पिंडदान.
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि. १५.०२.२०१७
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
आजची गोष्ट ही पालघर जिल्ह्यातील सालवड ह्या गावी घडलेली असून मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. सालवड ह्या गावी माझी मावशी राहायची. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मावशीकडे जायचो.
अशाच एका उन्हाळी सुट्टीत मी मावशीकडे गेलो होतो. एक दिवशी रात्री बाजूच्या घरामध्ये खूप गडबड चालली होती. बाजूच्या घरातील एका माणसाला त्याच्या घरच्यांनी दोराने बांधून ठेवले होते आणि तो सुटण्याचा प्रयत्न करत होता. (माणसाचे नाव मला माहित नाही आणि त्यावेळी ही नव्हते ) कोणालाही तो आवरला जात नव्हता. तो नाजीकच्याच बोईसर गावातील कुठल्यातरी कंपनीत कामाला होता. त्याची आई इतर लोकांना सांगत होती के आज हा कामावरून त्याची नाईट ड्युटी संपवून घरी आला आणि म्हणाला मला खूपच झोप आलीय मी झोपतो जरा. नेहमी सकाळी ७ च्या दरम्यान घरी येणार आज १२ वाजता घरी आल्याने मी त्याला विचारले की इतका वेळ का लागला आज त्यावर तो म्हणाला की मला काही नीटस आठवत नाहीय. त्याला काहीच आठवत नव्हत की तो इतका वेळ कुठे होता. मी परत त्याला सांगितले की काहीतरी खाऊन घे नाहीतर पित्त होईल पण तो म्हणाला की मला भूक नाहीय. एरवी तो काही खाल्ल्याशिवाय झोपत नव्हता. म्हणून मला वाटले की ह्याची तब्बेत तर ठीक नसेल ना, म्हणून मी ह्याच्या अंगाला हात लावून पाहिला तर त्याचे अंग एकदम थंड पडले होते.
मला ते जरा चमत्कारिक वाटले म्हणून मी त्याला म्हंटले की चल आपण डॉक्टर कडे जाऊया पण तो नाही म्हणाला म्हणून काळजीपोटी मी डॉक्टर ना घरी बोलविले. त्यांनी तपासणी करून सांगितले की ह्याचा जरासा BP लो झाला आहे पण काहीच घाबरण्याचं कारण नसून थोडा वेळाने तो व्यवस्तीत होईल. त्यांनी त्याला साखर पाणी किंवा लिंबू सरबत प्यायला द्या असे संगीतले आणि गरज पडली तरच हे औषध द्या असे म्हणून एक गोळीचे प्याकेट दिले आणि ते निघून गेले. त्यानंतर साधारणतः ६ ते ७ तास तो झोपूनच होता आणि त्याला त्रास नको म्हणून मीपण त्याला उठवले नाही. संद्यकाळी त्याला जाग आली तेव्हा मी त्याला सांगितले की जा अंघोळ करून घे परत कामावर जायचे आहे ना. मी तुझ्यासाठी काही खायला करते तो पर्यंत सर्व आवरून घे. काही वेळाने मला भांडी आपटण्याचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले तर हा शोकेस मध्ये ठेवलेली भांडी खाली फेकत होता आणि जोरजोरात ओरडत होता. त्यानंतर तो अर्वाच्य अशा शिव्या देऊ लागला आणि भिंतीवर डोकं आपटून घेवू लागला. मी पटकन त्याला येऊन पकडल पण तो पर्यंत त्याच्या डोक्याला लागून रक्त येऊ लागलं होतं. मी घाबरले आणि आरडाओरडा करून ह्याच्या बाबांना आणि बाजूच्या एकाला बोलावून ह्याला पकडून पलंगावर बसवलं पण तो काहीच ऐकून घेत नसल्याने बांधून ठेवले. हे म्हणून ती खाली बसून रडू लागली. तिकडे खूप लोकांची कुजबूज चालु होती. कोणी म्हणत होते की ह्याला भुताने झपाटले आहे तर कोणी म्हणत होते की ह्याला फिट आली असेल.
