डिनर
गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता . त्याने ए सी बंद करून ड्राइव्हर साइड्ची विंडो उघडली . गार वाऱ्याचे हलके मोरपीस चेहऱ्यवर झेलत ,आवडती ट्यून ऐकत गाडी चालवणे त्याचा परमोच्य आनंद होता आणि तो तो मनसोक्त उपभोगत होता . स्पिडो मीटरचा काटा शंभराच्या जवळपास तरथरत होता .
समोरच्या कोपऱ्यावर कोणीतरी रस्त्याच्या मधोमध उभाराहून लिफ्ट साठी अंगठा दाखवत होते . खूप अर्जन्सी असावी कारण ती व्यक्ती रस्त्याच्या साईडला न थांबता सेंटरला उभी होती . काही अडचण असेल का ? गाडी जवळ अली तशी ती व्यक्ती एक स्त्री असल्याचे त्याला जाणवले . त्याने तिच्या जवळ गाडी उभी केली . तसे अश्या वेळी थांबणे धोक्याचे असते ,पण त्याला त्याच्या तारुण्यावर आणि मस्सल पावरवर विश्वास होता .
“काय प्रॉब्लेम आहे ?”त्याने गाडीच्या खिडकी बाहेर डोके काढून , तिचे निरीक्षण करत विचारले . ती एक तरुण स्त्री , स्त्री कसली बावीस तेवीस वर्षाची मॉड तरुणी होती . तिच्या हातात एक पुडके होते . हॉटेलचा एखादा पदार्थ पार्सल प्याक केलेला असावा .
“सर मला मदत करा !माझी शेवटची ट्रेन मिस झाली . कशी बशी येथवर आले पण तोवर बस सेवा पण बंद झालीय !मला घरी जायचंय !”
तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता . आवाज कसला स्वीट आहे ! त्याच्या मनाने नोंद घेतली . ती मस्त उंच आणि सडपातळ होती . परफेक्ट फिगर . सगळं कस जिथल्या तेथे ! डार्क रॉयल ब्लु जीन्स आणि व्हाईट शर्ट मध्ये एकदम ‘खतरा ‘ दिसत होती !
“सर ,प्लिज नाही म्हणू नका !” तिने पुन्हा आर्जव केला
तो भानावर आला .
“मग तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो का नाही केली ?”
“आता तुम्हाला काय वेगळं सांगू ?एक तर ते थांबतच नाहीत , आणि हल्ली काय काय ऐकला येत ,म्हणून मी पब्लिक ट्रांसपोर्टच प्रेफर करते . ”
“मग — मी ?”
“तुम्ही जण्टलमन आहेत . कारण कोणी अश्या अपरात्री अनोळखी व्यक्ती साठी गाडी थांबवून चौकशी करत नाही . ”
‘जण्टलमन ‘शब्दाने तो सुखावला . तिच्या रेखीव चेहऱ्या कडे पहात त्याने मानेचं गाडीत बसण्यास खूण केली . ती गाडीस वळसा घालून त्याच्या शेजारच्या सीटवर सीटबेल्ट लाऊन बसली . काय ग्रेसफुल चाल आहे !हि आणि अशीच आपली आपली स्वप्न परी असावी !
” तुम्हाला कोठे सोडू ?”त्याने गाडी सुरु करत विचाले .
” या येथून साधारण पाच सात किलोमीटर वर एक डावे वळण आहे . तेथून पाचच मिनिटाच्या अंतरावर आमचा जुना वाडा आहे . तेथेच सोडा . ”
चला म्हणजे अजून दहा पंधरा मिनिटे हि अप्सरा शेजारी असणार .
“थँक्स , तुम्ही आज एका असाह्य आणि गरजू तरुणीला मदत केलीय . माझा बच्चा वाट बघत असेल हो घरी !”
“बच्चा !! म्हणजे —”
“नो ,नो , तुम्ही समजताय तसे काही नाही . माझे अजून लग्नहि झालेले नाही .’बच्चा ‘ म्हणजे माझा लहान भाऊ ! बिचारा आजारी असतो . !”
” आजारी ? काय झालाय त्याला ?”
“तो खूप ऍनिमिक आहे . त्याला रक्ताची खूप गरज आहे ! पांढरा फटक पडलय हो पोरग ! काही खातच नाही . म्हणून तर चव बदल म्हणून त्याच्या साठी बाहेरचे ‘डिनर ‘ घेऊन जातेय .तस मी त्याला सकाळी घरून निघताना प्रॉमिस केले होते आणि आज नेमका उशीर झाला . ” तिच्या हातातील पुडक्याचे गुपित हेच होते .
“प्लिज , आता लेफ्ट टर्न घ्या . हा या कच्या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला आमचा ‘पॅलेस ‘ आहे . “तिने जुनाट वाड्याचा उल्लेख ‘पॅलेस ‘ केल्याने दोघेही मोकळे पणे हसले . त्याने लेफ्ट टर्न घेतला .
“घरी अजून कोण कोण असत ?”त्याने सावध प्रश्न विचारला .
