*" वसंततात्या "*
- संदेश म्हात्रे
(०५.०७.२०१८)
- संदेश म्हात्रे
(०५.०७.२०१८)
नमस्कार वाचक मित्रहो, माझ्या आतापर्यंतच्या भयकथांना
भरभरून प्रेम व प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार.

आज मी तुम्हाला कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणेघाट या माझ्या मूळ खुद्द गावातील एक प्रसंग सांगणार आहे. हि थरारक गोष्ट खरी घडलेली आहे. वसंततात्या हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ, त्यांच्या सोबत घडलेली ही अंगावर काटा आणणारी कथा. रायगड जिल्हा हा भाताच्या शेतीसाठी व येथील पेणमधील सुबक गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. साधारण १९६८ साली माझ्या वडिलांची दहावीची परीक्षा झाली असेल, तोपर्यंत ते बेणेघाट येथे गावीच रहायचे , बाबांचे मोठे भाऊ म्हणजे माझे काका साधारण १९६३-६४ च्या सुमारास मुंबईत
येऊन स्वतःचं अस्तित्व शोधू लागले, स्थिर स्थावर वाटल्यावर त्यांनी माझ्या बाबांनाही मुंबईत येऊन काम करण्यास सांगितले. १९६८-६९ साली बाबा मुंबईत येऊन जमेल ते मिळेल ते काम करत कष्ट करायला सुरुवात केली. या सर्व घडामोडीत काका व बाबांना मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं ते त्यांच्या मामांचं, श्री. विठोबा म्हात्रे, *"आदर्श शिक्षक, महाराष्ट्र राज्य"* या पुरस्काराने नावाजलेलं खणखणीत व्यक्तीमत्व.
विठोबा मामांचे मार्गदर्शन व उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही असं बाबा व काका आठवणीने आवर्जून नेहमीच सांगतात.
बाबांचे वडिल म्हणजे माझे आजोबा हे बाबा लहान असताना देवलोकांत गेले, आजीची इच्छा खूप होती की मुलांनी चांगलं शिकावं पण परिस्थितीनुसार चालावं लागायचं, तुटपुंजी शेती त्यात रक्ताच्या नात्यांमधेच बळकावलेली जमिन.. शेतात राबून वर्षभर खाण्यासाठी भात पिकवायचा आणि त्यातून वर्षभराचं बाजूला ठेवून तुटक मुटक उरेल ते तांदुळ विकायचे एवढाच काय तो खटाटोप. या व्यतिरिक्त मग आजी मिठागरावर मिठ वेगळं करण्याचं काम करायला जाऊ लागली त्यातून महिन्याला "एक रुपया" इतका पगार मिळत असे..
तिथेच गावात बाजूला बाबांची मावशी रहात असे, प्रेमळ आणि गोड व्यक्ती. मी गेलो की मोठ्याशा पेटा-यात ठेवलेली बिस्किटे ती आजी द्यायची. बाबांच्या मावशीचे मिस्टर कडक स्वभावाचे. बाबांना व काकांना काही कमी पडल्यास ते पुरवत असत. बाबांना दोन मावस भाऊ, एक श्री. गणेश पाटील आणि लहान श्री. वसंत पाटील. दोघांनाही आम्ही गणेशतात्या आणि वसंततात्या असेच म्हणतो. गणेशतात्या अध्यात्मिक तर वसंततात्या आधुनिक विचारांचे. दोघांमधला फरक स्पष्ट दिसून येई.
कलेत, चित्रकलेत गणेशतात्यांचा हात कुणी धरू शकणार नाही असा ब्रश फिरतो. रंग छटांवर त्यांचं भाष्य ऐकत रहाण्याजोगं.
तर वसंततात्या तसे स्वभावाने मिलीजुली सरकार.. अध्यात्म आणि वास्तव यांचं सुरेख सांगड असणारी व्यक्ती, दिलखुलास हसणं, त्यांच्या मनमुराद हसण्यात सुरुवातीला "खि sss" येतसे.. स्वभाव रोखठोक. एखाद्या गोष्टीला नकार देता येत नसेल तरी गोल गोल करत तो नकार किती केलं तरी स्पष्टच दिला जातो. उंचपुरा बांधा, तगडी शरीर यष्टी, एखाद्या IAS आॅफिसरला लाजवेल असं व्यक्तिमत्व.चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम करावं आणि आपलं वेगळेपण सिद्ध करावं अशी त्यांची मनोमनची इच्छा.
