अघोर भाग १२
अघोरी शक्त्या...सैताने....त्यांच ी भूक हि फक्त एकच गोष्टीवर असते भय...त्याचं अस्तित्व ते प्रथम दर्शवतात ज्याने करून सावज कुमकुवत पडेल त्याच मनोबळ खचेल आणि ते स्वतःच्या प्राणापोटी ‘त्या’च्या समोर आपले गुडघे टेकेल... संध्याच्या नजरेस जे पडत होत ते विश्वासने काही क्षणापूर्वीच मृत पाहिलं होत. संध्या विश्वासला त्याच्या जवळ उभी राहून खांद्यावर त्याला डवचू लागली...अनु हातात बाहुली घेऊनच विश्वासच्या बाजूला उभी राहून दरवाज्याकडे अगदी घाबरलेल्या नजरेने बघत बघत आपल्या बाबाच्या शर्टची बाही दोन्ही हातानी धरून चुरगळत होती विश्वासने तिथेच हेरले...पण चुकूनहि आपली नजर त्याने दरवाज्याच्या दिशेने केली नाही हळू हळू सायंकाळ झाली होती वाड्याच्या चहूबाजूनी सावकाश काळोख पसरायला सुरु झाला होता. संध्या पुढचा मागचा विचार न करता आपली पावले चौकटीत उभ्या बकुळा मावशीच्या एका पोकळ दृढशरीर विरहीत अश्या अघोरी शक्तीच्या एका देखाव्यांच्या दिशेनी वाढवायला सुरुवात करणारच होती. विश्वासने आपल्या मुलीकड पाहिलं जी गोष्ट संध्यापाहू शकत होती तीच गोष्ट अनु देखील परंतु अनुच्या चेहऱ्यावर भय होत विश्वासने तिला पाहिलं आणि तसेच तिच्या डोळ्यांवर हात ठेवत तिला आपल्या छातीशी कवटाळून घेतले विश्वासने पाहिलं कि संध्या दरवाज्याकडेच बकुळा मावशीच नाव घेत जाऊ लागली...तोच तीच मनगट कुणीतरी धरले तो विश्वास होता... “ संध्या...जाऊ नकोस तिकडे...” “ अरे विश्वास असे का म्हणतोयस...आणि तू बघत का नाहीयेस बकुळा मावशी आल्या आहेत खरच.बघ त्या दारात उभ्या आहेत... “बकुळा अशी हसतेयस काय ? आतमध्ये...;” संध्या तिला ये म्हणणार होतीच कि विश्वासने तीच नाव पुकारतच “संध्या....no.....”
“dont...” तिचा पुढचा शब्द रोखला...कारण विश्वासला कळून चुकले होते कि आमंत्रण देताच ती चौकट ओलांडून आत येऊ शकत होती. विश्वासने ते होऊ दिले नाही त्याने संध्याला हाताला धरूनच खाली आपल्या समोर बसवले आणि ओंजळीत तिचा चेहरा घेतला.. “pls dont..!.ती बकुळा नाहीये...”
“विश्वास अरे असा काय करतोयस ?” असे म्हणतच संध्या तिच्याकडे पाहू लागली तेव्हा विश्वासने ओंजळीनेच तिची मान अडवली...” नको संध्या नको पाहूस तिकडे....ती बकुळा नाहीये..” त्यावर संध्या वैतागली... “ विश्वास तू तिच्याकडे पाहत का नाहीयेस आणि ती स्वतः आली आहे...काय झालेय तुला ? असे का वागतो आहेस?” “संध्या मी तुला एक गोष्ट सांगितली नाहीये..जेव्हा मी सखामामा आणि जखोबा त्या विहिरी पलीकडे त्या जंगलात बकुळाला शोधायला गेलो तेव्हा तिथे आम्हाला बकुळाच ....” “बकुळाच काय विश्वास ?” “संध्या तिथे आम्हाला बकुळाच प्रेत सापडले....she is dead...she is no more alive...” संध्याला मात्र त्याच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नव्हता कि बकुळाचा मृत्यू झाला आहे..कुणीतरी तिचा खून केला आहे... संध्याच मन मात्र आता बिथरले नवऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाहीतर कुणाच्या बाजूला अनुला दडलेलं पाहून तिचा हि मनाने अटळ निष्कर्ष काढला...संध्याने विश्वासच्या डोळ्यात पाहिले त्यात तिला खरेपणा दिसून आला... “ श्शस्स...