लेखक - प्रा. दयानंद सोरटे.
नमस्कार ! माझ्या पत्नीने हि कथा मला सांगितली आहे. तिची एक आत्या होती. विवाहानंतर १ वर्षानंतरच तिचे यजमान देवाघरी गेले. त्यामुळे तिला सासरचे लोक त्रास देऊ लागले. त्या त्रासाला कंटाळून ती माहेरी येऊन राहिली. मोठ्या भावाने तिचा सांभाळ केला. तिचा मोठा भाऊ म्हणजे माझ्या पत्नीचे आजोबा. माहेरी आल्यानंतर तिला उदर्निर्वाहाकरिता काहीतरी कामधंदा करणे गरजेचे होते. कारण घरामध्ये सदस्यांची संख्या मोठी होती. आणि कमविणारी व्यक्ती एकच म्हणजे माझ्या पत्नीचे आजोबा. त्यामुळे घरातील प्रत्येक जण आपल्या परीने होईल तेवढा हातभार लावण्याचा प्रयत्न करत होता.
त्यानुसार माझ्या पत्नीच्या आत्याने सातारा शहरामध्ये श्रीयुत कुपर शेट यांच्या बंगल्यावर धुणी - भांडी आणि स्वयंपाक करण्याची नोकरी मिळवली. हि गोष्ट सुमारे ४० वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी साताऱ्याचे चित्र काही वेगळेच होते. आत्तासारखे तेव्हा वाहतूक , रस्ते, दिवाबत्तीच्या सोयी नव्हत्या .गर्ददाट झाडी होती. दिवसादेखील एकट्याने बाई - माणसाने बाहेर पडायची भीती होती. एकंदरीत खूप दाट झाडी होती.
कुपर हे त्यावेळचे साताऱ्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती. त्यांचा कूपर नावाचा कारखाना सातारा M. I. D. C. मध्ये आज देखील अस्तित्वात आहे. ते पारशी असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच मांसाहारी जेवण बनत असे. एके दिवशी त्यांच्या बंगल्यावर अशाच काही कारणास्तव पार्टी होती. रात्री खूप उशिरा म्हणजे १२ वाजेपर्यंत पार्टी संपली. पार्टीला मटण बिर्याणी बनविलेली होती. आणि बरीचशी बिर्याणी शिल्लक राहिली होती. तेव्हा काम करणाऱ्या नोकर - चाकरांना त्यांनी ती शिल्लक राहिलेली बिर्याणी घरी घेऊन जाण्यास सांगितले. सगळ्यांना वाटून देखील एक मोठे पातेलेभर बिर्याणी हिच्या आत्ताच्या वाट्याला आली . पण रात्रीच्या वेळेस ती बिर्याणी घरी घेऊन जायची म्हणजे आफतच होती. शिवाय सोबतही कुणी नव्हते. घरी पायी चालत जायचे म्हटले तरी अर्ध्या तासाचे अंतर होते. नको म्हणावे तर मनात रुखरुख होती , घरी पोराबाळांच्या मुखात दोन घास पडतील. म्हणून मग तिने मन घट्ट केले आणि बंगल्यावरून एक कंदील सोबत घेतला. पातेले डोक्यावर उचलले आणि निघाली थेट घराच्या दिशेने. मध्यरात्रीची वेळ , त्यात समोर घनदाट काळोख , गर्द झाडी त्यात सरपटणाऱ्या जनावरांची भीती आणि मुख्य म्हणजे भुताची भीती कारण वाटेतच एका वळणावर खविस नावाच्या पिशाच्चाचे ठाण होते. हे ते ऐकून होती. त्यामुळे आणखीनच भीती वाटू लागली. भीतीने तिच्या सर्वांगाला कंप सुटला आणि अंग घामाने भिजून गेलं . तिने एवढं धाडस का केलं कुणास ठाऊक ?
कारण तिला विश्वास होता , तिची श्रद्धा होती. त्या बाबांवर . माझ्या पत्नीची आत्या दर गुरुवारी साताऱ्यामध्येच पोवई नाक्याजवळ एक दर्गा आहे . त्या दर्ग्याला खलीफ पीर बाबांचा दर्गा म्हणून ओळखतात. आजही तो दर्गा तिथेच आहे. मी देखील त्या दर्ग्यामध्ये अनेक वेळा गेलो आहे. त्या दर्ग्यामध्ये ती न चुकता अगदी लहान पणापासून दर्शनाला जात असे.. आतमध्ये स्रियांना प्रवेश नाही परंतु ती बाहेरूनच दर्शन घेत असे. त्या बाबांवर तिची अपार श्रद्धा होती. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच तिने हे धाडस केले होते. ती पुढे चालत होती. आणि तिच्या मागे कुणीतरी चालत आहे असे तिला जाणवत होते. सगळीकडे भयाण शांतता. पायाखाली तुडविला गेलेल्या पालापाचोळ्याचा आवाज आणि किरकिर करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज त्या भयाण शांततेचा भंग करीत होता. पण मन घट्ट करून ती झपझप पावले टाकत पुढे निघाली होती. पण त्यावेळेस तिला दोन गोष्टी तिला प्रकर्षाने जाणवत होत्या. त्या म्हणजे एकतर सगळीकडे एखाद्या अत्तराचा सुंधी वास दरवळत होता. आणि दुसरे म्हणजे कंदिलाच्या मंद प्रकाशात तिच्या मागोमाग चालणारी सावली . त्यांच्या घराच्या हद्दीत म्हणजे धावजी पाटील देवाच्या मंदिराजवळ आल्यानंतर तिला पाठीमागून आवाज आला कि, बेटा अब आरामसे घर जाओ , अब कोई डर नही है . आणि मग तिथून ती सुखरूप घरी आली . घरी पोहचल्यावर तिने सर्वप्रथम हात जोडून मनातूनच खलीफ बाबाचे आभार मानले.
त्यानंतर तिने घरी घडला प्रकार सांगितला . तेव्हा माझ्या पत्नीचे आजोबा तिला खूप ओरडले. इतक्या रात्रीच्या वेळेस एकटी असताना तिने असे धाडस करायला नको होते. पण घरातील चिल्या - पिल्यांच्या पोटात दोन घास जातील म्हणून तिने हे धाडस केले असे सांगितल्यानंतर आजोबांचे डोळे देखील पाण्याने डबडबले. कारण हे धाडस केवळ एक स्त्रीच किंवा आईच करू शकते.

No comments:
Post a Comment