' माझे बोन्साय ''
वेळ अंदाजे मध्यरात्र... आजूबाजूला काळाकुट्ट अंधार पसरला होता. काहीक्षण तरी अंधारात काहीच दिसत नव्हत. खुपच शांत वातावरण...
पण आता काहीतरी दिसू लागलं. अंधारातहि काही गोष्टी पुसट दिसू लागल्या. आजूबाजूला पाहता समजले कि, अरे हि तर तिच्या ओळखीची जागा आहे. समोर खिडकी होती, अर्धी उघडी होती. तिचा पडदा वाऱ्याने हलत होता. वारा आत आला कि, पडदा देखील आत यायचा आणि थोडा उजेड दाखवून वारा पुन्हा त्याला आपल्या बरोबर बाहेर न्यायचा. बाजूलाच टेबल होते, भिंतीस लागून. त्यावरील घड्याळातील आवाज मात्र टिक टिक चालू होता. किती वाजले होते,काहीच दिसत नव्हते. निर्मनुष्य जागा होती. कसलातरी वेगळाच शांततेचा वास होता तिथ, जणू काही वादळापूर्वीची शांतता.
तिच्या समोरील प्रत्येक दृष्य पुढच्या क्षणाला बदलून जात होत. ते टिकटिक वाजणारं घड्याळ तिथल्या शांततेत भंग पाडत होत. तिला वाटू लागले, कसली जागा आहे ही ?
मी इथे कशी आलीय ?
ती थोड पुढे सरसावली. या आशेने कि, अजून काही वेगळ दिसेल पुढे. हो, वेगळच होत पण भयानकतेन भरलेलं होत. बाजूलाच शोकेस होते आणि त्याच्यात तिचीच एक बाहुली होती, काय माहित का ? पण इतर दिवसांप्रमाणे आज ती गोंडस वाटत नव्हती. अस वाटत होत, ती कोणाकडे तरी पाहतेय. तेव्हा तीला वाटले, अरे हो...
हा तर आमचाच हॉल आहे..!
तिने आजूबाजूला पाहिले.
ती स्वतः अवनी आहे आणि हे तिचेच घर आहे, हे तिच्या लक्षात आले.
अरे हा... हे तर माझचं घर आहे "आभाळमाया "
आणि हि माझीच बाहुली आहे. माझी आवडीची लहानपणीची. या घरातील हॉलमधील प्रत्येक वस्तू तिच्या पसंतीने निवडून घेतली होती.
तो हॉल सजवण्यास.
तिने एकवेळ त्या बाहुलीवर आपली नजर टाकली. ती शोकेसच्या काचेमधून कोणाकडे तरी पाहत होती. अवनीने तिच्या नजरेच्या दिशेने पाहिले. तेव्हा तिला एक आवाज ऐकू आला. कसला आवाज...? रडण्याचा... ?
नाही नाही...
रडण्याचा नाही, तर मूसमूसण्याचा...? अरे मग रडल्यानंतर आपण मुसमुसतोना...?
असे तिचे तिच्या मनाशीच... मनातच द्वंद्व सुरू होते की, एक थंड वा-याची झुळूक येउन तिच्या चेह-यावर आदळली. आता
तिला स्पष्ट समजून येत होतं कि अस हे विलक्षण रडू एखाद्या माणसाचे असूच शकत नाही. विचित्र रडू होत ते. एकदम विचित्र पण काय आहे तो आवाज...?
रडण्याचा...? की...
जस कि त्या वाऱ्याला आता
तिच्या मनातील द्वंद्व थांबवायचं होत. ते त्या वाऱ्यालाच माहित. पण एवढ मात्र नक्की कि,
तीच द्वंद्व थांबलं आणि तिने पुढे पाहिले. अंधुक अंधुक तरी स्पष्ट. खिडकीतून पुसट प्रकाश आत येत होता. तेवढ्यात तो विचित्र मुसमुसनारा आवाज आता जरा जास्तच वाढला. तिला मागे असे जाणवले कि, त्या बाहुलीचे मुंडके तिच्या दिशेने वळले आहे. ती घाबरून झपाट्याने दूर झाली.
आणि तीच लक्ष टेबलवर गेल. पाहते तर काय ? तिथ एक हालचाल दिसली तिला. त्या हालचालीने ती अचानक दचकलीच. तिच्या माथी घामाचे ओस पडले. तिचे विचार तुटू लागले. काय आहे ते पाहण्यासाठी, ती थोडे पुढे सरसावली. दबकत दबकत भिंतीच्या आडोशानी पाहू लागली. काय होती ती हलणारी गोष्ट ? एक हलणारी गोष्ट...? तिथे एक पसरट भांडे तर होतेच. पण ते अगदी स्टेचू दिल्या सारखे स्तब्ध होते पण
काय होत ते ? अजून एक बाहुली होती का ती...?
