मसणवाट!
'हॅलो sss, रिक्षेने उतरलेय मी, आता पुढे कुठल्या दिशेने येऊ?'
'तशाच पुढे या...'अमर' कॉम्प्लेक्स विचारा!'
'अहो चौकात उभी आहे मी, नक्की कुठल्या दिशेने पुढे येऊ? काहीतरी लँडमार्क सांगा.'
'वैकुंठ स्मशानभूमी विचारा, वैकुंठ स्मशानभूमी...'
'काय???स..स..स..स्मशान? तुम्ही जरा चौकात घ्यायला येता का प्लिज?'
'अहो त्यात काय? रस्ता सोप्पाय, मी खिडकीतून दिसेनच तुम्हाला. ही बघा नुकतीच एक चिता पेटली, ज्वाला दिसतील, त्याच्या डाव्या बाजूने आत या.'
'डावी बाजू??? पण कोणाची?'
'अर्थात, स्मशानाची!'
'नाही नको, पुन्हा येते कधी....ब..ब..बाय.'
'अहो पण...'
फोन कट............…................

'हॅलो, अहो एवढ्या काय घाबरताय? थांबा मी येतो. तुम्ही चौकातच थांबा.'
'बरं, लवकर या.'
'बरं, लवकर या.'
'नमस्कार. पहिल्यांदाच आलेल्या दिसताय या भागात? हरकत नाही. एवढं काय घाबरता स्मशानाला? चला.'
'व्हॉट डु यु मिन घाबरता? घाबरण्याचीच गोष्ट आहे ही! याआधी आपलं बोलणं झालं, तेव्हा काही तुम्ही याची कल्पना दिली नव्हतीत.'
'अहो, कल्पना काय द्यायची यात? माणसं तिथे वस्ती, वस्ती तिथे समाज, समाज तिथे स्मशान...हे बघा हे आलं स्मशान. इथून पुढे डावीकडे वळा असं म्हटलं होतं मी.'
'प..प..पुढे चला हो लवकर. ही काय दाखवण्याची गोष्टय? किती दूर आहे अजून?'
'हे आलं 'अमर' कॉम्प्लेक्स! अगदी हाकेच्या अंतरावर आहे!'
'कोणाच्या?'
'जो हाक मारेल त्याच्या!'
'हूंह! पाचवा मजला, लिफ्ट आहे ना?'
'हो आहे नं, पण नेमकी आज बंद पडलीये. कधीतरीच होतो प्रॉब्लेम, बाकी इतर वेळी पुष्पक विमानातून वर जावं तशी अलगद आपल्याला वर नेते.'
'वर कुठे?'
'आपल्या मजल्यावर हो! पण आज जरा चढावं लागेल तुम्हाला. लिफ्ट बंद म्हणून मी फोनवरच तुम्हाला पत्ता सांगत होतो. पण तुम्ही...असो!'
'बापरे, केवढा काळोख आहे. लाईट व्यवस्था नाही का?'
'आहे नं, नेमके आज कॉरिडॉरचे लाईट गेलेत. म्हणून तुम्हाला मी सकाळी या म्हटलं होतं. तर तुम्ही संध्याकाळी....'
'बरं झालं ना, त्यामुळे काय काय बंद आणि काय काय 'नेमकं' सुरू आहे ते कळलं. बास अजून चढवत नाही मला. आला की नाही पाचवा?'
'अजून एक मजला, मग आलं घर. आम्ही काय सरावलो आता सगळ्याला.'
'सरावलो म्हणजे? लिफ्ट नेहमी बंद असते, असच ना?'
'अहो ते नाही, लिफ्ट सुरू असते. ते स्मशान वगैरेला'
'बरं बरं. कळलं. हुश्श! अवघड आहे हो. १८७ पायऱ्या...माय गॉड... फारच झालं....गेल्या गेल्या पाणी द्या आधी!'
'अहो आज नेमकं...'
'पाणी नाही आलं?????'