वसंततात्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारण १९८८-९० च्या सुमारास ते नोकरी करू लागले. नावाजलेल्या कंपन्यांपैकी IPCL कंपनीत काम करताना तीन शिफ्ट मधे काम करावे लागे. गावातल्या घरापासून ते वडखळ नाक्यापर्यंत तीन किलोमीटरचे अंतर पायदळी तुडवावे लागे. वडखळ नाक्यावरून मग हायवेचा रस्ता. पहिली शिफ्ट असताना पहाटे घर सोडावे लागे, बेफाम मोकळा रस्ता. चालायला रस्ता लांब होता म्हणून शेतातून शेताच्या बांधावरून चालत गेल्यास थोडं कमी अंतर चालावं लागे पण शेतातून गेल्यास अधिकच अंधार असायचा. वेळ आणि पायपीट वाचवण्यासाठी ही शेतातलीच वाट छान वाटे, ते त्याच वाटेने येत जात असत. दुसरी शिफ्ट संपल्यानंतर मात्र वडखळ नाक्यावरून या निर्जन वाटेने यायला रात्रीचे दीड दोन वाजत असत.
रात्री या वाटेने यायचे म्हणजे एखाद्याला घाम फुटेल पण वसंततात्या मनात काहीही न आणता हा प्रवास रोजच करत. वाटेत दोन्ही बाजूला शेत. अर्धी वाट चालल्यावर माणूस कुठेच धड पळत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. रात्रीची ही वाट चालताना वसंततात्या गाणी गुणगुणत चालायचे. आपल्याच पायांचा चपलेचा आवाज आल्यावर कधी कधी मागे बघावेसे वाटे पण कुठेही न बघता ते आपली वाट सोडत नसत. वाटेत निर्जन किड्यांचा आवाज अंगावर यायचा. कधी कधी कुणीतरी मागून हाक मारतंय की काय असाही भास होई.
वाटेत अधेमधे तळी आहेत, पावसाळ्यात ही तळी भरलेली असतात.
रात्रीचं चालताना दूरवर नजर टाकल्यास माणसा सारख्या चित्र विचित्र आकृत्या दिसत पण कुणीही त्याकडे लक्ष देत नसे.
गावातल्या आज्या वसंततात्यांना सांगायच्या, " बाला, रातचा कामाशी येतंस पून कोनी वा-हला(बोलवलं) तं जाव नकं व्हं " , " त्या तलंन बघाचा नाय सरल आपले घरा यवाचा "
तेव्हा वसंततात्यांच्या धिप्पाड शरीराकडे बघत एखादी आजी म्हणायची, " त्याला कोन भिववल? भूताच भितीन त्याला "
हे सगळं ऐकून वसंततात्याच्या आईला बरं वाटायचं पण तरी ती घाबरायची.
" बाला, बॅटरी घेतलीस काय " ती आठवणीने सांगायची. " रातचा वाटन साप बिप निंगतं "
त्यांचं सगळ्यांचं ऐकल्यावर मात्र पुन्हा रात्री ती वाट चालायची वेळ आल्यावर वसंततात्या थोडं सावरूनच चालायचे, कान टवकारलेले, मधेच सर्रकन कसलातरी आवाज यायचा आणि क्षणार्धात अंगावर काटा उभा रहायचा.
आई म्हणायची, " कोनी भिववला तं आंग उरवाचा नाय व्हं " ...
चालताना घाबरायला झालं तरी, अंगावर काटा आला तरी तात्या धीर धरून चालत, अंग उडवू देत नसत.
एकदा त्यांनी, "घाबरल्यावर अंग का उडवू नये?" याबाबत घरी जमलेल्या आज्यांना विचारलं तेव्हा जानकू आजी म्हणाली, " या बग बाला, तू रातचा यतंस नै त्या टायमान तकरं भूता खेता फिरतान, आता तुजा कामच यो आसला तं काय कराचा, तं या बग मी काय सांगतंय, रातचा शेतान घाबराला झाला नं गार वारा लागला तं आंग उरवाचा नाय, यी भूता खेता वा-यान आसतान, घाबरवतान, कदी हाका मारतान, नं आपुन घाबारलू नं आंग उरवाची खोटी ती आंगान शिरतान. "
" तो भूत बित आंगंन घुसला नै की तो त्याला व्हया तसा खातं नं बोलतं नं आपल्याना ताप भरत हो"

