विजय कुमार....विजय कुमार...कोण आहे हा विजय कुमार?? फिरस्त्या भिकाऱ्यांचे 3 खून झाले...प्रत्येक ठिकाणी रक्ताने एकच नाव लिहलेलं "विजय कुमार"
इन्स्पेक्टर अशोक यांनी आपल्या सहकाऱ्यांची सभा घेतली शांत सभेत त्याचे हे चिंताग्रस्त बोल पूर्ण हॉल भरून घुमत होते...कुणाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते...शेवटी मिटिंग मधून एक आवाज आलाच "सर..15 दिवसांपूर्वी विजय कुमार नावाचा एक परप्रांतीय माणसाची डेडबॉडी आपल्याला मिळाली होती...त्याचा काही संबंध ह्या 3 खूनांशी तर नसेल?"
अशोक जरा विचार करत राहिले "नाही नाही..मला नाही वाटत असे काही असेल...अहो..ती बेवारस डेडबॉडी...त्यात परप्रांतीय...आणि खून कुणाचे होतात बघा...भिकाऱ्यांचे...कुठेच लिंक नाहीय....ह्या नावाचा दुसरा कुणी तरी असेल"
तिकडून एक आवाज आला "सायेब मला तर हे प्रकरण वेगळंच वाटतय...परवा आमचे काही सहकारी पोलीस पेट्रोलिंग ला होतो..एक तरुणी केस सोडून फिरत होती रस्त्यावरून तिला आम्ही अडवलं...ति काहीच बोलत नव्हती. .तिला एकाने स्पर्श केला तेव्हा तिने आमच्या सहकारी मित्राला धक्का दिला...तो दूरवर जाऊन पडला आता तो ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये...हे काही तरी वेगळं प्रकरण आहे सर"
अशोक यांनी एक तीक्ष्ण नजर त्या आवाजाच्या दिशेने मारली आणि टेबलावर जोरात हात आपटून ते जरा रागातच म्हणाले "ओ शट अप यु....दारू पिऊन काम करता का रे??पोलीस ना तुम्ही...असल्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवता....माझी मुलगी प्राजक्ता 4 दिवसापासून आजारी आहे आजच तिला हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट केली म्हणून माझं ह्या प्रकरणाकडे लक्ष नाही...मला वाटलं तुम्ही सोल्व्ह कराल ही केस...पण तुम्हींतर ही असली फालतू कारणे सांगत आहात....ते काही नाही 3 खून झालेत...अजून नाही...शिंदे..त्या mg रोड वर होतात ना हे खून?? ठीक आहे...आज मीच जातो तिथे"
अस बोलून इन्स्पेक्टर अशोक यांनी सभा संपवली...रात्रीचे 11 वाजत होते...अशोक यांनी तयारी केली सध्या वेशात अंगावर एक घोगडं टाकलं...कमरेला त्यांची बंदूक होतीच...हातात एक थाळी त्यात काही चिल्लर आणि "खन्नन खन्नन" असे थाळीत पैसे उडवत ते चालले होते....भिकाऱ्यांचा वेष तर त्यांनी केला...आता प्रतीक्षा होती ती म्हणजे भिकाऱ्यांचे मुडदे पडणाऱ्या सिरीयल किलर ची....सिरीयल किलर च्या भीतीने रस्ता अगदी सामसूम होता...अधून मधून एखाद्या कुत्र्याचं भूकण्याचा आवाज येई....त्या भयाण शांततेत अशोक यांची नजर त्या खुन्याला शोधत होती.....अचानक त्यांना एक महिलेचा किंचाळीचा मोठा आवाज आला...तसे अशोक धावत धावत तिकडे गेले...सरळ रस्ता 100 मीटर वर एक साडी नेसलेली महिला आणि तिच्या छातीवर एक तरुणी बसली होती....आरडाओरडा आता शांत झाला होता....ती तरुणी तिच्या छातीवरून आता एका भिंतीकडे गेली... जरा जवळ गेलं असता अशोक यांना दिसलं की त्या बाईचं पोटं फाडल गेलंय...तिच्या पोटातून रक्ताचा सडा वाहत होता...आणि...रस्त्यावर रक्तच रक्त पसरलं होत...अशोक आता प्रचंड घाबरला त्यांनी बघितलं की तिच्या हातात त्या भिकारी फिरस्त्या महिलेची आतडी होती आणि त्या रक्ताळलेल्या आतड्याने ती काहीतरी लिहत होती...अशोक यांना खुनी सापडला होता ते धावत धावत त्या तरुणीच्या दिशेने गेले...तिच्या खांद्यावर हात टाकून तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला...पण ती जरा सुद्धा हालत नव्हती...तिच्या तोंडातून अमानवी असा गुरगुरण्याचा आवाज येत होता...तिचं लिहणे चालूच होत...अशोक सर्व ताकतीने तिला मागे ओढण्याचा प्रयत्न करत होते पण ती जागेवरून जरा सुद्धा हालत नव्हती...अचानक तिचं लिहणे थांबलं...