काहीही बोलू नकोस...मला समजल आहे...बस तिच्याकडे पाहू नकोस....संध्याहि विश्वासच्या उजव्या बाजूस येऊन बसली... “अनुsss.... अनुबीबीsss......” दाराच्या चौकटीतूनच बकुळाच्या रुपात आलेल्या त्या अघोराचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला..एका क्षणातच त्या आवाजाने विश्वास आणि संध्या दोघांच्याहि काळजाचा ठोका चुकवला...विश्वासने दोन्ही बाजूनी दोघीनाही घट्ट आवळून घेतले होते आणि आपल्या नजरा खाली घेतल्या होत्या..तो आवाज ऐकताच क्षणी छोट्या अनुने रडायला सुरुवात केली... “पपा...उंहू उंहू...” अनुने आता आणखीन जोरात रडायला सुरुवात केली... “ विश्वास...त...त ती आतमध्ये आलीय...” संध्याला तिच्या तिरकस नजरेने दरवाज्याची चौकट अंधुकशी दिसत होती. संध्याच म्हणन ऐकताच विश्वासने तिच्या खांद्यावर आपली पकड गच्च केली. दरवाज्यातून त्याने आतमध्ये पाउल ठेवल होत..बघता बघता आख्या वाड्यात अंधार पसरला होता डोळ्यांना जवळचे हि दिसणे अशक्य होऊ लागले...कदाचित हा त्याच पोकळ उपद्रवाचा परिणाम होता..बकुळाच्या त्या भयंकर रूपाने आतमध्ये यायला सुरुवात केली..चौकटीत पाय टाकून ती हळू हळू पुढे पुढे येऊ लागली होती...विश्वासने अनुला आपल्याशी घट्ट आवळून घेतल बाजूला संध्याला देखील संध्या आणि विश्वास दोघांच्याहि चेहऱ्यावर आता मृत्यूच भय होत कारण विश्वासने जे पाहिलं जे अनुभवल त्यानुसार बकुळा मृत असायला हवी होती. परंतु इथे जे आल होत ते मात्र विश्वास ठेवण्यापलिकडच होत...बघता बघता वाडा पूर्णपणे अंधारात बुडून गेला अगदी जवळ काय आहे ते सुद्धा दिसून येत नव्हत विश्वासने अनुला आता दोन्ही पायांच्या मधोमध घेतले... “संध्या....?” संध्याने देखील विश्वासच्या हातास घट्ट आवळून धरले... “बाळां..श्श्स...शांत पप्पा आहेत न..शुsss...” विश्वास अनुला शांत करायचा प्रयत्न करू लागला होता कि तोच.... “ठप.. ठप... ठप.... ठपsss” असे पावलांचे चालण्याचे आवाज येऊ लागले...अगदी पाठीमागून....चालता चालता बकुळाच्या रुपात आलेल्या त्या भयंकर अघोरी उपद्रवाच त्याच्या वास्तविक रुपात रुपांतर व्हायला लागले..बकुळाचे सुरकुतलेले पंजे त्याची बोटे होती त्या पेक्षा दीडपटीने वाढू लागली..अगदी धारदार नखे त्या बोटांच्या टोकावर उगवून येऊ लागली...
आणि तोच भयंकर पंजा विश्वास आणि संध्या दोघांच्या दिशेनी वाढत जाऊ लागला. विश्वासला कळून चुकले होते कि हा अंत आहे. आता दुसरा मार्ग नाहीये...आजवर कधीच त्याने देवाकडे धावा केला नव्हता किंवा कधी हात जोडले नव्हते विज्ञानवादी मनुष्य तो पण आज या शेवटच्या घटकामध्ये त्याने आपल्या कुटुंबासाठी मनात देवाचा धावा केला... वेग जणू मंदावलाच होता विश्वासने आपले दोन्हीच्या दोन्ही डोळे बंद केले...काळाने आपला भला मोठा जबडा त्यांना गिळण्यासाठी उघडला होता कि तोच “ठ्न्न ठ्न्न ठ्न्न ....” हा आवाज वाड्याच्या मुख्य प्रवेश द्वारावरच्या कडीचा होता त्या वाड्याच्या दरवाज्याची कडी कोणीतरी जोरात वाजवली होती. आणि एका व्यक्तीचा आवाज ऐकू आला... “ कोणी आहे का या वाड्यात ? कि भूत रहातात इथे.... ? स्वीट गर्लsss.... ?”
