अघोर...एक प्रकांड भय. - लेखक कनिश्क हिवरेकर.
PART-10 ,PART-11 ,PART-12
लवकरच मित्रहो आपल्यासाठी मी हि नवीन कथा घेऊन येत आहे एक अद्भुत अशी भीतीने रक्त गोठवणारी अशी प्रकांड तांडवाची एक अघोर कथा...त्याची एक झलक खाली आहेच...
“ आईsss...! माझ्या आईला वाचवा कोणीतरी माझ्या आईला वाचवा...! नाही ... नाही आईssss...”
“स्सहंहssss...!”
संध्या एक मोठा श्वास भरत बेडवर ताडकन उठून बसली. घामाच्या थेंबानी तिचा चेहरा ओला चिंब झाला होता. हात पाय अजून हि थरथरत होते डोळे सताड उघडे नजर अगदी स्थिरावून गेली होती. मती जणू बंदच पडली होती तिची... तिच्या आवाजाने आणि पांघरूणाच्या सर्रकन अंगावरून सरकण्याने शेजारीच झोपलेला विश्वास तिचा नवरा जागा झाला... त्याने अंधारातच हात चाचपडत टेबलाकडे नेला आणि तिथल्या टेबल लेंपचा खटका ओढला तसा त्या बेडपुरताच मर्यादित प्रकाश दोन्ही बाजूनी उजळला... त्याने पटकन तिथला आपला चष्मा हातात घेतला व डोळ्याला लावून उठला... बाजूस अगदी स्तब्ध अवस्थेत घामाघूम झालेल्या संध्याच्या खांद्यावर त्याने आपला हात ठेवला... “संध्या ?.... ए संध्या ?”
विश्वासचा हात तिच्या खांद्यावर पडताच ती दचकली...खोली मध्ये किंचितसा प्रकाश होता. तिच्या नजरेसमोर त्या प्रकाशित भिंती पाहून तिला वास्तविक जगात आल्याची अनुभूती झाली... शुद्ध येताच तिने आपल्या आजूबाजूला पाहिले... “ विश्व....विश्वास ....म ...मी .. आई....”
“ शुsss .... शुस्स... शांत हो इकडे ये...” असे म्हणत विश्वासने संध्याला आपल्या जवळ घेतले व तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला “काय झाले ? पुन्हा तेच स्वप्न पडले का ?” विश्वासने बोलत बोलतच शेजारचा पाण्याचा ग्लास घेतला व संध्याला पाणी पाजले... “ संध्या... अग मी तुला कितीवेळा म्हटल कि आपण जाउयात त्या डॉक्टरकडे त्यांना एकदा भेटून येऊ ते नेमक काय सांगतील ते ऐकून तरी घेऊ...”
“ हम्म...” हुंकारत संध्याने आपले सुटलेले केस सावरले... “ ठीके...आपण जाउयात...पण त्या आठवणी मला माहिती आहेत त्या माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीत अश्याच रोज रात्री येऊन त्या मला छळतात... मला तो क्षण; फक्त ती एकच आठवण माझ्या मेंदूमध्ये विश्वास घर करून बसली आहे मी कितीही प्रयत्न केला तरी ती मी विसरूच शकत नाहीये...विसरूच शकत नाहीये...” बोलता बोलता संध्याने आपल डोक विश्वासच्या खांद्यावरती टेकवले समोरच भिंतीवरती हार घालून टांगलेल्या आपल्या आईच्या फोटोकडे ती एकटक पाहत राहिली... “ आईने मला वाचवण्यासाठी स्वतःला त्या आगीत...”
“ हे जर असच चालू राहिले तर एक दिवस माझ्या संध्याला वेड लागेल.... नाई नाही मी हे होऊ देणार नाही....मला...मला तुझ्या या आठवणी पुसण्यापलीकडे दुसरा कुठलाच मार्ग उरला नाहीये...”
***
“ सावित्रेssss .... अग ए सावित्रे... अगsss.... पुत्ररत्न होईल आपल्याला... पुत्ररत्न... त्या ... त्या त्र्यंबकाची इच्छा आहे... खाली ये...” हातच बोट आणि नजरा अवकाशाच्या दिशेने करत तिरकस भयंकर नजरेने वरती पाहत तो उद्गारत होता. वाड्याच्या त्या खिडकीतून बाहेर तो उभा होता दाट काळ्या पांढऱ्या भुवया... ओठांवर फंगलेल्या जाड मिश्या...लंबकार चेहरा सताड उघडे अंग लालभडक कुंकवाने कोपऱ्यापर्यंत भरलेले त्याचे हात होते... कंबरेपासून खाली पांढरे धोतर खोवलेल त्याचा आक्रोश आरोळी चित्कार संपूर्ण वाड्याच्या भोवती घुमत होता जिथे नाही तिथे त्याचा वावर होता वाड्यातली एक एक वीट त्याच्या भयान करड्या आवाजाला आघातासारखे घेत होती... संपूर्ण माथा कपाळ कानमाथा विनाकेसांच होत फक्त मानेवर काही केस जटेगत लोंबत होते... त्याच्या पुढ्यात अग्नीकुंड जळत होता आणि बाजूने पिंड ठेवली होती वाड्याच्या अवती भोवती त्याच्या आक्रोशाने सर्वत्र कावळे जमा होऊन काव काव करत सुटले होते घिरक्या घालत होते...त्या अग्निकुंडातून...त्याच्यातू न निघणाऱ्या पिवळाधमक ज्वालांमध्ये त्याचा चेहरा क्रूर, राक्षसी दिसत होता...लालभडक निखाऱ्यासारखे त्याचे डोळे भडकले होते अंगावरील रक्ताच्या नसा ताठल्या होत्या...
