कोकणातल्या भूतकथा-भाग २" यव काय " ( येऊ का? )
कोकणातल्या भूतकथा भाग- १ च्या "वांझल्यातला गिरा " या माझ्या कथेस आपण वाचकांनी दिलेले प्रेम व आपला प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद. आज पुन्हा आपणाला
कोकणातील पेण तालुक्यातील गावांत लोक शेतावर काम करत असताना, गावात रात्री कसं असतं ते सांगणार आहे . या गोष्टींबद्दल मनात विचार जरी आला तरी अंगावर काटा उभा रहातो. आता मी ही कथा लिहीताना रात्रीचे दीड वाजले आहेत, घरात सगळेच गाढ झोपलेले आहेत पण मला आज लिहावंसं वाटतंय.
त्याचं झालं असं की शाळा कॉलेजात असताना मी दरवर्षी मे महिन्याच्या सुटीत माझ्या आजीकडे जात असे. परीक्षा संपली की १५ एप्रिललाच मी आजीकडे (आईच्या आईकडे) वढावला जायचो. १५ एप्रिल ते १४ जून असे दरवर्षी २ महीने मी आजी-आजोबांबरोबर रहात असे. वढाव म्हणजे पेण एसटी स्टँड पासून ७ किमीवर बसलेलं गाव. मुंबई गोवा हायवेने जाताना रामवाडी एसटी स्टँड सोडलं की वाशीनाका नावाचा पूल आहे. त्या पूलाच्या उजवीकडे वाशी-कणे-वढाव-कान्होबा-काळेश्री-भाल अशी गावं आहेत. त्यातलं हे वढाव गाव. गावाचा ७० टक्के भाग खाडीने वेढलेला आहे. लहानपणापासूनच मी तिथे जात असल्याने तिथले सर्व मित्रमंडळ मला जवळून परीचयाचे आहेत. त्यांच्याबरोबर मी चिंबोरी(खेकडे) , कोलबी (कोळंबी) पकडायला आणि मासे पकडायला जातसे. विठू, गिरीश, संजामामा, हरेश, अमित, सतिश, दात्या, वाल्या, हरीभाव, अशी आमची गँग.
वास्तविक हे सगळे नात्याने माझे मामा लागत पण वयाने जवळ पास सारखेच असल्याने आम्ही मित्र म्हणूनच जगलो, हसलो, खेळलो.
दिवसभर कुणाच्याही घरात बिनधास्त हात घालून खायचं, कुठेही उठायचं, बसायचं, दुकानातूश चिंचा , बोरं, कै-या आणायच्या आणि मीठ मसाला लाऊन दुपारच्या वेळेत सगळे मिळून खायच्या, हे सगळं आज आठवलं की छान वाटतं. संध्याकाळी आजी
छानसं जेवण बनवायची, मी दिवसभर कुठे कुठे भटकलो ते विचारायची.. इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस असं हजारदा सांगायची. संध्याकाळी सात वाजले म्हणजे मुंबईतील रात्रीचे अकरा वाजल्यासारखं वाटे. साडेसात-आठला जेवण झालं की मी आणि आजोबा मिणमिणत्या ४० च्या बल्बच्या पिवळ्या प्रकाशात अंगणात बसायचो. छान गार गार वारा येई. अंगणातील दोन्ही बाजूंनी लावलेली भेंडीची झाडं(रानटी) झाडं छान वा-यावर हलायची. ती आवडायची तितकीच त्यांची भिती ही वाटायची. आजोबा उठून गेले की मी ही पळवाट शोधायचो आणि आजी किंवा आजोबांची पाठ धरत असे. त्या अंगणात रात्रीचे आठ नऊ नंतर एकटा कोण बसेल? बाब्बा बाब्बा...!

कधी कधी रात्री लघवीला आल्यानंतर आजी किंवा आजोबा मला अंगणातच घेऊन जात असत. मला आठवतंय नववीपासुन मला अशी रात्रीची लघवी आली की आजी आजोबांना उठवायला थोडी लाजच वाटायची, कित्येकदा मी तसाच झोपून जायचो पण रात्री एकटा अंगणात जाऊन लघवी करायची या विचारानंच मला घाम फुटायचा.
