सुपरफास्ट_भोकाडी.
मी गावाकडील १२ वी नंतर पुढील शिक्षनासाठी पुण्यातील ऐका काॅलेजमध्ये अॅडमिशनसाठी निघालो, डबड्या मित्राची डबडा पल्सर घेवुन त्या डबड्या मित्रालाही सोबत घेवुन सकाळी ११ वाजता काॅलेजला पोहचलो सर्व प्रोसेस पुर्ण करुन आम्ही निघालो घरी पोहचायला उशिर होनार होता.
आमच्या गावकडे जो रोड वळतो त्या वळनावरच पुर्वी खुप लुटमार खुन वैगेरे घटना घडायच्या त्यामुळे तेथे भुत खेत दिसतात असा समज अजुनही आहे, आता आम्हाला नेमक तिथुनच जायला रात्रीचे ११:००- ११:३० होनार होते.गाडी मीच चालवत होतो, भुत खेतांच माझ्या मनात काही नव्हत अन सहसा येत पण नाही. मी कित्येक वेळा रात्री अपरात्री त्या ठिकानाहुन आलेलो होतो.
आता वर मी माझ्या मित्राला डबड्या का म्हनालो ते हळुहळु कळेलच तुम्हाला. डबड्या मित्राची डबडी पल्सर घेवुन ५०-६० च्या स्पीडन त्या भागातुन चाललोच होतो अन पुढे ४-५ किलोमिटरवर वळन घेवुन गावच्या रस्त्याला लागायचेच होते तर हा डबड्या मागुन म्हणतो कसा ये दिप्या गाडी थांबव ना बे त्या बाईला घे गाडीव ती बघ गाडीसोबत पळतीया कीती दमली असल.

धत तिच्या मारी हे काय नविन
५०-६० च्या स्पिडन कोनती बया पळनार हाय गाडीसोबत?
मला क्षनार्धात समधं क्लीक होवुन गेल, म्हणल हे झपाटल बहुतेक.
मी गाडीचा स्पिड वाढवला, डबड गाडपाट ते पळना बी तरी ८० पर्यंत गेल. हा भाै मागन ये दिप्या इकड बघ ना इकड ती बया लय पळतीये रे घेवु की रे तिला गाडीव,,
आता या डबड्याला झपाटल्यागतच झाल होत मग त्याला कस सांगाव की अरे बाबा ती बाई नाही भोकाडी हाय.

गाडीला आरस पण नाय, म्हनल त्यात मला तरी दिसली असती ही सुपरफास्ट भोकाडी माग तिरक्या नजरेनी पाहयचो पण काही दिसत नव्हत अन पुर्ण वळुन पाहायची हिम्मत मी ही केली नाही. क्योंकी डरना जरुरी है भाई लोग, नाय तिथ स्टाईल मारायची अन हिम्मत दाखवायची कलाकारी मी कधीच करत नाही ते अंगाशी येत मला माहीती होत.
गाडी पळवतोय पळवतोय गाडी ८०-९० च्या मध्येच. त्याला विचारल गेली कारे ती? त्या बावऴटाला मी काय बोलतोय ते जोरदार हवेमुळ ऐकायलाच जात नव्हत, ते पार गाडीच्या फुट्रेसवर उभ राहुन माझ खांदे दाबायला लागल ये दिप्या थांब रे थांब रे लय पळतीये रे ती बाई काहीतरी अडचन असल ना रे तिला घेवु की तिला गाडिव.
मला माहित होत हे बावऴट आधीच बाईलवेड हाय त्यात याला बाईची भोकाडी दिसली तरी पाजळनार हे.

आता माझी सटकली होती
ती बया राहिली बाजुला अन हा डबड्याच माझ्या मानगुटीवर बसायला लागला होता.
गाडी थांबुन याला अन त्या बाईला दोघांना थोबाडायचा विचार मनात येवुन गेला पण म्हणल हे अजुन तरी पुर् झपाटल गेलल नाही, पुर झपाटल असत तर यानी हलवुन हलवुन गाडी पाडुन थांबवली असती आता ह्यो थोडा शुद्धीत हाय तर पळवा गाडी त्याला कळतय तरी आपण गाडीवर हाय लय चळमुंगळा केला तर गाडी अन बाई अस चोैघे बी गटारात जावु.
त्याच्या त्या बाईच्या चिंतेने तरी मी अन गाडी आत्ता पर्यंत वाचलो होतो. कारण त्याला बाईला गाडीव घ्यायचच होत मग तो गाडी कशी पाडेल?अस लाॅजिक लावुन मी रामभरोसे बुंगाट चाललेलो.

त्याचा हालचालींचा पाठ पुरावा घेवुनच गाडी अजुन दामटली. तरी याच आपल चालुच दिप्या नालायका तुला काय मानुसकी बिनुसकी हाय का रे थांबना बे आय **बिप🔴(तो चक्क शिव्या देत होता मला) गाडी ती मरल ना येवढी पळुन.
मी त डोक्यालाच हात लावायचो राहिलो कारण हात गाडी चालवत होते.
गावच्या रस्त्याकडच वळन आलं गाडी ८०-९०च्या स्पीडने. म्हणल आता इथ वळायला गेल तर स्पिड कमी कराव लागल अन आमच्या डबड्या मित्राची कोण ती गाडीबरोबर सुसाट पळनारी आत्या, मावशी का काकु आहे ती पुट्टकन गाडीवर येवुन बसेल.
म्हणुन गाडी गावाकडच्या रस्त्याकडे न वळवता सरऴच दामटली.
मी तिरक्या नजरेने पाहयचो पण मला काही दिसत नव्हते अन या भाै च आपल चालुच माझ खांद वढु वढु दिप्या घे ना रे तिला.
मनात म्हणल ऐकदा या बाईचा पिच्छा सुटुदे गाडी थांबुन नाय मुस्काड फोडल या डबड्याच तर नावाचा दिप्या नाही.