१९९१ सालची गोष्ट. तात्यांची अशीच दुसरी शिफ्ट चालू झाली. सोमवारची रात्र. जुलै आॅगस्टचा महिना. पावसाळा. तात्या दुसरी शिफ्ट संपवून रात्री घरी परतीच्या वाटेवर चालत होते. वाटेच्या दुतर्फा भाताच्या शेतीची हिरवळ. चिखलाची वाट. चालताना चिखलात बुट चिकटायचे, त्यांचा विचित्र आवाज येई. आमावस्या नव्हती पण दोन तीन दिवसांनी अमावस्या येणार होती.
वसंततात्या वडखळ नाक्यावरून गावाच्या दिशेने अंधारलेल्या वाटेवरून चालत होते.
आज वाट जरा अंधुक दिसत होती, शेतातून बांधावरून चालताना आजुबाजूला दिसणारी मोजकी भेंडीची झाडं(रानटी गुलमोहरासारखी) आज काळीकुट्ट दिसत होती. वाट सोडुन इतरत्र बघायची हिम्मत होत नव्हती. तरी जीव मुठीत धरुन तात्या चालत होते. मधेच मागुन कोणीतरी चालतंय असा भास होई. न राहवून घाबरायला झाल्यास ते पटकन वळून मागे बघत, थांबत. कुणी नाही पाहून ते परत चालायला लागले. तोच हिरव्या गार शेतातून

" मी यव कय रं? "
असा धडकी भरणारा आवाज कानावर पडला, कर्णकर्कश असा तो आवाज तात्यांच्या कानात घुमू लागला. एक किलोमीटर अंतर कापून झाले होते. अजून दीड किलोमीटर कसं चालायचं असा प्रश्न त्यांना पडू लागला. आवाज आलेल्या शेतात बघण्याची हिम्मत होईना. त्यांनी आईला आठवलं, त्या आज्यांना आठवलं, अंग उडवायचं नाही, अंग उडवायचं नाही.. त्यांनी मनाशी गाठ बांधली. आपल्याच पायांचा सर्र सर्र आवाज चालणं नकोसं करु लागला. अंगावर काटा येऊ लागला.. भिती वाढायला लागली, अंग कापू लागलं, पाय चालतच होते. आता मागे वळून पहाण्याचीही ताकद नव्हती. पायांचा थरकाप होत होता, त्यामुळे तोल जात होता. धिप्पाड तरण्या माणसाला दम लागत होता. तात्या डोळे फाडून वाट बघत चालत होते. एवढ्यात...
गावाची वेस दिसली, रात्रीचे एक वाजले असतील. काही माणसेही दिसली, वसंततात्यांना हायसं वाटलं. वाटेत दोन तीन ठिकाणी एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी वहात जातं त्यावर लाकडी छोटेखानी पूल होते, त्यातल्या एका लाकडावर तात्यांचा पाय घसरला पण ते पडले नाहीत. कसंबसं सावरत ते गावात पोहोचले.जमलेले लोक कुणाचं तरी मयत घेऊन स्मशानात आले होते. तात्यांनी झाली हकिकत विसरण्याचा प्रयत्न केला. घरी कुणालाही काही सांगितले नाही.
रात्री बिछान्यात झोप लागली नाही. कोण होतं तिथे? कुणी आवाज दिला? का आवाज दिला? , खरंच आवाज आला होता की फक्त भास होता तो? शंभर एक प्रश्नांची सरबत्ती तात्यांच्या डोक्यात चालू होती. त्या वाटेनं चालताना त्यांनी स्वतःला घाबरू दिलं नव्हतं पण आता घरी आल्यावर मात्र त्यांना धडकी भरली होती. रात्रीचे तीन-चार-पाच वाजले तात्यांचा डोळा लागला नाही. शेवटी पाचला तसेच उठून त्यांनी अंघोळ केली, देव्हा-यासमोर जाऊन शांतपणे हात जोडले.
" कय रं बाला, आसा कोमरा आरवनी कला पूंजा करतंस? " आईने विचारलं. आईच्या प्रश्नांना उत्तर न देत वसंततात्या तिथून उठले आणि पुन्हा बिछान्यात गेले.
" बाला , कंपनीन काय झाला हाय काय? कनाची भिती करतंस, मना सांग घे " आई बिछान्याजवळ येऊन बोलली.
"काही नाही आई, जा तू, जरा डोकं दुखतंय, झोप लागत नाही म्हणून अंघोळ व देवपूजा केली" तात्या उत्तरले.
तात्यांचे असे उत्तर ऐकून आई निघून गेली.काहीतरी नक्कीच झालेलं आहे हे आईला जाणवलं, आईच ती, लहानपणापासून वाढवलेला आपला मुलगा कधी कसा वागतो हे एक आई सहज सांगू शकते, पण ती गप्प बसली. तात्या चादर घेऊन बिछान्यात लोळत होते, नंतर त्यांना गाढ झोप लागली.
पण मनातल्या भितीने पिच्छा कुठे सोडला होता, आज पुन्हा कामाला जायचंच होतं. झाला प्रकार मनात घर करून बसल्यानं त्यांनी सकाळीच आज(मंगळवारी) कामाला न जाण्याचं ठरवलं. दिवसभर तोच तोच विचार करून त्यांना कसंसंच झालं होतं. न राहून दुपारी बारा एक वाजता ते त्या वाटेवर गेले. जिथून तो आवाज आला होता ती जागा नीट पाहिली. अगदी मोकळं शेत होतं ते. एक टुमदार मोठंसं भेंडीचं(रानटी) झाड सोडून बाकी फक्त शेत आणि शेतातलं पावसाचं पाणी. चिखलानं भरलेली वाट. दूरवर एक मोडकी झोपडी होती, गावात अशाप्रकारच्या शेतावर भाताच्या पेंढ्याने बांधलेल्या घराला "बेडा" असं म्हणतात.
तात्यांना त्या बेड्यात जायची इच्छा झाली पण त्यांनी स्वतःला आवरलं आणि ते घरी परतले.
आईला त्या बेड्याबाबत विचारले, आई भडकली, " तू जेलतास तयं? "
तात्यांनी नकारार्थी मान हलवली.
" तयं जावाचा नाय हो" आई म्हणाली. मंगळवारी आॅफिसला दांडी झाल्यावर आता बुधवारी मात्र जायचंच होतं. तात्यांनी आज बुधवारी कामावरून घरी येताना बाहेरच्या मोठ्या रस्त्याने परत येऊ असा विचार केला आणि कामाला गेले. काम करतानाही मनात रात्रीचं गणित सुरु होतं. काम संपलं, झालं सुटलं एकदाचं अॉफिस, वडखळ नाक्यावरून आत गावात जाण्यासाठी दोन रस्ते दिसले, एक ती भयावह शेतातली पायवाट आणि दुसरा तो जास्त चालावं लागणारा मोठा रस्ता. ठरवल्याप्रमाणे ते मोठ्या रस्त्याने गेले. मनात चलबिचल, द्विधा स्थितीत त्यांनी तेवढं तीन-साडेतीन किलोमीटर अंतर पार केलं. घरी पोहोचताच त्यांना हायसं वाटलं.