माझी दहावीची परीक्षा झाली आणि लगेचच मी आजीकडे आलो.. दरवर्षी सारखी धमाल चालूच होती.. एके रात्री मला लघवीला आली आणि खूप जोरात. मध्यरात्र!
मी पाणी खूप प्यायलो होतो बहुतेक आणि झोपायच्या आधी लघवीही केली नव्हती. घरात कुट्ट अंधार! आतल्या रूममधे आजी, माळ्यावर आजोबा आणि माझघरात मी एकटा झोपलो होतो. गेल्या वर्षीच्या सुटीपर्यंत मी आजी किंवा आजोबांच्या जवळ झोपायचो. कधीकधी आजोबा आणि मी अंगणात लाकडी( दोरीच्या) एकाच खाटेवर झोपायचो पण आता मात्र मला एकट्याला आवडायचं.

तर मी एकटाच माझघरात. अंधार ! मान वर करायची सुद्धा हिम्मत नव्हती. पण लघवी खूपच जोरात येणं काय असतं ते सांगायची गरज नसावी, मला झोप लागेना. मी ठरवलं की
आज आपण हिम्मत करू आणि जाऊ अंगणातल्या कोप-यात..
आता लघवी ही गावी काय कुठे काय, कोप-यातच! त्यामुळे अंगणात समोरच कसं जमेल?
आज आपण हिम्मत करू आणि जाऊ अंगणातल्या कोप-यात..
आता लघवी ही गावी काय कुठे काय, कोप-यातच! त्यामुळे अंगणात समोरच कसं जमेल?
मी धीर केला, उठलो... मेन दार उघडायचं होतं, हात उगीचंच कापत होते.. तरी मी दार उघडलं... बाहेरची निरव शांतता आणि सन्नाटा मला हादरवून गेला. मी अंगणातला पिवळा
बल्ब लावला तरीही तो विचित्र अंधारच वाटत होता, अंगावर आलेला अंधार. रात्रीचा दीड-दोनचा प्रहर. मी चप्पल घातली, चारीकडे बघत बघत पुढं गेलो, बाहेर पडायच्या आधीच पँटची चैन वगैरे उघडून पूर्ण तयारीनिशीच होतो.. अंगावर कडक शहारे आले होते..

एक एक पाऊल पुढे...
पाच फूट , दहा फूट...
टवकारलेले कान, चहुकडचा कानोसा..
पंधरा फूट....
कोपरा...
जुनी भेंडीची झाडं...
एका कोप-यात कार्यक्रम सुरू...
पाय पळण्याच्या पूर्ण तयारीत...
१० टक्के - २० टक्के - ३० टक्के....
लघवीचा आवाज...
कान टवकारून, डोळे फाडून चौफेर नजर......
धाकधूक धाकधूक... छातीचे ठोके नाॅनस्टॉप...
४० टक्के - ५० टक्के...
.....आणि
" यव काय....? , ही ही ही ही ही ssss , ही ही ही ही ही ssss "
असा असा झाडावरून बाईचा आवाज कानावर पडला...
कर्णकर्कश विचित्र घुमणारा आवाज, कडक शहारा..
मी अंग उडवलं...
पँट सुटली, खाली घसरली, पायात पाय अडकला, चप्पल गुंतली...
घराच्या दिशेने भरधाव पाय, , डोळे जमिनीकडे, पंधरा फूटाचं अंतर तेव्हा पंधरा कोस वाटलं...
परतीच्या धावेत ६० टक्के - ७० टक्के
पायरीवर पडलो, आपटलो... उठलो.
घरात प्रवेश केला
घरात प्रवेश केला
दार बंद करताना, तोंड बाहेरच्या दिशेला जाणार होतं, पाठमोरी भिती... पुन्हा अंगावर शहारा... मागे बघता येण्याची नसलेली ताकद...
पाठीमागून भयंकर विचित्र दबाव..
आत गेलो, दरवाजा लावलाच तोच बाहेर पैंजणांचा आवाज,
छनछन! छनछन! छनछन!
( वाचलास, वाचलास, वाचलास ! ही ही ही ही ही ssss )
भास की काय काहीच समजलं नाही.. कडी लावली नी थेट माळ्यावर पोहोचलो, आजोबांच्या कुशीत गेलो...