क्षणभराचाही अवधी लागला नाही विश्वासच्या पापण्या त्या आवाजानं फाडकन उघडल्या गेल्या. अगदीच ओळखीचा आवाज होता तो खूपच ओळखीचा जिव्हाळ्याचा...त्या आवाजाने त्या व्यक्तीच्या चौकटीत साधा पाय ठेवण्याने एक भला मोठा अनर्थ घडता घडता राहिला होता....त्याचा डाव फसला होता विश्वासमध्ये तर जणू एकप्रकारचे निर्भीड बळच संचारले...त्या व्यक्तीने आपल्या खिशातील लायटर काढले आणि खटकन ते पेटवले तसा त्याच्या चेहऱ्यावरती प्रकाश पडला...आणि इकडे फसलेल्या डावाने स्वतःच क्रोधात येऊन बकुळाच रूप घेऊन आलेल ते उपद्रव क्षणातच हवेत धूर होऊन उडून गेले...विश्वासने आपली मान वरती करून पाहिले तर विश्वासच्या चेहऱ्यावरती आनंद मावत नव्हता...तोंडात सिगरेट पेटवत तो व्यक्ती चौकटीत उभा होता. त्याला पाहताच विश्वासच्या मुखातून अगदी हर्षmy उद्गार बाहेर पडले...
“जयदेवsss...! .तू !” चौकटीत उभा तो दुसरा तिसरा व्यक्ती कुणी नसून खुद्द....जयदेव होता...तिथे त्या लायटरच्या उजेडात त्याचा चेहरा स्पष्ट दिसून येत होता. खांद्यावर एका बाजूने बँग अडकवून तो उभा होता. जयदेवने आपल्या हातातील लायटरने आजूबाजूला काही स्वीच वगेरे आहे का शोधले तसे त्याला एक कंदील दिसून आला जयदेवने त्याचा काच वरती केला आणि तो दिवा पेटवला...त्या दिव्याचा प्रखर असा प्रकाश आख्या वऱ्हांड्यात पडला...तसे जयदेवने समोरच्या प्रकाशात पाहिले कि कोणीतरी उभ आहे... प्रकाशात विश्वास ,अनु आणि संध्या दोघेही पुढे सरसावले... त्यांना पुढे प्रकाशात आलेल पाहताच जयदेवाच्या आनंदाचा पारावर राहिला नाही... “विश्वास....! माझ्या मित्रा! कुठे कुठे नाही शोधल मी तुम्हाला या गावात...”
“जयदेवा...! “ विश्वास त्याला पाहत म्हणाला... “ जयदेवा तुझे लाख आभार...लाख आभार..” असे म्हणतच विश्वासने जयदेवला एक आलिंगन दिले... “ विश्वास ? ठीक आहे न सगळ ?” त्यावर संध्या पुढे येत म्हणाली... “ नाही जयदेव...! इथे काहीच ठीक नाहीये...!एका भयंकर संकटात सापडलोय आम्ही सर्वे...”
जयदेव चिंताग्रस्त चेहऱ्याने त्यांना पाहू लागला दोघानाही धापा लागल्या होत्या घश्याला कोरड पडली होती मृत्यूच मुख त्यांनी पाहिलं होत... “ अंकलsss...” छोटी अनुने आपले रडणे थांबवले आणि संध्याच्या मिठीतून धावत जाऊन ती जयदेवला बिलगली... “oh माझी स्वीट गर्लsss.....”
“पण जयदेवा तू इथे आलास कसा ? तुला इथला पत्ता कसा मिळाला आणि..आणि ते पत्र ? तू पाठवलेल ते पत्र...”
“नाही विश्वास..त्या पत्राची आता गरज नाहीये...कारण मी आलोय...आणि तुझ्यासाठी ते नाही तर हे पत्र म्हत्वाच आहे.” जयदेवने आपल्या खिशातून ते पत्र बाहेर काढले...आणि विश्वास व संध्या दोघांसमोर ठेऊन दिले... “ हे पत्र सखाराम मामाच आहे...यात त्यांनी अश्या काही काही बाबी लिहिल्या आहेत कि...त्यांचा मलाही उलगडा झाला नाहीये...संध्याची ती स्वप्न, ते आभास हि गोष्ट साधीसुधी नाहीये...या मागे एक वेगळच रहस्य दडलं आहे विश्वास...माझ अंतर्मन मला सारख उठून इकडे येण्यासाठी हेलकावत होत...मी इकडे येण्यापूर्वी ते पत्र पाठवले होते तुझ्या नावाने...”
“जयदेवा..! आमच्यासाठी तुम्ही एवढ्या दूर आलात !” “संध्या ! अग अस बोलून तू मला परके करतेयस...अग आपण तिघे एकाच कॉलेजमध्ये शिकलो तिथे दिवस काढले माझ्या डोळ्यासमोर मी तुमच प्रेमांकुर फुलताना पाहिलं आहे...” विश्वास आणि संध्या दोघांनी एकमेकांना पाहून किंचित हास्य दिले...
