समुद्र__किनारा
•
(सदर कथा संपूर्ण पणे काल्पनिक आहे त्याचा वास्तविक घटना आणि नावांशी काही एक संबंध नाही .तस असेल तर तो निव्वळ योगायोग असू शकेल)

हरिहरेश्वर माझा आवडत गाव .. गेले काही वर्ष मी इथ जवळच राहतो .सावित्री नदी जिथं समुद्राला मिळती तिथे हे गाव वसला आहे . भगवान शंकराच मंदिर ,मंदिराच्या मागच्या बाजूंला प्रदिक्षणा मार्ग तिकडे जाणारा पायऱ्यांचा य रस्ता आजूबाजूला चार टेकड्या या मध्ये वसलेला हे गाव . मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा, तिथून बीच वर चालत गेला कि लांब वर मी राहतो.तिथेच काही जण अजून राहतात . सहसा मी मंदिरा कडे जात नाही . मागे मात्र जातो तिथे खूप खोल घळयी आहेत लोक तिथे येतात फोटो काढतात .मस्ती करतात .काही जण तिथ बुडून मेलेत .समुद्र खोल आहे .कळत नाही किती खोल आहे .
•
माझी ओळख करायची राहिली कि !,माझा नाव हरी !! उस्मानाबाद मध्ये मध्ये कॉलेज ला होतो .आमच्या गाव कडे समुद्र नाही त्या मुळे मला समुद्राची खूप ओढ होती ,समुद्रावर याव, मस्त गाणी ऐकत सूर्यास्त बघत बसायचे अशी माझी आवड होती .कॉलेज ला यायच्या आधी मी लहानपणी शाळेच्या ट्रीप ला इथ येउन गेलो होतो .परत आलो ते कॉलेज च्या ट्रीप ला.आता इथेच राहतोय .एखाद्या जागेशी अशी काही गट्टी जमती कि ती जागा सोडावीशी वाटत नाही .इच्छा असून हि…. !
मला रात्री बीच वर फिरयला खूप आवडता.भीती नाही वाटत कसलीच , शांत समुद्र ,फेसाळत्या लाटा त्यांचे आवाज मला शांत शांत करतात .खवळलेला समुद्र बघुन मला भीती वाटते तेव्हा मंदिरा कडे जायचा नसत!! दिवसा मी बीच वर येत नाही खूप गर्दी असते मला गर्दी आवडत नाही.
•
आज कसला तरी आनंद वाटत होता कसला ते कळात न्हवत ,रात्री बीच वर फिरत होतो काही तरी चाहूल लागली.लांब वर काही लोक तिथ दारू पीत धिंगाणा घालत होते .किती वाजले कळत न्हवता कारण आता मी घड्याळ वापरत नाही .मला ओळखीची चाहूल लागली म्हणून मी जवळ गेलो काही जण दारू पिऊन समुद्रात उतरले होते त्यात किरण पण होता माझा कॉलेज चा मित्र !! बाकीचे त्याला ‘किरण्या तिकडे पाण्यात जाऊ नको,मागच इसरला काय ? अस सांगत होते .तरी तो आपल्याच मस्तीत त्या खडक असलेल्या ठिकाणी चालला होता तिथ समुद्र खोल होत जातो .
किरण चे दोन्ही मित्र तिथून हलले नाहीत त्यांना जास्त झाली होती आपसात ते बोलत होते त्यातला एक जण म्हणत होता “आमची कॉलेज ची ट्रीप आली होती सगळे पोर पोर ठरवून ट्रीप काढली होती . आम्ही गाडी करून आलो होतो .किरण त्यात आगाव पोरग!! संध्याकाळी आम्ही सगळे दारू पिऊन इथच कुठ तरी बसलो होतो इथ खर तर दारू प्याला परवानगी नाही पण आम्ही लपवून आणली होती.नाव आठवत नाही आमच्यातला एक पोरगा इथ वाकमन वर गाणी ऐकत बसला होता. मागून कधी किरण्या आला आणि त्याचा वाकमन हिसकावून घेतला.वाकमन घेऊन तो पुढे ते पोरगा मागे मागे असा पळत होते .दोघा हि खोल समुद्रात शिरले”.
एकदम लोक ओरडायला लागले म्हणून हे कॉलेज ची स्टोरी सांगणारी पोर पळत तिकडे गेली.आता जाड झालेली पोर आणि त्यात दारू पिलेली नित पळता पण येत न्हवता. किरण्या बुडला होता त्याचा थांग पत्ता लागत न्हवता.काही वेळाने पोलीस पण आले होते .रात्र भर बोटीने तपास करून अजून त्याची बॉडी पण सापडली न्हवती.सापडणार हि न्हवती मी म्हणला न समुद्र खोल आहे तिकड !!
•
मघाच्या पोरांची दारू उतरली होती पोलीस विचारत होते आणि ते सांगत हते “ साहेब ! मी म्हणत होतो इकडे नको यायला. काही वर्षांपूर्वीआमच्या कालेज ट्रीप मध्ये असच एक पोरग इथ गायब झाला होत. त्याला वाकमन च्या पायात दारू च्या नशेत किरण ने ढकलून दिल होत .त्याची बॉडी पण शेवट पर्यंत मिळाली नाही.!! आठवल हरी त्याच नाव .!!”
मी तोवर माझा बदला पूर्ण केला होता किरण्या पाण्यात गेल्यावर त्याला मी त्याच जागेवर घेऊन गेलो आणि तसाच पाण्यात खोल खोल नेला .त्याची पण बॉडी आता मिळणार नाही!!!आता इथून मी जाऊ शकतो .इतके वर्ष अडकलेला माझा जीव आता मोकळा झाला .काही वेळाने उजाडेल .मी कायमचा जातोय इथून, किरणला इथ ठेवून !!!
•
(समाप्त)

No comments:
Post a Comment