मी घाबरलो आहे हे आजोबांनी ओळखलं.
मी घाबरलो आहे हे आजोबांनी ओळखलं.
"काय झाला रं? "
" घाबारतंस कला? "
" कयं गेलतास? "
" घाबारतंस कला? "
" कयं गेलतास? "
माझी बोबडी वळली होती, मी गप्पच, आजोबा उठले, लाईट लावली तसं मला बरं वाटलं.
" कनाला घाबारतंस? " त्यांनी थोड्या रागात विचारलं...
" कनाला घाबारतंस? " त्यांनी थोड्या रागात विचारलं...
मी गप्पच..
त्यांनी माझं घाबरणं सीरीअसली घेतलं होतं, का ते माहित नाही. त्यांना माहित होतं की संदेश रात्रीचा आवाज दिल्याशिवाय चुकूनही बाहेर जाणार नाही. तरी ते मला खूणवून खूणवून विचारत होते...
मला सांगावंसं वाटत होतं पण तोंडातून आवाजच निघत नव्हता, घाबरून आवाज न निघणं काय असतं ते मी पहिल्यांदा अनुभवलं होतं. त्यांना राग येत होता.. ते जवळ आले..
माझ्या खांद्यावर हात ठेवले, पाठीवरून हात फिरवत आजीला आवाज दिला ,
माझ्या खांद्यावर हात ठेवले, पाठीवरून हात फिरवत आजीला आवाज दिला ,
" काय गो, उठतंस काय "
" बाला घाबारलाय, य्ये! "
" बाला घाबारलाय, य्ये! "
" बालाला काय झाला? "
" त्याचा बापूस कच्चा खाईल मना " म्हणत आजी ताडकन उठली आणि माळ्यावर आली.
" त्याचा बापूस कच्चा खाईल मना " म्हणत आजी ताडकन उठली आणि माळ्यावर आली.
" काय झाला बाला " तिच्या डोळ्यात पाणी होतं, तिनं मला कवटाळून जवळ घेतलं. त्या दोघांना काय समजलं त्यांचं तेच जाणो.
" बायेर वट्यावं गेलतास? " ( वट्यावं = ओट्यावर = अंगणात)
" ए बाला, वट्यावं गेलतास नै? "( ओट्यावर गेला होतासक ना)
" कोन दिसला? " ( कोण दिसलं)
" झारावं कोन हुता कय रं? " ( झाडावर कुणी होतं का? )
" आय्यं, य्यो बोलं नाय... " ( अरे देवा, हा बोलत नाही)
" बोलवी हुती काय रं कोन " ( कोणी बाई बोलवत होती काय रे)
" कोन दिसला? " ( कोण दिसलं)
" झारावं कोन हुता कय रं? " ( झाडावर कुणी होतं का? )
" आय्यं, य्यो बोलं नाय... " ( अरे देवा, हा बोलत नाही)
" बोलवी हुती काय रं कोन " ( कोणी बाई बोलवत होती काय रे)
मला १००% खात्री पटली की मी जे ऐकलं त्यात काहीतरी तथ्य होतं. मी अजून घाबरलो आणि
मला बोलता येईना झालं.
मला बोलता येईना झालं.
आजीने माझे दोन्ही ओठ ताणले, माझे दात हलत होते.
" आवं, दातखिल बसली पोराची " ( अहो दातखिेळी बसली ह्याची)
" आक्काला बोलवाला व्हया " ( अक्काला बोलवायला हवं)
" आक्काला बोलवाला व्हया " ( अक्काला बोलवायला हवं)
आजोबा खाली उतरले, बाहेर गेले... शेजारच्या आक्काला आवाज दिला, आक्का लगेच बाहेर आली. ( आक्का म्हणजे आजोबांची चुलत बहिण) . आजोबा आणि आक्का बोलत होते.
" मी बगतं थाप" ( मी बघते थांब) असं आक्का म्हणाली आणि ती थेट आत आली.
आक्का !
७० वर्षाची आजी. बुता-याची झाडू घेऊन आली, डोळे मोठे केलेले, कपाळावर मोठं कुंकू, कमरेला खोचलेला पदर, नववारी साडी... तावात माझ्या दिशेने आली...