बुधवार उलटला, आज गुरूवारी पुन्हा कामाला निघायचं होतं आणि मोठ्या लांबच्या रस्त्याने जरा ठिक आहे असं वसंततात्यांना वाटून गेलं.. ते कामाला गेले. आज काम करताना त्यांच्या मनात कसलेच विचार नव्हते. आज आॅफिसमधे त्यांच्या जवळच्या मित्राचा वाढदिवस होता, घरून जरा लवकर निघून त्यांनी त्यांच्या त्या ( ज्ञानेश्वर) मित्रासाठी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक छानशी महागडी सेंटची बाॅटल घेतली. ते त्या विचारात होते. मग रात्री आॅफिस सुटल्यावर तात्यांच्या इतर मित्रांनी ज्ञानेश्वरकडे वाढदिवसानिमित्त हायवेच्या ढाब्यावर पार्टीची मागणी केली. ज्ञानेश्वर दादांनीही मागेपुढे न पाहता होकार कळवला. रात्रीचे १.०० वाजता ते हॉटेल काॅर्नरवर अंगणात आनंदाने खात होते. एकाही टेबलवर चिटपाखरू नव्हतं.फक्त वसंततात्या व त्यांचे ६-७ मित्र तिथे होते. वडखळ नाक्यापासून ७-८ किलोमीटर अंतरावरील ह्या ढाब्यावरील हा पार्टीचा खाण्याचा कार्यक्रम सुरु असताना वसंततात्यांच्या मनात मध्येच तो रस्ता येई. पण ते त्याकडे लक्ष देत नव्हते. दोघा तिघांनी मिळून ज्ञानेश्वर दादांसाठी केक आणला होता, ज्ञानेश्वर दादांनी तो कापला आणि छान पद्धतीने वाढदिवस साजरा झाला. ज्ञानेश्वर दादांनी सगळ्यांसाठी ड्राय चिकन लाॅलिपॉपच्या चार चार प्लेट घरी पाठवण्यासाठी पार्सल आॅर्डर केल्या होत्या. सगळ्यांचं पोटभर खाऊन झाल्यावर पार्सलच्या पिशव्याही आल्या.
"अरे ज्ञानेश्वरा , इकरं खाल्ला तवरा बेस झाला, यान काय हानलास आता? " एक जण म्हणाला.
" घरा घेऊन जा , बराच उशीर झालाय बग, चला निगा" यवढंच ते म्हणाले .
चार जणांकडे त्यांच्या बाईक्स होत्या, ते एकमेकांना शक्य तितक्या घराजवळ सोडून आपापल्या घरी जाणार होते. एव्हाना घड्याळाचा काटा दोन वर सरकत चालला होता.. किर्रर्र कुट्ट अंधार, निरव शांतता!
वसंततात्यांना एका मित्राने समीरने लिफ्ट देतो म्हणून सांगितलं, दोघेही बसले. समीरने त्याची लाॅलिपॉपची पिशवी तात्यांच्या बॅगेत ठेवायला दिली, उतरताना दे असं समीरने सांगितलं.. बाईकवरून जाता जाता तात्यांनी सोमवारी रात्री घडलेली हकीकत त्याला सांगितली. प्रसंग सांगताना समीरच्या अंगावर शहारे येत होते तो ऐकत होता. घाबरत होता पण बुडत्याला काठीचा आधार वाटावा तसा समीरला वसंततात्यांचा आधार वाटत होता आणि मनातल्या मनात वसंततात्यांना वाटत होतं की समीर बिनधास्त मुलगा आहे त्यामुळे तात्यांना त्याचा आधार वाटत होता. दोन्ही होड्यांचा भयंकर थरकाप चालू होता. वसंततात्यांनी समीरला विचारलं, " कापतंस कला रं? "

