भाग ६
अंधारकोठडी
लेखक : कनिश्क हिवरेकर
मोहनने भीतीने आवंढा गिळला "कोण आहे इथे ? " मोहनने विष्णूला विचारले... त्यावर विष्णूने अलगद आपल्या समोरचे ते पुस्तक मोहनकडे सरकवले प्रथमतः त्याने मोहनकडे पाहत आपल्या ओठांवरती बोट ठेऊन शांत राहण्याचा इशारा केला " श्श्श्स.... " आणि त्या नंतर तेच बोट त्या पुस्तकातील कांतार राक्षसाच्या चिन्हांवरती ठेवले...
"नाही..! खरच ? " मोहन उद्गारला... " श्श्श्स..." विष्णूने त्याला आवाज कमी करण्यास सांगत आपली मान होकारार्थी हलवली... " विष्णू आणि मोहन दोघेही आता झुकून पुढे येऊन अगदी दबक्या आवाजात बोलू लागले... " आपल्याला माहिती नाहीये तो सध्या कुठे आहे. कदाचित त्याला माहिती नसेल कि आपण इथे आहोत. त्यामुळे लवकरात लवकर जे काही हाती लागेल ते घेऊन आपण इथून निघू... तू बस आवाज करू नकोस "
विष्णू म्हणाला तसे त्या जाड पुस्तकाजवळ प्रशांतने कातरून नेलेले काही वर्तमान पत्र पडली होती त्यांच्याखालीच बातम्याचा काही मजकूर लिहीलेला होता. विष्णूने आवाज न करता तो पेपर आपल्या हातात घेतला आणि हळू अगदी फुसफुसत्या आवाजात त्याने ते मजकूर वाचायला सुरुवात केली...
" एक अलौकिक पुरातनकालीन मंदिराचा शोध एका प्रसिद्ध इतिहासकाराने लावला त्याचं नाव प्रमोद एकावडे. भारतवर्षात आजवर कधीच कुठेही असा पुरातन कालीन मंदिराचा शोध लागला गेला नव्हता इतिहासात पहिलाच असा शोध आहे. आजपर्यंत या जागेबद्दल अस मानण्यात आले कि त्या मंदिराच्या शोधात गेलेले कोणीहि परत आले नाही. परंतु मिस्टर प्रमोद एकावडे यानी
अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली व भारताचा पौराणिक इतिहास जपण्यासाठी ती अलौकिक मूर्ती शोधून काढली. परंतु ती मूर्ती सध्या कुठे आहे हे अजून हि एक गुपितच आहे विचारण्यात आल्यावर आम्हाला फक्त सुरक्षेची बाब अशी कारणे सांगून टाळण्यात आले. आहे.... " विष्णूने संपूर्ण बातमी वाचली... " याचा अर्थ आपले प्राचार्य एकावडे यांनीच त्या मूर्तीचा शोध घेतला आणि ती मूर्ती कुठेतरी दडवून ठेवली.. आणि ती देखील आपल्याच कॉलेजमध्ये... "
" होय मोहन अगदी बरोबर बोललास...कदाचित त्या रात्री प्रशांतला कोणाकडून तरी समजले कि अशी अशी नवी पुरातनकालीन गोष्ट आपल्या संग्रहलयात आलीय त्याच्या छंदापायी प्रशांत त्या रात्री इथे आला होता आणि त्याने हि शोधाशोध केली. कदाचित त्याला त्या मूर्ती पर्यंत पोहोचण्याचा मार्ग भेटला होता.
त्याच्या शोधात तो इथे आला आणि इथे त्याची भेट कोणाशीतरी झाली.. " विष्णू बोलता बोलता थांबला " कांतार " मोहन विष्णूच्या डोळ्यांमध्ये आलेल उत्तर ओळखून उद्गारला. " होय... " विष्णू उत्तरला... त्या गूढ काळ्या अंधारात दोघेही रहस्याच्या जाळ्यांमध्ये गुरफटून गेले होते. आजूबाजूने जेवढा गूढ काळोख दिसून येत होता तेवढच दीर्घ संकट होत.
न जाने कुठल्या दिशेने ते घात करायला येईल माहित नव्हत. " विष्णू ?? " हा आवाज कोण्यातरी तिसऱ्याच व्यक्तीचा होता विष्णू आणि मोहन दोघांच्याहि कानावरती तो आवाज पडला काही क्षणासाठी मोहन आणि विष्णू एकमेकांना पाहत राहिले... दोघांनीही आपल्या माना शेल्व्स मधून बाहेर भिरकावल्या त्या दोघांच्याहि दोन्ही बाजूनी पुस्तकाची कपाटे होती मधोमध टेबलावरती दोघेही बसले असताना समोरून त्यांना कोणाचा तर हाक मारण्याचा आवाज ऐकू आला..