" कोन हाईस बोल? " ( कोण आहेस बोल)
झाडूचा जोराचा फटका माझ्या अंगावर पडला.
झाडूचा जोराचा फटका माझ्या अंगावर पडला.
"बोलतंस काय रं? " " तू कोन हाईस? " ( बोलतोस की नाही, तू कोण आहेस? )
आक्काचं ते रुप भयाण होतं. झाडूचे फटके पडत होते, माझे दात कडकड कडकड वाजत होते. ती काहीतरी परीक्षा घेत होती.. मी रडायला लागलो. आजी आजोबा निमूटपणे बघत होते.
आक्काने मला हाताला धरुन बाहेर आणलं. आजुबाजूचे लोक, रघूअण्णा, सतीशची आई अशी चार पाच माणसं बाहेर आली होती. आक्कासमोर सगळे गप्प होते.
रघूअण्णा फार दयाळू आणि कोमल स्वभावाचे. जिल्हा परिषदेत काम करणारे शुद्ध भाषा बोलणारं व्यक्तीमत्व, त्यांनी मला चक्क उचलून घेतलं आणि..
रघूअण्णा फार दयाळू आणि कोमल स्वभावाचे. जिल्हा परिषदेत काम करणारे शुद्ध भाषा बोलणारं व्यक्तीमत्व, त्यांनी मला चक्क उचलून घेतलं आणि..
" बाळ, काय झालं सांग "
" घाबरायचं नाही बाळ "
" सांग सांग लवकर "
" घाबरायचं नाही बाळ "
" सांग सांग लवकर "
मला हायसं वाटलं. अंगणात सगळी मोठी मंडळी पाहून धीर आला
मी घाबरत घाबरत रडत रडत त्या भेंडीच्या झाडाकडे बोट दाखवून बोललो की इथे मी लघवी करत असताना असा असा प्रकार घडला. सगळे एकमेकांकडे प्रश्नार्थक बघत होते.
आजीने मला खाली उतरवलं आणि जवळ घेतलं. रघू आण्णा म्हणाले की " अरे तुला भास झाला"
आजीने मला खाली उतरवलं आणि जवळ घेतलं. रघू आण्णा म्हणाले की " अरे तुला भास झाला"
"आण्णा, भास नव्हता तो, मी स्पष्ट ऐकलाय तिचा आवाज आणि पैजणांचा आवाज "
" नाही आरे, आसं कधी असतं का " आण्णा म्हणाले.
" आण्णा, खरं सांगा " मी.
" आजी, तू तरी सांग, नाहीतर मी पुन्हा इथं कधीच येणार नाही "
आक्काला आवरलं नाही, ती म्हणाली ..
" तुला आव-या रातचा बायेर यवाला कोनी सांगला? " ( एवढ्या रात्री तुला बाहेर यायला कुणी सांगितलं?)
ती आजोबांवर खेकसली, " शिवाजी, तुला पोराला सांगता नाय आला काय? "
" संदेस रातचा बायेर कला निंगला? " ( संदेश रात्री बाहेर कसा गेला? )
रात्रीचे तीन वगैरे झाले होते, आजी मला आत घेऊन गेली. जमलेले सगळे निघाले .
आक्का घरात आली आणि माझघरात झोपली. मी, आजी आणि आजोबा सुद्धा माझघरातच चटई आणि घोंगडीवर झोपलो. मी आक्कालाच विचारलं,
" आक्का, नीट काय ते सांग "
आक्का आढेवेढे न घेता सांगायला लागली. " बग संदेस, इकरं गावान रातचा बायेर जावाचा नाय, तुजे आजूसला सांगाचा, तो न्हेल तुला, इकरं भूता खेता आसतान्, तुला म्हाईत हाय
कय रं? "
ती बोलत राहिली...
कय रं? "
ती बोलत राहिली...