" थंडी परलीय नै " समीर उत्तरला.
" तुजी बोबरी कनाला वलली? " समीरने विचारलं..
" गार वारा सुटलाय नं " तात्या म्हणाले.
दोघंही आतून घाबरलेच होते आणि एकमेकांना त्यांचं घाबरणं लक्षात आलं होतं. एरवीपेक्षा हवा जरा जास्त थंड होती, बारीक मोठा पाऊस अधेमधे सुरुच होता. वडखळनाका जवळ येताना समीरने सांगितलं की " अरे वसंता, तुला मी वरखल नाक्यावं सोरतं "
तात्या म्हणाले, " ठिक " .
तात्या म्हणाले, " ठिक " .
" अरे वसंता, तुला रयवारी ती लग्नासाठी मुलगी बगाला जावाचा हाय नं? "
तात्यांनी नुसतं " हुं " केलं.
वडखळ नाक्यावर तात्या उतरले. समीरची पिशवी बॅगेतच राहिली. कसल्याशा विचारात तात्या चालू लागले, रविवारी मुलगी बघायला जायचंय हा एक विचार डोक्यात सुरु होता त्याप्रमाणे पैशाच्या जुळवा जुळवीचाही विचार चालु होता.. त्या तंद्रीमधे वसंततात्या अंगवळणी पडलेल्या पायवाटेवरच चालायला लागले, आपण कुठल्या रस्त्याने चालतो आहोत याचं त्यांना भानच नव्हतं. बराच वेळ ते चालत होते , दीड एक किलोमीटरचा पल्ला पार केला तरी त्यांना काहीच वाटलं नाही.. ते विचारात मग्न होते. आणि...