'नाही हो, पाणी आलं आणि नेमकं दिवसभर आहे, असंच सांगत होतो. एरव्ही सकाळी ९ पर्यंतच असतं. बसा. फॅन लावतो...अरेच्चा! इथलेही लाईट गेले की काय? ओह, नाही नाही. चुकीचं बटन दाबलं गेलं. झाला सुरू फॅन. बसा इथे खुर्चीत. अगं, जरा पाणी आणतेस का? मलाही आण थोडं.'
'घर तर छान दिसतंय. पण येईपर्यंत अगदीच घाबरगुंडी उडाली होती माझी. वर आल्यावर अगदी प्रसन्न वाटतंय.'
'वाटतंय ना? म्हणूनच थांबवलं तुम्हाला. घर बघा, मग ठरवा. पण तुम्ही स्मशानभूमी पाहूनच...'
'त..त..तो विषय कशाला सारखा काढताय? बरं...बिल्डिंगमध्ये साधारण किती बिऱ्हाडं आहेत? लहान मुलांचा आवाज आला नाही?'
'अहो ती नेमकी...'
'नेमकी????'
'अहो, म्हणजे ती नेमकी अजून शाळेतून आली नाहीयेत. आली की नुसता हैदोस घालत असतात. पण एक बरंय. त्यांच्यामुळे परिसर जिवंत वाटतो, नाहीतर नुसती मसणवाट!!!...अहो हे काय, अशा ताडकन उठलात का?'
'तुम्ही सारखं घाबरवताय? स्मशान, मसणवाट वगैरे. मला भीती वाटते या शब्दांची! हे एव्हाना तुम्हाला कळायला हवं होतं.'
'जिथे सर्वांचाच शेवट होणारे, अशा ठिकाणाला काय घाबरायचं? मी तर म्हणतो, उलट ही आपली सोय आहे. मरण डोळ्यासमोर दिसू लागलं, की आपणहून चालत जायचं नि झोपायचं. उगीच जाता जाता चार खांद्यांना आपला भार नको. अग्नी द्यायलाही कोणी नसेल, तर थेट विद्युतदाहिनीवर जाऊन शेवटचा निरोप घ्यायचा.'
'तुम्ही फारच डेंजर आहात. काय वाट्टेल ते बोलताय. बापरे, एवढा भयानक वास कसला येतोय?'
'जळलं वाटतं पूर्ण. मगाशी तुम्ही येत असताना चिता लावलेली ना त्याचाच हा वास!. ही पहा खिडकीतून स्पष्ट दिसतेय. आम्हाला या वासाची सवय झाली. तुम्हालाही होईल. आता आम्ही एवढे सरावलो आहे इथल्या परिसराला, की शुद्ध हवेत आम्हाला कोणी नेलं, तर आम्ही आजारी पडू!'
'पुरे तुमचं स्मशान पुराण. निघते मी. ऐकून ऐकून चक्कर येऊ लागली. प्लिज मला सोडायला जरा चौकापर्यंत येण्याची तसदी घ्या.'
'ठीकाय! जशी तुमची इच्छा. खरं तर लवकरच ही बिल्डिंग रिडेव्हलोपमेंटला जाणार आहे. इथे मोठा टॉवर उभा राहणार आहे. वाढीव जागा मिळेल. आताची बिल्डिंग करबरीस्तान बुजवून बांधली होती, पुढे मागे स्मशानाची जागा काबीज करून आणखी मोठा कॉम्प्लेक्स करण्याची शक्यता आहे. मग ना तुम्हाला मसणवाटेची भीती राहणार, ना प्रेत जळाल्याचा वास येणार. मात्र सतत येणाऱ्या अंत्ययात्रांमुळे नेहमीची वर्दळ जरा कमी होईल एवढंच.'
'आता प्लिज निघूया, नाहीतर इथून मी परस्पर वर जाईन असं वाटतंय!'

© ज्योत्स्ना गाडगीळ
No comments:
Post a Comment