"काळाची झडप "
लेखक - प्रा. दयानंद सोरटे.
वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो , मी जी सत्यकथा आपल्यासमोर सादर करत आहे. ती मी स्वतः अनुभवलेली आहे. या कथेद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायची नाही. वाचकांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच हि कथा वाचावी हि विनंती.
त्यावेळी मी ११ वर्षाचा होतो. मोठा भाऊ , वहिनी आणि मी नूकताच रिलीज झालेला धर्मेंद्र आणि मुमताजचा लोफर चित्रपट पहायला गेलो होतो. मोठा भाऊ कामावरून साधारणपणे रात्रीच्या ८ वाजेपर्यंत घरी येत असे.मग जेवण वगैरे आटोपून आम्ही गीता टॉकीजला तो शेवटचा शो पाहण्याकरिता गेलो. तो चित्रपट समजण्याइतकी माझी बुद्धी परिपक्व नव्हती. पण उगीचच मोठया भावाच्या मागे लागून कबाब मे हड्डी बनण्याकरिता मी गेलो होतो. त्यावेळी वहिनी गरोदर होती. बहुदा तिला आठवा महिना चालू होता. चित्रपट रात्रीच्या १२ वाजता संपला. तेव्हा रात्री उशिरा बस मिळत नसे शिवाय वहिनीही अवघडलेली होती. तिला चालायला उरकत नव्हते . त्यामुळे भावाने टॅक्सिने घरी जाण्याचा निर्णय घेतला. पाच - सहा मिनिटात आम्ही आमच्या इमारतीजवळ पोहोचलो. आम्ही ज्या ठिकाणी उतरलो तिथे बाजूलाच एक मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडावर लटकलेल्या वटवाघुळांचा एकच गलका सुरु होता. उतरल्यानंतर उत्सुकता म्हणून आम्ही ती झाडाला उलटी लटकलेली वटवाघुळे त्या झाडाखाली उभे राहून पाहू लागलो. बिल्डिंग बाजूलाच असल्यामुळे मी आणि भाऊ पटपट चालत पुढे आलो. वहिनीला चालायला उशीर लागला. आमची रूम तिसऱ्या मजल्यावर होती. आम्ही पहिल्या मजल्याचे जिने चढून वर गेलो. वहिनी मागून हळूहळू येत होती. लाईट्स असल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नव्हते. आम्ही दुसरा मजला चढून वर गेलो. आणि वहिनीचा जोराने किंचाळल्याचा आवाज आला.
वहिनीचा आवाज ऐकून आम्ही दोघेही धावतच पुन्हा खाली उतरून आलो. तर वहिनी पहिल्या मजल्याच्या जिन्याजवळ बेशुद्ध होऊन पडलेली दिसली. भावाने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याने तिला उचलून घेतली आणि घरी आणले. तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारून तिला शुद्धीवर आणले. तिला काय झाले म्हणून विचारल्यावर ती म्हणाली मी जिने चढत असताना अचानक माझ्या तोंडावर एका साडीचा पदर आला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला एवढेच मला आठवते. विशेष काही नाही म्हणून घरातल्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आणि सर्वजण झोपी गेले. भाऊ सकाळी कामावर जाण्यासाठी लवकर उठत असे. वहिनीही तशी नेहमी लवकरच उठत असे. भावाने वहिनीला तिच्या नावाने हाक मारली.आणि तिला उठविण्याकरिता थोडे हलविले. तशी वहिनी रागाने उठली आणि भावावर डोळे मोठे करून जोराने ओरडली " ये माझे नाव आशा नाही , आणि तू मला हात का लावलास ,तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अंगाला हात लावण्याची. " भावाला तिच्या अशा वागण्याचा राग आला. कारण तिने त्याला अरे - तुरे केले. म्हणून त्याने जोराने वहिनीच्या एक कानाखाली लावून दिली. वहिनीचे डोळे लाल झाले होते. त्यामुळे बाबा मध्ये पडले. बाबांनी भावाला बाजूला केले.
कारण त्यांना काही वेगळीच शंका आली होती. बाबांनी भावाला समजावून कामावर पाठवून दिले. त्यादिवशी दिवसभर वहिनीने घरातल्यांना खूप त्रास दिला. घडलेला प्रकार आम्ही फोन करून वहिनींच्या आईला कळविला. कारण वहिनीच्या आईंच्या अंगामध्ये कुठल्यातरी देवीचा संचार होत असे. दुसऱ्याच दिवशी वहिनीची आई आमच्या घरी हजर झाली.तिने घरात पाय टाकताच तिच्या अंगामध्ये देवीचा संचार आला. आणि तिने काठी मागितली. वहिनीला समोर बसवून ती म्हणाली तुझी हिम्मत कशी झाली हिला धरायची , चल आत्ताच्या आत्ता चालती हो इथून . पण वहिनीही काही तिला ऐकेना . म्हणाली मी हिच्या पोटातल्या बाळाला घेऊनच जाणार. खूप उशीर त्या दोघींचा वाद चालू होता. मग बाबानी धाडस करून वहिनीच्या आईला विचारले , कि काय झालंय तिला?
त्यावर ती म्हणाली, तुमच्याच इमारतीमधील एका बाईने धरलय हिला. बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गरोदर बायकांना आणि ओल्या बाळंतिणींना तेव्हा पासून धरते हि. त्यानंतर खूप वेळाने वहिनी शुद्धीवर आली.
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वहिनी नॉर्मल वागू लागली. आम्हाला वाटले सगळं सुरळीत झाले. म्हणून वहीनीची आई देखील तिच्या घरी निघून गेली. पण आठवड्याभराने एका रात्री वहिनीच्या पोटामध्ये खूप वेदना होऊ लागल्या. त्या वेदना सहन न झाल्याने वहिनी मोठयाने रडू लागली. त्यामुळे घरातील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब सिझरिंग करावे लागेल. ऑपरेशन करुन मुलाला बाहेर काढले पण ते मूल मेलेलं होतं. त्या हडळीने आपला डाव साधला होता. शेवटी ती बाळाला घेऊनच गेली. घरातल्यांना खूपच दुःख झाले. कारण आमच्या घरात येणार ते पहिलं बाळ होतं. वहिनीला आम्ही हे लगेच कळू दिले नाही. खूप दुःखी अंतःकरणाने आम्ही त्या बाळाला मूठ - माती दिली आणि घरी परतलो.

No comments:
Post a Comment