आणि...
पायामागून चालण्याचा आवाज येऊ लागला.. स्पष्ट आवाज!
आता मात्र वसंततात्या हादरले, गोंधळले, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली होती.. आता अर्धी वाट चालून झाली होती. सोमवारी रात्री " मी यव काय? " असा आवाज आलेली जागा थोड्याच अंतरावर होती.
आता मात्र तात्यांना घाम फुटला होता, पाय लटपटत होते.. पावलांमागून पावलांचा आवाज येतच होता. मागे बघण्याची हिम्मत ताकद नव्हती. चालत रहाण्यावाचून पर्याय नव्हता. इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था.
वसंततात्यांच्या अंगावर सारखा काटा येत होता.. तात्या देवांचं नामस्मरण करू लागले.. .
तसा मागून येणारा पावलांचा आवाज अधिकच मोठ्यानं येऊ लागला.. ही विचित्र परीक्षा सुरू होती.. देवाचं नाव घेणं बंद केल्यावर मागचा आवाज कमी येत होता.
तात्या पुन्हा देवाचं नाव घेऊ लागले, अंगावर कडक काटा उभा राहिला. लागलीच मागचा पावलांचा चिखलातून येणारा आवाज अधिकच मोठ्यानं येऊ लागला.. हा काहीतरी विलक्षण भयंकर प्रकार असल्याचं लक्षात आलं. आपण काय करणार आता ? काय करायचं? धावत सुटायचं का? धावताना पाय अडकून कुठे पडलो तर इथे वाचवायला कुणीच नाही... विचार खुंटत चालले होते.
देवाचं नामस्मरण व नामस्मरणाचा आवाज तात्यांच्या नकळत वाढत होता.
वसंततात्यांच्या खांद्यावर आॅफिसची बॅग, त्यात समीरची पार्सलची पिशवी, रिकामा डबा होता आणि हातात लॉलिपॉपची चार प्लेट पार्सलची पिशवी हालत होती.

एक वेळ अशी आली की अंगात प्रचंड शक्ती संचारुन तात्यांनी " जय बजरंग बली " अशी मोठ्यानं किंचाळी ठोकली..
आणि पलटून मागे बघितलंं आणि थांबले, मागे बघतच राहिले...
लॉलिपॉपचा घमघमाट जाणवत होता...
मागे कोणीच नव्हतं, हातातल्या बॅटरीने नीटसं दिसत नव्हतं , त्यांनी बॅगेतून एमर्जन्सीची दुसरी बॅटरी काढली.. दोन्ही बॅटऱ्या नीट चालत नव्हत्या.. मंद प्रकाश.
कोणीच दिसत नव्हतं.अचानक एकाच वेळी दोन्ही बॅटऱ्या लुकलुकायला लागल्या.. काही समजेनासं होऊ लागलं आता..

हवा टाईट!
घामाघुम अंग!
घामाघुम अंग!
त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली तोच , मागून कुणाच्यातरी पावलांचा आवाज चालू झाला..
" हा पोहोचलेला, भयंकर भूताटकीचा प्रकार आहे हे तात्यांनी ओळखलं.. "
तेवढ्यात

" मना दे खावाला " , " मना दे खावाला "...
असा घोघरा विक्षिप्त आवाज कानात घुमला, नेमका कुठुन आला तो आवाज कळलंच नाही.. आता मात्र पुन्हा वळायचं जमणार नाही , आणि वळुयाही नको असं तात्यांना क्षणभर वाटून गेलं. मागून पावलांचा पाठलाग व
छर्रर्र... छर्रर्र...छर्रर्र...छर्रर्र... असा चपलांसारखा चिखलातला आवाज चालूच!
" रातचा यता जाताना तेलकट खावाला हानाचा नाय कदी " हे गावच्या आज्यांनी सांगितलेलं त्यांना आठवलं.. आपल्या हातात तेलकट पार्सलची पिशवी आहे हे लक्षात येताच
त्यांनी लगेचच हातातली पिशवी चालता चालताच खाली सोडून दिली...

पिशवी सोडताक्षणी, पाठलागाचा आवाज चक्क बंद???
"आवाज बंद? "
पाठशिवणीचा खेळ शांत झाला होता.
वसंततात्यांना हायसं वाटलं..
ते चालत राहीले, नसती पीडा गेली असं मनोमन वाटून गेलं. अंगावर काटा येणं जाणं हा सरबत्तीचा खेळ सुरुच होता.
सोमवारी रात्री आवाज आलेली जागा आठ दहा पावलांवर होती...
आता नवीन टेन्शन घुमू लागलं, एखादा कमकुवत माणूस जागेवरच बेशुद्ध होऊन पडेल अशी वेळ. बॅटरी नावाला पेटत होत्या, भाताच्या गवताची दोन फुट वाढलेली दोन बाजूची हिरवळ व त्यातली निमुळती काळसर वाट अशी चाल चालू होती.

"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
नामस्मरण सुरूच होते..
नामस्मरण सुरूच होते..
आता काय?
पावलं भरभर भरभर भरभर...
चिपचॅप , चिपचॅप .. चिखलाचा आवाज..
सोमवारी आवाज आलेली जागा मागे टाकली, आज काही झालं नाही..
पुन्हा पावलं भरभर भरभर भरभर...
घरी पोहोचायची घाई.. लालबुंद डोळे...
तात्यांना वाटलं की झालं आता एक किलोमीटरची वाट राहिली आहे आणि घात प्रसंग टळला आहे.. आता शांत वातावरण आहे, आपण निवांत भरभर घरी जाऊ..