"कोण आहेस तू?? तुझा खेळ संपलाय..चल पोलीस स्टेशन मध्ये"
"कोण आहेस तू?? तुझा खेळ संपलाय..चल पोलीस स्टेशन मध्ये"
अशोक यांच्या या वाक्याने त्या तरुणीचे गुरगुरने वाढले "मैं नही आऊगां थाने" अशी अमानवी किंचाळी त्या तरुणीच्या तोंडातून बाहेर पडली..तिने मागे वळून बघितलं...तिचे केस तिच्या चेहऱ्यावर होते...तिचा चेहरा दिसत नव्हता....तिने अशोक चा गळा पकडला....अशोक ने तो हाथ सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिची ताकत अफाट होती...अशोकचा जीव गुदमरू लागला...त्यांनी आपला हाथ कमरेजवळ नेला आणि पिस्तुल काढलं....पिस्तुल बघून ती अजून चिडली आणि तिने अशोक ला एखादी बाहुली फेकवी तस फेकून दिलं...एका बेंच वर ते कोसळले आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं...ते स्वतःला सावरत होते....ती जोर जोरात गुरगुरत अशोक जवळ येत होती....
ती जवळ येऊन उभी राहिली....चेहऱ्यावर आलेल्या केसा मुळे अजून तिचा चेहरा अस्पष्ट होता... अशोक यांनी तिच्यावर बंदूक रोखली आणि चेहऱ्यावरचं रक्त पुसत तिला म्हणाले "कौन हो तुम??बतादो वरना गोली चला दूंगा"
हे शब्द ऐकून ती त्या भयाण आवाजात ती हसू लागली...तिच्या दातांची खट्ट खट्ट त्या भयाण शांततेला छेदत होती.....हातातील पिस्तुल बघून ती म्हणाली
ती जवळ येऊन उभी राहिली....चेहऱ्यावर आलेल्या केसा मुळे अजून तिचा चेहरा अस्पष्ट होता... अशोक यांनी तिच्यावर बंदूक रोखली आणि चेहऱ्यावरचं रक्त पुसत तिला म्हणाले "कौन हो तुम??बतादो वरना गोली चला दूंगा"
हे शब्द ऐकून ती त्या भयाण आवाजात ती हसू लागली...तिच्या दातांची खट्ट खट्ट त्या भयाण शांततेला छेदत होती.....हातातील पिस्तुल बघून ती म्हणाली
"तुम क्या मरोगे मुझे...मैं तो पहले से ही मरा हुवा हु....2 महीने पहले up से यहाँ आया था...क्यो..पता है तुमको??...अपनी बीबी जानसे से मारा था मैंने...साली दारू के लिए पैसा नही देती थी...मार डाला साली को..फिर पुलिस पड़ गयी पीछे...भागता रहा इधर उधर...फिर एक ट्रेन में बैठके आ गया इधर...इधर रहने लगा....2 दिन से कुछ खाया नही था...और काम तो कुछ आता नही था...भिक मांगने बैठ गया...तो ये साले भिकारी वहाँ भी परेशान करने लगे...उधर से भी भगा दिया इन्होंने....उस रात दारू की तलब लगी..तो एक सोये भिकारी के पैसे छीने और जाने लगा...तब ये साले भिकारी मारामारी पे आ गए...लहूलुहान कर दिया मुझे...फिर वहाँ से भागा...तब पैर फिसल कर गिर गया...सीधे एक नोकीले पत्थर पे...फिर क्या गयी जान इन भिखारियों की वजह से....भूत बन कर भटकता रहा...फिर एक दिन ये लड़की दिखी बहुत सजधज के जा रही थी साली दोपहर के 12 बजे...घुस गया इसके शरीर में...फिर क्या रात को निकलता और मार डाला इन भिखारियों को"