इतका सारा गदारोळ चालला असताना कोणीतरी बाहेरगाव हुन एका माणसाला घेऊन आले. तो भूत उतरवणारा असावा भगत असावा. त्याने घराची एक रूम साफ करायला सांगून तीच्या आत एक हळद, अबीर, कुंकू, आणि शेवटला सेंधव मीठ असलेलं आणि ४ घेरे असलेल एक वर्तुळ तयार केलं (आता ते वर्तुळं त्याच गोष्टींचं होत हे पण मला नीटस आठवत नाही पण आता माहिती असल्याने अंदाज बांधतोय) आणि समोरच दुसर छोट वर्तुळ आखून त्यात तो स्वतः बसला. त्यानंतर एका पळसाच्या पानात त्याने पानाच्या शिरा असतात त्याच प्रमाणे एक उभी रेष आणि बाकी आडव्या रेषा काढल्या. पहिले अबीर मग शेंदूर मग गुलाल मग कुंकू असे एकावर एक रेषा त्याने काढल्या. त्यावर एक लिंबू ठेऊन त्याचे ४ भाग केले आणि त्यात ह्याच सर्व गोष्टी भरल्या. त्यानंतर त्या कागदावर जरासा भात ठेऊन त्या भातावर एक पिठाचा दिवा पेटवून तो सर्व उतारा त्याने त्याच्या अंगावरून ७ वेळा उतरवला आणि त्याच्या एका माणसाला स्मशानात नेऊन ठेवायला सांगितलं. त्यानंतर त्याने समोर एक छोटंस हवंन कुंड ठेवलं. त्यानंतर बराचवेळ तो काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. काहीवेळाने हावनकुंडात त्याने आग प्रज्वलित केली आणि जशी पहिली आहुती दिली तशी आग जोरात पेटायला लागली आणि तो मुलगा जोर जोरात घुमायला लागला आणि वेगळ्याच आवाजात ओरडायला लागला. हे दृश्य पाहून मी खूप घाबरलो होतो पण मला ते बघायच पण होत. तो मुलगा म्हणाला की कशाला मला बोलावलंय, तुझं मी काय बिघडवल आहे. त्यावर तो माणूस बोलला के बोल कोण आहेस तू बोला. तर तो मुलगा बोलला की तुझ्या बापाचं काय जातंय मी कोण पण असेल.
हे ऐकून तो माणूस खूप संतापला आणि त्याने काही तांदूळ हातात घेऊन तोंडाशी नेऊन काही तरी पुटपुटून त्या हवन कुंडात टाकले तसे तो मुलगा जास्तच ओरडायला लागला आणि म्हणाला मारू नको मारू नको मी संगतो सर्व, मी सांगतो. ते ऐकून तो भगत बोलला की सर्व खर खर सांगितलं तर मी तुला मारणार नाही आणि सोडून देईन. त्यावर तो मुलगा म्हणाला की मी शरद. शिवाजीनगर (बोईसर मधला एक भाग आहे आता तिकडे खूप चाळी आणि दुकाने झाली आहेत. पूर्वी ओपन प्लॉट होते.) च्या इथे रस्त्याला लागून असलेल्या वडाच्या झाडावर राहतो. ह्याने काल मला ठेवलेला उतारा असलेला भात ओलांडला त्यामुळे मला रात्रभर उपाशी राहावे लागले म्हणून मी हे झाड धरले आहे. आता मी इकडेच राहणार असे म्हणून तो हसू लागला. त्यावर तो माणूस म्हणाला अरे सोड त्याला तुझा भात तर तुला मिळाला आहे ना. त्यावर तो म्हणाला की मला आता काळ्या पिसाच कोंबड पण पाहिजे, २ बोकड पाहिजेत, एक सोन्याची चैन पाहिजे, असे बरेच काही त्याने सांगितल्यावर चिढलेल्या भागताने त्याला सांगितले की तू जर आता ह्याला सोडला नाहीस तर मी तुला बाटलीत भरून जमिनीत खड्डा खणुन त्यावर घोड्याच्या लीद ने सारवून टाकेन मग १०० वर्ष तिथून तुझी सुटका नाही. तर तो हसायला लागला आणि म्हणाला की तू काय मीच तुझी वाट लावतो बघ परंतू त्याचे भगतापुढे काहीच चालले नाही शेवटी तो निराश होऊन म्हणाला की निदान मला कोंबड तरी दे. भागताने ते मान्य केल्यावर त्याला विचारले कि तू हे झाड कधी सोडणार त्यावर तो म्हणाला की जेव्हा कोंबड मला मिळेल लगेच मी ह्याला सोडून देईन. त्यावर भगत म्हणाला की आधी वचन दे की तू ह्या मुलाला काही करणार नाही. त्यावर तो हो म्हणाला आणि मुलगा खाली कोसळला. त्याला सर्वांनी उचलून पलंगावर ठेवल.