प्रसंग टळला आहे असे वाटता क्षणी,
मागे...
मोठा आवाज ...
"........च्यॅपर्रर्रर्रर्र..... "
जोरात पाय आपटल्याचा आवाज होता तो.. निर्धास्त झालेल्या वसंततात्यांना खूपच भिती वाटली..
" आज आपलं काही खरं नाही "
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"..
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"
"जय बजरंग बली" , "जय बजरंग बली"..
च्यॅपर्रर्रर्रर्र.....च्यॅपर्रर्रर्रर्र.....च्यॅपर्रर्रर्रर्र.....
च्यॅपर्रर्रर्रर्र..... पुन्हा आवाज सुरू..

आता मात्र तात्यांना काय करावं सुचेना झालं , पाय घसरून ते पडले. परत स्वतःला सावरलं, मागे वळून पाहिलं नाही...
तोच मागून....
तोच मागून....
"तेला पिसकीनचा खावाला दिलास , नं मना कोन देईन? याँव... याँव... याँव..."
घशात कफ अडकून जसा, घसा बसल्यावरचा आवाज असतो तसा खरखरीत आवाज आला..
त्याचं "याँव... याँव... याँव..." हे वाक्य फारच भितीदायक होतं.

समीरची पार्सल पिशवी बॅगेत असल्याची तात्यांना जाणीव झाली, त्यांनी ताबडतोप अख्खी बॅगच मागे भिरकावून दिली..
बॅगेची चैन उघडल्याचा स्पष्ट आवाज, आतून पिशवी काढतानाचा आवाज, पार्सलचा कागद उघडतानाचा आवाज तात्यांनी पुढे चालताना कान टवकारूनच ऐकला...
लाॅलिपॉप अत्यंत हावरट पद्धतीने आणि अधाशासारखं खात असल्याचा आवाज समजतत् होता. जोरदार वारा सुटला, गार वारा जाणवू लागला, एक पावसाची सर आली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला, मागून पाठलागीचा आवाज बंद झाला न झाला तोच समोर....

वाटेत...
एका शेतातून दुसऱ्या शेतात पावसाचं पाणी जाण्यासाठी जी दोन फुटी वाट असते व त्यावर लाकडी फळ्या व बांबू टाकून बनवलेला जो लाकडी पूल असतो त्यावर एक चित्र विचित्र माणसाच्या आकारातलं शरीर पूर्ण वाट अडवून बसलेलं दिसलं..
साधारण पंचवीस फुटाचं अंतर..
साधारण पंचवीस फुटाचं अंतर..
हि आकृती तात्यांकडे एकटक पहात असल्याचं तात्यांनी पाहिलं...
" डोक्यावर टक्कल, थोडे बहुत इकडे तिकडे वावरणारे केस, डोळ्यांची मोठ्ठीशी बुब्बुळे , किडलेले लाजत हसरे दात, किडकिडी शरीरयष्टी, उघडं शरीर, फक्त कमरेला एक लंगोटी, पाठीवर स्पष्टपणे दिसणारा पाठीचा हाडांचा कणा , गोल गोल फिरणारी नजर, चेहेऱ्यावर शिकार मिळाल्याचा आसुरी आनंद आणि गुमान गप्प शरीराची हालचाल , त्याच्या चेहऱ्यावर ओघळणारं भर पावसातलं पावसाचं पाणी.. "
समोरचं दृश्य थक्क करणारं होतं, तात्यांना चक्कर आल्यासारखं झालं.
ती समोरची आकृती मान हलवत आणि डोळे फिरवत घोगरा आवाज काढत म्हणाली,
" आज आमावशा हाय, य्ये!
य्ये, य्ये...! बरा मिललास.. "
य्ये, य्ये...! बरा मिललास.. "
पाऊस अजून गर्द झाला, जोरदार बरसू लागला..
आपण आज संपलो तात्यांनी असं मनोमन म्हटलं... ते जागचे जागीच थांबले, डोळे मिटले..
छातीवर हात जोडले आणि ओरडले..
छातीवर हात जोडले आणि ओरडले..
" जय बजरंग बली "
गावात पोहोचायला अर्धा किलोमीटर अंतर बाकी असावं, गावाची वेस दिसत होती पण दूर होती आणि वेशीवरची भूतं सहज सोडत नाहीत हे ही त्यांना नीट माहीत होतं.. क्षणभराच्या प्रार्थनेत तात्यांनी कुलदैवत व हनुमानाचा धावा केला आणि कोण अपरिमित शक्ती त्यांच्या अंगात अवतरली..
भयंकर उत्साह तात्यांच्या पायात जाणवला...