“ टंणssss टंणssss टंण.... टंण टंण टंण त्र्यंबका.... अरे मृत्युंजया....! स्वीकार कर.... ! स्वीकार कर.... स्वीकार कर्रर... सावित्रे.... मी आलो... मी आलोssss...!” असे म्हणत तो झप झप चालत वाड्याच्या दिशेने येऊ लागला...
“ आईssss मला खूप भीती वाटतेय... आई बाबा असे का करताय? असे का ओरडत आहेत ? आई...मला तुझ्यापासून दूर नाही व्हायचं आई...”
“ नाही बाळा संध्या मी तुला काही होऊ देणार नाही... मी आहे न.. मी आहे हं...”
सावित्रीने संध्याला उराशी घट्ट बिलगून घेतले होते आज मात्र त्याची हद्द पार झाली होती सावित्रीने आज मरण जरी पत्करावे लागले तरी बेहत्तर.. मनाचा ठाम निर्धार केला होता...आणि तितक्यातच...
“ धाडsss! धाडssss!” करत असे एका मागोमाग एक आवाज येऊ लागले तो आता वाड्यात आला होता एक एक करून त्याने प्रत्येक दरवाज्यावर लाथ मारत तो उघडून पाहायला सुरुवात केली होती... तो आवाज जवळ येत होता... अगदी जवळ ... आणि जवळ येता येता तो आवाज अचानक थांबला... चिमणीच्या उजेडात माय लेकी दोघी कोपऱ्यात धान्याच्या पोत्यांमागे दडून बसलेल्या होत्या...तसाच चर्रर चर्र चर्रर करत चामड्याच्या चपलांचा चरकण्याचा आवाज त्यांच्या दरवाज्याजवळ येऊन थांबला...काही क्षण एक भयान शांती पसरली होती आणि तोच क्षण आला... ओठ दाराच्या त्या फटीजवळ आणत अगदी हळूवार आवाजात तो उद्गारला...
“ सा....वी ...त्री....!”
लवकरच मित्रहो आपल्यासाठी मी हि नवीन कथा घेऊन येत आहे एक अद्भुत अशी भीतीने रक्त गोठवणारी अशी प्रकांड तांडवाची एक अघोर कथा...त्याची एक झलक खाली आहेच...
“ आईsss...! माझ्या आईला वाचवा कोणीतरी माझ्या आईला वाचवा...! नाही ... नाही आईssss...”
“स्सहंहssss...!”
संध्या एक मोठा श्वास भरत बेडवर ताडकन उठून बसली. घामाच्या थेंबानी तिचा चेहरा ओला चिंब झाला होता. हात पाय अजून हि थरथरत होते डोळे सताड उघडे नजर अगदी स्थिरावून गेली होती. मती जणू बंदच पडली होती तिची... तिच्या आवाजाने आणि पांघरूणाच्या सर्रकन अंगावरून सरकण्याने शेजारीच झोपलेला विश्वास तिचा नवरा जागा झाला... त्याने अंधारातच हात चाचपडत टेबलाकडे नेला आणि तिथल्या टेबल लेंपचा खटका ओढला तसा त्या बेडपुरताच मर्यादित प्रकाश दोन्ही बाजूनी उजळला... त्याने पटकन तिथला आपला चष्मा हातात घेतला व डोळ्याला लावून उठला... बाजूस अगदी स्तब्ध अवस्थेत घामाघूम झालेल्या संध्याच्या खांद्यावर त्याने आपला हात ठेवला... “संध्या ?.... ए संध्या ?”
विश्वासचा हात तिच्या खांद्यावर पडताच ती दचकली...खोली मध्ये किंचितसा प्रकाश होता. तिच्या नजरेसमोर त्या प्रकाशित भिंती पाहून तिला वास्तविक जगात आल्याची अनुभूती झाली... शुद्ध येताच तिने आपल्या आजूबाजूला पाहिले... “ विश्व....विश्वास ....म ...मी .. आई....”
“ शुsss .... शुस्स... शांत हो इकडे ये...” असे म्हणत विश्वासने संध्याला आपल्या जवळ घेतले व तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला “काय झाले ? पुन्हा तेच स्वप्न पडले का ?” विश्वासने बोलत बोलतच शेजारचा पाण्याचा ग्लास घेतला व संध्याला पाणी पाजले... “ संध्या... अग मी तुला कितीवेळा म्हटल कि आपण जाउयात त्या डॉक्टरकडे त्यांना एकदा भेटून येऊ ते नेमक काय सांगतील ते ऐकून तरी घेऊ...”