तो आवाज संपूर्ण लायब्ररीमध्ये घुमला गेला... त्या आवाजात अगदी सूर लावलेला होता. " विष्णू .... ? ? " विष्णूने व मोहनने नजरा समोर टाकल्या तेव्हा त्यांच्या अंगामध्ये जणू लाल मुंग्याच वारूळ फुटले जणू काही हजारो मुंग्या एकसाथ त्यांच्या अंगावर चढल्या होत्या. मानेवरून अगदी थंडगार बर्फाची धार कोणीतरी सोडली अस त्यांना जाणवले...
त्यांच्या समोर त्या दूर अंधारात टेबलावर ठेवलेल्या दिव्या पल्याड चेहऱ्यावर अगदी कुत्सित हास्य घेऊन प्रशांत उभा होता. " प पप प्रशांत ? " विष्णू उद्गारला... त्यावर दूर उभा प्रशांतने त्याच्याकडे पाहून अगदी स्मित हास्य केले. खालून येणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्याच्या अवयवांच्या सावल्यांनी त्याचा चेहरा अगदी भयंकर दिसत होता. तसाच चेहऱ्यावर हास्य घेऊन प्रशांत तिथेच आपल्या जागीच गर्रकन वळला...
आणि चालत चालत दुसऱ्या कपाटाच्या आणि विष्णू व मोहन दोघांच्या नजरे आड गेला... " विष्णू ? तो खरच प्रशांत ? " मोहन विष्णूकडे पाहत विचारू लागला... एखाद्या वादळापूर्वी जशी शांतता असते तशीच शांती त्या लायब्ररीमध्ये पसरली होती. आणि परत एकदा नजरे आड गेलेल्या प्रशांतच्या आवाजाने विष्णूला हाक मारली...
"विष्णू ??? " या वेळी तो आवाज संपूर्ण लायब्ररीमध्ये घुमला तशीच लायब्ररीची खिडकी उघडी असल्या कारणाने किंचित आवाज बाहेर उभा हनम्या हवालदारच्या कानावर पडला.. " ए सुकड्या अरे ऐकल का तू ? आत मध्ये कोणतर हाका मारतय बघ..." हनम्या हवालदार सुकडेला म्हणाला....परंतु सुकडे हवालदारचा चेहरा तेव्हा पूर्णपणे निर्भाव झाला होता.
" होय लेका मी पण ऐकला. कुणाचा तर आवाज आला आत्ता. आत जाऊन बघता पण येत नाही " इकडे आतमध्ये विष्णू आपल्या जागेवरून उठला टेबलावरील कंदील घेऊन मोहनहि त्याच्या मागोमाग उठून उभा राहिला...दोघेहि आता प्रशांत त्यांच्या नजरेआड झाला त्या कपाटाच्या दिशेने सरसावू लागले.
धोका टाळण्यासाठी दोघांनीही कपाटाचा आडोसा घेतला तिथे पुस्तकांच्या ओळींमध्ये काही बारीक सारीक फटी होत्या त्या फटीमधून विष्णू पलीकडे पाहत पाहत पुढे जात होता आणि त्याच्या पाठोपाठच मोहन देखील. त्या पुस्तकांच्या असलेल्या फटीमध्ये विष्णू अगदी स्पष्टपणे मोहनला पाहू शकत होता.
जसा जसा विष्णू पुढे सरकू लागला तसे तसे पलीकडे उभा प्रशांत आपली मान मागे तिरकी वळवू लागला जणू त्याला कळत होत कि विष्णू त्याला एवढ्या लहान चिरेमधून पाहतोय प्रशांतने जागेवरच उभा राहून तिरकस मान मागे वळवली एका गालात भयंकर छद्मी हास्य आणत त्याने विष्णूच्या अगदी नजरेत नजर घालून पाहिले..