नाही नाही...
एक छोटी बुटकी व्यक्ती...?
हो हो...
असेच काहीसे दिसत होते. अरे ती व्यक्ती काय करीत होती? ती व्यक्ती खाली वाकून बसलेली होती. आणि तेव्हा तीला परत तो आवाज, रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि काहीतरी रागात बडबडण्याचा देखील. तेवढ्यात ती व्यक्ती, ती बुटकी व्यक्ती हळू हळू उठू लागली.
ती व्यक्ती जशी जशी उठू लागली, तसे तसे अवनीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.
पण अचानक ते शांत हि झाले. कारण, "अरे हे काय...?
हे... हे... हे तर माझे बोन्साय, माझे आवडते बोन्साय. "
तिने वाढवलेले वडाचे बुटके झाड होते ते. ती अशा विचारात असताना, अचानक ते बोन्साय तिच्या दिशेने वळले. त्याच ते रूप पाहून अवनीचे डोळे भीतीने पांढरे पडले.
"अरे हे काय ? याला डोळे आहेत, नाक आहे, कान आहेत, हात आहेत, म्हणजे फांद्या आहेत पण पाय...? हो आहेत ना त्याची मुळे..."
हे सगळ तिच्या मनात धास्ती घालू लागल. तिच्या काळजाचा धड्धड् आवाज येत होता. हे सगळ पाहत असताना त्या बोन्साय चा भयानक अवतार बनू लागला. ते छोटे बुटके झाड हळू हळू विद्रूप बनू लागले. आक्रोश करू लागले. त्याचे वेडे वाकडे ओठ आपोआप बनू लागले
आणि त्याच्या त्या पिवळ्या गर्द डोळ्यामधून रक्तासारखा लाल स्त्राव बाहेर पडून येत होता ओघळत होता. तो रक्तापेक्षा गडद रंगाचा पदार्थ घळाघळा वाहू लागला जणू ते बोन्साय रडत होते. विद्रुप होऊ लागले ते. भयानक दिसू लागले. एका चेटकिणी प्रमाणे त्याच रूप बनू लागल होत. नाही नाही चेटकीण नाही तर राक्षसच वाटत होते ते एक. आता मात्र ते जोरजोरात ओरडू लागले, त्याचा आवाज असह्य्य होता
ते म्हणत होते. "सोडवा सोडवा. मला या कुंडीच्या कैदेमधून. सोडवा "
काय चालले होते हे ?
नेमके काय चालले होते हे ?
ते बोन्साय तिच्याकडे पाहू लागले. ती पळून जाणारच होती कि, तेवढ्यात तिला जाणवू लागले कि तिला जागेवरून हलताच येत नाहीये. आता मात्र ती पुरती घाबरली. तेवढ्यात त्या बोन्साय चा आवाज चढला..
''अवनी थांब ! .. अवनी.... तूच ना ग ? तूच... हो तूच माझ्या या रुपासाठी कारणीभूत आहेस. किती दुष्ट आहेस ग तू. मला माझ्या त्या आईपासून वेगळ केलस तूच ना.
तुझ्या लहानपणी तूच मला इथ आणलेस ना " आणि असे म्हणत म्हणत त्याच्या पिवळ्या डोळ्यात अजून रक्त गढू लागले. आणि वाहू लागले.
"बघ माझी हि अवस्था. काय करून ठेवलयस तू मला.किती निर्दयी आहेस तू . आता तुझे हाल देखील मी असेच करेन.
तुला देखील खुरटी करेन. बुटकी करेन ''
असे म्हणत ते वेडेवाकडे हसू लागले आणि त्या पसरट कुंडीसकट उड्या मारत मारत पुढे येऊ लागले. जणू काही एक छोटा ससा पण त्या बोन्सायचे रडणे ओरडणे असहय्य होते .
आता मात्र अवनीला काय करावे ते समजेना. अवनीला जागेवरून हलताच येत नव्हत. तेवढ्यात त्या बोन्सायने टेबलवरून खाली उडी मारली आणि अवनीच्या दिशेने उड्या मारत येऊ लागले. हसू लागले. रडू लागले. आता मात्र अवनीची खैर नव्हती. ते अवनीच्या समोर खाली होते. अवनी त्याला लाथेने उडवू पाहत होती. पण तिला तिचा पाय हलवता येत नव्हता
कि हात.
