दबंग - bhutakhetachya goshti
"दोन मित्र दारुच्या नशेत समुद्र किनारी बसले होते.छान हवा सुटली होती. संध्याकाळची वेळ होती. सुर्य आपली शेवटची झलक दाखवत होता. मावळतिचा सुर्य खुपच लोभस होता.
|
मित्र आपापसात आपल्या जिवनातल्या सुख दुखाच्या वार्ता करत होते.
आता दारु ही संपत आली होती. वेळ होती घरी जाण्याची खुप वेळ समुद्र किनारी बसल्यावर वेळेचे भान राहिल नाही. आता चांगलाच अंधार पडत आला होता. तरी वाळुत पाय रोवत हळु हळु ते घरच्या दिशेने निघाले.
दोघांचे पाय लटपटत होते. दारुच्या नशेत ते एकमेकांशी बडबडत जात होते. एका मित्राच्या हातात अर्धवट संपलेली दारुची बॉटल होती.
तो समुद्र किनारा सामसुम होता सहसा तिथे जास्त कोणि जात नसायच. आणि हा किनारा भुता खेतांसाठी बदनाम होता त्या मुळे संध्याकाळी तिथे फारशी माणस थांबत नसत.
दोघ जण आता जवळपास रस्ताजवळ पोहचत आले होते पण अजुन अवकाश होता. चालत मधेच पडत कधि एकमेकांना शिव्या घालत ते चालले होते.
अचानक त्यातिल एका मित्राचा पाय वाळुत रुतला
खुप जोर लाउन पण त्याचा पाय वाळुतुन बाहेर पडत नव्हता.
दारुच्या नशेतच ए सोड मला....ए सोड.... मला जाउदे करत बडबडत होता दुसर्या मित्राने त्याला विचारल
जास्त झाली का भाउ....?? मला बघ ...माझे पाय बघ उभा आहे ना ?? तु बघ वाळुत रुतला...
दुसर्या मित्राने आपल्या मित्राचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला पण काहि केल्या पाय बाहेर येत नव्हता.
म्हणुन सांगतो मित्रा दारु लय वाईट बघ तुला चालता येत नाय !!!
ऐ शहाण्या तु गप बाहेर काड मला पहिला...
दोघहि चांगले झिंगले होते.
मित्र जोर लावत होता.
इतक्यात त्याने पाहिले कि वाळुत काहि हालचाल होतेय.
दारुच्या नशेतच त्याने डोळे किल किले करत पाहिल... काय आहे ? वाळुत साप कि अजुन काय तो जरा घाबरला. पण तिथे काहि विपरितच होत.. म्हणतात ना अशा जागि जाउ नये जि जागा भुता खेतानी भरलेली असते ...त्यांची खुप चलती असते. वाळुतुन एक मानवी कवटी डोक हलवत वाळु झटकत बाहेर येउ लागली. हे दृष्य पहाताच मित्राची दारु अर्धी जवळपास उतरुनच गेली.
"महेश ते बघ... ते बघ.... कोण आहे ....?
बोलत तो मागे सरकला आता तो कंकाल जवळ पास धडापरयंत वाळुतुन बाहेर आला जणु त्याला कोणि पुरुन ठेवला होता. आणी तो उठुन बसला. दुसरा मित्र फुट भर मागे उडाला. त्या कंकालाने एका हाताने वाळु खाली मित्राचा पाय धरला होता .
दुसरा मित्र जोरात अोरडला महेश .........!!! त्याची दारु आता ऊतरली आणि तो जिव घेउन धडपडत त्या जागेवरुन धावत सुटला घामाघुम झाला .
पण महेश ला चांगलीच चडली होती त्याला काहिच शुद्ध नव्हती.
ऐ थांन पळतो काय ऐ थांब रे बोलत महेश ने त्याच्या मागे पाहिले तो कंकाल त्याचा पाय पकडुन वाळुत बसला होता. दुसरा मित्र लांबुन महेश ला पहात होता
महेश मागे फिरला त्यानेे त्या कंकालाला पाहिले त्याचे डोळे लाल होते हातातली दारुची बॉटल महेश ने कंकालाच्या कवटिवर फोडली...
"घे भाड्या तु पण पी.... हे हे हे महेश दारुच्या नशेत हसायाला लागतो
सोहन त्या जागेवरुन पलायन करतो
अशात रात्र जाते .
बहुतेक महेश मेला असावा. सोहन विचारात पडला
चांगला मित्र होता दारु खुप वाईट दारु मुळे वाया गेला ...बोलत तो परत पहाटे पहाटे समुद्र किनारी घाबरत घाबरत गेला
त्याने लांबुन पाहिले कि महेश जागि पडला आहे तो धावत त्याच्या जवळ गेला.आणी त्याने आजु बाजुला पाहिले तो सांगाडा जवळ पास नाहि याची खात्री झाल्यावर सोहन ने महेशला हलवले पण तो उठत नव्हता.त्याने धावत जाउन समुद्रा वरुन पाणी आणले आणि महेश च्या तोंडावर मारले तसा महेश खडबडुब जागा झाला.
ऐ सोड.... ऐ सोडे मला अस बडबडु लागला
अरे महेश मि आहे सोहन तुला कोणि धरल नाहि आहे सुटलास तु जिव वाचला तुजा.
अरे काल तुला शुद्ध तरी होति का?? तुला भुताने धरल होत !!!
"हे हे हे चेष्टा करतो का माझी ??? महेश ला आश्चर्य
नाहि खरच मि नाहि तुच दारुच्या नशेत त्या भुताची चेष्टा करत होतास दारुची बाटली पण हाणलीस त्याच्या डोक्यात ..!
"हे हे हे 😄😄 ...बरच हाय कि आता आपल्या नादि लागणार नाहि त्यो...! महेश बरळला
"अरे दारु पिलेल्याचे पाय खेचतो काय बोलयच ??? दोघ आता समुद्र किनार्यावरुन उठले सोहन ने महेश ला खांदा दिला जाता जाता महेश परत बडबडतो
"परत दिसलास तर हाड खिळखिळी करेन ...!
चल रे ....!
दोघ मित्र बोलत होते
अरे भिति नाहि वाटलि तुला
"अरे आयुष्यालाच कंटाळलोय
दोघ जोर जोरात हसु लागले. आणि घराच्या दिशेने निघाले
समाप्त 😇
🙏 श्री.मंगेश पांडुरंग घाडीगावकर
( सदर कथा काल्पनीक असुन मनोंरंजनाच्या हेतुने लिहिली आहे समाजात अन्नश्रद्धा आणि व्यसनाधिनतेला दुजोरा देत नाही. )
No comments:
Post a Comment