" तू कला जेलास रातचा वट्यावं? , इकरं गावान नी शेतान यक बायको फिरतंय चार वरीस झालं.. तुला मना खरा खरा सांगाला व्हया , या बग मी काय सांगतंय ती बायको नव-यान टाकली व्हती नं तिनं तकरं खारीन जाऊन उरी मारली व्हती... आता निंगतं ती रातची नं भटाकतं गावभर नं शेतान बी जातंय दिवसा.. शेवंता तीचा नाव हो "
( तू का गेलास ओट्यावर? , इकडे गावात व शेतात गेली चार वर्ष नव-याने टाकलेली आणि खाडीत जीव देऊन मेलेल्या शेवंताचं भूत निघतं , ती जीव घेते)
माझं अंग कापू लागलं. आक्का म्हणाली , " बग तुला सांगतंय, तुला सांगला म्हंजी तू संभलून -हाशील"
" यकदा मी नं तुजी आजीस दुपारचा जेवान करून शेतान जेलतू , नं आमी दोगी बियानं टाकी हुतू ..
तं झारावं लटकून यी बया आली नं आमचेकरंं बगीत रायली... "
" मान वाकरी नं दात बायेर कारलं, केस जमनीला टेकं हुतं.. "
" आमी गप रायलू, तुजी आजीस जाम घाबारली हुती, आमी आमचा काम करी हुतु नं ती बगीतच हुती.., पान्याच्या मटक्यावं तिनं हात मारला, ह्ये लांब लचक हात, मी पून घाबारलू , नं ती किकालली .."
" यव काय ... ही ही ही ही ही ssss ,ही ही ही ही ही ssss "
शेवंताच्या तोंडूंन हडळीचे स्वर निघाले.
( विस्कटलेले लांब सडक केस, भरपूर काजळ भरलेले मोठ्ठाले वटारलेले डोळे , कपाळावर मोठ्ठंसं कुंकू, विचित्र असे बाहेर आलेले दात , तरूण चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या , हातात बांगड्या, पायात पैंजण असं तिचं रुप...)
तिचं शेतात " यव काय " विचारणं भयानक होतं .
" वयनी , चल निंगू आपुन घरा जाव " आक्का म्हणाली.
हडळ बोलली, " दोगींना पून न्हेईन मी खारीन " ( दोघींना मी खाडीत नेऊन मारीन)
" मी नं तुज्या आजीसनी शेवंताकरं बगलाच नाय नं आमी शेतातून बायेर आलू नं घरची वाट धरली , तशी ती चालत व्हती मागं मागं "
( मी आणि तुझ्या आजीने तिच्या कडे बघितले नाही, आम्ही शेतातून बाहेर आलो आणि घरच्या वाटेला लागलो, ती मागे मागे येत होती)
( मी आणि तुझ्या आजीने तिच्या कडे बघितले नाही, आम्ही शेतातून बाहेर आलो आणि घरच्या वाटेला लागलो, ती मागे मागे येत होती)
" मी सोराचू नाय आज, ही ही ही ही हीssss " ती मोठ्यानं विचित्र हसली.
( मी सोडणार नाही, ही ही ही ही ही ssss )
( मी सोडणार नाही, ही ही ही ही ही ssss )
" तव-यान गावची इठोबाची पालखी आली, पालखी दुसऱ्या गावाला निंगली हुती , आमाला बरा वाटला , आमी दोगी बी पालखीच्या मानसान घुसलू.... नं आमी मागं बगला , ती बगी हुती ..."
" वाचलीव दोगी बी " शेवंता रागात बोलली नी नायनाट पलून गेली..
( दोघी वाचलात...)
( दोघी वाचलात...)
नंतर यकदा दोनदा शेवतानं दोन तीन बापयांना( पुरुषांना) खारीन ढकलून मारला, आता आठ- दहा मानसा आसतील तरच आमी शेतावं जातू आनं रातच्याला कोनी बी यकटा बायेर परं नाय.. " आक्का म्हणाली.
" तुला निंगूत आवाज दिला ती शेवता हुती, वाचलास बाला "
( तुला आत्ता आवाज दिला ती शेवंता होती, वाचलास)
( तुला आत्ता आवाज दिला ती शेवंता होती, वाचलास)
" वाचलास बाला "
आणि आजी रडू लागली...
( कोकण भूतकथा भाग २ समाप्त)
( भाग ३ क्रमशः...)
( भाग ३ क्रमशः...)
Mast sotry I love this story
ReplyDelete