विष्णू जागेवरच थांबला... " हा प्रशांत नाहीये... " विष्णू पुटपुटला... "मोहन आपल्याला काहीही करून इथून निघायला हवय.. त्याला चकमा द्यायला हवाय...नाहीतर आपल काही खर नाही... " विष्णू मोहनला म्हटला " अरे मग रे विष्णू आता इथून निघायचं कस ? तो तर आपल्या रस्त्यालाच आहे... "
तोच विष्णू व मोहन दोघेही बोलत त्या कपाटाच्या शेवट पर्यंत आले विष्णूने आधी आजूबाजूचा कानोसा घेतला. पळण्याची धावण्याची कुठून शक्यता भेटेल ती पाहिली. नंतर त्याने आपली नजर प्रशांतला पाहण्यासाठी त्याच्या बाजूने फिरवली तेव्हा विष्णू ते पाहून हादरला...कारण त्या जागेवर न प्रशांत होता न दुसर काही..
न जाने क्षणभरात प्रशांत तिथून नाहीसा झाला होता.. " मोहन तो इथे नाहीये. तो आत्ता इथे होता गायब झालाय तो. मोहन हीच वेळ आहे चल लवकर धाव निघ इथून मोहन निघ... " विष्णू सांगताच क्षणी मोहन त्याच्या मागून निघाला व त्यासोबत विष्णूहि दोघेही जीव मुठीत घेऊन धावू लागले होते
काही ढांगा पुढे जाता न जाता तोच विष्णू आणि मोहन दोघेही थरारून आपल्या जागीच मूर्तीसारखे उभे राहिले. दोघांच्याही माथ्यावर घामाचे ओस जमले होते. कारण आत्ता क्षणार्धापूर्वी नाहीसा झालेला प्रशांत अगदी भयंकर चेहरा घेऊन त्याच्या समोर अवतरला होता. " विष्णू अरे मला सोडून कुठे चाललात तुम्ही दोघे ? "
" मला शोधायला आला होतात न तुम्ही ? हे घ्या मी तुमच्या समोर उभा आहे ना ? " प्रशांतचा आवाज बदलत घोगरा आणि विचित्र निघत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते आसुरी हास्य क्षणाक्षणाला वाढत जात होत.. " मोहन धाव लवकर " विष्णू ओरडला मोहनची मात्र बोबडीच वळली होती...
दोघेही उलट्या दिशेने धावत सुटले... धावता धावता मोहनचा पाय कशावरून तरी सर्रकन घसरला तसाच तो धाडकन खाली कोसळला. मागे मोहन कोसळला हे पाहून विष्णूने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला उचलताना विष्णूला दिसून आले मोहनचा घोट्यापासून पाय मुरगळला होता. ज्या गोष्टीवरून त्याचा पाय घसरला ती हिरवट चिकटसर गोष्ट तोच द्रवपदार्थ होता.
" मोहन उठ लवकर.... " विष्णूने मोहनला आधार देत उचलले... नशीब बलवत्तर म्हणून विष्णूला अगदी समोरासमोर एक खिडकी दिसली. अगदी चार एक हाताच्या अंतरावरतीच होती ती खिडकी.. " मित्रा मोहन माझ्यावर विश्वास ठेव. आपण इथून बाहेर निघू... " धापा टाकत विष्णू मोहनशी उद्गारला....
त्यावर कण्हतच मोहनने मागे वळून पाहिले. त्यावेळी त्याला दिसले प्रशांतचा अवतार बदलत जात होता त्याच्या बुभळाची जागा पिवळाधमक मधोमध काळी चीर असलेल्या राक्षसरुपी डोळ्यांनी घेतली होती... " विष्णू हा तोच आहे... विष्णू तू जा इथून मला सोडून तू तुझा जीव वाचव...विष्णू जा... "
परंतु विष्णूने हार नाही मानली आपल्या जिवलग मित्राचा प्राण वाचवण्यासाठी त्याने त्याला न जुमानता उभ केल व आपल्या खांद्यावर आधार दिला व तसेच ओढत त्याला खिडकीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला... आतमध्ये चाललेली आरडा ओरड धडपड आता स्पष्टपणे बाहेर उभा त्या हवालदारांना ऐकू गेली होती..
" ए कोण हाय र आतमध्ये... गपगुमान बाहेर पड नाही तर आम्ही आत येतोय बघ... " विष्णूला ते ऐकू गेले दोघेही कसे बसे धावत लंगडत खिडकीच्या दिशेने येऊ लागले... " मोहन आपल्याला बाहेर उडी घ्यावी लागेल दुसरा पर्याय नाही...चल लवकर माझ्या सोबत " मोहनला होणाऱ्या वेदनांना त्याला सहन केल्याखेरीज पर्याय नव्हता कारण त्या काही क्षणाच्या वेदनाच त्याचा जीव वाचवणार होत्या...