भुताच म्हणणं मान्य करून भगताने घरच्यांना सांगितले की तुमच्यापैकी कोणीतरी जाऊन त्या झाडाजवळ कोंबडा सोडून या आणि आज अमावस्या असल्याने रात्रभर ह्याच्यावर जागून पहारा ठेवा उद्या सकाळपर्यंत हा बरा होईल. आपण जर ह्याच्यावर काही जोर जबरदस्ती केली तर हा ह्याला इजा पोहोचवू शकतो. त्यानंतर भगतने काहीतरी मंत्र बोलून त्याच्या पलंगाभोवती वर्तुळ काढले आणि त्यांना काळजी घ्यायला सांगून निघून गेला. त्या नंतर सर्व लोकांची पांगापांग झाली. अचानक रात्री त्या घरातून परत खूप गजबजाट ऐकू येऊ लागला. तो मुलगा घरातून पळाला होता आणि कुठेच सापडत नव्हता आणि त्याला शोधायला गावातली माणसे मशाली घेऊन निघाली होती. त्याची आई खूप रडत होती आणि शेजारील बायका तिला धीर देत होत्या. रडता रडता ती म्हणत होती के हा म्हणाला कि आई मला वाड्यात लघुशंकेला जायचंय, चांगला नेहमीसारखा बोलत असल्याने मला वाटले की हा बरा झाला असेल म्हणून मी ह्याला जाऊ दिलं तर बराच वेळ झाला तर हा येत नाही म्हणून पहायला गेले तर हा कुठे गेला कोण जाणे. असे म्हणून ती परत रडायला लागली.
त्यांच्या वाड्याच्या (घराचं मागचं आवार) मागचा भाग खाडीचा असल्याने काही माणसे लगेच त्याच दिशेने निघाली. काही माणसे गावाकडे निघाली होती, काही परत भगताला आणायला गेली होती. समुद्राला ओहोटी असल्याने खाडीत जास्त पाणी नव्हते आणि समुद्राचे पाणी खूप लांब गेले होते. सर्वजण हाका मारत मशाली आणि ब्याटरी घेऊन शोधात असताना कोणीतरी त्याचाच सारखा माणूस खाडीच्या पैलतीरावर एका दगडावर गुडघ्यात डोकं घालून बसलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन बघितले तर तोच होता पण त्याला नीट शुद्ध नव्हती म्हणून लोकांनी त्याला उचलून घरी आणले. तो ज्या ठिकाणी बसला होता तो भाग खाडीचा असल्याने तिकडे खूप समुद्री दगड होते. त्याच्यावर खवले असल्याने लोकांचे पाय कपात होते. बरेच लोकांचे पाय कापून रक्त येत होते आणि गुडघाभर चीख्खल असल्याने सर्वांचे पाय पण चिखलाने माखले होते.