आता अवनी देखील रडू लागली. ते बोन्साय म्हणाले
"का ग आता का रडतेयस कस वाटतय माझ्या सारख जखडून राहिल्यावर हा ह्ह्हSSS.... ? आता तुझी सुटका नाही यातून " आणि असे म्हणत त्या बोन्साय ने अवनीच्या अंगावर जोरात उडी मारली आणि लगेच तेव्हा अवनी ओरडली...
"आईईईईईईईईईईईईईईई....''
अस म्हणून ती जागी झाली. ती खूपच घाबरली होती. आता मात्र अवनीला काही समजेना झाले..
स्वप्न ...?
स्वप्न होते कि आणखी काही... ? याचा विचार करत असताना अवनीला लहानपणी चे ते तिच्या शेतातील वडाचे रोपटे आठवले. जवळ जवळ २० ते २२ वर्षापूर्वीची गोष्ट. ती लहान होती. ती गावी गेली असताना. शेतात खेळताना इवलुश्या अवनीला ते इवलूस रोप खूप आवडल होत.
ते रोप एका मोठ्या वडाच्या झाडाखाली होत.
खूपच साजिरे गोजिरे. खूपच नाजूक होत ते. तिने त्याला पटकन मातीतून ओढून काढले होते. आणि घरी आंनदाने घेऊन आली होती आणि बाबांच्या मदतीने त्याचा बोन्साय वाढवला होता. गेली बरीच वर्षे ती त्याला जपत होती. प्रेमाने वाढवायची. खूप प्रेम द्यायची त्याला. रोज ती त्याच्याशि काही न काही बोलायची. पण आज चक्क ते बोन्साय तिच्याशी बोलले होते. हे कस झाल..? तिला काहीच समजत नव्हत. हे स्वप्न काही वाईट होण्याचा इशारा आहे का. तिने अलार्म क्लाॅक पाहिले. जवळपास रात्रीचे १:३०
वाजले होते. अवनीने झटक्यात अंगावरील पांघरून बाजूला केले आणि अचानक ती हॉलच्या दिशेने जाऊ लागली. जितक्या वेगाने ती हॉलच्या दिशेने जात होती, तो वेग हळु हळु कमी झाला. ती थोडी घाबरली तर होतीच. ती दबक्या पावलाने हळू हळू चालू लागली.
बेडरूम... नंतर किचन असे पार करीत ती हॉलमध्ये येऊन पोहोचली. पुढे जात जात ती हॉलच्या भिंतीजवळ पोहोचली. जिथे ती स्वप्नात सुरुवातीला उभी होती तीच खिडकी हॉलची... तोच पडदा...
" जावे का इथून पुढे ?"
पण तिचे पाय जाग्यावरून हलतच नव्हते.. परत द्वंद्व ? नकोच ते. म्हणून हिम्मत करत ती पुढे जाऊ लागली.. पण हळू हळू चालू लागली. ती त्या टेबलजवळ पोहोचली आणि तिला ते बोन्साय दिसले. ते बुटके...खुरटे... वडाचे झाड. पण स्तब्ध. तिला ते स्वप्न आठवले. या छोट्या बोन्साय मध्ये कुठे नाक, डोळे... काहीच तर नव्हत. त्याचे हात-पाय दिसत आहेत का ? ते पाहण्यासाठी ती गुंग झाली.
कि अचानक समोरची खिडकी धाड् असा आवाज करीत उघडली. खिडकीच्या काचा तडतड आवाज करीत फुटल्या आणि खिडकीतून एक वेगळाच प्रकाश झोत आतमध्ये आला. हे काय चाललय ते अवनीला कळायच्या आत हे सारे घडले. अचानक तिच्या पायाखालची जमीन सरकली. अधे मध्ये जमीन दुभागु लागली आणि तोल जाऊन अवनी तिथे खाली पडली
आणि समोर पाहते तर काय ?
ते एवढस वडाच बोन्साय, आता आक्राळ विकराळ रूप धारण करू लागले. बघता बघता त्याच खोड अति वेगाने वाढू लागले. त्याच्या छोट्या छोट्या फांद्या जोराने पसरू लागल्या. अवनी हे सर्व खाली पडलेल्या अवस्थेतच पाहत होती. तिला उठायला हि येत नव्हते. तिच्या समोरचा तो वड आजूबाजूस पसरत गेला. घर तर कधीच गायब झाल होत. त्याच्या पारंब्या अवनी भोवती लोंबू लागल्या होत्या. बघता बघता एक भला मोठा वटवृक्ष तिच्या पुढ्यात उभा राहिला.
