आहेत....
मला माझे आईबाबा,,,सासूसासरे....सगळे मेलेले लोक
दिसतात....पण घरात कुणालाही पटणारे नाही....हे लोक
मानणारच नाहीत हसतात हो मला....पण मग मलाच का
सगळे दिसते.....????
घराच्या भिंतीतून आरपार माणसे जाताना दिसतात...
त्यांना वळावे लागत नाही...ऊडी मारावी लागत नाही
कसे शक्य आहे????
आज घरात श्राध्द....कॅटरर्स आले होते.स्वयंपाक सुरु होता.
घरात पाहुणे जमले होते.माझी तर नुसती धावपळ सुरू होती.
त्यावेळी घरात मला खूप लोक दिसत होते.मी चिडून विचारले
"तुंम्ही इथे काय करता???"
ते सगळे हसायलाच लागले....
भटजी मंत्र म्हणत होते...
तसे ते लोक बोलले..."समोर बघ!!!!
मी समोर बघितले....तर समोर एक फोटो होता.
चैहरा ओळखीचा होता....मी जवळ जाऊन पाहिले
आणि
मला रडूच कोसळले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आज मी ताईकडे आलो...ताईचे घर मोठे ऐसपैस....मागिलदारी
समुद्र....घरात मस्त खेळती हवा....मला जाम आवडले.....
घरात श्राध्द होते.....भटजी मंत्र म्हणत होते....अचानक
काय झाले कोण जाणे....घरातील सगळी माणसे गायब
झाली....घराची मागची पुढची दारे बंद झाली.....मी ऊठून
ऊभा राहिलो.....जोराचे वादळ आले होते....खूप काळोख दाटून आला...वाऱ्याचा आवाज माझे काळीज चिरत होता.
जोराचा पाऊस सुरू झाला.आणि पाठीमागच्या दारावर
थाप पडली..मी दरवाजा ऊघडायला जाणार
इतक्यात आतल्या खोलीतून ताई बाहेर आली..हिरवी साडी
हिरव लेणे ल्यालेली.....डोक्यात खूप शेवंतीच्या वेण्या....
ती खूप भयानक दिसत होती....डोळे पांढरेशुभ्र....नजर
स्थिर....ती मला बोलली....".दार ऊघडू नकोस.....तीन थापा
दारावर पडल्याशिवाय दार ऊघडू नये.जी चूक मी केली
ती तु करू नकोस".
आणि बंद दारातून ती. सरळ बाहेर गेली....दार न उघडता...

मी शुध्दीवर आलो.
भाऊजी,भाचे सगळै भोवती होते
आज ताईचेच श्राध्द होते.
मी ऊठुन बसलो.श्राध्दासाठी सवाष्ण आली होती.हिरवे लेणे
ल्यालेली तिच्याजागी मला ताईच दिसत होती...अजुनही
खूप लोक दिसत होते....मला गरगरायला लागले...मी बाहेर
आलो...तर आतुन एक माणूस बाहेर आला.... माझ्याकडे
बघत बगत तो समोरच्या तारेच्या कुंपणातून आरपार चालत गेला...समोरच पिंपळाचे झाड होते.त्यात निघून गेला....
तो मलाच दिसत होता....त्याच्याजवळून एक माणूस गेला
त्याला कळले पण नसावे....
माझ्या भोवती खूप माणसेच माणसे होती.
एवढ्यात समोरून प्रेतयात्रा आली...
त्यातील प्रेत तिरडीवर ऊठून बसले होते...
अरे हे काय चाललेय....मी धावत घरात आलो...
भाऊजींना बोललो..."भाऊजी हे घर झपाटलेले आहे...
इथून चला...."
भाऊजींना पण काही अनुभव आले होते असे ते बोलले
आणि
आंम्ही ते घर सोडले.
पण त्या घराने माझ्या ताईचा घास घेतला.....
समाप्त
निशा सोनटक्के

No comments:
Post a Comment