आता "आर या पार"
असेही संपलोच आहोत आता जीवाची ताकद एकवटून तात्या जणू काही त्याच्या अंगावर धावून जाऊन त्या आकृतीच्या मानगुटीवर बसणार अशी हल्ला चढवल्यासारखी प्रचंड धाव तात्यांनी त्याच्या दिशेने घेतली..
हलला तर ठिक नाहीतर आज याला तुडवूनच पुढे जाईन असं तात्यांनी ठरवत धावत राहिले..

" जय बजरंग बली " ... उठ, उठ, उठ..( धावतानाच तात्या ओरडत होते)
तो हलत नव्हता,
" जय बजरंग बली " ... उठ लवकर...
( तात्या जोरात धावतायत...)
तो तरीही हलला नाही,
तात्या त्याच्या दोन पावलांवर आले,
" उठ नायतं, तुरवतं बग तुला, तुजे आशीला तुजे... "
" जय बजरंग बली "
आणि,
तात्यांचा भरधाव वेगातला उजवा पाय त्याच्या अंगावर पडणार इतक्यात....
त्यांंनं त्या लाकडी पुलावरून बाजूच्या शेतात उडी घेतली, शेतातल्या पाण्यात, चिखलात उडी घेतल्याचा सस्पष्ट आवाज घेत तात्यांनी त्याला पार केलं..
भर चिखलात तात्या भरधाव वेगाने धावत होते, कसलंच भान नव्हतं आता गावाची वेस जवळ आली होती, पाय धावत होते, सरकत होते , तात्यांचे डोळे, चेहेरा पावसाच्या पाण्यात भरलेला..
धाव कमी होत नव्हती..

" सुटलास! , आज सुटलास..." त्याचा घोघरा मोठ्ठा आवाज मागून दोन तीन वेळा आला. तात्यांची धाव थांबली नाही, त्यांनी मागे पाहिलं नाही.
वेशीवर गावदेवीचं मंदिर होतं तिथल्या नारळ फोडायच्या जागेवर तात्या धावता धावता अडखळले, पडले... डोक्याला मार लागला.
डोकं कुण्या बाईच्या पायावर होतं, लाल भरजरी साडी, पायात पैंजण , लाल रंगातले तळवे..
तात्यांनी वर पाहिलं, साक्षात देवी उभी होती,
" मोठ्ठाले डोळे , मोकळे केस , भरभरून घातलेलं काजळ , कपाळावर भलं मोठालं कुंकू , नाकात मोठी पूर्ण सोन्याची नथ, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला गळा , एक हाती कमळ , एका हातात त्रिशूळ, एक हात तात्यांच्या माथी आणि एक आशिर्वादाचा खुला उभा उघडा उजवा हात.. पूलावर "त्यानं" उडी मारलेल्या जागी ती गावदेवी करड्या कडक रागीट नजरेने पहात होती...
तात्या मंदिराजवळच सकाळपर्यंत त्याच अवस्थेत बेशुद्ध पडले होतेे...
सकाळी गावातल्या लोकांनी तात्यांना घरी आणलं. न सांगता लोकांना अमावस्येच्या रात्री शेतातल्या पायवाटेवर काय झालं असावं याचा अंदाज आलाच होता...
तात्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सगळं सगळं सांगितलं.. आजुबाजूचे लोक, आई, बाबा , गणेशतात्या, वैशालीकाकू सगळे जण डोळ्यात पाणी आणून आणि -हृदयाच्या धडधडत्या ठोक्याने ऐकत होते..

आईने लागलीच गावदेवीला मंदिरात जाऊन नमस्कार केला..
"कोकणातल्या भूतकथा भाग ३ समाप्त"
(भाग ४ - क्रमशः)
(भाग ४ - क्रमशः)
काल्पनिक कथा। मांसाहाराच्या पिशव्या घेऊन चाललेल्याचया मदतीला बाजरंगबली येत नसतो. आणि देवी काय अशी कुणा पण ऐर्या गैर्याला दर्शन देते का?
ReplyDelete