बस्, आता सगळे काही शांत होऊ लागले. अवनी कावरी बावरी झाली होती.
अवनीने उठण्याचा प्रयत्न केला, ती उठून पळणार... तितक्यात एक जाडजूड पारंबी सापाप्रमाणे सरपटत येऊन तिच्या पायाला विळखा घालू लागली आणि तोच दुसऱ्या बाजूने अजून एक तशीच पारंबी तिच्या दुसऱ्या पायाला गुंडाळली. अवनी रडू लागली. "सोडा...सोडा... मला वाचवा..." अवनी रडत ओरडत गयावया करीत विनवणी करीत होती. अवनी अडखळत उभी राहिली आणि तिला समोर दिसले. ते वडाचे झाड, त्याला असलेले ते हिरवे गार डोळे ते लांब लचक चेटकिणी प्रमाणे नाक.
ते झाड तसेच होते स्वप्नातल्या बुटक्या बोन्साय प्रमाणे. ओठ झाडाच्या काळ्या सालीने बनलेले वेडे वाकडे होते. खूपच भयंकर दिसत होत ते. आजूबाजूला अंधार आणि समोर तो राक्षसी वटवृक्ष. अवनी थरथर कापत होती. तेवढ्यात ते वृक्ष वेडे वाकडे ओठ हलवत बोलू लागल. "फक्त आम्ही आहोत इकडे तुझा आवाज ऐकणारे. इथ आमच राज्य आहे फक्त ..." असे म्हणत त्या वडाच्या मुळामधून आणखी काही खोडे उगवू लागली आणि झरझर आजूबाजूला पसरू लागली. बघता बघता तिकडे वेगवेगळी झाडे निर्माण झाली. आणि जणू तिकडे एक जंगलच उभे राहिले आणि या सर्वामध्ये अवनी जखडली गेली. ती
स्वतःला सोडवू पाहत होती पण सारे काही व्यर्थ. तेवढ्यात काही झाडांची मुळे सरसर तिच्या दिशेने येऊ लागली अन् त्यांनी अवनीच्या हातास जखडले. "सोडा सोडा... वाचवा मला " अवनी जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तो मोठा वटवृक्ष पुढे बोलू लागला.
"तुझी आता सुटका नाही. तु मला माझ्या मातीपासून वेगळे केलेस ना. ते माझे घर होते...! आता मी तुला तुझ्या घरापासून वेगळ करेन
आभाळमाया... ना तुझे घर...? पहा तू आता.... मला नाही मिळू दिले ना ग तू ती
आभाळ माया, ते खुले आकाश...
किती सुंदर असते ते. एवढूसा तुकडा दिसायचा मला त्या आकाशाचा.
मला वेगळे केलेस त्या आनंदापासून. मी हि वटवृक्ष बनलो असतो पण तू नाही बनू दिलेस मला. माझ्या खांद्यावर हि ती पाखरे खेळली असती. माझी फळे खाण्याकरिता भुकेले जीव आले असते.
पण तु तो सर्व आनंद हिरावून घेतला आहेस माझ्याकडून. त्या छोट्याश्या खताच्या डबक्यात, मला तू डांबलस. हो खतच... माती कधी नव्हतीच त्यात. तू मला जखडून ठेवलस एका ठिकाणी. माझ्या फांद्या... माझे हात पाय खुरडलेस. माझ्या फांद्या खुरट्या केल्यास तू. माझ्या मूळांना कापून तू टाकलेस. त्यांना तारांच्या वेटोळ्याने बांधलेस. काय चूक होती माझी..? की तू मला एवढा त्रास दिलास ? मी हि सजीवच आहे... तुम्हा माणसासारखा.. मी काही निर्जीव शोभेची वस्तू नाही
कि तू मला तुझ्या दिवानखाण्यात सजवलेस...? एक लक्षात ठेव आम्ही आहोत म्हणूनच तुम्ही माणसे आहात. आमच्या मुळे तुम्ही जगता...'' एवढ बोलून तो वटवृक्ष आक्राळ विकराळ गर्जना करू लागला. माझी वेदना तुला नाही समजणार असे म्हणू लागला. अवनी मात्र घळाघळा रडू लागली "चूक झाली माझी , माफ कर मला... मला सोडा" असे ओरडून ओरडून सांगू लागली. त्यावर तो वट वृक्ष म्हणाला.. "नाही... आता तुझे पण तेच हाल होतील. जे तू माझे केले आहेस. तुला हि मी खुरटी करेन. बुटकी करेन. तुझ्या हातापायांना साखळ्यात गुंडाळून ठेवेन " आणि असे म्हणताच, ती मूळे अवनीला आणखी जखडू लागली. त्यांनी अवनीचे आता हात पाय पिरगाळायला सुरुवात केली. अवनी त्या त्रासाने ओरडत होती. आता तिचा जीव जातोय कि नंतर अस झाल होत तिला आणि तश्याच तिच्या त्या पिरगाळलेल्या हाता पायांना जाडजूड फांद्या गुंडाळल्या जाऊ लागल्या. अवनीला ते वटवृक्ष म्हणाले
"तुम्ही काय म्हणता, आम्हाला....? बोन्साय ना...? तुमची शोभेची वस्तू...