बघता बघता विष्णू व मोहन दोघांनी खिडकी बाहेर उडी घेतली तश्या खिडकीची तावदान धाडकन उघडली गेली...त्यामधून विष्णू मोहनसकट बाहेर पडला. वेद्नाच्या कळेने मोहन कण्हत होता. तोच आवाज ऐकून तिथून सुकडे हवालदार आणि हनम्या हवालदार तिथे धावत आले... " एय कोण हाय र तिकड ? कोण तू ? ए उठा च्या आयला इथ काय करताय तुम्ही ? चोर बीर तर नाही ? आन आतमध्ये काय करत होतात ? "
ते दोघेही विष्णू आणि मोहनला बोलू देत नव्हते विष्णु त्यांना जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होता कि इथे थांबू नका लवकर निघा इथून पण हनम्याने विष्णूचे गचुरे पकडल होत मोहन खाली पडलेला कण्हत होता दोघांच्याहि अंगावर जखमा झाल्या होत्या... " आर बोलतो का नाही तू आता ? "
हनम्या हवालदार त्याच्यावर काठी उगारत म्हणाला.. " पळा... थांबू ... नका इथे ... " विष्णू मोठ्मोठे श्वास उरात भरत त्यांना बोलायचा प्रयत्न करत होता पण ते दोघे काहीएक ऐकायला तयार नव्हते.. तोच सुकडे हवालदार खिडकीच्या दिशेने जाऊ लागला विष्णू हन्म्याला हातवारे करून सांगू पाहत होता त्याला अडवा त्याला अडवा..
"चोSSप आता जे काही बोलायचं ते सायेबासमोर बोलायचं... " त्यावर सुकडे आतमध्येच पाहत उभा होता... " काय र आतमंदी काय करत होता तुम्ही दोघ हा ? " सुकडे म्हणाला... तोच विष्णूने श्वास भरले हनम्या बोलायचा थांबला होता तोच विष्णू त्याला ओरडला " दूर व्हा तिथून दूर व्हा... "
" का र ? काय झाल ? " आणि पुढच्याच क्षणी तिथेच घात झाला उघड्या खिडकीच्या अंधारातून दोन भयंकर पंजे बाहेर डोळ्याची पापणी लवायची वेळ कि तोच झर्रकन एका झटक्यातच सुकडे हवालदाराला त्या दोन हातांनी आतमध्ये ओढून घेतले. त्याची किंचाळी देखील क्षणाच्या अर्ध्या भागाला विरघळत दूर अंधारात बुडून गेली..
विष्णू मोहन आणि सुकडे हवालदारचा साथीदार ते भयंकर दृश्य पाहून मात्र क्षणभरासाठी हादरून गेले. विष्णूने मोहनला जागचे उठवले हनम्या हवालदारास अजूनदेखील विश्वास बसेना झाला होता कि त्याच्या डोळ्यासमोर दोन भयंकर हातानी त्याचा साथीदार आतमध्ये ओढून घेतला होता. खिडकीमध्येच दूर अंतरावरती दोन पिवळे धमक डोळे व सुकडेच्या हातातील पडलेल्या दिव्याच्या उजेडात एक
भयावह दानव ,सैतान राक्षस कि आणखी काही तिथे उभे तिघांकडे पाहत होते. न जाणे देवाने विष्णूला कशी वाचा दिली विष्णूच्या तोंडून फक्त एकच निर्भाव शब्द बाहेर पडला ... "धाव ! " विष्णू हनम्याला त्याच्या अवस्थेतून गदा गदा हलवत त्याला निघण्यासाठी सांगत होता. " ए सुतकाळच्या..! नाय तुझा मुडदा बशीवला तर नावाचा हनम्या हवालदार नाय म्या... भाड्या... बाहीर ये भाड्या... "
आपल्या साथीदाराला गमवल्यावर भीतीहि तशीच आणि संताप हि तेवढाच हनम्या हवालदारला झाला होता. परंतु विष्णू त्याला सारखी विनवणी करू लागला... " धावा नाहीतर तो आपल्याला हि गिळून टाकेल लवकर निघा इथून... चला..! " यावेळी मोहनने खिडकीमध्ये पाहिले तसे त्याने बघितले तेव्हा तो सैतान
तो दानव बाहेरच्या दिशेने या तिघांकडेच धावत येत होता... विष्णूने तसेच मोहनला पकडले व दोघे हि तिथून धावत सुटले त्यांच्या जोडीने हनम्या हवालदार सुद्धा निघाला. त्याने विष्णू सोबत मोहनला हि आधार दिला... धावता धावता तिघेही मोहन सोबत वरच्या मजल्यावर जाऊ लागले तोच मजला
ज्यावर मनोरा होता. बघता बघता हवेत गारवा वाढला होता जखमी अंगाला गार वारा झोंबत असल्यामुळे थंडीने वेदना आणखीनच तीव्र होऊ लागल्या होत्या. पाहता पाहता तिघेही वरच्या फ्लोरवरती आले.. " काय हाय ते नेमक ? अन कोण हायत कोण तुमी दोघ तुमच्या मूळ आज माझा साथीदार दगावला तुम्हाला तर आता... "
" हे बघा काका...! आम्हाला माफ करा पण हि वेळ समजवण्यासाठी नाहीये जीव वाचवण्याची आहे " " बर हे बघा तुम्ही दोघ त्या समोरच्या खोलीत घुसा ती उघडीच दिसतीय मला जा लवकर पोरानो निघा... " " आणि तुम्ही ? "
" मी आमच्या कदम साहेबाकड जातो. त्यांना घडला प्रकार सांगाव लागल.... हि काय साधीसुधी गोष्ट नाही वाटत... मी येतो सायेबाना घेऊन सकाळपर्यंत... जा लवकर जा तुम्ही दोघ...पळा" बघता बघता वातावरणात बदल झाला...ढगांच्या गर्जना वाढू लागल्या...