एका तरुणीच्या तोंडून येणारे हे भयाण पुरुषी आवाज आणि तिची ताकत अशोक यांना अनपेक्षित होती ..त्यानी जरा घाबरत प्रश्न केला "तो 15 दिन पहले यहाँ जो लाश मिली वो विजय कुमार तुम हो??
"हा हाँ वो मैं ही हु...और पुलिस वालों से भी मुझे नफरत है..तुझे भी मरना होगा साले""" अस बोलून एक भयाण किंचाळीने ती अशोक च्या दिशेने धावू लागली
समोरच्या अनपेक्षित दृश्याने घाबरलेले अशोक ती अमानवी शक्ती आपल्या दिशेने येत आहे हे पाहून अजून घाबरले आणि त्याने पिस्तुलाचा चाप ओढला
दोन गोळ्या फायर झाल्या...तशी ती तरुणी खाली कोसळली....हातातील बंदूक तिच्यावर रोखून धरत ते हळूहळू त्या निपचित पडलेल्या तरुणीकडे जाऊ लागले....खाली पडल्या मुळे तिचे केस मागे सरकले होते...तिचा चेहरा बघून अशोकच्या हातातली बंदूक खाली पडली....त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...त्यांनी गुडघ्यावर बसून तिला उचललं आणि....
दोन गोळ्या फायर झाल्या...तशी ती तरुणी खाली कोसळली....हातातील बंदूक तिच्यावर रोखून धरत ते हळूहळू त्या निपचित पडलेल्या तरुणीकडे जाऊ लागले....खाली पडल्या मुळे तिचे केस मागे सरकले होते...तिचा चेहरा बघून अशोकच्या हातातली बंदूक खाली पडली....त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...त्यांनी गुडघ्यावर बसून तिला उचललं आणि....
"प्राजक्ता sssss अग काय झालं हे...उठ...उठ...ए प्राजक्ता...अरे हे काय केलं मी"
ते तिला हलवत होते पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती आता फक्त एक देह होती...कारण तिचा जीव बंदुकीच्या गोळ्यांनी कधीच घेतला होता....अशोक आपल्या मुलीला कवटाळून रडत होते...अचानक फोन वाजला....फोन हॉस्पिटलमधून डॉक्टर चा होता...ज्या हॉस्पिटलमध्ये प्राजक्ता ऍडमिट होती
कसल्या तरी आशेने अशोक ने फोन उचलला तिकडून एक घाबरलेला आवाज आला
"हॅलो...इन्स्पेक्टर अशोक...तुमची मुलगी प्राजक्ता...हॉस्पिटल मधून गायब झालीय...आम्ही शोध घेतला पण कुठेच दिसत नाही तुम्ही ताबडतोब इकडे या"
ह्या वाक्याने अशोकच्या हातातला फोन गळून पडला प्राजक्ताच्या चेहऱ्याकडे बघत ते रडत होते....त्यांची नजर समोरच्या भिंतीवर पडली त्यावर ते शब्द त्यांना दिसले
"विजय कुमार का बदला पूरा हुआ"
No comments:
Post a Comment