हा.. हा.. हा...
आता पहा आमच्या देखील राज्यातील शोभेची वस्तू तयार होतेय. तू देखील आता खुरटी होशील. बुटकी होशील.
हा.. हा.. हा..."
आणि तो वड जोरजोरात हसू लागला...
"तूझे बोन्साय...
माणसाचे बोन्साय...
मज्जा येइल ना?
आम्ही बोन्साय...
तर तुम्ही कोण...?
झाडाचे बोन्साय तर माणसाचे "माण्साय" ....कसे छान वाटते ना अवनी , माण्साय नाव..?"
अवनी रडू लागली....
''सोडा...
मला जाऊ द्या...
सोडा... वाचवा.. वाचवा.. मला...''
असे ओरडू लागली.
तिला वाटू लागले.
किती क्रूर आहे हा शब्द "माण्साय"... म्हणजे जिवंत माणसाचे बोन्साय... म्हणजे... माझे बोन्साय...??? '' तितक्यात
'' मा...ण्सा...य.....
मा...ण्सा...य......
मा...ण्सा...य......''
असे तो राक्षसी वटवृक्ष जोरजोरात वेड्या सारखे ओरडू लागला.
"मा.....ण्सा.....य....
हा.. हा.. हा.."
अवनीला तो आवाज, तो त्रास तिला असहय्य वाटत होता. कधी जीव जातोय कि असाच त्रास राहील
अस झाल होत तिला. ते ऐकताच अवनी अंगात असेल नसेल तेवढा त्राण गोळा करून घसा कोरडा होइस तोवर ओरडली.
"नाहीहीहीहीईईईईईईईईईईईई... ."
आणि अवनी झोपेतून जागी झाली आणि इकडे अवनीचे बाबा धावतच अवनीजवळ आले. "अवनी बेटा काय झाले ? अशी का ओरडतेयस ? "
तेव्हा अवनीची जीभ बोलण्यासाठी नीट शब्द उच्चारू शकत नव्हती.
"बा... बाबा ते बोन बोन्स बोन्साय ते वड माझे मान्साय... माझे बोन्साय .... बाबा..."
अवनीच्या बाबानी तिला शांत केले.अवनीने पाणी पिले व तिचा तेव्हा जीवात जीव आला. तिने बाजूचे घड्याळ पाहिले. जवळपास सकाळचे सात वाजत आले होते. ती उठून थेट हॉलमध्ये आली आणि तिची नजर त्या बोन्साय वरच अडकली...
काय होत ते...?
स्वप्न होते का...?
कि भास...?
कि स्वप्नातील भास...?
कि स्वप्नातील स्वप्न ...?????
याला काहीही म्हणल तरी, तिने त्यात पाहिलेल्या बोन्सायच्या वेदना कमी होणार नव्हत्या. अवनी तेथे टेबल पाशी गेली. जवळ गेली आणि तिने ते बोन्साय प्रेमाने उचलून घेतले आणि "सॉरी मला माफ कर " असे म्हणत तिने त्याची माफी मागितली आणि त्याला कुरवाळत... ते बोन्साय समोरच्या बागेत बाहेर लावण्यास घेऊन गेली... 😊
शेवटी एकच सांगू इच्छिते, नैसर्गिक गोष्टींचा आपण विचार करायला हवा. त्यांना देखील जीव असतो, मन असत.
त्यानाही दुःख होत असेल, वेदना हि होत असतील, विचार करा...
तरळले माझ्या डोळ्यात पाणी
"माझे बोन्साय'' हे असे पाहुनी
एकच प्रश्न उरला आहे मनी
आता तरी वाढवेल का या रोपास कुणी ?
आता तरी जगवेल का या वृक्षास कुणी ??
Thank u... 😊
- प्रियांका विजय नांगले.

"नाहीहीहीहीईईईईईईईईईईईई...

No comments:
Post a Comment