“जयदेवा तुला जेवढ काही माहिती आहे...त्याहूनहि अधिक गोष्टी आहेत इथे...अगदी विश्वासापलिकडच्या आजपर्यंत यांची अनुभूती मी कधीच घेतली नव्हती पण आज माझ सर्व भौतिक जगातील शास्त्र कुमकुवत पडले...आज जयदेव मी देव आणि सैतान यांच्या मधील अंतर आणि त्यांची सीमा पाहिली... “हम्मsss...! मी आलोय या पत्रात विश्वास तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याची उत्तरे देणारा खरा अधिकरी मिळेल...”
“ कोण हाय का ?” वाड्याच्या बाहेर दोन तीन माणसे आली होती हातात कंदील घेऊन...तसे विश्वास आपल्या जागचा उठून उभा राहिला पाठोपाठ संध्याहि निघाली “चल माझी स्वीटगर्ल आपण बाहेर बघुयात काय चालू आहे...” जयदेवने तिला उचलून आपल्या खांद्यावरती टाकले आणि चालू लागला...जयदेव अनुला थोपटत जातच होता कि त्याला जणू असे काहीतरी जाणवले जसे कुणीतरी धावत धावत त्याच्या दिशेने येत आहे....जयदेवने मार्शल आर्ट्सचे कधी काळी क्लासेस घेतले होते त्याची बुद्धी आणि शक्ती दोन्हीहि एकत्रित ट्रेन होत्या..अचानक होणाऱ्या आघातान तो ओळखून होता...जयदेवाने काही क्षणाचा अवधी घेतला आणि तिथेच तो माघारी वळाला परंतु मागे कुणीहि नव्हत... “strange...!!”
“ कोण तुम्ही लोक ? इथे काय करताय ?” विश्वासने विचारले...तसे ते म्हणाले “ मालक आम्हाला सरपंचान पाठवलय तुम्हाला बोलण धाडावल हाय....आता देवळात गाऱ्हाण ठेवलाया....”
“अरे ! आत्ता आठवल...पण आता कसे जाणार आपण जयदेव नुकताच आला आहे आणि...”
“काय रे ? काय झाल ?” जयदेव बाहेर येत विश्वासला विचारू लागला.. “जयदेवा गावात या लोकांनी गाऱ्हाण घातलय...बोलावल होत यांनी...” “अरे मग चल...मी हि येतो..” जयदेव उत्साहाने म्हणाला. “ठीक तर मग गाडी इथेच आहे आपण जाऊन येऊ...” असे म्हणत विश्वासने बाहेरून दरवाजा बंद करून घेतला..आणि तो , जयदेव, अनु आणि संध्या चौघेही सरपंचाच्या वाड्यावर जायला निघाले...अमावस्याच्या काळ्या रात्रीत गडद ढगांनी पेहराव मांडला होता रात्रीच्या काळोखात आता डांबरासारखे काळे रात्रीच भयाण प्रीतीबिंब घेऊन धो धो कोसळू लागला... “इथल वातावरण खूपच विचित्र आहे...खूपच विचित्र...” जयदेव बाहेर पाहत म्हणाला...शेवटी त्यांनी गाडी बाहेर काढली व गावच्या दिशेनी निघाले...इकडे जखोबाने आपली वाट धरली होती मनात एक समज ठेऊनच तो इथे वाड्यावरती येत होता कि वाड्यात संध्या विश्वास आणि छोटी अनु सुरक्षित नसतील..पण सखाराम पुढे घडणाऱ्या भयानक घटनापासून अनभिज्ञ होता...
जंगलाचा मार्ग पार करून सखा पायवाटेला लागला होता. आणि संकटे आ वासून तिथे बसली होती.
सखाने आपला वेग वाढवला तो झपाझप आपली पावले टाकत पुढे निघाला होता...एक एक डाव खेळून तो आता एका एका प्राणाचा बळी देत होता. त्या बंद पत्रामागे दडलेलं सखारामच्या मनात कुजलेल गुपित काय असेल ? काय आहे ते गुपित?
“सखाsss.....!” एक भयंकर घोगरा आणि जीव घेणा आवाज त्याला एकू आला...कारण वीस वर्षानंतर हा ओळखीचा अगदी ओळखीचा आवाज त्याच्या कानावरती पडला... “गोविदपंत....” सखारामच्या अंगावरील एक न एक केस उभा राहिला होता भीतीने त्याची गाळण उडाली होती कारण समोर पायवाटेस अडवूनच गोविंदपंत बसला होता..मुंजा . एक समंध बनून....एक अघोर बनून...
क्रमश :

No comments:
Post a Comment