“कोणी नाही ! मी आणि बच्चा दोघेच !आई बाबा मागेच बच्चा आणि हा जुना वाडा सांभाळायची साठी देऊन देवाघरी गेलेत . ”
“ओ सॉरी ! बाय द वे मी शशांक . एकुलता एक . आई डॉक्टर, बाबानचा बिजनेस . मी एका मल्टिनॅशनल कम्पनित प्रोग्रामर म्हणून काम करतोय . “तिने न विचारातही त्याने आपली माहिती दिली . तिचे पाच दहा मिनिटाचे सानिध्य त्याला सुखावून गेले होते . तीच बोलणे , वागणे , लहान भावाची काळजी , चेहऱ्यावरचे हाव -भाव , सगळंच त्याला आपलस वाटू लागलं होत . आता घराजवळ आलोच आहोत तर घर आतून पाहून घ्यावे ,तिच्या भावाची पण विचारपूस करावी . सगळं ठीक वाटलं तर चार दोन भेटी नंतर पुढचं विचारता येईल .
“बस थांबा ! आलाच आमचा राजवाडा ” त्याची गाडी एका थोरल्या गेट समोर उभा केली . समोर खरेच एक दुमजली जुनाट बांगला होता . अंधुक प्रकाशातहि त्याची भव्यता अधोरेखित होत होती . सगळी वास्तू अंधारातच होती फक्त वरच्या मजल्यावर एका खिडकीत उजेड दिसत होता . बहुदा ती बच्चाची रूम असावी .
“खरे तर आपण जी मदत केलीय तिची परतफेड केवळ ‘थँक्स ‘या शब्दाने होणार नाही . तुमची हरकत नसेल तर ऐक ऐक कप कॉफी घेऊयात का ? मी पटकन बनवते . “तिने अजीजीने विनंती केली . हि बया बहुदा मनकवडी असावी ! का ‘घरात या ‘ हे आमंत्रण ?पण तसे नसावे ,आजारी असला तरी भाऊ घरात आहे . हे केवळ सौजन्य आहे . इतका वेळ आपण तिच्या सोबत बोलतोय एक अक्षरही वावगे बोलली नाही .
“तसा बराच उशीर झालाय . पण ऐका कॉफीला कितीसा वेळ जाणार . आणि तुम्ही इतक्या प्रेमाने ऑफर करताय कि ‘नाही ‘म्हणवत नाही . ” तो गाडी खाली उतरला .
तिने गेट ढकलून उघडले . जून गेट कुरकुरल . बंगल्याचा भव्य दाराचे कुलूप उघडले . दिव्यांची बटने दाबून घरभर उजेड केला . जुने खानदानी दणकट फर्निचर , भव्य पेंटिंग्स , तलम पडद्याचा खिडक्या , तो सभोवताल पहात होता . त्या भव्य हॉल मधून वरच्या मजल्यावर जाण्या साठी जिना होता . उंच छताला नाजूकसा झुंबर हलकेच झोके घेत होता. खरेच तो राजवाडाच असला पाहिजे .
“आपण वरच जाऊ . बच्चाच्या रूम मधेच बसू . त्याची तुमची ओळखही होईल . त्याचाशी तुम्ही थोडे बोलत बसा ,मी पटकन कॉफी करते . वरच शेजारी किचन आहे . ”
“ठीक ”
दोघे जिन्यातून वरच्या मजल्यावर गेले .
००० बच्चाच्या रूमचे दार उघडेच होते . या घरात आल्यापासून शशांकला एक कुबट आणि जुनाट वास येत होता . पण हे साहजिकच होते . वास्तू जुनी होती आणि कितीही म्हणले तरी देखभाल त्या मानाने कमीच पडत होती .
“ताई ,तू आलीस !”
बच्चा अंथरुणातून उठून बसत म्हणाला . शशांक तिच्या मागून त्या रूम मध्ये आला . तो जुनाट वास बच्चाच्या खोलीत जरा ज्यास्तच येत होता . त्याने बच्चा कडे पहिले . बापरे ! बच्चा म्हणजे कातड्याच्या झाकलेला हाडाचा सापळा होता ! त्याचा कातडीचा रंग ‘पांढरा -फटक ‘पेक्षाही पांढरा होता . त्याचे डोळे इतके खोल गेलेले होते कि पाच फुटांवरून सुद्धा शशांकला त्याची बुबळे दिसत नव्हती .
“हो रे बच्चा . सॉरी आज जरा उशीरच झाला . “ती म्हणाली .
“माझे ‘डिनर ‘ आणलेले दिसतंय !”
“हो ,हे काय . “तिने हातातली पिशवी हलवली .
तोवर शशांकने एक जडशीळ शिसवी लाकडाची खुर्चीवर बसकण मारली होती .
“ताई , तू पण माझ्या सोबत ‘डिनर ‘ कर ना .! तुला पण भूक लागली असलंच कि !”
ते खरेच होते . तिचे पण भुकेने आतडे तुटतच होते .
तिने मानेनेच होकार दिला .
आणि दुसऱ्या क्षणी ते दोघे बहीण भाऊ शशांकवर तुटून पडले . !
कारण तोच तर त्यांचे ‘डिनर ‘ होता !

— सु र कुलकर्णी
No comments:
Post a Comment