दिड एेक किलोमीटर थोडा चढता रोड असल्यान याच गाडम ९० च्या पुढ काय गेल नाही जेव्हा उतरनीचा रोड लागला तेव्हा कुट गाडी १०० पर्य़त पोहचली.
ये बघ ना रे ती बाई तुला पण थांब म्हणतीये थांब ना रे दिप्या, ह्यो भाै परत बोंबलला.
आता माझीच टरकायला लागली मला सांगतीये म्हणजे माझ्या साईटला आली का काय? मी स्पिड गाडीच वाढवल होत का भोकाडीच तेच कळना झालत. जेवढी गाडी रेस करतोय तेवढी भोकाडी रेस होतेय. फुल स्पिड मध्ये घाम यायला लागला. म्हणल कोणाला तरी उचलतेय बाई ही नाहीतर स्वता तरी दोघांमध्ये येवुन बसतीया.
आता उतारामुळे गाडी ११०-१२० पर्यंत गेली तशी डबडा गाडी काय ढकलली नसती. मी तर घोड्याच्या डोळ्याला पट्टी बांधतात तस ऐका सरळ रेशेत समोरच पाहुन गाडी दामटीत होतो. या भाै च खांद दाबन कमी झाल होत अन आवाज बी येत नव्हता, हा बावऴट माग होता का नव्हता माहीत नाही मी मपली गाडी सुसाट सोडुन दिलती. असल्या येड्याची काय काळजी करायची हाय माग का नेला भोकाडीन ऊचलुन, येड्या***बिपबिप (लय शिव्या दिल्या मी त्याला मनातल्या मनात) समजुन जा काय अवस्था असल माझी.

पुढ दत्त मंदिर होत तिथ दोन पायजम्यावाले मानस दिसली गाडी हळु केली अन थांबलो ऐकदाचा.
पहिल्यांदा मनातुन मी माझेच आभार मानले कारण की मध्ये हाॅटेल मध्ये जेवन झाल्यावर हा डबड्या म्हणला होता की गाडी मी चालवतो म्हणुन, नशिब मी त्याच्याकडे गाडी दिली नाही, नाहीतर काही दिसांनी या सुपरफास्ट भोकाडी बरोबर आम्ही दोघ बी भोकाडी बनुन गाड्यांच्या मागे पळत असतो.

असो मंदिराजवळ गाडी थांबवली, गाडीवरन टांग काढायला गेलो अन या डबड्याच्या पेकाटात लाथ बसली, तशी बी मारनारच होतो मी. पहिल देवळात घुसलो अन त्याला बी वढीत नेल. पाया पडलो अन बाहेर आलो. येवढी पळापळ धावपळ करित कार्टी दर्शन घेतात म्हणल्यावर पायजम्यावाल्या ऐका मानसानी विचारल काय रे काय झालय. त्यांना मी सगळा घडलेला प्रसंग सांगितला.
त्यातला ऐक (मानुस) नाना म्हणाला याच्या (डबड्याच्या) कानफटात हान पहिली अजुन ती बया उतरली का नाही बघ. ?
अरे अशा वेळेस पहायच नसत सारख, काही काही हाडऴी डोळ्यांनीच वश करुन घेतात.
आता मात्र डबड्या थोडा वैचारिक झाला होता म्हणाला मला काही समजतच नव्हत मी काय करत होतो ते. आता त्याच तेलाच माहीती काही सुधरत नव्हत का याला बाईला गाडीव घ्यायचच होत.? पण सुधरत नव्हत हे म्हणनच त्याला योग्य वाटल असेल कारण मी असल्या हावभावातच होतो की तो परत काही बाईच्या बाजुन बोल्ला असता तर त्याच थडगच मी मंदिराच्या माग ऊभारल असत.

त्या नानांनी मला विचारल तु पाहिली का नाही रे तिला. ? मी म्हणल नाना मला पाहयचीच नव्हती अन दिसली पन नाही.
नाना म्हणले देव गण असेल तुझा म्हुन नाय दिसली तुला.

क्वचितच घटना घडतात इथे अशा, त्यात तुम्ही सापडलात.
मनातुनच म्हणल दिसली नाही का माझ्या पर्यंत पोहचली नाही ती बया हे देवालाच माहीती, पण सध्या स्थितीला गाडीचे आभार मानने गरजेचे होते, जी गाडी भोकाडीच्या दोन-चार टांगा तरी पुढे पळत होती.
देवळाच्या भोवती असलेल्या झाडाचे फुल तोडले अन गाडीच्या खोपडीत लावले. माझा डबड्या मित्र बिनलाज्यावानी खाली मान घालुन हसत होता. त्याच्या पण खोपडीत ऐखाद फुल नाहीतर दगड घालावा अस वाटल होत.
पण मग किक मारली अन १०-१२ किलोमीटर लांबुन घर गाठल.

(टिप - कुणाला अशा धावपट्टु कुटं धावतानी आढळल्या तर नक्की थांबुन माहीती घ्या.
कारण ती बया सरासरी नक्कीच ९० च्या स्पिड ने तरी ३-४ कि.मी. पऴत असावी.
अशा महिला नक्कीच भारताला आॅलंपिकचे सुवर्ण पदक मिळवण्याच्या कामाला येतील.)

No comments:
Post a Comment