हनम्या हवालदार पळत पळत खाली आला कॉलेजच्या गेटच्या बाहेर त्याची मोटार सायकल होती तिथपर्यंत कसबस पोहोचल म्हणजे तो इन्स्पेक्टर कदम पर्यंत पोहोचणार होता. खाली येताच त्याला पावसांच्या जोरदार धारांनी झोडपून काढले...पावसाच्या रपरप आदळनाऱ्या धारांमध्ये त्याला
आजुबाजूच काही दिसण मुश्कील झाल होत एकदा का गाडी जवळ पोचलं म्हणजे मिळवल...विष्णू मोहनला घेऊन सावकाश त्या खोलीच्या दिशेने जात होता कि अचानक त्याला हनम्या हवालदारच्या दबक्या आवाजात किंचाळण्याचा आवाज आला अस वाटत होत तो ओरडला होताच कि त्याच्या गळ्याती नस कोणीतरी धारदार शस्त्राने कापली...
विष्णूच्या कानी तो आवाज पडला तसा विष्णूने त्या फ्लोरवरून गच्चीतून खाली पाहिले तेव्हा विजांच्या कडकडाटीमध्ये विष्णूला खाली एक काळा कपडा अंगात पांघरून एक माणूस उभा असलेला दिसला त्याच्या हातात एक धारदार सुरा होता. ज्यावरून रक्ताचे थेंब पावसाच्या पाण्याने ओघळून खाली टपकत होते त्याच्या पुढ्यातच हनम्या हवालदारच प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडल होत.गळा चिरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
विष्णू व मोहन दोघांनी ते पाहिले.मोहन ओरडणार होताच कि विष्णूने त्याच तोंड दाबले व त्याला खाली बसवले विष्णूने आपली नजर वर काढून तो प्रकार पाहू लागला... एक संकट कमी होते का म्हणून हे दुसरेच पुढे उभे राहिले...तो व्यक्ती हनम्याचे प्रेत ओढत थेट लायब्ररीच्या दिशेने चालला होता.
विजांचा लख्ख प्रकाश क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होता तश्याच एका लकलकाटीमध्ये विष्णूला त्या माणसाचे हात दिसून आले ज्याच्यावर तेच सैतानाच त्या कांतारच गोंदण गोंदले होते... अचानक जणू त्या माणसाला जाणवले आपल्याला कोणीतरी पाहत आहे. त्याने गर्रकन आपली मान वर केली व पाहिलं पण त्यावेळी तिथ कोणीही नव्हते न विष्णू न मोहन...
कसेबसे जाउन विष्णूने आपल्या समोरचा किंचित उघडा दरवाजा आतमध्ये ढकलला व आतमध्ये शिरून तो बंद केला...
काही क्षण दोघांच्याही धापा भरल्या होत्या जोरजोरात दोघेही श्वास घेऊ लागले. तसा मोहन वेदनेने कळवळत खाली पडला विष्णूने दाराला कडी लावली आतमध्ये त्या खोलीत प्रकाश होता. अगदी सुसज्ज खोली होती ती. तोच विष्णूची नजर आपल्या समोर असलेल्या टेबलापलीकडे गेली...
" सर आपण ? "
क्रमश:

No comments:
Post a Comment