लोकांनी त्याला उचलून घरी आणले त्यावेळी सर्व लोकांचे कपडे, हात पाय चिखलाने माखले होते काही लोक भिजले होते पण एक खूप आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलाचे पाय आणि अंग एकदम सुके होते. खाडीवर गेल्याची एक ही खूण त्याच्या अंगावर नव्हती. सर्व लोक ह्याचाच आश्चर्य करत होती की सर्व जण माखून आले आणि हा एकदम सुका कसाकाय. त्यानंतर थोडयाच वेळात तो भगत परत आला आणि परत त्याने तसच सर्व मांडामांड करून उतारा करून मंत्र पुटपुटू लागला आणि त्याला उद्देशुन म्हणाला की तू तर वचन दिलेले की ह्याला काही करणार नाहीस मग हे काय सर्व. भगत त्याला सारखं विचारात होता परंतु बराच वेळ झाला तरी तो काही बोलत नाही असे पाहून त्याने अग्नी पेटवून पहिली आहुती टाकली त्या बरोबर तो मुलगा बोलायला लागला पण ह्यावेळी त्याचा आवाज वेगळाच येत होता त्यामुळे त्या भगताला संशय आल्याने तो परत बोलला की बोल तू कोण आहेस. त्यावर तो म्हणाला की मी धोंडू खाडीत राहातो. तेव्हा भगत बोलला की तू कशाला ह्याला पकडलं आहे त्यावर तो म्हणाला की मी ह्याच्या घराच्या मागच्या बाजूला बसलेलो असताना हा माझ्या अंगावर थुंकला म्हणून मी ह्याला पकडलेय. आता मी ह्याला सोडणार नाही.
तर भगत बोलला की ह्याने मुद्दामून नाही केले त्याला काय माहित की तू तिकडे बसला होता तू ह्याला सोडल नाहीस तर तुला कायमचा अंधाऱ्या विहिरीत बंद करून टाकीन आणि माझं ऐकलं तर तुला मुक्त होण्यासाठी पिंडदान करिन मग जे देवाला मान्य असेल ते होईल. बोल काय करतोस अंधाऱ्या विहिरीत जतोयस कि मग मुक्त होतोयस. त्यावर तो म्हणाला की मला आधी एक विडी द्या. भागताने इशारा दिल्यानंतर बाजूच्या एका माणसाने त्याला विडी पेटवून दिली. विडी पीता पीता अचानक तो रडू लागला. तो म्हणाला की गेल्या २०० वर्षांपासून मी इकडे अडकून पडलो आहे. माझा माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय होता.आम्हाला मूल बाळ होत नव्हते. माझ्यातच दोष होता तरी त्याचे खापर मी माझ्या बायकोवर काढायचो आणि तिला मारायचो. असेच एके दिवशी तिच्याबरोबर माझे कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात मी तिच्या डोक्यात वरवंटा घातला. राग ओसरल्यावर मला दिसले की ती निपचित पडली होती. मला खुप पच्छाताप झाला पण वेळ निघून गेली होती म्हणून मी पण खाडीत जाऊन जीव दिला पण माझ्या पापकर्मामुळे माझी सुटका होऊ शकली नाही. मरणानंतर मला कळले की माझी बायको चरित्रवान होती, पतिव्रता होती. तेव्हापासून मी त्या जागेवर बसून रडत असतो. असच मी रडत असताना हा माझ्यावर थुंकला आणि म्हणून मला राग येऊन मी ह्याला पकडले.
त्यावर भगत म्हणाला की जे झाले ते झाले आता तरी सुधार आणि ह्याला सोडून दे. मी तुला वचन देतो कि तुझ्या नावाने हा मुलगा पिंडदान करेल. पण जाण्याची खूण दे. हे ऐकताच तो म्हणाला की तुझ्यावर विश्वास ठेवून मी जातोय. मी जाताना दाराबाहेर ठेवलेली मोठी खुर्ची खाली पडेल. जारावेळाने ती खुर्ची खरोखर खाली पडली आणि तो मुलगा परत निपचित पडला. त्यानंतर भगताने त्याच्या गळ्यात एक दोरा बांधला आणि तो निघून गेला. काही दिवसानंतर त्या मुलाने पिंडदान केले असे ऐकले.
नमस्कार मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर लाइक करा आणि काही प्रश्न असतील तर कंमेन्ट करा. अनोळख्यां साठी पण पिंडदान करायची सवय करा त्यामुळे तुम्हाला पण त्याचा फायदा होऊ शकतो.
समाप्त.
अंकुश सू. नवघरे...
Disclaimer..
ह्या कथेत आलेल्या गावांच्या नावाचा उल्लेख करून माझा त्या गावांची बदनामी करायचा कुठलाही हेतू नाही. काही गावांची नावे ही फक्त संदर्भ म्हणून घेतली गेली आहेत त्याचा प्रत्यक्ष कथेशी काही संबंध नाही ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
...धन्यवाद...

No comments:
Post a Comment