“ हम्म...” हुंकारत संध्याने आपले सुटलेले केस सावरले... “ ठीके...आपण जाउयात...पण त्या आठवणी मला माहिती आहेत त्या माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीत अश्याच रोज रात्री येऊन त्या मला छळतात... मला तो क्षण; फक्त ती एकच आठवण माझ्या मेंदूमध्ये विश्वास घर करून बसली आहे मी कितीही प्रयत्न केला तरी ती मी विसरूच शकत नाहीये...विसरूच शकत नाहीये...” बोलता बोलता संध्याने आपल डोक विश्वासच्या खांद्यावरती टेकवले समोरच भिंतीवरती हार घालून टांगलेल्या आपल्या आईच्या फोटोकडे ती एकटक पाहत राहिली... “ आईने मला वाचवण्यासाठी स्वतःला त्या आगीत...”
“ हे जर असच चालू राहिले तर एक दिवस माझ्या संध्याला वेड लागेल.... नाई नाही मी हे होऊ देणार नाही....मला...मला तुझ्या या आठवणी पुसण्यापलीकडे दुसरा कुठलाच मार्ग उरला नाहीये...”
***
“ सावित्रेssss .... अग ए सावित्रे... अगsss.... पुत्ररत्न होईल आपल्याला... पुत्ररत्न... त्या ... त्या त्र्यंबकाची इच्छा आहे... खाली ये...” हातच बोट आणि नजरा अवकाशाच्या दिशेने करत तिरकस भयंकर नजरेने वरती पाहत तो उद्गारत होता. वाड्याच्या त्या खिडकीतून बाहेर तो उभा होता दाट काळ्या पांढऱ्या भुवया... ओठांवर फंगलेल्या जाड मिश्या...लंबकार चेहरा सताड उघडे अंग लालभडक कुंकवाने कोपऱ्यापर्यंत भरलेले त्याचे हात होते... कंबरेपासून खाली पांढरे धोतर खोवलेल त्याचा आक्रोश आरोळी चित्कार संपूर्ण वाड्याच्या भोवती घुमत होता जिथे नाही तिथे त्याचा वावर होता वाड्यातली एक एक वीट त्याच्या भयान करड्या आवाजाला आघातासारखे घेत होती... संपूर्ण माथा कपाळ कानमाथा विनाकेसांच होत फक्त मानेवर काही केस जटेगत लोंबत होते... त्याच्या पुढ्यात अग्नीकुंड जळत होता आणि बाजूने पिंड ठेवली होती वाड्याच्या अवती भोवती त्याच्या आक्रोशाने सर्वत्र कावळे जमा होऊन काव काव करत सुटले होते घिरक्या घालत होते...त्या अग्निकुंडातून...त्याच्यातू
“ टंणssss टंणssss टंण.... टंण टंण टंण त्र्यंबका.... अरे मृत्युंजया....! स्वीकार कर.... ! स्वीकार कर.... स्वीकार कर्रर... सावित्रे.... मी आलो... मी आलोssss...!” असे म्हणत तो झप झप चालत वाड्याच्या दिशेने येऊ लागला...
“ आईssss मला खूप भीती वाटतेय... आई बाबा असे का करताय? असे का ओरडत आहेत ? आई...मला तुझ्यापासून दूर नाही व्हायचं आई...”
“ नाही बाळा संध्या मी तुला काही होऊ देणार नाही... मी आहे न.. मी आहे हं...”
सावित्रीने संध्याला उराशी घट्ट बिलगून घेतले होते आज मात्र त्याची हद्द पार झाली होती सावित्रीने आज मरण जरी पत्करावे लागले तरी बेहत्तर.. मनाचा ठाम निर्धार केला होता...आणि तितक्यातच...
“ धाडsss! धाडssss!” करत असे एका मागोमाग एक आवाज येऊ लागले तो आता वाड्यात आला होता एक एक करून त्याने प्रत्येक दरवाज्यावर लाथ मारत तो उघडून पाहायला सुरुवात केली होती... तो आवाज जवळ येत होता... अगदी जवळ ... आणि जवळ येता येता तो आवाज अचानक थांबला... चिमणीच्या उजेडात माय लेकी दोघी कोपऱ्यात धान्याच्या पोत्यांमागे दडून बसलेल्या होत्या...तसाच चर्रर चर्र चर्रर करत चामड्याच्या चपलांचा चरकण्याचा आवाज त्यांच्या दरवाज्याजवळ येऊन थांबला...काही क्षण एक भयान शांती पसरली होती आणि तोच क्षण आला... ओठ दाराच्या त्या फटीजवळ आणत अगदी हळूवार आवाजात तो उद्गारला...
“ सा....वी ...त्री....!”
No comments:
Post a Comment